चालू घडामोडी - डिसेंबर २०२५

अभ्या..'s picture
अभ्या.. in काथ्याकूट
1 Dec 2025 - 4:50 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मिपावरच्या चालू घडामोडींचा परामर्ष घेता घेता "अ" च्या बाराखडीतले सदस्यनामे घेणारे आयडी सोडून बाकी सगळे आयडी सगळ्ळ्ळे समजून घेतील अशा अपेक्षेने चालू घडामोडींचा हा (माझा) पहिला धागा काढत आहे. चालू घडामोडींच्या धागानिर्मात्यांच्या लिस्टीत "अ" वर्गीय धागालेखक तसेही मायनॉरिटीत असल्याने म्हणले चला उपेक्षितांचा पण आवाज उठवुया. बाकी इतर ऑथेंटिक, हुशार, प्रगाढ हुशार, शिकलेले, हुकलेले, "ब" पासून पार "य" "झ" पर्यंतच्या एकबार, दुबार, मल्टीबार आयडींना चर्चेसाठी आमंत्रण.
नेमका विषय पण "अ" पासून सुरु झालेला मिळाला.
"अ"नगर पंचायत निवडणुक स्थगित झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर पट्ट्यातील ह्या गावात व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचे आणी लोकशाहीचे भीभत्स रुप पाहण्यात आले. माध्यमात उठवलेल्या आवाजामुळे उर्वरित महाराष्ट्राला निदान ह्या प्रकरणाची थोडीफार तरी कल्पना आली. पक्षाचा, युत्यांचा विचार न करता मोठमोठ्या दिलेल्या आवाहनामुळे आणी राजकीय स्वार्थासाठी सर्वच स्तरांवर राबवल्या गेलेल्या शासकीय यंत्रणांमुळे महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे ह्या विधानाचा पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2025 - 5:14 pm | अमरेंद्र बाहुबली

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2025 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूकांचा घोळ आणि कायद्यावर मागील महिण्याच्या धाग्यात दळन टाकलं होतं. आज नगरपालिकेच्या अनेक घोळांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय नागपूर खंडापीठाच्या निर्णयानंतर आज उच्चन्यायालय मुंबई संभाजीनगर खंडपीठामधेही स्थगित निवडणूकां आणि नियमित सुरु असलेल्या निवडणूकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावे अशा सुचना निवडणूक आयोगास दिल्या. आता ते सुचना काढतील वगैरे.

''निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चुकीचे आहे. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. लोकांनी काही म्हणायच्या अगोदर आपण बोंबा मारुन मोकळे. धन्यवाद.

चालू द्या.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2025 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणविसांनी निवडणूक आयोगाला “घरचा आहेर” दिला म्हणायचं!

कंजूस's picture

3 Dec 2025 - 5:51 am | कंजूस

हो. आंबट चिंचेचा गोळा व्यवस्थित भेटवस्तूच्या खोक्यात बांधून दिला. पण ते पडले सरकारी अंमलबजावणी खाते. ते पार्सल कुणीच घेत नाही.

कंजूस's picture

3 Dec 2025 - 5:52 am | कंजूस

सगळेच ढगात वावरत आहेत. निकालानंतर कळेलच कोण किती तोंडावर पडलाय.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Dec 2025 - 3:31 pm | अमरेंद्र बाहुबली

“गुजराती” कंपनीचे इव्हीम, घरगडी असल्यासारखा चुना आयोग असल्यावर काय बिशाद आहे इतर कोणाची जिंकायची?

विजुभाऊ's picture

3 Dec 2025 - 4:15 pm | विजुभाऊ

“गुजराती” कंपनीचे
या शब्दाचे प्रयोजन समजले नाही

टर्मीनेटर's picture

3 Dec 2025 - 4:36 pm | टर्मीनेटर

उचलली जीभ... लावली टाळ्याला...
अशी प्रवृत्ती असेल तर काही 'प्रयोजन' असलेच पाहिजे असे काही नसते हो विजुभाऊ... 😀

सुबोध खरे's picture

4 Dec 2025 - 10:52 am | सुबोध खरे

उचलली जीभ... लावली टाळ्याला...

आला कळफलक हातास

बडवला विचार न करता

हि त्याला समकक्ष म्हण आहे

धर्मराजमुटके's picture

3 Dec 2025 - 5:06 pm | धर्मराजमुटके

अबांच्या किबोर्डवरील 'व्ही' ही कळ मधून मधून बंद होते बहुतेक. 'व' अक्षर टाईप होत नाही बहुतेक :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2025 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्कोसे आया मेरा दोस्त. मास्कोको सलाम करो. रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागिदार असून, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

इंदिरा गांधींनी मास्कोशी दोस्ती करून अमेरिकेचं महत्त्व कमी करून टाकलं होतं.
पुतीनच्या जेवणात फाफडा जलेबी कढी असणारच.
खाने में क्या है? https://youtu.be/mog3Wc_-NAU?si=zEilmEU1euFS9AD4

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Dec 2025 - 11:18 am | अमरेंद्र बाहुबली

तपोवनातील जमीन हडपायचा डाव नाशिककर उधळून लावतील अस दिसतय! गुड वर्क नाशिककर!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2025 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची इंडिया टुडे समुहाच्या दोन महिला पत्रकारांनी घेतलेली मुलाखत पाहिली आणि आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे निघालेले पाहताना अजिबात आश्चर्य वाटले नाही.

पत्रकारांनी एक प्रश्न असा विचारला की, 'भारतीय पंतप्रधानांनी रशियासोबत नाते घट्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत, भारत रशिया नाते सर्वाधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या पंतप्रधानांचे योगदान अधिक आहे?'

हा प्रश्न सरळ सरळ चाटूगिरीचा होता. पुतीन जितके धूर्त कपटी दूरदर्शी आहेत तितकेच चलाख आहेत, त्यांनी ही बला फुटबॉलसारखी उडवून लावली! ते उत्तरले की, 'हा प्रश्न असभ्य आहे!'

चला लागा कामाला.

-दिलीप बिरुटे

फारच चाटुगिरी झाली. पण इंडिया टुडे त्या पत्रकारांना ठेवणार नाहीत.

आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे निघालेले पाहताना अजिबात आश्चर्य वाटले नाही.

आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे १९९४ सालीच क्रांतिवीर चित्रपटातून निघालेले आहेत!
पुतिन ह्यांनी कदाचीत हा चित्रपट पाहिला असावा किंवा गेला बाजार त्यातला नाना पाटेकरचा "और एक बात जानती हो? तुम्हारे अखबार पर सुबह बच्चे हगते है।" हा संवाद तरी ऐकला असावा 😀

जोक्स अपार्ट, मुलाखत देण्याआधी इंडिया टुडे समुहाचा पुर्वेतिहास पुतिन ह्यांनी माहिती करुन घेतला असावा, त्यामुळे कशाप्रकारचे उत्तर समोरच्याला अपेक्षीत आहे ह्याचा व्यवस्थित अंदाज येण्याएवढे 'धूर्त, दूरदर्शी आणि चलाख' ते नक्कीच असल्याने त्यांनी ही बला फुटबॉलसारखी उडवून लावली असावी 😂

कंजूस's picture

8 Dec 2025 - 8:43 pm | कंजूस

यावरून आठवलं.....
ओबामांनी त्यांच्या promised land पुस्तकात भारतातील तसेच विविध देशांतील राजकीय नेत्यांवर टिप्पण्या लिहिल्या आहेत. त्यापैकी
"राहुल - वर्गात वारंवार हात वर करून लक्ष वेधून घेऊ पाहणारा विद्यार्थी."

इंडिगो मुळे निर्माण झालेला प्रश्न पुन्हा कधीच येणार नाही असे काही होऊ शकेल का?
सरकारने विमान प्रवासाचे दर निश्चित करणे पूर्ण सोडून द्यावे दराबाबतीत पूर्ण्पणे लाझीज फेअर तत्व अवलंबावे.
भारताला विमान कंपन्यांची दफनभूमी ठरवणारानी एके काळी दमणीया एअरवेज, मोदी लुफ्त , सहारा एअरवेज आणि तत्सम यांची कर्तबगारी काय होती ते पहावे आणि त्याना परवाने कोणी दिले तेही समजून घ्यावे
ज्या ज्या कम्पन्यानी बजेट सर्वीसेस दिल्या त्यांचे बारा वाजलेले आहेत.

फक्त बजेट सर्विस देणे वेगळं आणि बिझनेस आइडियाज वेगळ्या.
https://youtu.be/9BRc9dz13Lk?si=KOYjgLZg6mJPDzFl
हे अगोदर कुणाला सुचलं नाही.
मल्ल्याने एक प्रश्न विचारला की सरकार जर इंडिया , इंडियन एरलाइन्सला मोठी फंड इंजेक्शनं मारते तर किंगफिशरला का नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2025 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताला १५० वर्ष झाले त्या अनुषंगाने अधिवेशनादरम्यान लोकसभेत सोमवारी या विषयावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेस प्रारंभ करुन मूळ गीतातील कडव्यांच्या निमित्ताने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. आता महाराष्ट्रातही विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात वंदे मातरम वर चर्चा होणार आहे.

प.जवाहरलाल नेहरु यांच्यावरही एकदा स्वतंत्र विषय घेऊन लोकसभा अधिवेशनात चर्चा करुन टाकावी म्हणजे तो एकदाचा विषय संपून देशातील प्रश्नावरही चर्चा करता येईल, असे म्हणायला हरकत नाही. :)

-दिलीप बिरुटे

रशियात जुन्या नेत्यांचे पुतळे पाडून टाकण्यात आले होते त्याची आठवण झाली.
मुसलमान सत्तेने देवगिरी जिंकल्यावर यादव राजाचे मस्तक गटारमुख म्हणून बसवले होते.
नवीन सत्ताधीश जुन्याची आठवण राहू नये याची काळजी घेतो. देशात अठ्ठावीस टक्के मुसलमान एकजुटीने आहेत. त्यांना न आवडणाऱ्या, नको असलेल्या गोष्टी टाळल्या तर काम सोपे होईल नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2025 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आग्या१९९०'s picture

9 Dec 2025 - 10:18 pm | आग्या१९९०

काल प्रियांका गांधीने संसदेत जोरदार भाषण करून जागतिक रडूबाईला जेरीस आणले. वरताण म्हणजे नेहरूंविरोधी काय गरळ ओकायची ती ओकायला संसदेत खास एक दिवस ठेवण्याचा सल्लाही दिला.
आज राहुल गांधीने वंदे मातरम् वरून सत्ताधाऱ्यांना गप्प बसवले. कुठून वंदे मातरम् ची चर्चा घेतली असे जागतिक रडूबाईला झाले असेल.
राहुल गांधी दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत. जागतिक रडूबाई सुद्धा त्याला आता पप्पू म्हणत नाही. ह्याउलट जागतिक रडूबाई विश्वगुरू, अजैविक असा प्रवास करत पुन्हा जागतिक रडूबाई पदावर विराजमान झाली.
राहुल गांधीने सरकारच्या GST ला गब्बर टॅक्स संबोधले होते. सरकारने GST टॅक्स कमी करून राहुल गांधीसमोर झुकले.
विमान वाहतूक सेवेतील मक्तेदारीच्या धोक्याची भविष्यवाणी राहुल गांधीने वर्षभरापूर्वी केली होती. सरकारने विमान कंपनीपुढे लोटांगण घालून आपली परिपक्वता दाखवून दिली.
राहुल गांधीच्या द्रष्टेपणाची यादी बरीच मोठी होईल. तूर्तास
" वंदे मातरम् ".

नेहरूंचा मुद्दा आता उगाचच उगाळला जात आहे. सरकारने काही दुसरी चर्चा काढावी. बरोबर.

छान बोलली प्रियंका गांधी.व्हिडिओसाठी धन्यवाद.

रात्रीचे चांदणे's picture

10 Dec 2025 - 9:27 am | रात्रीचे चांदणे

प्रियांका गांधी यांनी चांगल भाषण केलं. बाकी मुद्दे पटो ना पटो दोन मुद्दे मात्र पटले. एक म्हणजे बंगाल निवडणूक आहे म्हणूनच लोकसभेत चर्चा ठेवली गेली आणि दुसरा म्हणजे नेहरू वरील टिकेचा. आणखी किती दिवस नेहरू वर टीका करत राहणार.

कांदा लिंबू's picture

10 Dec 2025 - 9:37 am | कांदा लिंबू

न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन

हे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन आहेत.

त्यांनी मदुराईतील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील प्राचीन दगडी दीपस्तंभ असलेल्या दीपथून येथे कार्तिक पौर्णिमेला हिंदूंना दीपोत्सव करण्याची परवानगी दिली.
(त्यांचा हा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही कायम ठेवला होता). मागच्या महिन्यात, दिंडीगुल जिल्ह्यातील एन. पंजमपट्टी गावात, कालीयम्मन मंदिराच्या कुंभबिषेकम दरम्यान सरकारी मालकीच्या सार्वजनिक जागेवर हिंदूंनी अन्नदान करण्यास ख्रिश्चनांनी आक्षेप घेतला आणि विरोध केला. या सार्वजनिक जागेचा वापर पारंपारिकपणे त्यांच्या ईस्टर कार्यक्रमांसाठी केला जातो असं त्यांनी दावा केला. त्यानंतर, मद्रास उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि त्यांनी असा निर्णय दिला की सार्वजनिक जागेवर एका समुदायाची मक्तेदारी असू शकत नाही. ती सर्व समुदायांना किंवा कोणत्याही समुदायाला वापरण्यासाठी उपलब्ध नसावी.

आता, द्रमुक आणि विरोधी पक्षाचे खासदार, न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी धर्मनिरपेक्षतेविरुद्ध निर्णय दिला आहे असे म्हणत त्यांच्यावर महाभियोगाची मागणी करत आहेत!

मोदी सत्तेत येऊन बारा वर्षे होत आहेत!

संदर्भ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2025 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल्या सहा महिन्यात पुणे, नंदुरबार, जळगाव नाशिक, अहिल्यानगरसह अनेक भागात बिबट्याने धुमाकुळ घालून ३७ जणांचा बळी घेतला. या बिबट्यांना मानवी वसाहतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बिबट्यांच्या अधिवास असलेल्या क्षेत्रात एक कोटी रुपये किमतीच्या शेळ्या-मेंढ्या सोडा असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिका-यांना दिले.

गोबरयुगात अशा पालथ्या निर्णयांचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. देशभरात दीडलाखापेक्षा अधिक राखीव हेक्टर वनक्षेत्रे विकासाच्या नावाखाली उजाड़ करणे चालू आहे, उद्योगपतींना विकासासाठी जंगलांच्या जागाही विकासासाठी देणे सुरु आहे, जंगले कमी होत चालली हे वन्यप्राणी शहरात येण्याचे मुख्य कारण आहे. शेळी,मेंढी हे पाळीव प्राणी आहेत, ते जंगलात राहूच शकत नाही. सर्व शेळ्या-मेंढ्या सायंकाळी गावातच परत येतील. आणि त्यांच्या पाठोपाठ बिबटे पुन्हा गावात येतील.

चोरीचं प्रमाण कमी व्हावे म्हणून चोरांना घबाड नेऊन देण्याने चोरी थांबणार नसते. कशाचा कशाशी संबध नसणारी भ्रष्टाचाराशी ही नवी 'शेळी बिबट्या' योजना किती दिवस तग धरते ते येत्या काळात कळेल. पालथ्या निर्णयास शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

स्वधर्म's picture

10 Dec 2025 - 2:58 pm | स्वधर्म

काल बाबा आढाव गेले. एक चळवळीतला पुरोगामी कार्यकर्ता गेला. खरे तर असे निरलस स्वच्छ काम करणारे कार्यकर्ते होणं आता अवघड आहे, त्यामुळे एका युगाचा अंत झाला असे म्हणावेसे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2025 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

10 Dec 2025 - 8:50 pm | आग्या१९९०

संसदेत गृहमंत्री शिवी देतो आणि ते विरोधी पक्षाने लक्षात आणून दिले तरी लोकसभा अध्यक्ष गप्प बसले. सर्वात कहर म्हणजे गृहमंत्री लोकसभा अध्यक्षांना ती शिवी रेकॉर्डमधून काढण्याचा हुकूम सोडतात आणि तात्काळ लोकसभा अध्यक्ष हुकूमाची अंमलबजावणीही करतात. हेच लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या खासदारांना " मला आदेश देण्याचा तुम्हाला काही हक्क नाही " असे संतापून सांगत असतात. हे पद निष्पक्ष असते ना?
राहुल गांधीनी अमित शहाला चर्चेसाठी पत्रकार परिषदेचे खुले आव्हान दिले आहे. असे ऐकलाय की ' एक अकेला सब पर भारी ' हे आव्हान स्वीकारणार आहे.
" वंदे मातरम् "

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2025 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'साला' हाच शब्द विरोधीपक्षाच्या नेत्यांनी कोणी वापरला असता तर, काय हंगामा झाला असता ?
देशाचे गृहमंत्री यांचं स्वतःवरचं नियंत्रण गेलेले दिसलं त्या चर्चेत. अर्थात, राहुल गांधी यांनी दिलेलं
पत्रकार परिषदेचं खुलं आव्हान ते स्विकारणार नाहीत.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

11 Dec 2025 - 6:59 pm | आग्या१९९०

राहुल गांधीचे कुठलेच खुले आव्हान ते स्वीकारणार नाहीत. राहुल डरपोक नाही ह्याची त्यांना खात्री आहे. मुख्य म्हणजे राहुल गांधी संसदेत अद्वातद्वा बोलताना कधीच आढळले नाही.
राहुल गांधीने आता इंग्रजीतच बोलायचे ठरवले आहे असे वाटतं. सत्ताधारी पक्षाच्या आयटी सेलची आता पंचाईत झाली आहे.
वंदे मातरम्

कपिलमुनी's picture

11 Dec 2025 - 7:39 pm | कपिलमुनी

विधानसभा , लोकसभा अध्यक्ष , राज्यपाल , राश्ट्रपती अशी सरकारने नेमलेली माणसे पक्षविरोधी बोलायचा दम दाखवतील , निष्पक्ष काम करतील असा त्यांना वाटले..

त्यात निवडणून आयोग अध्य्क्ष निवडीतून न्यायाधीशांना वगळतात, आणि उरली सुरली लाज कोळून पितात

कांदा लिंबू's picture

11 Dec 2025 - 8:10 pm | कांदा लिंबू

पूर्वी चित्रलेखा नावाचा एक मराठी साप्ताहिक होतं. ‌त्यात शेवटच्या पानावर वेलची या सदरात काही खुशखशीत किस्से यायचे. नुकत्याच संसदेत साला या शिवीदर्शक शब्दाच्या झालेल्या तथाकथित वापरावरून त्यातला एक किस्सा आठवला. ‌

"मनमोहन सिंग पंतप्रधान असताना (म्हणजे खरंतर सोनिया गांधी यांची सत्ता असताना) ते परदेशी दौऱ्यावर आपल्या सोबत पत्रकारांचा चमू घेऊन जायचे.‌ एका युरोपियन देशाच्या अश्याच एका दौऱ्यावर असताना पत्रकारांना हॉटेलात साला कॉंग्रेसी (Sala Congressi) असा शब्दप्रयोग लिहिलेला फलक दिसला!

हा शब्दप्रयोग भारतात वाचनात वा ऐकण्यात आला असता तर फार काही विशेष वाटलं नसतं पण युरोपातल्या त्या देशामध्ये असा शब्दप्रयोग दिसणे हे चर्चेचा विषय ठरलं. सगळ्याच पत्रकारांना त्या देशाची स्थानिक भाषा येण्याचा काही प्रश्नच नव्हता.

अर्थात तो देश इटली होता आणि Sala Congressi म्हणजे इटालियन भाषेत सभागृह (Conference Hall)!"

साला कॉंग्रेसी

गामा पैलवान's picture

11 Dec 2025 - 8:44 pm | गामा पैलवान

हाहाहा, मस्त किस्सा आहे कॉंग्रेसच्या सासुरवाडीचा ! बाणही अगदी अचूक दिशेने दाखवलाय !! जामातो दशमो ग्रह: उगीच म्हणंत नाहीत !!! ;-)
-गा.पै.

ट्रंप ने पाकिस्तानला त्यांची एफ१६ विमाने दुरुस्त करता यावीत यासाठी पॅकेज जाहीर केले आहे