ऑस्ट्रेलिया येथे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

Bhakti's picture
Bhakti in काथ्याकूट
29 Nov 2024 - 7:31 am
गाभा: 

ऑस्ट्रेलिया येथे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी आणण्याची शक्यता आहे.नियम मोडल्यास दंड होणार आहे.
https://www.bbc.com/news/articles/c89vjj0lxx9o
"आमच्या मुलांचे बालपण असावे आणि पालकांना आम्हाला त्यांच्या पाठीशी आहेत हे कळावे अशी आमची इच्छा आहे," अल्बानीज यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.

खरोखरच अगदीच कालचाच प्रसंग कन्या सहलीसाठी गेली होती.घरी आल्यावर म्हणाली"आई स्नेहा म्हणाली की तिने आज पहिल्यांदाच मोबाईल शिवाय जेवण केले."
मोबाईल शिवाय हल्ली खुप लेकरं जेवणच नाही.मोबाईलने हळूहळू बालपणावर कब्जा केलाच आहे.पण जर सोशल मिडिया - टिकटॉक, ट्विटरवर, फेसबुक इ.ठिकाणी मुलांचा वावर वाढत जाणार आहेच.वयाच्या १०-१७ टप्प्यावर मुले स्वतःच्याच भावनिक गुंतागुंत सोडवण्यात सक्षम नसतात.अशावेळी अजून भावनिकदृष्ट्या गुंता वाढवणाऱ्या सोशल मिडिया पासून त्यांनी दूर राहणे श्रेयस्करच आहे.तेव्हा अशा नियमांचे सर्वत्र स्वागत होत आहे.यूट्युब ,काही गेमिंग माध्यमांचा यात समावेश नाहीये.युट्युब बाबत योग्य पण गेमिंग माध्यमांवर ही बंदी पाहिजे होती.
१९/३४ अशा मतांनी हा नियम लागू होणार आहे.तेव्हा काही जण या विरोधात आहेत असे दिसते.तर हा नियम लवकरच मोडीत निघेल असं काहींचे म्हणणे आहे.
याविषयी आणखी माहिती असेल तर नक्की शेअर करा..

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

29 Nov 2024 - 8:04 am | धर्मराजमुटके

चांगला निर्णय. सरसकट बंदी नसावी, थोडा वेळ बघू द्यावा मोबाईल या म्हणण्यात काही तथ्य नाही. मोबाईल हातात आल्यावर मोठ्यांचे नियम गळून पडतात. पाच मिनिटे पाच मिनिटे म्हणता म्हणता ५ तास कसे निघून जातात कळत नाही.

अमुक वयापर्यंत "बंदी" घातली की त्या अमुक वयाचा वाढदिवस होताक्षणी त्या वर्ज्य / अप्राप्य गोष्टीवर तुटून पडले जाईल ही शक्यता वाढते. सोळाव्या किंवा अठराव्या किंवा एकविसाव्या वर्षानंतर कशाचे व्यसन नव्याने लागू शकत नाही ही समजूत भाबडी आहे. मग ते दारूचे असो, रमी किंवा तत्सम जुगार ॲप्सचे असो किंवा गेमिंग आणि सोशल मिडीयाचे असो.

अगदी लहान बालक असते तेव्हा त्याच्या हाती मोबाईल न देणे हे पालकांच्या हातात असते. त्यासाठी कायदा आणि दंड करून कशी नेमकी अंमलबजावणी होणार ?

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Nov 2024 - 10:26 am | चंद्रसूर्यकुमार

निर्णय चांगला आहे पण तो अंमलात कसा आणणार याची उत्सुकता आहे. कागदोपत्री फेसबुकवर अकाऊंटही १८ वर्षाखालील कोणालाही उघडता येत नाही. हल्ली तरूण पिढी फेसबुकवर विशेष नसते- इन्स्टाग्रामवर असते ती गोष्ट वेगळी. पण एकेकाळी फेसबुक बरेच जास्त लोकप्रिय होते तेव्हाही खोटी जन्मतारीख देऊन १८ वर्षाखालचे सर्रास फेसबुकवर अकाऊंट उघडायचे. ते टाळण्यासाठी आधार कार्ड (किंवा ऑस्ट्रेलियात त्याला समकक्ष जे काही असेल ते) देऊन मगच अकाऊंट उघडता येईल (त्यातून खोट्या नावाने अकाऊंट तयार केले जायचे नाहीत हा आणखी एक फायदा) असे काही करणार का? मग त्यातही डेटा सेक्युरिटी वगैरे प्रश्न निर्माण होतील. पूर्वी मिपावर केवळ स्त्रियांसाठी म्हणून एक अनाहिता असे मिपाच्या अंतर्गत दुसरे फोरम होते. तिथे सदस्यत्व केवळ स्त्री सदस्यांनाच मिळायचे. आता एखादी व्यक्ती स्त्री सदस्यच आहे हे पडताळायचे कसे? तर त्यासाठी फोन नंबर देऊन मग त्या नंबरवर मिपा अधिकृत संपादक (किंवा जे कोणी असतील ते) फोन करायचे आणि संबंधित व्यक्ती स्त्रीच आहे हे आवाजावरून पडताळून बघायचे असे काहीतरी होते. तेव्हाही असे फोन नंबर दिले जाण्यावरही काहींनी विरोध केला होता हे आठवते. त्यातही कोणी पुरूष सदस्याने त्याच्या पत्नीचा नंबर दिला आणि तिला फोन केला गेला असता तर?

असो. जे काही असेल ते. निर्णय चांगला आहे पण तो अंमलात कसा आणणार हे बघायला हवे.

कर्नलतपस्वी's picture

29 Nov 2024 - 12:41 pm | कर्नलतपस्वी

खोलात गेल्यावर कळेल. परंतू अंमलबजावणी मुश्किल च नाही तर नामुमकीन आहे.

मोठी माणसेच एव्हढी ॲडिक्ट झाली आहेत.....त्यांचेच व्यसन कसे सुटेल हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. अर्थात मी सुद्धा याला अपवाद नाही.

मधे मला कॅण्डिक्रशचे व्यसन लागले होते. मुश्किलीने सुटले आहे.

सर्व ज्ञान सोमी वर आहे.

"जाये तो जाये कहा समझे ना", ही मोठ्यांची अवस्था.

ऑस्ट्रेलियन पालक कदाचित समझदार असतील तर सरकारला सहकार्य करतील.

पण भारतात नवजात शीशूपासून ते विसाव्याच्या दगडावर बसलेल्या पर्यंत लोकशाही खतर्‍यात आहे आसा ओरडा सुरू करतील. पत्रकारांना,फुरोगाम्यांना आयते कोलीतच मिळेल.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 1:15 pm | टर्मीनेटर

मोठी माणसेच एव्हढी ॲडिक्ट झाली आहेत.....त्यांचेच व्यसन कसे सुटेल हा ऐरणीवरचा प्रश्न आहे.

+१०००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2024 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडे घरातली मोठी माणसं-महिला यांच्याकडील वापरावर मर्यादा आणली पाहिजे.
आणि शेवटी लहान-मुलांकडे वळावे असे वाटते. सालं ते फेसबूकवरील ते रील्स...वाट्सॅप.

सालं जिंदगी नावाची काही गोष्टच राहीली नाही.

-दिलीप बिरुटे
(आंतरजालावर पडिक जनतेपैकी एक )

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 1:30 pm | टर्मीनेटर

आपल्याकडे घरातली मोठी माणसं-महिला यांच्याकडील वापरावर मर्यादा आणली पाहिजे.
आणि शेवटी लहान-मुलांकडे वळावे असे वाटते.

+१०००
आपल्याकडे कामाच्या आणि शिक्षणाच्या सर्वच ठिकाणी (कार्यालय/कारखाना/शाळा/कॉलेज) इत्यादी ठिकाणी कर्मचारी/कामगार/विद्यार्थी/ शिक्षकांना मोबाईल फोन आणायला बंदी करण्यात यावी.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 1:33 pm | टर्मीनेटर

गाडी चालवताना फोनवर बोलताना पकडल्यास दंड न आकारता थेट काही दिवसांच्या साध्या कैदेची तरतूद कायद्यात असावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2024 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कायद्याने काहीही होणार नाही. कायद्यावर विश्वास असला तरी-

टू व्हीलवाले, ते मान आणि खांद्यात मोबाईल गुंतवून गाड्या चालवणारे आणि चालू टू व्हीलरवर मेसेज पाहणारे, यांना गाडी उभी करुन ढुंगनावर पोकळ बांबूचे निब्बर साताठ फटके आणि दोन हजार रु प्रत्येक वेळी दंड.

फोरव्हीलरवाले ड्रायव्हींग करताना अधून-मधून वाट्सॅपवर मेसेज पाहणारे आणि चालू गाडीत व्हाइस अथवा टंकून रिप्लाय करणारे, मित्र मैत्रीणी भेटल्यानंतर गप्पा मारण्याऐवजी वाट्सॅप-फेसबूक- मेसेज बघणारे, जेवतांना फोन पाहणारे, घरी एकत्र कुटूंबात असतांनाही मोबाईल पाहणारे, झोपायच्या वेळीही जग अजून जिवंत आहे की बुडाले हे पाहणारे, कर्मचारी, शिक्षक, नौकरदार, कंपनीतले या सर्वांना आवरणे गरजेचे आहे.

लाडक्या बहीणीच्या योजनेप्रमाणे महिन्याला केवळ दोन जीबी डाटा वगैरे आणि नंतर, यांचं घरगुती गॅस आणि किराणा, बंद केला पाहिजे. उपायसुद्धा सुचेना. सालं अवघड झालं. :/

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 2:18 pm | टर्मीनेटर

टू व्हीलवाले असोत की फोरव्हीलरवाले... सर्वांना एकच न्याय लावावा!

फोरव्हीलरवाले ड्रायव्हींग करताना अधून-मधून वाट्सॅपवर मेसेज पाहणारे आणि चालू गाडीत व्हाइस अथवा टंकून रिप्लाय करणारे, मित्र मैत्रीणी भेटल्यानंतर गप्पा मारण्याऐवजी वाट्सॅप-फेसबूक- मेसेज बघणारे, जेवतांना फोन पाहणारे, घरी एकत्र कुटूंबात असतांनाही मोबाईल पाहणारे, झोपायच्या वेळीही जग अजून जिवंत आहे की बुडाले हे पाहणारे, कर्मचारी, शिक्षक, नौकरदार, कंपनीतले या सर्वांना आवरणे गरजेचे आहे.

अहो सर टू व्हीलवाले असोत की फोरव्हीलरवाले सर्वांनाच आवरणे गरजेचे आहे आणि शिक्षाही सर्वांना समान असावी...
ते मेले तरी कोणाला काही वाटायची गरज नाही, पण त्यांच्यामुळे कोणी जीव गमावला तर तो गंभीर मुद्दा ठरतो!

प्रचेतस's picture

29 Nov 2024 - 3:06 pm | प्रचेतस

तुम्हाला कधी चलन पडलंय की नाही? पडलंय तर किती वेळा पडलंय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2024 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला कधी चलन पडलंय की नाही? पडलंय तर किती वेळा पडलंय?

मिपावर खोडसाळ लोक फार वाढलेत... २०१४ नंतर.

आमच्याकडे चौकात सिग्नलवर काही ठिकाणी 'सेकंद' दिसण्याची सोय नाही, म्हणजे असली तरी, ते ट्राफीक पोलिसवाल्यांनी हटकून काढून टाकले आहेत. आपल्याला वाटतं सिग्नल सुरु आहे, आपण आपलं वाहन ऐन पुढे घालायला आणि ऐन मध्यावर लाल दिवा पडायला कर्मधर्म संयोगाने एकच वेळ येते, असे लाल दिवा लागल्याने एक दोन वेळेस ऑनलाइन पावत्या आल्या आहेत. ( संदर्भ : पाहा महाट्राफीक अ‍ॅप )

महामार्गावर जरा मोकळा रस्ता दिसला म्हणून जरा आपण जराअ वेग वाढवायला आणि मोकळ्या रस्त्यावर जाळं टाकून बसलेले पोलिसाच्या त्या दूर्बीनवरुन आपला स्पीड पकडायला एकच वेळ होऊन जाते. अशा कर्मधर्म संयोगाने घडलेल्या गोष्टींमुळे भक्कम चलन पडलंय. आता कितीही मोकळा रस्ता दिसला तरी, शंभरच्या वर जात नाही.

सामान्य नागरिकांशी चिटींग करुन पैसे उकळणारे साले सगळे पोलिस नरकात जातील. गरुड पुराणात फसवणूकीबद्दल भयंकर नरक यातना सांगितलेल्य आहेत.

-दिलीप बिरुटे

मिपावर खोडसाळ लोक फार वाढलेत... २०१४ नंतर.

हा आपला गैरसमज आहे.

ऐन मध्यावर लाल दिवा पडायला कर्मधर्म संयोगाने एकच वेळ येते, असे लाल दिवा लागल्याने एक दोन वेळेस ऑनलाइन पावत्या आल्या आहेत.

अहो पण डायरेक्ट लाल दिवा कसा लागेल? आधी पिवळाच लागणार ना...! तुम्ही गाडी तशीच दामटवत असाल.

महामार्गावर जरा मोकळा रस्ता दिसला म्हणून जरा आपण जराअ वेग वाढवायला आणि मोकळ्या रस्त्यावर जाळं टाकून बसलेले पोलिसाच्या त्या दूर्बीनवरुन आपला स्पीड पकडायला एकच वेळ होऊन जाते.

त्यासाठी स्पीडगन डिटेक्टर नावाची अ‍ॅप आहेत ती टाका, स्पीडगनच्या आधी अ‍ॅलर्ट देईल. बाकी नगर रस्त्यावर इतका स्पीड वाढवता येतो म्हणजे कमाल हे. मोठमोठे खड्डॅ हेत भो त्या हायवेवर.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 4:15 pm | टर्मीनेटर

म्हणजे असली तरी, ते ट्राफीक पोलिसवाल्यांनी हटकून काढून टाकले आहेत.
हा अनुभव मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरही येतो....
ट्राफिक वाले बॅरिगेट्स लावून ठेवतात बरोबर खालापूराचा एक्झिट येण्या अगोदर... मग ३०० रुपये दिले की गाडी मागे घेऊन, अडथळे हटवून जाण्याचा मार्ग खुला केला जातो 😀
होता हैं... चलता हैं... दुनिया हैं...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Nov 2024 - 1:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

२०००-२००१ साली रा.स्व.संघाच्या एका मोठ्या पदाधिकार्याने इंटरनेट वापरावर लहान मुलांवर मर्यादा घालावी असे विधान केले होते. लगेच सगळ्या वर्तमानपत्रांतून टीकेचा भडिमार झाला होता त्याची आठवण झाली. टीका करणार्यात कुमार केतकरादी,अरूण टीकेकर आघाडीचे तत्कालिन संपादक होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 1:37 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले पुतिनकाका वापरतात तो. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबचे काही विशिष्ट चॅनेल ह्यांचा स्पीड स्लो करायचा. इतका की बफरिंग पाहून एखाद्याने जीव द्यावा.

धर्मराजमुटके's picture

29 Nov 2024 - 1:41 pm | धर्मराजमुटके

युट्यूबचे काही विशिष्ट चॅनेल ह्यांचा स्पीड स्लो करायचा.
पहिल्यांदाच अबांशी सहमत ! याने साप पण मरेल आणि लाठी पण तुटणार नाही.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 1:54 pm | टर्मीनेटर

सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले पुतिनकाका वापरतात तो. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबचे काही विशिष्ट चॅनेल

तांत्रिकदृष्ट्या भारतात हे अशक्य आहे! चीन आणि रशियामध्ये मेटा आणि गुगलची उत्पादने वापराण्यावर बरेच निर्बंध आहेत त्यामुळे तिथे हे शक्य होऊ शकते.... पण भारतीय वापरकर्त्यांचे तसे नाही, इथे 'फुकट ते पौष्टिक' ह्या तत्वज्ञानाचे पालन करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे की ह्यापैकी एकाचाही 'स्पीड' कमी केल्यास ते एकगठ्ठा पुरवत असलेल्या बाकीच्या सेवांवर त्याचा अनिष्ट परिणाम होईल....
ह्या विषयाच्या फार तांत्रिक तपशीलात न जाता इथेच थांबतो 😀

हे शक्य आहे. इथे उघड्यावर लिहिता येणार नाही पण हे भारतात करता येते.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 2:21 pm | टर्मीनेटर

हे शक्य आहे. इथे उघड्यावर लिहिता येणार नाही पण हे भारतात करता येते.

त्यातून अनेकांची नसबंदी होईल हे मान्य... म्हणूनच जास्ती तांत्रिक तपशीलात जात नाही असे म्हंटले होते...

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 2:23 pm | टर्मीनेटर

पण हे भारतात करता येते.

ह्यावर चर्चा करायला आवडेल!

सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले पुतिनकाका वापरतात तो.

आता यापुढे ईव्हीएमचे काहीही झाले तरी महाराष्ट्राची रशियाकडे वाटचाल असा शब्दप्रयोग करू नका. ;-))

कंजूस's picture

29 Nov 2024 - 6:27 pm | कंजूस

ज्यांना खड्ड्यात जायचे त्यांना जाऊ द्यावे.

नियम टाकले की ते कसे मोडायचे यांच्या चर्चा, त्यातून कुणाला कसा खाऊ मिळतोय हे आणखी. इंटरनेट स्पीडच नाही तर हायस्पीड प्रोसेसर वाल्या डिवाईसेसचा( antutu score दहा लाखांपेक्षा अधिक) उपयोगच काय?

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 6:39 pm | टर्मीनेटर

ज्यांना खड्ड्यात जायचे त्यांना जाऊ द्यावे.

नियम टाकले की ते कसे मोडायचे यांच्या चर्चा, त्यातून कुणाला कसा खाऊ मिळतोय हे आणखी. इंटरनेट स्पीडच नाही तर हायस्पीड प्रोसेसर वाल्या डिवाईसेसचा( antutu score दहा लाखांपेक्षा अधिक) उपयोगच काय?

तुम्ही काय लिहिले आहे ते कमीतकमी तुम्हाला तरी समजले असेल अशी भाबडी अपेक्षा 😀

मुलांचा सोशल मिडियाचा वापर वाढला असल्याने तसा कायदा केला असावा त्यांचे शारीरिक मानसिक हित जपण्यासाठी. जे अधिक वापर करत आहेत त्यांचे ते आणि पालक बघतील. कायदाबियदा नकोच. कायदा नसेल तर काय इंटरनेट स्पीड कमी करणे हा काही पर्याय ठरत नाही. वारं करणारे आणखी अधिक वेळ चिकटून राहतील. सरकारने लक्ष घालायला नको. ज्यांना खड्ड्यात जायचे त्यांना जाऊ द्यावे. असं म्हणतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 8:33 pm | अमरेंद्र बाहुबली

माझा २.५ वर्षाचा मुलगा आहे. घरात ४ फोन असल्याने एनिटाईम कुणाचा ना कुणाचा फोन त्याला दिसतोच त्यामुळे तो मागतोच नाही दिला तर मोठे भोकांड पसरतो. ह्यावर मला तरी अजून काही पर्याय सापडला नाहीये. मोकळा असेल तर त्याला घेऊन खाली फिरून येणे, त्याच्यासोबत खेळणे, टीव्ही हे पर्याय आहेत. मोबाईल समोर असल्याशिवाय आजीबात जेवत नाही. यूट्यूबवर बोटे सरासरा चालतात. त्याला स्किप एड करने माहित आहे, स्पीकर चालू करून गाणे बोलायला लावतो. कटी रात खेतो मे आणी मै निकला गड्डी लेके हया गाण्यांवर त्याला नाचायचे असते. ह्यापासून वाचण्यासाठी मी टीव्ही वर माझ्य लग्नाची कॅसेट (पीडी) लावून देतो. त्यात मी ओळखीचा दिसत असल्याने थोडा गुंततो, माझ्या सोबतची बाई कोण हे त्याने अजून ओळखले नाहीये. एकंदरीत हया प्रश्नावर अजून तरी सोल्यूशन मिळाले नाहीये.

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 9:09 pm | टर्मीनेटर

मोकळा असेल तर त्याला घेऊन खाली फिरून येणे, त्याच्यासोबत खेळणे, टीव्ही हे पर्याय आहेत.

मिपावर वायफळ चर्चा करण्यात जेवढा वेळ घालवता तेवढा पिल्ला (हे अत्यंत प्रेमाने म्हंटले आहे) साठी द्या.... तो वेळ सत्कारणी लागेल!

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

घरी असतो तेव्हा मिपा बंदच असते. घरातले म्हणतात, “कोण ते लोक ? काळे की गोरे? त्यांना कधी पाहिले नाही त्यांच्याशी बोलत बसतोस? एखाद दिवशी तुला बोलावतील नी चांगले कुटतील.” :)
पण आतापर्यंत १६-१७ मिपाकराना भेटलोय पण एकानेही कुटले नाही उलट प्रेमाने खाऊ पिऊ घालून परत पाठवले आहे. :)

टर्मीनेटर's picture

29 Nov 2024 - 9:39 pm | टर्मीनेटर

घरातले म्हणतात, “कोण ते लोक ? काळे की गोरे? त्यांना कधी पाहिले नाही त्यांच्याशी बोलत बसतोस? एखाद दिवशी तुला बोलावतील नी चांगले कुटतील.” :)

😀

आतापर्यंत १६-१७ मिपाकराना भेटलोय पण एकानेही कुटले नाही उलट प्रेमाने खाऊ पिऊ घालून परत पाठवले आहे. :)

मिपाकर आहेत ते,,, मतभेद आणि मनभेद मधला फरक त्यांना चांगला समजतो.... 👍

कंजूस's picture

30 Nov 2024 - 1:01 am | कंजूस

पटलं.

एकूण चर्चेत हा बुमरॅंग पालकांकडेच येत आहे.पालकांनीच सोशल मिडियाचा वापर कमी केल्यास मुलांसाठी ते ठोस उपाययोजना करू शकतील असे दिसते.
फेसबुक, ट्विटर ही पालकांकडून वापरली जाणारी जास्त सोमि आहेत.पण विचार करता तिथे राजकारण,उणीधुणी शिवाय काहीच पोषक असं घडतांना दिसत नाही.जर तुम्ही व्यावसायिक म्हणून ही माध्यमं वापरत असाल तर गोष्ट निराळी आहे.अन्यथा अशा सोमिंचा त्याग केल्यास आयुष्यात काही भूकंप येणार नाही.
राहिला प्रश्न युट्यूब आणि इन्स्टाचा तर इस्टाचा वापर दिवसांतून १५ मि.खुप झाला.युट्युब माझं सर्वात आवडतं सोमि आहे.यावर माहिती मिळते.हुशार असाल तर पैसेही कमवू शकता.
मग मुलांना हानिकारक ठरत आहेत,...रील्स ! काहीही रील्स बनवून लोकं पैसे कमवू लागले आहेत.
-रील्स पाहणे,मुलांसमोर पाहणे कटाक्षाने टाळावे.
-कॉन्सियसपणे स्क्रीन टाईम कमी करणं यासाठी
-पेपर वाचणे,पुस्तक वाचणे.
-बागकाम करणे.
-ट्रेकिंग,फिरायला जाणे.
-प्राणायाम ध्यान १५ मि.करणे.
- भरपूर व्यायाम करणे
-नवीन छंद शिकणे- चित्रकला,गायन,नृत्य,वादन, भरतकाम इ.
एकंदरीत कन्झ्युमर होऊ नका... तुमच्या मुलांनाही होऊ देऊ नका...रीअल लाईफ क्रीअटर बनवा.

टर्मीनेटर's picture

3 Dec 2024 - 1:20 pm | टर्मीनेटर

जर तुम्ही व्यावसायिक म्हणून ही माध्यमं वापरत असाल तर गोष्ट निराळी आहे.अन्यथा अशा सोमिंचा त्याग केल्यास आयुष्यात काही भूकंप येणार नाही.

मी एका समाज/पंथावर लेख लिहायला घेतलाय (जो आज-उद्याकडे लिहुन पुर्ण होणे "अपेक्षीत" आहे 😀) त्यातला सुरुवातीचा उतारा खाली पेस्टवतोय...

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही. पाहात नाहीत, रेडिओ ऐकत नाहीत, स्वयंचलित यंत्रे, वाहने, फोन/मोबाईल फोन वापरत नाहीत, इंटरनेटचा वापर करत नसल्याने आपल्या आस्थापनांमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड्स, डिजिटल पेमेंट न स्वीकारता सर्व व्यवहार रोखीत किंवा चेक द्वारे पूर्ण करतात, गर्भपात आणि गर्भनिरोधक साधने निषिद्ध मानत असून भरपूर संख्येने अपत्ये जन्मास घालतात, थोडक्यात सांगायचे तर मध्ययुगीन जीवनशैलीशी साधर्म्य असणारी जीवनपद्धती हे लोक एकविसाव्या शतकात जगतात असे तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा पटकन विश्वास बसेल का?

आणि विषेश म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला हा पंथ इस्लामशी संबंधीत नाही, आणि आफ्रिकेतल्या किंवा मध्यपूर्वेतल्या कुठल्या तरी मागासलेल्या देशांत नसुन कुठल्या देशात अस्तित्वात आहे, त्यांची जीवनशैली, धार्मिक संकल्पना वगैरेची माहिती रोचक आहे. सांगायचा मुद्दा काय की त्यांच्यासारखी जीवनपद्धती अंगीकारणे आपल्याला अशक्य असले तरी स्मार्ट फोन आणि त्याद्वारे होणारा समाज माध्यमांचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी काही प्रमाणात त्यांचा अनुनय करणे फायदेशीर ठरु शकेल असे वाटते!

प्रतिक्षा नव्या लेखाची...

रीडर's picture

4 Dec 2024 - 5:10 am | रीडर

आमीश की काय तो समाज असावा असं वाटतंय.