मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या · · जे न देखे रवी...
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना..... संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला माहित आहे तुला माहित आहे लाटांना माहित आहे हाक त्यांचीच तर आहे धावणाऱ्या रक्ताला मी फुलांनी अडवले आहे नशिबाची कविता तिच्या लयीत सोडली आहे ...... संध्याकाळी तू..... शिवकन्या

वाचन 5074 प्रतिक्रिया 0