आवाज: स्त्रीमुक्तीचा
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला. तेव्हापासून महिलांना मुलं पैदा करण्याचे यंत्र व घरकाम करणारी मोलकरीण म्हणून गणना होऊ लागली.