1

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-२)

Primary tabs

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
29 Aug 2022 - 1:14 pm

दिवा जंक्शन ओलांडत असताना पनवेलकडून WAP-4 इंजिनासोबत एक समर स्पेशल बाहेर होम सिग्नलला थांबलेली होती. पुढच्या सहाच मिनिटांत राणी कल्याण ओलांडत होती. कल्याणमधून बाहेर पडून कर्जतच्या मार्गाला लागत असतानाच आधी तिकडून आलेली लोकल पलिकडच्या मार्गावरून कल्याणमध्ये आली आणि दीड मिनिटानीच तिच्या मागोमाग पुण्याहून तपकिरी रंगाच्या कल्याणच्या WCAM-2 बरोबर आलेली डेक्कन एक्स्प्रेस शेजारून क्रॉस झाली. या मोठ्या वळणावर पुढच्या सगळ्या डब्यांच्या दारात उभं राहून तसंच खिडक्यांमधून कॅमेरे, मोबाईल बाहेर काढून फोटो आणि व्हिडिओ करणारे Railfans दिसत होते. माझ्या डब्यातही पुढच्या बाजूला Railfans चा एक गट बसलेला दिसला. त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. त्यांच्यातला एक जण वयानं मोठा दिसत होता आणि बाकीचे तरुण वयाचे त्याला खूप मान देत होते. त्यामुळं त्याला खूप भारावल्यासारखं वाटत असावं. त्याच्या चेहऱ्यावरचे एकंदर भाव तसेच वाटत होते.

कल्याण
कल्याण सोडल्यावर मला जरा भूक लागू लागली होती. त्यामुळं नेहमीप्रमाणं खानपानवाला कधी येतोय अशी वाट बघतबघत प्रवासाचा आनंद घेत होतो. कर्जत, अंबरनाथ, बदलापूरच्या लोकल्स शेजारून जात होत्या. बाहेर आता जरा जोराचा पाऊस सुरू झाला होता. म्हणून मी खिडकी बंद केली, पण नव्या-कोऱ्या माझ्या खिडकीच्या वरच्या भागातून पाणी आत माझ्या अंगावर येऊ लागलं. थोड्या वेळानं ते येणं थांबलं. दरम्यान, कल्याण, मुंबईकडे जाणाऱ्या मेल/एक्सप्रेस शेजारून जात होत्या. अंबरनाथला तर WDP-4D सह नागरकोईल काय धडाडत कल्याणकडे गेली सांगू! मुंबईला नियमित देखभालीसाठी पाठवलेल्या एका डब्यासह निघालेली कोयना कल्याणच्या WCAM-3 इंजिनाबरोबर वांगणीला क्रॉस झाली. त्याचवेळी तिथं डाऊन लूपवर दोन WDM-3D इंजिनं जोडलेली कंटेनरची मालगाडी दख्खनच्या राणीसाठी लूपवर उभी करून ठेवलेली होती. कोयनेच्या आधी दौंड-इंदूरही गेली होती. आता कर्जत जवळ आलं होतं आणि उद्यानही क्रॉस झालेली होती, पण गाडीत पाण्याशिवाय काहीच येत नव्हतं. दरम्यान, माझ्यापुढच्या काही रांगा सोडून बसलेल्या प्रवाशांमध्ये एक Railfan होता. त्याला खिडकी मिळाली नव्हती. मग त्याच्या शेजारचा “तिकडे” गेल्यावर त्यानं लगेच खिडकीचं आसन बळकावलं. काही मिनिटांनी तो प्रवासी परत आपल्या जागेवर आल्यावर त्या Railfan ला उठवत होता, पण तो Railfan बाजूला न होता, त्याला तुम्ही माझ्या सीटवर बसा असा आग्रह धरत होता. तो नाही नाही म्हणत होता, पण शेवटी त्या Railfan चा हट्ट त्यानं पुरवला.
राणी आज वेगात पळत असली तरी कर्जतला नियोजित वेळेच्या 9 मिनिटं उशिराच पोहचली होती. कर्जतला नुकताच जोरदार पाऊस होऊन गेल्याचं बाहेरच्या दृश्यावरून दिसत होतं. म्हणून या पावसाळी वातावरणात शेवटी तिथं मी बाहेरचा वडापाव घेतला – गरमागरम आणि चविष्ट!

भोजन
भोजन यान (Dining Car)

दख्खनची राणी पुढे निघाली, तेव्हा कर्जतच्या पुण्याकडे जाणाऱ्या यार्डात एक BCN वाघिण्यांची मालगाडी आपल्या WDG-4 इंजिनांच्या जोडीसह थांबलेली होती, कारण तिला अजून बँकर जोडलेले नव्हते. आता किमान वडापाव खाऊन झालेला असल्यामुळं गाडीत बरेच जण शांत झालेले होते. पळसधरीनंतर पाऊस पूर्ण उघडला होता; पण आधी झालेल्या पावसामुळं घाट हिरवागार झालेला होता. लोणावळ्यापर्यंत येत असताना शेजारच्या अप लाईनवरून कर्जतकडे जाणारे बँकर्स, इंटरसिटी एक्सप्रेस क्रॉस झाल्या. लोणावळ्यात गाडी थांबत असताना तिथं उतरणाऱ्यांची रांग दारापासून बरीच लांब आली होती. त्यातच गाडीतल्या काही Railfans ना खाली उतरून vlog करण्याची घाई झाली होती. पुढच्यांना ते मागून ओरडत लवकर उतरा, लवकर उतरा करत होते. मग त्या प्रवाशांपैकी काहींनी त्यांना झापलं.

बँकर काढून झाल्यावर लोणावळ्यामधला विसावा संपवत दख्खनची राणी पुढच्या प्रवासाला निघाली, तोच पुण्याहून आधी लोकल आणि तिच्या मागोमाग, अगदी अर्ध्या मिनिटाच्या फरकानं इंद्रायणी लोणावळ्यात शिरताना दिसली. पुढे लोणावळ्याच्या TXR यार्डात कर्जतकडे जाणारी एक मालगाडी 3 WAG-7 आणि 2 WAG-5 अशा पाच इंजिनांसह पुढे जाण्याची परवानगी मिळण्याची वाट बघत उभी होती. त्याचवेळी NMG डब्यांच्या WAG-9 इंजिनासह चिंचवडकडे निघालेल्या एका गाडीला बाजूला काढून राणीला मार्ग मोकळा करून दिला गेला होता. आता राणीनं कमालीचा वेग घेतला होता. त्यातच शेजारून सिकंदराबाद-राजकोट आणि बेंगळुरू-अजमेर लोणावळ्याकडे निघून गेल्या. राणीच्या वाटेत येणाऱ्या मालगाड्यांना तळेगाव आणि देहू रोडला बाजूला उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यांनाही ओलांडताना राणीचा वेग अनुभवण्यासारखाच होता. शिवाजीनगर गाठेपर्यंत आणखी एक मालगाडी आणि एक रिकामी गाडी लोणावळ्याकडे गेली.

एसी
वातानुकुलित डबा

अखेर ठीक रात्री 8.05 ला मी शिवाजीनगरमध्ये उतरलो. तिथं काही Railfans उतरले होते. राणी सुटल्यावर त्यांचं गाडीचे व्हिडिओ करणं आणि गाडीतील Railfans ना बाय-बाय करणं सुरू होतं. अशा रितीनं दख्खनच्या राणीच्या पहिल्याच LHB डब्यांबरोबरच्या धावेचा प्रवास करण्याचा अनुभव मला घेता आला; पण कोणत्याही खानपान सेवेशिवाय! तरीही प्रवास मस्त झाला.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/08/2_29.html