ग्लु वाईन

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
18 Dec 2011 - 5:04 pm


नमस्कार मंडळी.. गेले काही दिवस आंतरजालापासून दूर होते. सध्या ख्रिसमसमय माहौल आहे, फ्रांकफुर्टचे ख्रिसमस मार्केट आणि त्यातील चॉकलेट्स, गरमागरम चेस्टनट्स, ब्राटवुर्ष्ट, राकलेट, फाँड्यु आणि ग्लुवाइनचे स्टॉल्स भरभरुन गर्दी करत आहेत.ग्लु वाइनच्या जोडीला चेरी, रास्पबेरी, प्लमच्या वाइन्सही वाफाळत आहेत.खास मुलांकरता आणि अल्कोहोल न पिणार्‍यांकरता नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचे स्टॉल्सही आहेत. त्यात आज शेवटचा रविवार! दोन चार दिवसातच मार्केट बंद होणार ते पुढच्या नाताळापर्यंत.. पण ग्लु वाइनची मजा घरीही घेता येईलच की! म्हणूनच ही पाकृ: (ग्लु वाइन मधील अनेक व्हेरिएशन्स पैकी हे एक - जर्मनीतल्या मार्केटात ग्लु वाइन आणि ग्लु वाइनचा स्पेशल मसाला मिळतो , परंतु तो सगळीकडे उपलब्ध नसतो. म्हणून ही दुसरी पध्दत देते आहे.)
ग्लु वाइनला (Glühwein) म्युल्ड वाइन (Mulled wine) असेही म्हणतात.
साहित्य- १ लिटर साधीशी रेड वाइन (उगाच महागडी रेड वाइन नासायची गरज नाही.ती नुसती पिता येते.)
३/४ लवंगा,२ वेलदोडे, १ बोटभर दालचिनीचा तुकडा,लिंबाची किसलेली साल २ टी स्पून,
४ ते ५ टेबलस्पून साखर (अधिक गोड हवी असेल तर अजून २ चमचे साखर घाला)
आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!
कृती- अगदी सोप्पी आहे.
दालचिनी,वेलदोडे, लवंगा, लिंबाची किसलेली साल ह्या सर्वाची मिक्सरमधून पूड करा रेड वाइनमध्ये ही पूड आणि साखर घाला व गरम करत ठेवा,उकळू नका. पुरेसे गरम झाले की गाळून कपातून प्या.
ग्लु वाइन कपातूनच पितात.

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

18 Dec 2011 - 5:37 pm | स्वाती२

व्वा!
साधी रेड वाईन चालणार म्हणजे एकदम बजेट फ्रेंडली !

जर्मनीतल्या मार्केटात ग्लु वाइन आणि ग्लु वाइनचा स्पेशल मसाला मिळतो , परंतु तो सगळीकडे उपलब्ध नसतो. म्हणून ही दुसरी पध्दत देते आहे.

हे एकदम ब्येस. :)
नेहमी प्रमाणे एकदम हटके पाकृ.
धन्स गं तायडे.

दादा कोंडके's picture

18 Dec 2011 - 6:46 pm | दादा कोंडके

आणि सोपी सुद्धा.

कालच संध्याकाळी बाडेन-बाडेनच्या क्रिसमस मार्केटमध्ये ग्लुवाइन प्यायल्यानंतर थोडसं उबदार वाटलं होतं!
मागच्या वेळी म्युनिकमध्ये तुरट चव लागली होती. म्हणून यावेळी "ओह्ने अल्कोहोल" मागितली आणि छान लागली.

मनिष's picture

18 Dec 2011 - 9:31 pm | मनिष

देवा.. मला जर्मनीलाच ऑनसाईट पाठव. स्वातीतै, आमंत्रण गृहित धरतोय! :-)

मोहनराव's picture

18 Dec 2011 - 9:54 pm | मोहनराव

धन्यवाद. या पाककृतीची वाटच पाहत होतो. सोकाजीराव यांना विचारले होते याबद्द्ल. दर गुरुवारी ऑफिसमधे ही वाइन देतात. मस्त असते. मार्केटमध्ये सध्या या वाइनच्या स्टॉलला खुप गर्दी असते.

५० फक्त's picture

18 Dec 2011 - 11:45 pm | ५० फक्त

असं असतंय काय हे, बरं बरं, चला एखादी तरी दारु गरम करुन पितात याची माहिती मिळाली.

अवांतर - श्री . वपाडाव यांचा एक मोठा कप देउन सत्कार करावा काय या विचारात आहे.

चला एखादी तरी दारु गरम करुन पितात याची माहिती मिळाली.

बर्‍याच दारवा गरम गरम पितात.
तांदळापासून बनवलेली जापनीज साके गरम करूनही पितात.
बर्‍याच गावठी दारवाही गरम गरम पितात.

- (गरम दारवा प्यायलेला) सोकजी

अवांतर: ग्लु वाइनची रेसिपी भन्नाट, पण त्यात सांगीतलेले इंग्रेडीएंट 'कडक थंडी' सध्या नसल्यामुळे कधी करावी ह्या विचारात.

सूड's picture

19 Dec 2011 - 11:41 am | सूड

>>- श्री . वपाडाव यांचा एक मोठा कप देउन सत्कार करावा काय या विचारात आहे.

धागा वाचला नि हीच कमेंट द्याया आल्तो .

कवितानागेश's picture

18 Dec 2011 - 11:52 pm | कवितानागेश

येस्स्स्स......

चिंतामणी's picture

19 Dec 2011 - 12:06 am | चिंतामणी

आता तु फटुसुद्धा टाकला हायेस म्हणजे ते बराबरच असनार.

बाकी काय बोलायचे ते येकदा टेस्टींग करून जाल्यावरच लिवु.

पन येक सांगतो. ते "ग्लु" नाव वाचुन कसेसेच जाले.

कॉलींग सोत्री.

सोत्रि's picture

19 Dec 2011 - 10:17 am | सोत्रि
Solapurkar's picture

19 Dec 2011 - 4:28 am | Solapurkar

हे पिउनच बघा :-)

मसाला चहाची आठवण झाली..

शुद्ध चहा पिणार्‍यांना मसाला चह त्रासदायकच वाटतो.. आम्ही त्यास फोडणीचा चहा म्हणतो.

पिऊन बघण्याआधी सांगणं कठीण आहे, पण सर्वजण म्हणताहेत म्हणजे असणार खास.

वाईनमधे चाट मसाला, काळेमीठ, चिंच वगैरे घालून त्यात पाणीपुरीची खुशखुशीत पुरी बुडवून गट्टम करण्याचा "वाईन पुरी" नावाचा पदार्थ बनवावा की काय असा विचार मनात आला.

वाईनसोबत स्नॅक्स खाण्याचा अभिनव मार्ग नाही का वाटत हा? :)

सुहास झेले's picture

19 Dec 2011 - 11:38 am | सुहास झेले

सहीच... प्यायला आवडेल :) :) :)

यशोधरा's picture

19 Dec 2011 - 11:58 am | यशोधरा

मस्त गं स्वातीताई, करुन पाहणार आहे मी.

मृत्युन्जय's picture

19 Dec 2011 - 1:47 pm | मृत्युन्जय

मी काय म्हणतो ही ग्लु वाइन पिण्याऐवजी आपला काहवाच का पिऊ नये?

आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!

अगदीच! साँय्क साँय्क करणारं गळकं नाक नि थंड्गार पडलेली कानशिलं हेदेखील त्या मसाल्याइतके महत्त्वाचे घटक आहेत!

घरी करू शकतोच पण माझ्यामते ख्रिसमस मार्केटांतच त्या गरमागरम Gluhwein ची खरी मजा असते! हे म्हणजे आंगणेवाडयेच्या जत्रेक वालावलकराच्या नायतर गावड्याच्या हाटिलात हादडलेल्या चय नि भजयेची सर घरच्या भजयेक येणा नाय ना.. तसल्यातलीच गत! :)

आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही
अर्र.......... आता पार्ल्यातल्या जर्मन स्टोअर्स मध्ये कडाक्याची थंडी शोधणे आले...... ;)

प्रभाकर पेठकर's picture

29 Dec 2011 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

प्र.का.टा.आ.

प्रभाकर पेठकर's picture

29 Dec 2011 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर

स्वाती,

ग्लु वाईन बनविली.

आपण सांगितलेला मसाला आणि पद्धत वापरून विनकार्निस टॉनिक वाईनची (तशी स्वस्तातली) ग्लु वाईन बनविली.

एकदम ब्येष्ट. आत्ता त्या वाईनचे घोट घेत घेत प्रतिसाद लिहीतो आहे.

इथे, मस्कत मध्ये, जर्मनीच्या थंडीला पर्याय म्हणून घरची वातानुकूलन यंत्रणा पूर्ण क्षमतेवर ठेवली आहे.

आता ३१ डिसेंबरला अजून एक लिटर बनवून (कारण तो पर्यंत ही बाटली संपेलच) मित्र मंडळींना जर्मन ग्लु वाईनचा आस्वाद देतो.

धन्यवाद.

अन्या दातार's picture

29 Dec 2011 - 4:01 pm | अन्या दातार

>>आत्ता त्या वाईनचे घोट घेत घेत प्रतिसाद लिहीतो आहे.

तरीच दोनदा लिहिले गेले वाटते ;)

आमच्या कोंकणातली गरमागरम वाफाळणारी आमसुलाची कढी (कोकमकडी) हा पर्याय कसा वाटतो?

काढ्यासारखाही लागत नाही आणि उकाड्यातही चालते..

शिवाय गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे तितकीच उत्कृष्ट लागते..

कसें? ;)

दिसते तर एकदम खल्लास. रेसिपी लिहाल का?

ज्या सायटीवरुन फोटो चोप्य पस्ते केले आहेत तिथेच कृतीही आहे.... राईट क्लिक करुन साईटसची नावे पाहता येतील..

मी नेहमी घरी करतो, पण शॉर्टकटमधे..

या सायटींवर खास काही सुगरणींनी लिहीलेली साग्रसंगीत कृती आहे.

माझी कृती म्हणजे सरळ कढीपत्त्याची अन जिर्‍यामोहोरीची साजुक तुपात केलेली फोडणी आमसुलाच्या कोळात चर्रकन ओतून मग ते मिश्रण खळाखळा उकळवणे. सीझन असेल आणि कोकणात गावी गेलेलो असलो की लाल ताजी कोकमं झाडावरुन काढून आणतो.. तशी असली तर आणखी मस्त रंग येतो.

यात खोबरे नाही.. तस्मात सोलकढी वेगळी आणि ही वेगळी.. ही फक्त भुरके मारुन पिण्याची गोष्ट.. जेवणात तोंडीलावणे नव्हे..

प्रभाकर पेठकर's picture

29 Dec 2011 - 4:37 pm | प्रभाकर पेठकर

सोलकढी वेगळी आणि ही वेगळी

ह्याला फुटी कढी असे म्हणतात. मला दोन्ही आवडतात. सोल कढी आणि फुटी कढी. सोलकढी चवीला उजवी असली तरी नारळाच्या दुधामुळे (फॅट आणि कोलेस्टरॉल) तिचे मार्क कमी होतात.

सही...आजच केली आणि गरमागरम छान लागली. आता रात्री गार कशी लागते बघुया! (गार प्यायची आहे म्हणून तुपाची फोडणी नाही दिली) :-)
फ्रेश कोकम असतील तर फार मजा येईल, कोकम आगर होते, त्याला जरा जास्तच स्ट्राँग तुरट चव आहे, पन चलेगा... धन्यवाद गवि.

- Manish
दुसरी साईट फोटोवरून 'redchillies' शोधल्यावर मिळाली, दुसरा फोटो फ्लिकरवरून होता.

स्वाती दिनेश's picture

30 Dec 2011 - 6:29 pm | स्वाती दिनेश

पेठकर, वावावा.. लगेचच ग्लुवाइन करुन पाहिलीत आणि आवडल्याचे आवर्जून सांगितलेत, धन्यवाद.
सर्व खवय्यंनो,
धन्यवाद.
स्वाती

babu b's picture

14 Nov 2017 - 12:14 am | babu b

छान