Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता

एस's picture
एस in मिपा कलादालन
5 Dec 2014 - 4:57 pm

डिस्क्लेमर १ - खालील कैच्याकै क्यालिग्राफी उर्फ सुलेखन पाहून कोणाला आम्हांस शिव्या द्यायची इच्छा झाल्यास अवश्य द्या. ;-) आमच्याकडून हे पातक करवून घ्यायची कल्पनेची आयडिया ही मिपाचे माननीय सुपरशेफ गणपाशेट यांची आहे. तेव्हा खालील कित्त्यांकडे पाहून कोणाला जे काही वाटेल ते सर्व मिररवरून परावर्तित होऊन त्यांच्याकडे जाणार आहे. यात त्यांना आमचा पत्ता देणार्‍या माननीय पैसाताईंचापण वाटा आहे.

डिस्क्लेमर २ - आपल्याला द्येव्वनाग्री क्यालिग्राफी काही येत नाही. तेव्हा चुकल्यामाकल्या वळणांकडे दुर्लक्ष केले जावे. खाली दिलेली उदाहरणे ही इंडिकेटिव्ह आहेत. फॉन्ट-फॉन्टमध्ये फरक असू शकतो. माझ्याकडे देवनागरीसाठी वापरला जाणारा बोरू वगैरे नव्हते. नेहमीचा जो डावीकडे कातरलेला बोरू बाजारात मिळतो तो रोमन लिपीच्या कॅलिग्राफीसाठी योग्य असतो. त्याने देवनागरी सुलेखन करता येत नाही. देवनागरीसाठी उजवीकडे कातरलेला बोरू मिळतो, तो घ्यावा. तसेच शाई वापरावी. त्यासाठीही खास गडद शाई मिळते. मी खालील सुलेखन हे घरात बरेच दिवस पडून असलेल्या साध्या A-4 कागदांवर काळ्या जलरंगाने व चार नंबरच्या सपाट (फ्लॅट) ब्रशने केले. त्यामुळे त्या कागदांचा सदुपयोगपण झाला आणि जलरंगांच्या पेटीतील कधीही न वापरला जाणारा एक रंगही संपला! (FYI: जलरंगचित्रणात काळा आणि पांढरा रंग वापरला जात नाही. कागदाचा पांढरेपणा आणि वेगवेगळे रंग एकत्र करून बनवलेले गडद मिश्रण वापरले जाते.) बोरूने जास्त सुबक सुलेखन करता येईल.

आता वेळ नाही. आकृत्यांमध्ये जास्तीत जास्त पायर्‍या दाखवल्या आहेत. काही शंका असल्यास अजिबात विचारू नये. :-D

स्वर - अ अ‍ॅ आ ऑ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ ॠ ऌ ॡ
यातील अ, इ, उ, ऋ आणि ऌ हे र्‍हस्व स्वर आहेत तर उरलेले दीर्घ स्वर आहेत.

A-1

ब्रशने दिलेल्या स्ट्रोकची जाडी सुमारे आठ ते दहा मिमी इतकी येत असल्याने मी त्याच्या सहापट मिडल झोनची उंची ठेवली. तसेच अडीच-अडीच पट जागा ही टॉप झोन आणि बॉटम झोनसाठी ठेवली. टॉप झोनमध्ये वेलांट्या, मात्रा वगैरे येतात. बॉटम झोनमध्ये 'द' सारख्या अक्षरांचे पाय तसेच उकार वगैरे येतात.

दुसरे असे, की तुम्ही जर साध्या पेनने किंवा बोरूने सुलेखन करणार असाल तर देवनागरी अक्षरांवरील आडवी दांडी ही सर्वात शेवटी दिली जाते. पूर्ण शब्द किंवा अक्षर काढून झाल्यावर. इथे साइनबोर्ड पेंटिंगची पद्धत वापरली आहे. त्यात आधी आडवी रेघ देतात. (ज्ञानामृत स्रोत - लहानपणी पेंटरांचं नीरस शासकीय पाट्या रंगवण्याचं काम तासन् तास न्याहाळणे. आता तो वर्गच दुर्मिळ झाला बिचारा. फ्लेक्सने वाट लावली या धंद्याची!)

A-2

A-3

A-4

A-5

A-6

A-7

A-8

A-9

A-10

A-11

A-12

A-13

A-14

अं आणि अः (अनुस्वार आणि विसर्ग) हे स्वर नसून व्यंजने मानली जातात.

व्यंजने -

कंठव्य - क, ख, ग, घ, ङ

Ka-1

Ka-2

ख च्या दोन पद्धती दाखवल्या आहेत. जी आवडेल ती वापरा. जुन्यासारखी 'रव' ही पद्धत आता वापरात नाही. महाराष्ट्र शासनाने अशा श, ल यांच्या वळणांसारख्या काही गोष्टी हिंदीतून आयात केल्या असे मध्ये कधीतरी वाचले होते. असोत.

Ka-3

Ka-4

Ka-5

तालव्य - च, छ, ज, झ, ञ

Cha-1

Cha-2

Cha-3

Cha-4

Cha-5

मूर्धव्य - ट, ठ, ड, ढ, ण

Tta-1

Tta-2

Tta-3

Tta-4

Tta-5

दंतव्य - त, थ, द, ध, न

Ta-1

Ta-2

Ta-3

Ta-4

Ta-5

ओष्ठव्य - प, फ, ब, भ, म

Pa-1

Pa-2

Pa-3

Pa-4

Pa-5

विशिष्ट व्यंजने - य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

Ya-1

Ya-2

Ya-3

ल जुने मराठी वळण आणि दांडीवाले हिंदीतून घेतलेले वळण.

Ya-4

Sha-1

श चे पण तसेच. डावीकडचे जुने वळण.

Sha-2

Sha-3

Sha-4

Sha-5

Sha-6

Sha-7

यातील ज्ञ, क्ष, श्र, क्त वगैरे व्यंजने ही जोडाक्षरे असल्याने काही वेळा त्यांचा समावेश वर्णमालेत स्वतंत्र व्यंजन म्हणून केला जात नाही. पण मी बालवाडीत वगैरे जे शिकलेलो आठवतंय त्यानुसार इथे क्रम दिला आहे.

वेलांटीची पद्धत - र्‍हस्व आणि दीर्घ वेलांट्या. यात वेलांट्यांच्या कुठल्या बाजू टेकलेल्या आहेत व कुठपर्यंत त्या खेचायच्या याकडे लक्ष द्या.

Velanti

उकार - र्‍हस्व आणि दीर्घ

Ukaar

रु आणि रू

RuRoo

काही जोडाक्षरे -

र इतर अक्षरांना जोडण्याच्या पद्धती

R-1

R-2

R-3

ह इतर अक्षरांना जोडण्याचा पद्धती

H-1

द्य - हे वळण मी दिले आहे तसे आधुनिक पद्धतीने काढावे. हीच पद्धत द्ध सारख्या इतर जोडाक्षरांनाही वापरावी. त्यामुळे 'मु्द्द्याचे' हा शब्द नीट लिहीता येईल. इथे मिपावर दिसतो तसा नका लिहू.

Dya

आणि हे अंक -

0-9

हुश्श...! बास झालं, आता तुमचं तुम्ही गिरवत बसा! आमची बेडरेस्ट संपली... ;-)

(गणपाशेठ, खुश?)

जाताजाता - शुद्धलेखनाशिवाय सुलेखन म्हणजे रंगलेल्या मैफिलीत गायिकेला लागला ठसका. तेव्हा आधी शुद्धलेखन शिकावे. :-)

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

5 Dec 2014 - 5:17 pm | रुस्तम

मस्तच

प्रचेतस's picture

5 Dec 2014 - 6:19 pm | प्रचेतस

प्राथमिक तरीही आवश्यक असे.
धन्यवाद स्वॅप्स ह्या धाग्याबद्दल.

बापरे केवढी ती चिकाटी!! धन्यवाद.

मधुरा देशपांडे's picture

8 Dec 2014 - 7:55 pm | मधुरा देशपांडे

खरंच. अगदी असेच वाटले. धन्यवाद.

शिद's picture

10 Dec 2014 - 8:53 pm | शिद

असेच म्हणतो. _/\_

अवांतरः माझं अक्षर पाहून माझे वडील नेहमी म्हणत "अक्षर आहे की कोंबडीचे पाय?" :D

आतिवास's picture

5 Dec 2014 - 6:47 pm | आतिवास

आता 'हाताने' लिहिणं हे भूर्जपत्रावर लिहिण्याइतकं प्राचीन वाटायला लागलंय. पण प्रयत्न करुन पाहीन.
''इ" हे इतके वळणदार अक्षर आहे हे प्रकर्षाने लक्षात आलं :-)

हो ना! ते काढून काढून वैतागलो. चार पानं फक्त साठीच खर्ची पडली. तसेच चे पण. :-D

जयंत कुलकर्णी's picture

5 Dec 2014 - 6:51 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच..........

बहुगुणी's picture

5 Dec 2014 - 7:01 pm | बहुगुणी

तुमचे आणि तुम्हाला उद्युक्त केल्याबद्दल गणपाशेठचे आभार!

लेख वाचल्यावर लक्षात आलं, (हल्ली 'लिहिणं' जवळजवळ नामशेषच झालं असलं तरी जेंव्हा क्वचित कधी 'लिहितो' तेंव्हा) मी 'ख' आणि 'ल' हे जुन्याच पद्दतीने लिहितो. पण ते 'द' आणि 'य' यांचं जोडाक्षर 'द्य' असं न लिहिता तुम्ही दाखवलं आहे तसं का लिहायचं ते काही झेपलं नाही. आणि तुम्ही 'शंका अजिबात विचारू नये' म्हणून धमकी दिली असली तरी विचारतोच (फाट्यावर मारण्याच्या मिपाधर्माला स्मरून) :-) : हल्ली बोरू सहज मिळत असल्यास कुठे शोधावा? म्हणजे स्टेशनरीच्या दुकानात मिळतो का? की खास कॅलिग्राफी साहित्याच्या एखाद्या सप्लायर कडून मागवायला लागतो?

त्यामुळे द्द हे दोनदा सुटे-सुटे द दाखवता येतात. उदा. 'मुद्दा' हा शब्द घ्या. मला समजा त्याला विभक्ती प्रत्यय लावायचा असेल, मुद्द्याचे, मुद्द्याला इ. तर इथे लिहिताना बरेच जण नुसते 'मुद्याचे' असे चुकीचे लिहितात. त्यापेक्षा मी दाखवल्याप्रमाणे द ची जोडाक्षरे लिहायची सवय ठेवली तर लेखनात एकजिनसीपणा येईलच, शिवाय शुद्धलेखनाची चूक होणार नाही. इथेही द्ध हे अक्षर अर्धा द आणि पूर्ण ध असे लिहिले पाहिजे होते. गमभन वापरून इथे तसे टाइप करता येत नाही. म्हणून! :-)

देवनागरीसाठीचा बोरू ऑनलाइन शॉपिंगवर मिळत नाही. पुण्यात अप्पा बळवंत चौकात मिळतो. किंवा स्वतःही बनवता येईल. जमल्यास बनवून इथे फोटो टाकतो.

चिगो's picture

25 Dec 2014 - 7:23 pm | चिगो

अनेकानेक धन्यवाद, स्वॅप्स.. वर बर्‍याचजणांनी म्हटल्याप्रमाणे, मराठीत लिहीणे आजकाल फार म्हणजे फारच कमी झालंय. (इंग्रजीतला कार्यालयीन व्यवहार स्वतः 'ड्राफ्टींग' करत असल्याने त्याची सवय आहे . मला टाईपण्यापेक्षा कींवा 'डि़टेक्शन'पेक्षा कागदावर खरडणे आवडते. ;-) )
पण जेव्हा केव्हा पोरीला खर्डा गिरवेन (गिरवलाच तर) तेव्हा ह्या धाग्यातली शिकवणी कामी येणार. (पण वाचनखुण साठवता येत नाहीय. असे का?)

चिगो's picture

25 Dec 2014 - 7:27 pm | चिगो

आणि हो, ते "द्+ध" बद्दल पण सहमत.. श्रद्धा हे आपण "श्र+अर्धा द+ध+आ" असंच बोलतो.. टाईपतांना मात्र उलटं होतं..

श्रीरंग_जोशी's picture

5 Dec 2014 - 7:04 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या चिकाटीला व परिश्रमांना सलाम.

अवांतर - इंजिनिअरींग ड्रॉइंगचे सुरुवातीचे दिवस आठवले.

सही रे सई's picture

7 Jul 2016 - 8:26 pm | सही रे सई

तुमच्या चिकाटीला व परिश्रमांना सलाम.

अगदी असेच म्हणेन.

मला एलिमेंट्री चित्रकलेची परीक्षा आठवली.

सस्नेह's picture

5 Dec 2014 - 7:08 pm | सस्नेह

माझी एक भाची आर्किटेक्चर शिकतेय ती असली अक्षरं लै भारी लिवते ! आक्षी छापल्यागत.
तुमचीपण तशीच वाटतात.

पैसा's picture

5 Dec 2014 - 8:18 pm | पैसा

मस्त झालंय सगळं! योगायोगाने हाताने लिहिण्याबद्दल हल्लीच एका ग्रुपवर चर्चा झाली त्यामुळे शाईचे पेन आणि काळी शाई आणून थोडे थोडे लिहायला सुरुवात केली आहे. अक्षर अजून सुवाच्य म्हणता येईल असे आहे हे पाहून कॉलर ताठ केली आहे!!

गणपा's picture

5 Dec 2014 - 8:20 pm | गणपा

पामराच्या विनंतीचा मान ठेऊन आणि त्यासाठी पेश्शल मेहनत करुन हा तक्ता दिल्या बद्दल धन्यवाद स्वॅप्स.
अक्षरे गिरवायला बसतोच आता. :)
_/\_.

एस's picture

5 Dec 2014 - 9:24 pm | एस

गिरवा गिरवा!

आधी वाटलं होतं एका दिवसात होईल. पण लई दीस लागले राव!

लहानपणी काही गोष्टी आमच्या दुर्लक्षित आणि कच्च्या राहिल्या त्यातली ही एक.
एका लेखात पाया भक्कम करत आहोत. आता हात.हाताने लेखन करत होतो. आता टंकलेखन आले ते सुध्दा मी मराठी नाहीच. इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे तेव्हा मराठी अक्षरे उमटतात.
छान चिकाटी आणि तपस्या. मराठीची गिर्वाणभारती होऊ नये हीच अपेक्षा.

खटपट्या's picture

5 Dec 2014 - 10:11 pm | खटपट्या

माझा अत्यंत आवडता विषय !!
पहीलाच प्रयत्न असेल तर खूपच छान.

मस्तानी's picture

5 Dec 2014 - 11:04 pm | मस्तानी

मनःपूर्वक धन्यवाद ! अतिशय सुंदर !! काय मेहनतीने केले तुम्ही आणि कित्ती सुबक सुंदर !!!
तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
( "वाचनखुण साठवा" हा पर्याय का दिसत नाहिये ? या लेखासाठी हा पर्याय हवा म्हणजे हवाच अगदि.)

मदनबाण's picture

5 Dec 2014 - 11:06 pm | मदनबाण

जबरदस्तच रे ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)

सुधीर's picture

5 Dec 2014 - 11:20 pm | सुधीर

लहानपणी मूळाक्षर गिरवायचो त्याची आठवण झाली....

मुक्त विहारि's picture

5 Dec 2014 - 11:27 pm | मुक्त विहारि

आवडला...

वाखूसा का नाही?

एस's picture

5 Dec 2014 - 11:29 pm | एस

आज वाखूसाचा संप आहे. ;-)

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 1:39 am | मुक्त विहारि

कितीतरी जणांनी वाखूसाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असेल आणि मग तीच आपोपाप गायब झाली असेल.

आता वाखूसाला पण तो "थिंक पॉझीटीव्ह" हा लेख वाचायला द्यावा लागेल.

सतिश गावडे's picture

5 Dec 2014 - 11:30 pm | सतिश गावडे

भारी आहे राव.

एकंदरीत मराठी लेखन (टंकन नव्हे) नाही म्हणण्याईतपत कमी झाल्यामुळे हल्ली मराठी लिहायचं म्हटलं म्हणजे अक्षरांची वळणे आठवावी लागतात. त्यात असलं काही पाहिलं की ही कला अंगी असणार्‍यांचा हेवा वाटतो. :)

जयन्त बा शिम्पि's picture

6 Dec 2014 - 3:23 am | जयन्त बा शिम्पि

आमच्या लहानपणी इयत्ता ३ री ते इयत्ता ७ वी पावेतो बोरुने अशा प्रकारे सुलेखन गिरवावेच लागे. त्यामुळे अशा प्रकारे
सुलेखन करणे मला ही छान जमते. बोरु एकतर कोठे सहज मिळत नाही ही पहिली गोष्ट ! ! शिवाय बोरु शाईच्या पात्रात बुडविल्यानंतर , अक्ष्रराचा प्रारंभ ठळकपणे होतो , पण बोरुतील शाई जसजशी संपत येते तसतसे अक्षर फिकट होत जाते .
यावर उपाय म्हणून , " अरुल " कंपनी कडून शाईच्या पेनच्या निब्ज चा एक सेट ( सहा निब्ज) बाजारात मिळतो. तो आणुन ,शाईचा पेन ( झरणी ) वापरावा. मग वर दाखविल्याप्रमाणे लेखन करणे शक्य होते आणि लोकांची " वा ! ! काय सुंदर अक्षर आहे तुमचे ! ! " अशी सुखद प्रतिक्रिया पण कानावर येते. लेखातील मार्गदर्शन आवडले. सुंदर सुलेखन !!

१अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर ?
१ब) शुद्+ध शुदध शुद्ध .चूक ?
२अ)पश्+चिम =पश्चिम ?
२ब)पश्र्+चिम =पश्र्चिम ?
२क)पष+चिम =पष्चिम ?
२ड)पश्+चिम =पश्चिम ?
३अ)भक+ती =भक्ती ?
३ब) पत्+की =पत्की

आपण मराठीत जोडाक्षर शक्यतो उच्चाराप्रमाणे पूर्ण अक्षरास अर्धे अक्षर जोडतो जसे रत्+नागिरी रत्नागिरी ,अन्+तू अन्तू बर्वा परंतू कानडीत याला बहुधा उलट (=रन्तागिरी)करतात. जाणकार सांगतील. त्यामुळे चुकीचे लिहिले जात असावे

१अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर ?
- चूक

१ब) शुद्+ध शुदध शुद्ध .चूक ?
- बरोबर. द अर्धा आणि ध पूर्ण. उच्चारातही आधी द् आणि नंतर ध चा उच्चार केला जातो.

२अ)पश्+चिम =पश्चिम ?
- बरोबर.

२ब)पश्र्+चिम =पश्र्चिम ?
- चूक. श्र ह्या अक्षरातील खालची तिरपी रेघ म्हणजे अर्धा र् हा श ला जोडला आहे. त्याव्यतिरिक्त नुसता श (इथे टाईप करता येत नाही. समजून घेणे.) काढल्यास वरील २अ) प्रमाणे दिसेल. श्र + च = श्र्च. ज्याचा उच्चार श् + र् + च असा होतो. जो पश्चिम या मूळ शब्दात अपेक्षित नाही.

२क)पष+चिम =पष्चिम ?
- चूक.

२ड)पश्+चिम =पश्चिम ?
- २अ) प्रमाणेच दिसतोय. तेव्हा बरोबर.

३अ)भक+ती =भक्ती ?
- बरोबर. आधी अर्धा क् आणि मग पूर्ण त. म्हणूनच क्त हे जोडाक्षरही इथे दिसतेय तसे न काढता अर्धा क् (पाय मोडलेला) आणि त्याला जोडून पूर्ण त असा काढला तर ते जास्त योग्य, आधुनिक आणि उच्चारानुगामी वळण ठरेल.

३ब) पत्+की =पत्की
- बरोबर.

माझ्या माहितीप्रमाणे आता कानडीतही जोडाक्षर काढण्याची पद्धत बदलली आहे. आता आधुनिक मराठीप्रमाणेच कानडीतही उच्चारानुगामी व एकरेषीय जोडाक्षरे काढली जातात ज्यात मूळ अक्षराचे वळण व स्थान जास्त बदलत नाही.

प्रचेतस's picture

7 Dec 2014 - 8:50 am | प्रचेतस

माहितीपूर्ण.

यसवायजी's picture

8 Dec 2014 - 12:51 pm | यसवायजी

आपण मराठीत जोडाक्षर शक्यतो उच्चाराप्रमाणे पूर्ण अक्षरास अर्धे अक्षर जोडतो जसे रत्+नागिरी रत्नागिरी ,अन्+तू अन्तू बर्वा परंतू कानडीत याला बहुधा उलट (=रन्तागिरी)करतात.
होय. कन्नडमध्ये रत्नागिरी (ರತ್ನಾಗಿರೀ)च लिहितात.
'त्न'साठी 'ತ್ನ್' इतकेच. आणी काना याच ತ್ನ್ (त्न) ला दिला जातो. त्यामुळे असे वाटते की, 'त'ला काना दिलाय आणी 'न' अर्धं काढलंय.
रन्तागिरी असे लिहिता येते:- ರಂತಾಗಿರೀ

चौकटराजा's picture

6 Dec 2014 - 7:32 am | चौकटराजा

कॅलेग्राफी ही एक आवड आहे. अशी आवड आवर्जून जोपासणारे नेहमीचे पेन वा बॉल पॉईंट पेन वापरीतच नाही. त्यासाठी वेगळे पेन मिळतात. त्याची निबे ही वेगळी मिळतात. बोरू ने येणारे अक्षर हा कॅलिग्राफी या विषयाचा अत्यंत लहान असा भाग आहे. साधारण पणे " फॉन्ट इंक" नावाची शाई कॉलिग्राफीसाठी वापरली जाते . ती अतिरिक्त गडद असते. ज्याना बोरू
वगैरे न वापरता सराव करायचा असेल त्याना फोटोशॉप मधे असा सराव करता येईल. स्वत: चा शैलीदार फॉन्टही तयार
करता येईल. श्री कमल शेडगे हे कलाकार या क्षेत्रातील बाप माणूस.

एस's picture

6 Dec 2014 - 10:19 pm | एस

कमल शेडगे यांनी एकूणच भारतीय लिप्यांच्या सुलेखनात खूप काम केले आहे. मीही त्यांचेच सुलेखन पाहून प्रभावित झालो होतो. आठवा 'रंगीला' चित्रपटाचे सुलेखन. अच्युत पालव यांची ओळख बरीच नंतर झाली.

अजया's picture

6 Dec 2014 - 10:55 am | अजया

वेळ मिळताच प्रयत्न करुन पाहिल्या जाईल.माझा लेकही सुलेखन शिकलाय पण इंग्रजी अक्षरं.त्यालाही जोडीला घेते.

विजुभाऊ's picture

6 Dec 2014 - 11:20 am | विजुभाऊ

बॉलपेन आल्यापास्नं फाउन्टनपेननी ल्ह्यायची सवय संपली.
आता तर काय चेकवरच्या सहीसाठीच कधीतरी हातात पेन येतय. आणि त्यावेळेस अक्षरशः बोटे कष्ट घेवून वळवावी लागतात

जयन्त बा शिम्पि's picture

6 Dec 2014 - 4:58 pm | जयन्त बा शिम्पि

बॉलपेन ने अर्ध अधिक पान जरी लिहिले , तरी बोटे दुखावयास लागतात , पण शाईचा पेन वापरुन दोन तास लिहिले तरी बोटांना दुखत नाही, मला तर चांगला ,गुळगुळीत कागद मिळाला , तर किती लिहू अन किती नाही असे होवुन जाते
सुन्दर अक्षर काढणे ही जाणिवपूर्वक जोपासलेली कला म्हणा वा छंद म्हणा, पण मनाला आनंद देणारी बाब आहे हे मात्र खरे

'काय, कुठवर आलीये बालवाडी?', 'अजून प वरच आहात काय?' असले कुटुंबाकडनं आलेले ठेवणीतले स्नॅक्स खात खात हा धागा पूर्ण झाला. ;-)

निलापी, वल्ली, सखी, आतिवास, जयंत कुलकर्णी, बहुगुणी, श्रीरंग_जोशी, स्नेहांकिता, पैसा, गणपा, कंजूस, खटपट्या, मस्तानी, मदनबाण, सुधीर, मुक्त विहारि, सतिश गावडे, जयन्त बा शिम्पि, चौकटराजा, अजया, विजुभाऊ...

अर्रर्र, एवढी नावे लिहिण्यापेक्षा आलेल्या 'वरच्यांना' आणि आगामी 'खालच्यांना' घाऊक धन्यवाद द्यायला पाहिजे! :-P

धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल!

तुम्ही हे सगळं स्वहस्ते लिहून धागा काढलात त्याबद्दल हॅट्स ऑफ!!

खटपट्या's picture

8 Dec 2014 - 8:42 am | खटपट्या

abcd

एस's picture

8 Dec 2014 - 12:25 pm | एस

सुंदर! स्केचपेनाने केले का? की अजून काही? आणखी येऊ द्या!

खटपट्या's picture

8 Dec 2014 - 10:25 pm | खटपट्या

साधा हायलायटर मार्कर आहे.

बबन ताम्बे's picture

8 Dec 2014 - 12:54 pm | बबन ताम्बे

रांगोळी ?

मग तर खूपच सुरेख !

पैसा's picture

8 Dec 2014 - 2:43 pm | पैसा

खूपच छान झालंय!

चौकटराजा's picture

10 Dec 2014 - 9:05 am | चौकटराजा

भारी हा एकच शब्द पुरे !

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 9:34 am | खटपट्या

सर्वान्चे धन्यवाद

शिद's picture

10 Dec 2014 - 8:55 pm | शिद

मस्तच जमलं आहे.

मी अगोदर म्हंटल्याप्रमाणे तुम्ही आहातच मिपाचे शीघ्र-चित्रकार.

प्रमोद देर्देकर's picture

8 Dec 2014 - 11:24 am | प्रमोद देर्देकर

धन्यवाद स्वॅप्स साहेब,
आणि या लेखाला वाखु पाहिजे यांस अनुमोदन.

का कोण जाणे, पण मला सर्वात सुंदर देवनागरी आणि रोमन लिपीच वाटते. लहानपणी शाळेत जायच्या रस्त्यावर बाजारपेठ होती, त्यातील दुकानांवर लावलेल्या पाटया मी भान हरपून बघत असे. गावात एकच पेंटर होता. पण प्रत्येक बोर्डावर तो वेगवेगळ्या तर्हेने सुंदर नावे लिहीत असे. उदा. शिवाजी जनरल स्टोअर्स अशी पाटी असेल तर श ची तलवार तो भारी काढत असे.

मी २००२ की २००३ मध्ये अच्युत पालवांना भेटून (दादर पश्चिमची कुठलीशी शाळा होती) सुलेखनाचे काही बेसिक क्लास केले होते. (७०० रुपये फी द्यायची होती, पैसे नव्हते, सांगितलं तसं. ठीक आहे, बस म्हणाले.) नेहमीप्रमाणंच नंतर आमचा आळस नि करंटेपण आड आल्यानं नंतर पाठपुरावा केला नाही.

अक्षर सुधारण्यासाठी काही मुलभूत गोष्टींमध्ये चौकोनी रेषा असलेली वही वापरणे आवश्यक ठरतं. अक्षर जेवढं तेवढी वरची टोपी नसेल तर अक्षर चांगलं दिसत नाही हा आणखी एक मुलभूत नियम. म्हणजे 'च' असेल तर च ची आडवी रेघ मागे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत टोपी मागे न्यावी लागते अन्यथा च अपुरा वाटतो.. प्रत्येक अक्षरानुसार दोन अक्षरांमधलं अंतर योग्य प्रकारे ठेवावं लागतं. मराठी सुलेखनासाठी उजव्या बाजूनं ४५अंशामध्ये तर इंग्रजी सुलेखनासाठी डाव्या बाजूनं ४५अंशामध्ये पेनाचं निब कापलेलं असलं तर 'सुरुवातीला' (मुळाक्षरं गिरवताना) बरं पडतं.

वरच्या पद्धतीचं सुलेखन करण्यासाठी कुल्फीच्या काडी पासून ते अनेकानेक प्रकारच्या साधनांचा वापर करता येतो असं त्यांनी प्रात्यक्षिकासह सांगितलं होतं. इन्जेक्शन वापरुन देखील काही सुलेखन प्रकार करुन दाखवले होते. 'सिग्नेचर'ची सिग्नेचर, असोका चित्रपटाचं टायटल अशी आत्ता लगेच आठवलेली काही नावं.
याना गुप्ता च्या अंगावर सुलेखनाचं बॉडी पेंटींग केलेलं हे सांगितल्यावर.... असो!