मराठी संगीतकार ॠषिराज : माहिती पाहिजे

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
27 Aug 2022 - 10:59 pm

१९७८ - ८० चा सुमार असावा, बन्याबापू या सिनेमाची गाणी खुप गाजत होती.

मी कशाला आरशांत पाहू गं, हे गर्द निळे मेघ, ले लो भाई चिवडा ले लो, प्रीतीचं झुळझुळ पाणी ही गाणी आकाशवाणी आणि गल्लीबोळातही गाजत होती.
उषा मंगेशकर बरोबर हिंदीतील अमीतकुमार, शैलेद्र सिंग यांचा ही प्रेक्षकांना खुप पसंत पडला. ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सवातील मेळ्यामेळ्यात, कॉलेज मधील स्नेहसंमेलनात ही सादर होणार हे ठरलेले होते.

HNB1212DH2

रुढार्थाने नायक नसलेले मोहन गोखले आणि बाळ कर्वे यांनी बहारदार काम करून केलेली धमाल प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती.
HN1214BDH2234

कथा, पटकथा, संवाद हे सिद्धहस्त वसंत सबनीस यांचे होते, बन्या व बापू हे दोघे बेकार तरुण बेकारीला कंटाळून बन्या जीव द्यायला जातात, पण दोघांनाही तरूणी भेटतात आणि वाटेल ते करून जगायचे असे ते ठरवतात. प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोची होत राहते पण जिथे जिथे ते काम धरतात,तिथे काहीतरी घोळ घालतात व परिणामी त्यांची नोकरी जाते. पण शेवटी काही काही होत शेवट गोड होतो असं कथासुत्र गीत, संगीत, विनोद, अभिनय या मुळे सर्वबाजूंनी जमून आला होता ! बॉक्स ऑफिस वर पण बन्याबापूने चांगले यश मिळवले.

123eHN12BDH2ert4

हे सर्व माझ्या शालेय मित्राशी गप्पा मारताना आठवले. या सिनेमाचे संगीतकार ॠषिराज होते. या काळात त्यांनी आणखी काही सिनेमांना संगीत दिले होते, सिनेमांची नावं आठवत नाहीत. संगीतकार ॠषिराज यांच्याबद्दल आंजावर कुठेच काही माहिती मिळाली नाही, त्यांचे छायचित्र देखील नाही !

कुणाला संगीतकार ॠषिराज यांच्याबद्दल काही तपशील माहीत आहेत का ? त्यांचे छायचित्र इत्यादि कुठं उपलब्ध होऊ शकेल ?

चित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

हाच प्रश्न गेल्या वर्षी ही शालेय काळातली गाणी ऐकताना पडला होता. त्या क्षेत्रातील जाणकार मित्रालाही याबद्दल काही सांगता आलं नाही.
जालावर माहिती मिळत नाही. जुन्या दर्दी लोकांकडून माहिती मिळेल असे वाटते. त्यांचा शेवटचा चित्रपट १९९९ चा दिसतो (निर्मला मछींद्र कांबळे असे शीर्षक)
त्या आधी मात्र अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांचा जख्मी दिल (१९९४) यातलं त्यांच्ं संगीत असलेलं एक गाणं ऐकता येईल.

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2022 - 12:56 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद खेडूत.
जख्मी दिलचं गाणं मस्त आहे !
अश्विनी छान दिसलीय या गाण्यात (ही आणखी मोठी स्टार व्ह्यायला हवी होती, पण मला वाटतं ती जागा माधुरीने आधीच पटकावली होती !

हिंदीतही ॠषिराज यांचे सिनेमे आहेत हे प्रथमच कळाले, अर्थात बन्याबापू वाले हे तेच आहेत याची खातरजमा करायला हवी.

या दशकातल्या कित्येक हिट मराठी कलाकारांबद्द्ल काहीच माहिती आंजावर उपलब्ध नाहीय.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक खाते झोपी गेलेले असल्याने मराठी चित्रसृष्टीसाठी असे काही उपक्रम करावेत हे त्यांच्या डोक्यात येणे अशक्यच !

संगीतकार हृषीराज यांचं एक मधाळ गाणं

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2022 - 9:57 pm | चौथा कोनाडा

व्वा सुंदर प्रेमगीत !
❤️❤️❤️

तर्कवादी's picture

28 Aug 2022 - 8:09 pm | तर्कवादी

ही घ्या माहिती. हृषीराज यांनी अनेक भोजपुरी चित्रपटांसाठी प्रामुख्याने काम केलंय असं दिसतंय.

https://www.jiosaavn.com/artist/rishi-raj/aSH8gFV1qi4_

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2022 - 10:14 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, तर्कवादी.

लिंक मधलं गाणं हिंदी आहे जख्मी दिल (१९९१) या सिनेमातलं. यात अक्षयकुमार, अश्विनी भावे असे कलाकार होते

तुम्ही भोजपुरी म्हणाताय ते वेगळे, आताच्या पिढीतले वाटताहेत ! गीतकार, गायक आणि संगीतकार आहेत, बाज स्थानिक वाद्यांचा दिसतोय !

तर्कवादी's picture

29 Aug 2022 - 12:02 am | तर्कवादी

तुम्ही भोजपुरी म्हणाताय ते वेगळे, आताच्या पिढीतले वाटताहेत

पण जिओ सावनने एकाच संगीतकाराच्या अल्बमच्या यादीत जख्मी दिल हा हिंदी चित्रपट, अपराधी नावाचा मराठी चित्रपट आणि अनेक भोजपूरी चित्रपट दाखवले आहेत. म्हणजे जिओ सावननुसार तरी हृषी राज हा एकच संगीतकार आहे. जिओ सावनने जर काही घोळ घातला असेल तर माहित नाही.
"गाना" वर पण अशीच माहिती आहे. याच हृषी राजच्या समोर बन्याबापू , जख्मी दिल आणि अनेक भोजपूरी चित्रपट नमूद केलेले आहेत. पण अर्थात १९७७ च्या बन्याबापूला संगीत देणारा संगीतकार छायाचित्रात खूपच तरुण दिसतोय आणि तरुणपणीचे छायाचित्र म्हणावे तर १९८० च्या दशकातले छायाचित्र वाटत नाही ते. ते डिजिटल छायाचित्र वाटते.त्यामुळे संशयाला नि:संशयपणे जागा आहे.
https://gaana.com/artist/rishi-raj

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2022 - 10:18 pm | चौथा कोनाडा