पावसाळी भटकंती - पुरंदर

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
4 Aug 2022 - 6:21 pm

धवलगडावरून तसेच पुढे निघालो सकाळीच मिसळ खाल्ली असल्यामुळे विशेष भूक नव्हती तरी पण सासवड मध्ये मुलांना थोडा खाऊ घेतला आणि पुरंदराकडे निघालो. गड भारतीय लासखाराच्या ताब्यात असल्यामुळे गडावर जास्तीत जास्त ३ वाजे पर्यंत आत सोडतात आणि ४ वाजता गडावरून बाहेर पडायला लावतात. आणि गडमाथ्यावर जायचा असेल तर तुमचा मोबाइल जमा करावा लागतो. माथ्यावर पण २ नंतर जायला बंदी आहे . त्यामुळे तसं नियोजन करूनच जाव लागत. गडावर संभाजी महाराजांच स्मारक आहे. धवलगडावर रखरखीत ऊन आणि पुरंदरावर पाऊस आणि धुकं . १ ते २ तसं भटकल्यावर मुलांना खूप भूक लागली म्हणून थोडा आधीच निघालो कारण रविवार असल्यामुळे गडावर खूप गर्दी होती. नंतर लौकर बाहेर पडणं मुश्किल झाला असत. नारायणपूर ला दर्शन घ्यायला जायचा होता पण खूप गर्दी आणि मुलांना भूक लागली असल्यामुळे तो बेत रद्द केला , तिथून ५ - १० किलोमीटर पुढे आल्यावर जेवण केल आणि शिवापूर मधून बाहेर पडून घरी आलो.

धुक्यात हरवलेला गड

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

गडावरचे काही फोटो

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Aug 2022 - 6:33 pm | कंजूस

पुरंदरला जायचा विचार आहे. नारायणपूर शिवमंदिर, दत्तमंदिर पाहिलं आहे.

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 10:49 am | कॅलक्यूलेटर

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

4 Aug 2022 - 8:20 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

4 Aug 2022 - 8:20 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

4 Aug 2022 - 8:21 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

4 Aug 2022 - 8:22 pm | चौथा कोनाडा

व्वा , झकास भटकंती वर्णन आणि प्रचि.
धुक्यात हरवलेल्या गडाचे फोटो खुप सुंदर!

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 10:51 am | कॅलक्यूलेटर

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2022 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख भटकंती.

-दिलीप बिरुटे

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 1:50 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद!

राघव's picture

5 Aug 2022 - 3:18 pm | राघव

ती तलवार कुणाची?

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 3:44 pm | कॅलक्यूलेटर

तशी काही तिथे माहिती दिलेली दिसली नाही. आणि असेल तरी माझ्या नजरेतून सुटली असेल कारण तिथे खूप गर्दी होती. पण खूप आकर्षक दिसत असल्यामुळे फोटो घेण्याचा मोह आवरला नाही

फोटोमधे त्या केस वर काही लिहिलेले दिसले पण काय ते समजले नाही, म्हणून विचारले

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 4:50 pm | कॅलक्यूलेटर

मराठा धोप तलवार असा लिहिलेला आहे त्यावर.

कर्नलतपस्वी's picture

5 Aug 2022 - 3:54 pm | कर्नलतपस्वी

नसरापुरच्या घरातून पुरंदर दिसतो. बरेच वेळेस गेलो आहे.
फोटो छान आहेत.

कॅलक्यूलेटर's picture

5 Aug 2022 - 4:51 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद!

प्रदीप's picture

5 Aug 2022 - 8:11 pm | प्रदीप

फोटो, पण काही प्रश्न आहेतः

१. लासखार म्हणजे काय? (का तुम्हाला लष्कर म्हणायचे आहे, व हा टायपो आहे?)

गड भारतीय लासखाराच्या ताब्यात असल्यामुळे

२. एक फोटो चर्चसदृष्य इमारतीचा आहे. ते नक्की काय आहे?

थोडी टिपण्णी: नुसतेच फोटो टाकण्यापे़क्षा, स्थळाची माहिती लिहीलीत तर लेख अजून बहारदार होईल.

कॅलक्यूलेटर's picture

6 Aug 2022 - 12:01 pm | कॅलक्यूलेटर

हो "भारतीय लष्कराच्या" असा लिहायचा होता.
थोडी टिपण्णी: नुसतेच फोटो टाकण्यापे़क्षा, स्थळाची माहिती लिहीलीत तर लेख अजून बहारदार होईल. - पुढच्या लेखात प्रयत्न करतो
२. एक फोटो चर्चसदृष्य इमारतीचा आहे. ते नक्की काय आहे? - तिथे माहितीफलक लावलेला नाही त्यामुळे नक्की सांगता येणार नाही

प्रदीप's picture

6 Aug 2022 - 12:59 pm | प्रदीप

पुरंदर किल्ल्यावर हे इर्गुजि धर्तीचे चर्चसदृष्य बांधकाम नक्की काय आहे, ह्याविषयी येथे कुणी माहिती देईल का? -- प्रचेतस?

प्रदीप's picture

6 Aug 2022 - 3:06 pm | प्रदीप

थोडे गूगलल्यावर मलाच किमान एक दुवा मिळाला आहे, ज्यानुसार पुरंदरावर एकाहून अधिक चर्चेस आहेत. ब्रिटीशांनी १८१८ साली हा किल्ला ताब्यांत घेतल्यावर, त्यांनी ही चर्चेस बांधली आहेत, असे हा दुवा म्हणतो.

प्रचेतस's picture

7 Aug 2022 - 6:56 am | प्रचेतस

होय, ब्रिटिशांनी ही चर्चेस बांधली होती, ह्याशिवाय सैनिकांच्या बंगलेवजा बरॅक्स देखील किल्यावर आहेत. पुरंदर भारतीय सैन्याच्या ताब्यात येण्याआधी तिथं खूपदा जाणे होत असे, ह्या बरॅक्स तेव्हा फार मोडकळीस आल्या होत्या. तुटलेली कौले, फुटलेली तावदाने, मोडलेले दरवाजे, आतमध्ये पालापाचोळा अशी वाईट स्थिती होती. मात्र त्यांची मूळची रचना फार भारी होती, आतमध्ये चक्क फायरप्लेस देखील होत्या. आता मात्र त्यांची निगा बऱ्यापैकी राखली जातेय.
पूर्वी वज्रगडावर जाता यायचे. वज्रगडाच्या सर्वोच्च माथ्यावरील उभ्या दगडांवर जाणे हा अनुभव होता. आता मात्र वज्रगडावर जाणे प्रतिबंधित आहे.

कॅलक्यूलेटर's picture

8 Aug 2022 - 11:10 am | कॅलक्यूलेटर

वा! छान माहिती धन्यवाद .

प्रदीप's picture

8 Aug 2022 - 12:24 pm | प्रदीप

.

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:42 pm | गोरगावलेकर

वर्णन आणि फोटो दोन्हीही छान

कॅलक्यूलेटर's picture

16 Aug 2022 - 4:07 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद