मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची (श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत) म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ|| या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||१|| नांदूरमधमेश्वर धरण जवळ दोन मैलावर उस द्राक्ष पिकवी शेतकरी कष्टाने फार नाशिकजिल्ह्यातले हे पक्षी अभयारण्य गोदावरी पुढं वाहते पिकवीत रानं म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||२|| गणपती सरस्वती देवीच्या आजूबाजूला होमकुंड मंदिरात दाखवीते ज्वाला वाहन देवीचे वाघ समोर दर्शनाला मन प्रसन्न होई आईला भेटून म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||३|| निळकंठेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी हरहर शंभो शंकराची समोर वसती एका गावात दोन देव नांदती अख्यायीका प्रसिध्द पुरानकालापासून म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||४|| म्हाळसादेवी कुळदेवी भक्त कुळांची भक्त तिचे सारे देशातून येती आशिर्वाद दर्शन घेवून जाती पाषाणभेद बुध्दीहीन करी आईचे कवन म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||५|| - पाषाणभेद

वाचन 1568 प्रतिक्रिया 0