Skip to main content

नकोसे वाटते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते? कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे" मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी? संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!
लेखनविषय:

वाचने 6350
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते? मस्तच... सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" व्वा... :) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

"सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" एकंदरीत जब-या. (कसं सुचतंब्वा तुम्हांला ) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी? संकटांना एकटे येणे नकोसे वाटते! फारच छान.... =D> =D>

कोणता शेर आवडला असे विचारले तर अख्खी गझलच द्यावी लागेल. मस्तच गझल.. खूप आवडली ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

In reply to by ऋषिकेश

खरंच कशा सुचतात तुला इतक्या छान ओळी?? सावलीची कल्पना तर =D>

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"
क्या बात है ! अप्रतिम !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

गद्य लिहिणे एक गोष्ट, पण इतकी सुंदर कविता? तीही इतकी वृत्तबद्ध? राम, राम! किंवा लाहोल बिलाकुवत (क्रांतीताईंना ही अभिव्यक्ती कदाचित जास्त आवडेल!) आपुनको आताइच नहीं| सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

जबरदस्त ! अप्रतिम !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"
मस्तचं..

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते! नेहेमीप्रमाणेच सुरेख !!:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

क्रांती तुझ्या कविता नेहमीच मनाचा ठाव घेतात. सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" हे उच्च!! - प्राजक्ता http://www.praaju.com/

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी? संकटांना एकटे येणे नकोसे वाटते! हे मात्र एकदम पटले....... वेताळ

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" हे विशेष आवडले.. :)

सावलीची कल्पना सरस! कविता नेहमीसारखीच...

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते हे खूप आवडले

नेहेमीप्रमाणेच छान कविता. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

फारच छान आहे गझल

सुंदर कल्पना आणि कल्पनाविस्तार. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

बरेच दिवसांनी तुमची सुरेख गजल! देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" तसे सर्वच आवडले पण त्यातही हे दोन शेर विशेष वाटले! :) चतुरंग