महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!