उंबर खिंडीतील नाट्य भाग १ (स्लाईड्स १-१६)

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
19 May 2023 - 11:04 pm
गाभा: 

उंबर खिंडीतील नाट्य भाग १ (स्लाईड्स १-१६)

शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते. मिपाकरांसाठी सादर...

मिपा १

मिपा २

मिपा ३

मिपा ३ अ

मिपा ४

मिपा ५

मिपा ६

मिपा ७

मिपा ८

मिपा ९

मिपा १०

मिपा ११

मिपा १२

मिपा १३

मिपा १४

मिपा १५

पुढील भागात... करतलबखानाचा जायचा मार्ग

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

20 May 2023 - 11:17 pm | प्रसाद गोडबोले

जाऊ द्या

पुरंदरे , सोमण , ओक , गोखले , महाजन

संपला विषय =))))

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 May 2023 - 3:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

या लेखात केवळ उंबर खिंडीच्या लढाईबद्दल विश्लेषण आहे. यात आडनावांचा संबंध कुठे आला? मते मांडणारे जर आडनावाने कांबळे,गायकवाड्,भोसले,पाटील वगैरे असते तर ईतिहास बदलला असता का?

कर्नलतपस्वी's picture

22 May 2023 - 4:31 pm | कर्नलतपस्वी

पिंक टाकून गेले.
हा. का ना का

चांगला लेख आहे उगाच वेगळे वळण लागू नये.

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2023 - 12:09 am | प्रसाद गोडबोले

अहो आहात कुठल्या जगात ?
बाबासाहेब पुरंदेरेंनी अख्खे जीवन खर्ची घातले त्यांचा इतिहास अभ्यासण्यात , शेवटी काय झालं त्यांचं ? महाराष्ट्रभूषण दिला तेवां पासुन त्यांना महाराष्ट्र द्रोही ब.मो . असे म्हणुनच ओळखले जाते , हे चक्षुर्वै सत्यं आहे. तुम्ही डोळे झाकुन घेतलेत , आम्ही नाही !
भांडारकरवर जे झालेलं त्याचा कोर्टात निकाल काय लागला आठवतंय का तरी तुम्हाला ? भांडारकर तो झांकी है शनिवार वाडा बाकी हे हे लक्षात ठेवा , विसरु नका !
बामणांनी खोटा इतिहास लिहिला , इतिहासाचे विद्रुपीकरण केले अन पैसे छापले असे सर्रास, अजुन सुस्पष्ट भाषेत, पब्लिक मध्ये बोलणारी लोकं आहेत ! तुम्ही भेटला नाहीत काय त्यांना ?

ब्राह्मणांनी किमान आता तरी जागे व्हावे , लिहायचेच असेल तर अगदी बाळाजी विश्वनाथापासुन ते नाना फडणवीसांपर्यंत कैक लोकं आहेत इतिहासात. त्याच्या आधी अख्खे सातवाहन आहेत . त्यांच्यावर संशोधन करा अन इतिहास लिहा .

पण नको तिथे नाक खुपसुन स्वत:च्या जातिबांधवांना जगणे मुश्कील करु नका ही कळकळीची विनंती आहे !

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2023 - 10:17 am | राजेंद्र मेहेंदळे

मराठा तितुका --असे म्हणणार होतो, पण ती वेळ गेली, आता हिंदू तितका मेळवावा, भारतधर्म वाढवावा.
तो कारतलब खान अफगाणिस्तान की ईराण मधुन आला आणि कोकणपट्टी जिंकायला निघाला, झाकीर नाईक मलेशियात बसून गरळ ओकतोय आणि आपण अजून जातीपातीत गुंतलोय.

काय बोलणार?

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2023 - 11:30 am | प्रसाद गोडबोले

हिंदू तितका मेळवावा, भारतधर्म वाढवावा

हे हे असलेच विचार असलेल्या एका "माथेफिरु"ने जे केलं त्याचे परिणाम आम्ही भोगलेत , आमच्या आजोबांनी भोगलेत. आमचा काडीमात्र संबंध नसताना !
१९४८ मध्ये जे झालं ते करायला लोकं अफगाणिस्तान की इराण की मलेशिया मधुन आलेली नव्हती !
पुण्या मुंबईत बसुन गफ्फा मारणे अन वातावरण गढुळ करणे फार सोप्पे आहे , उर्वरीत महाराष्ट्रात त्याचे काय पडसाद उमटतात ह्याची तुम्हाला कल्पना नाही .

फडणवीसांच्या ट्वीट मध्ये एक शब्द चुकला तर केवढा गजहब माजला होता माहीत आहे ना ! इथे तर अख्खे लेख लिहितायएत , तुम्हाला कल्पनाही नाही की ही केवढी मोठ्ठी रिस्क आहे , किती आगीशी खेळ आहे तो .
परत परत , दरवेळी हात भाजल्यावरच तुम्हाला अक्कल येणार का ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2023 - 4:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

कदाचित तुमचे आडनाव "गोडसे" असेल तर किवा नातेपुते, पुसेसावळी, कोठिंबे सारख्या आडगावातला तुमचा वाडा रातोरात जळला असेल आणि शेती बळकावली असेल तर मी समजू शकतो. माझ्या आधीच्या पिढिलाही काही प्रमाणात ते भोगावे लागले आहे. ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समाजालाही भोगावे लागले आहे. असो. विषय थांबवतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 May 2023 - 6:28 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला, लिहित रहा
पैजारबुवा,

शशिकांत ओक's picture

21 May 2023 - 11:56 am | शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाबद्दल.
दुर्गविहारींची प्रतिक्रिया यायची वाट पहात होतो.
त्यातल्या त्यात कमी धोक्याच्या बोरघाटातून यायचे सोडून करतलबखानाने हा घाट का निवडला असावा यावर काही विचार समजून घ्यायला आवडेल.
पुढील एकूण ४५ पेक्षा जास्त स्लाईड्स मधून आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...

दुर्गविहारी's picture

21 May 2023 - 4:52 pm | दुर्गविहारी

परिसाद थोडा उशीरा देतो आहे, त्याबध्दल क्षमस्व ! पण आधी या विषयावर थोडे संदर्भ तपासले. यावरुन काही बाबी लक्षात आल्या. मुळात शाहिस्तेखानाची मोहीम हि फक्त शिवाजी महाराजांविरुध्द नसून आदिलशाहविरुध्दही होती. त्यामुळे त्याने लालमहालात तळ ठोकून चाकण लढण्याबरोबरच परिंडा ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. परिंडा ताब्यात घेण्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलबखान उझबेगला पाठवले.मोघली फौज पाहून परिंड्यासारख्या बळकट दुर्गाचा किल्लेदाराने घाबरुन न लढताच भुइकोट मोघलाण्च्या हवाली केला. या विजयाने आत्मविश्वास मिळालेल्या कारतलबला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला कोकण प्रांत म्हणजे कल्याण, नागोठणे, भिवंडी, पनवेल, चौल हा प्रदेश ताब्यत घेण्यासाठी पाठवले. या मोहीमेची आखणी शाहिस्तेखान गुपचुप करीत होता, मात्र शिवाजी महाराजांच्या तरबेज गुप्तहेर खात्यामुळे शिवाजी महाराजांना या बातम्या ताबडतोब पोहचल्या. जर कारतलबखान वीस हजार सैन्य घेउन निघाला असेल तर डोंगराळ प्रदेशात युध्द करण्याची सवय नसलेले सैन्य घेउन तो मुद्दम अवघड वाटेने जाणार नाही. शिवाय इतके मोठे सैन्य असताना मोहीमही गुप्त राखणे शक्य नाही. कारण शाहिस्तेखान जेव्हा अहमदनगरवरुन पुण्याकडे येत असताना, वाटेत सोनवडी-सुपे-इंदापुर-शिरवळ मार्गे सासवडला जात असताना वाटेत गराड्याच्या खिंडीत मराठ्यांनी खानाच्या फौजेला चांगलेच पाणी पाजले होते.त्याच्याही आधी खानाच्या लष्करावर मराठ्यांनी सातत्यांनी हल्ले केलेच होते. शिवाय शाहिस्तेखान हा याआधीही दख्खनच सुभेदार होताच. हे सर्व लक्षात घेता, कारतलबखानाला तो अवघड वाटेने जाण्याचा सल्ला देइल असे वाटत नाही. त्यामुळे या परिसरातील बोरघाट हि एकच सोपी वाट उरते. अर्थात हे शिवाजी महाराजांनाही माहिती असल्यामुळे त्यांनी कदाचित बोरघाटात मुद्दाम मावळ्यांच्या काही तुकड्यांची हालचाल केली असावी. अर्थात असा कोठे उल्लेख नाही, पण मला हिच शक्यता वाटते. यामुळे बोरघाटाच्या उत्तरेकडचा भीमाशंकरच्या घनदाट जंगलातून जाणार्या वाटांनी कल्याण-भिवंडीच्या दिशेने जायचे किंवा बोरघाटाच्या दक्षिणेकडून उतरणार्‍या पाच पायरीची वाट, सव घाट, काठीची वाट किंवा त्यातलात्यात सोपा असणारा सवाष्णी घाट याने खाली जायचे हे पर्याय होते.मात्र त्यावेळी मावळातील सर्वच गड शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत होते, तेव्हा हा धोका पत्करणे शक्यच नव्हते. त्यामुळे उंबरखिंडीची वाट किंवा कुरवंडे घाट हि एकच शक्यता उरते. बहुतेक शिवाजी महाराजांना हेच हवे असेल.कारण कारतलबखान पुण्यातून उंबरखिंडीकडे म्हणजे तुंगारण्याकडे येत असताना त्याची वाट लोह्गड-विसापुर व तुंग-तिकोना या चार गडाच्या मधून होती ( सध्याचे पवनानगर धरण ) मात्र या गडावरुन कारतलबखानाला कोप्णताही प्रतिकार झाल्याची नोंद नाही.खरतर कारतलबखानाला इथेच शंका यायला हवी होती, पण अतिआत्मविश्वासाने त्याचा घात केला असावा. पुढे काय घडले ते तुम्ही लिहीलेच आहे.

आता प्रश्न येतो, समजा खान बोरघाटाने उतरला असता तर काय झाले असते ? याचे उत्तर म्हणजे पुढे कान्होजी आंग्रेनी सातारकर शाहु महाराजांच्या फौजेचा ( पहिले बाळाजी विश्वनाथ पेशवे ) केलेला याच बोरघाटात पराभव. कदाचित बोरघाटातील अश्याच एका अडचणीचा जागेचा वापर शिवाजी महाराजांनी केला असताच.

अनेक शक्यता कशा असू शकतात हे समजून घ्यायला सोपे जाते.
या मोहिमेच्या परिघात राहून आपण सुचवलेल्या घटना आणि शक्यता पुढील सादरीकरणातून दिसून येईल.
...
या निमित्ताने ज्यांना इतिहासातील घडामोडींची माहिती आहे त्यांनी या मोहिमेवर आपले विचार व्यक्त करावेत.
हे सादरीकरण मिलिटरीच्या दृष्टीने अभ्यास करून दिसेल

Trump's picture

21 May 2023 - 1:48 pm | Trump

मस्त माहीती.

काही सुचना
१. जर गुगल मॅप्स किंवा तत्समचा दुवा दिल्यास तो भाग प्रत्यक्ष नकाशात पाहता येईल.
२. खुप त्रोटक माहीती आहे असे वाटते. कृपया थोडे जास्त लिहा.

शशिकांत ओक's picture

22 May 2023 - 3:06 pm | शशिकांत ओक

भागात आपली विचारणा पुरी होईल असे वाटते.
या भागातील कथनावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

कर्नलतपस्वी's picture

23 May 2023 - 11:18 am | कर्नलतपस्वी

पण नको तिथे नाक खुपसुन स्वत:च्या जातिबांधवांना जगणे मुश्कील करु नका ही कळकळीची विनंती आहे !

लेखाच्या संदर्भात काही वेगळी माहीती असेल तर लिहायचे नाहीतर आसल्या पिंका टाकून वातावरण गढूळ नका करू. आपली कळकळ आपल्याच जवळच ठेवा.

मिपावर असले प्रतिसाद देऊन कुणालाही शष्प फरक पडत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2023 - 11:34 am | प्रसाद गोडबोले

हा हा हा.

भेटुयात एकदा , सविस्तर भेटुन चर्चा करु. भांडारकर ला यायला जमेल का तुम्हाला ?

Trump's picture

23 May 2023 - 3:27 pm | Trump

लेखाच्या संदर्भात काही वेगळी माहीती असेल तर लिहायचे नाहीतर आसल्या पिंका टाकून वातावरण गढूळ नका करू. आपली कळकळ आपल्याच जवळच ठेवा.

+१

प्रसाद गोडबोले's picture

31 May 2023 - 11:52 am | प्रसाद गोडबोले

आज सकाळला अप्रतिम लेख आला आहे , नक्की वाचा >>>

पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय घेतले अन् अहिल्यादेवी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली
https://www.esakal.com/nanded/ahilya-devi-holkar-jayanti-special-empress...

लेखातील काही वाक्येमुद्दामुन उधृत करीत आहे >

सरदार राघोबादादा भट व शिंदे यांचे सहकार्य वेळेवर न मिळाल्याने हा लढा दोन महिने चालला

त्या काळात पेशव्याई ही मनुस्मृतीनुसार चालत होती. बहुजन समाज अज्ञान, अंध्दश्रध्दा व परंपरेत किचपडत पडलेला होता. त्याकाळी शुद्र माणसाला कसलेच अधिकार नव्हते. त्या काळात सर्व समाजाच्या स्त्रियांना हिन दर्जा मिळत होता. राजे मल्हारराव यांनी वैदिक धर्माच्या विरोधात धडाडी ‌निर्णय घेवून स्रिला सन्मान मिळवून देवून राजकारणात आणले होते

त्यामुळेच परंपरेच्या श्रखंला तोडून धैर्याने पुढे येवून पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय अहिल्येने घेतली आणि आदर्श राज्य करणारी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली.

तरी त्या पुरोहित इतिहासकारानी लिहिलेले चरित्र पुस्तक वाचून लोकमातेच बदनामी करणे चालूच आहे.

मंदिरात कोरडा शिधा व पैसा घेणारे ब्राह्मण पुजारी पण कसलीही सुविधा न देता सामान्यांना लुटण्यासाठी बसलेले असतं. ते स्वतः ला भुदेव समजून घेत असतं.

या देशातील भुदेव मात्र स्वहितासाठी जातीभेद, धर्मभेद करत असतात आणि चुकीचा इतिहास लिहित असतात. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. भुदेवानी छ. शिवाजीला राजा मानल नाही. छ. मल्हाररावाना राजा मानल नाही. अहिल्याईना महाराणी मानल नाही.

म्हणून " सत्यशोधा आणि सत्य स्विकारा " पुरोहितांचे ग्रंथ धिक्कारा,यातच खरा पुरुषार्थ आहे.

असा लिहायचा असतो इतिहास ! शिका जरा काहीतरी. पण शिकतील तर ते कसले .

आम्ही भूदेव शशिकांत ओक ह्यांच्या इतिहास लेखनाचा ठार निषेध अन धिकार करतो .

प्रचेतस's picture

23 May 2023 - 8:25 pm | प्रचेतस

लेख चांगला पण स्लाईड शो फॉर्मेट आणि वेगवेगळ्या रंगसंगतीमुळे वाचणे जिकिरीचे होतेय. प्लेन टेक्स्ट मध्ये लिहिल्यास आणि त्याला अनुरूप अशी छायाचित्रे टाकल्यास वाचणे सुसह्य आणि लेख सुसंगतही होईल.

शशिकांत ओक's picture

24 May 2023 - 9:16 am | शशिकांत ओक

माझ्या पॉवर पॉईंट स्लाईड्सवर मजकूर लेखनाबद्दल "ठीक आहे पण...“
असे म्हटले जाते...
यावर मी काही मोफत सल्ले घेतले. काही पैसे देऊन. त्यानुसार बदल करायला लागलो.
नंतर एकानी म्हटले की तुम्ही एकच रंगसंगतीच्या प्रेझेंटेशनला मोबाईल किंवा लॅपटॉप वर वाचायला,
प्रदर्शनात बॅनर्स म्हणून साधारण ५ ते ८ फुट लांबून वाचायला सोईचे होईल असे करायला
आणि भाषण करताना मोठ्या स्क्रीनवर मागे बसणाऱ्यालाही लांबूनही दिसेल असे करता, तीनही गरजा वेगळ्या आहेत. म्हणून तसे विचार करून वेगवेगळे ३ प्रेझेंटेशन करावेत.
यानंतर काही लोक भेटायला घरी आल्यावर टी व्हीवर दाखवून मते आजमावली. तर त्यांनी काही बदलू नका आहे ते ठीक आहे असे म्हटले!
मी विचार करतो की मला माझे कथन महत्वाचे आहे. नकाशे आणि फोटो यातून मला अभिप्रेत असलेल्या स्लाईड्स सीमित मिडियाच्या माहितीतून सादर करताना कलात्मकता मागे पडत असेल तर सध्या तसेच राहिले तरी चालेल. पुढल्या पिढीतील तज्ज्ञ आणि कल्पक तरुणाई ते काम करेल.

टीव्ही किंवा तत्सम प्रोजेक्शन स्क्रीनवर वाचण्यास उपयुक्त आहेच यात वादच नाही, मात्र मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाचणे कठीण पडते इतकेच म्हणायचे आहे.