पुस्तक परिचय
शाश्वत : लेखक संजीव कोटकर
कथासंग्रह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस
चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमधे एक कथा आहे. ती कथा कुठेतरी आपल्या भावनाना स्पर्ष करणारी आहे.
संजीव कोटकरांच्या शाश्वत या कथासंग्रहातील कथा या आपल्या आजुबाजूला घडणार्या किंवा पाहिलेल्या वाटतात. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतात.
या कतासंग्रहात एकुण १५ कथा आहेत.आपल्या सभोवताली घडणार्या.यातील पात्रे काहीवेळा सजीव तर काहीवेळा निर्जीव पण भावना असलेल्या बस्तू आहेत.
कथा लिहीताना लेखक मोठे काही तत्वज्ञान सांगितल्याचा आव आणत नाही. साधीशीच गोष्ट असते.
पहिल्याच कथेत रुखसाना कथानायीका एक पडायला आलेली कोणतेच गतवैभव नसलेली इमारत आहे पण तीला भावना आहेत. आपल्या आश्रयाला आलेल्या कुत्रीची पिले ढिगार्यात गाडली जाऊ नये म्हणून तीने आपले पडणे लांबवले आहे.
झेंड्याची काठी या कथेत कोटकर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची तुलना झेंड्याच्या काठीशी करताना म्हणतात की त्याला वाटले की आपले आयुष्य असेच आहे झेंड्याच्या काठीसारखे. स्वतःचे आस्तित्व असून्नसल्यासारखे, तीच्या वाचून झेंडा फडकू शकत नाही, पण जेंव्हा फदकतो तेंव्हा फक्त झेंडाच दिसतो.काठीच्या आस्तित्वाची कोणी दखलच घेत नाही.आपल्याला तरी काय गरज आहे काम करण्याची. त्याने परत काठी कडे पाहिले. त्याच्या लक्षात आले की काठीला स्वतःचा असा काही पर्याय नाही. झेंडे बदलले तरीही काठीच्या असण्यावर काहीच फरक पडणार नाही. तशीच रहाणार सरळ आणि दुर्लक्षीत तरीही आवश्यक.
नस्तित्व ही स्वतःच्या मतिमंद मुलाचे आस्तित्वच नाकारणारा बाप आणि त्याचे आस्तित्व हेच सर्वस्व मानणारी आई यांच्यातील भावनीक संघर्षाची कथा आपल्याला भोवतालची एखादी अशीच व्यक्ती आठवून देते. आपले अपरिहार्य कोतेपण दाखवून देते.
दु:ख आभाळा एवढे कथेतील सुमिताचा मुलगा लोकल ट्रेनच्या अपघातात मरण पावलेला. तो गेल्यानंतर ती सैरभर होऊन निरुद्देश स्टेशनवर उभी रहाते आणि त्यातूनच तीला स्वतःच्या आयुष्याचे ध्येय गवसते. ट्रेनला लटकून प्रवास करणार्या मुलांना अपघाताबद्दल जागरूक करणे पण हे करत असताना तीच्या सत्कार समारंभात तीचे नवर्याकडे लक्ष्य जाते. आणि तीला जाणवते की आपण इतके दिवस नवरा अरविंदला विसरून गेल्याची जाणीव होते आपल्या नवर्याकडे दुर्लक्ष्य होते हे जाणवताच ती म्हणते आपल्याला मधुरचीच नाही तर अरविंदची ही आई होणे गरजेचे आहे.
कोटकरांच्या कथा अगदी साध्या आहेत. पण यातच त्या खरी गम्मत आहे. कथांमधली पात्रे कुठेच हीरो बनायचा प्रयत्न करत नाहीत. लार्जर दॅन लाईफ होत नाहीत. अगदी आपल्या आसपास वावरत आहेत असे वाटते. म्हणूनच ती पटतात. आपली वाटतात.
सूट या कथेतील मांजरेकर रीटायर्ड आहेत. मुलांच्या इ बायकोला असाध्य आजार झालेला आहे. जेमतेम महिनाभराची सोबतीण आहे. नवर्याने सूट शिवावा म्हणून तीने कधीकाळी हौसेने सूटाचे कापड आणले होते. मरणासन्न बायकोची इतकीतरी इच्छा पूर्ण करावी म्हणून मांजरेकर टेलरकडे सूट शिवायला टाकतात. इतकीच काय ती कथा पण ती कथा सांगणार्या जगदीशभाई टेलरच्या सारखेच कथा वाचताना आपलेही डोळे किंचीत ओले होतात.
सधवा कथेत नवर्याने लग्नानंतर अप्लावधीतच सोडून दिलेल्या बायकोने तो नवरा मरण पावल्या नंतर मंगळसूत्र कशाला काढून टाकायचे हा प्रश्न भागिरथी बाईंप्रमाणे आपल्यालाही पडतो.
फोटो कथातली संहिता. ज्या आईने आपल्याला जन्म दिला नाही. ती वैदेही आपली आणि नाही म्हणून तीचा दु:स्वास करते/तीला परकी बाई मानते पण ज्या क्षणी तीला समजते की बाबांशी लग्न करतानाच वैदेहीने निर्णय घेतला होता की ती संहीताला स्वतःचे मुल समजेल तीने आपल्यावरील मायेत कमतरता होऊ नये म्हणून स्वतःला मूल होऊ दिले नाही. त्या क्षणी आपणही संहीता च्या भावनांबरोबर सहमत होतो.
"शंका" या कथेतली समीधा , आईच्या मागे आपल्याला साम्भाळणार्या शुभाताई आणि वडीलांच्या निखालस नात्यावरच्या सगळ्या शंका गळून पडल्या नंतर ती शुभाताईंची आई बनायला तयार होते.
य कथेतली पात्रे अगदी साधी आहेत.तितकीच अस्सल आहेत. ती त्यांच्या भावनांसहीत आपल्याला भिडतात.आपण आपल्या मनात घोळत रहातात. बोचणी कथेतला नायक दुसर्या एकाचा तिरस्कार करतो. आनी मनातल्या मनात शिव्या देतो. तो ज्याचा तिरस्कार करतो त्याचा अपघाती मृत्यू होतो. कथानायकाला वाटते की आपण तिरस्कार केला म्हणून हे असे घडले. तो म्हणतो की त्या नंतर कधीही मला एखाद्या चा संताप आला तिरस्कार वाटला की मला मिलींदची आठवण होते. आणि ती बोचणी माझा संताप कमी करते. कधीच कोणाचा असा तिरस्कार करू नका .बोचणी बरोबर आयुष्यभर जगणे फार अवघड आहे हो.
छोटीशी चूक या कथेतील भिकार्याला चुकून भीक म्हणून एक नोटाचे पुडके असलेली पिशवी दिली जाते. इतके पैसे का लपवले असे विचारत झोपडप्ट्टी दादा त्याला मारहान करतो. त्यत त्या भिकार्याचा जीव जातो. त्याची भीक मागण्याची जागा तो दादा दुसर्या एकाला देऊन टाकतो. ही कथा वाचताना जीवनाची क्षुद्रता जाणवते.
शाश्वत का कथेबद्दल काय सांगू? स्वतःच्या जीवाला कंटाळलेल्या एकाला अश्वत्थामा आणि हनुमंत हे दोन चिरंजीव भेटतात. अश्वत्थामा हा चिरंजीवत्वाचा शाप घेऊन वावरणारा तर हनुमान हा चिरंजिवत्वाचे वरदान घेऊन वावरणारा. एकच समाईक गोष्ट असणारे दोघे पण दोन विचारसरणीतला हा फरक. आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडतो.
या कथा संग्रहातली प्रत्येक कथा वाचून लवकर संपते पण मनात रेंगाळत रहाते. त्यातली पात्रे आपले विचार व्यापून टाकतात. अगदी साध्या साध्या वाक्यानी मनाचा वेध घेतात. आप्न त्या बद्दल पुन्हा पुन्हा विचर करत रहातो. हीच या कथा संग्रहाची ताकद आहे.
शाश्वतः संजीव कोटकर
प्रकाशक हेडविग मिडीया हाऊस
परिचयकर्ता : चकोर शाह