पावसाळी भटकंती - धवलगड

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
3 Aug 2022 - 5:10 pm

पावसाळी भटकंती - धवलगड
अजून म्हणावा असा पाऊस नसल्याने, खूप गरम होत असल्यामुळे आणि सहकुटुंब असल्यामुळे आम्ही अगदी छोटा असा गड निवडला होता. पुण्यापासून जवळपास ५० किमी च्या अंतरावर भुलेश्वर मंदिराजवळ काहीसा दुर्लक्षित आणि निर्जन असा हा गड.
पुणे सासवड यवत असा मार्ग घेतला होता बोपदेव घाट उतरल्यानन्तर ऑस्करवाडी मिसळ ला थांबून नाश्ता केला आणि तासाभरात गडाच्या पायथ्याजवळ गेलो तोच मुलांना हरीण दिसले. मग गाडी थांबवून आम्ही हरीण पाहत बसलो त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले. हरीण दिसल्यामुळे मुलं भलतीच खुश झाली होती ते पाडस बहुतेक त्याच्या कळपापासून लांब आला होता आम्ही दिसल्यामुळे मग ते पळून गेला. १५ - २० मिनिटांमध्ये आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोचलो. गडावर विशेष असे काहीच अवशेष शिल्लक नाहीत. अगदी अर्ध्या पाऊण तासात गड पाहून होतो. ढवळेश्वर मंदिर आणि एक पडकी भिंत. पण स्थानिक लोक बहुतेक रोज गडावर येत असावेत कारण महादेवाच्या पिंडी ला ताजी फुले वाहून यथोचित पूजा केलेली दिसत होती गडावरून खाली उतरून आम्ही गावात एक वाडा आणि मंदिर आहे त्याला भेट दिली आणि पुढे आम्ही पुरंदर ला गेलो . अगदी अर्ध्या दिवसात होईल असा हा ट्रेक किंवा सहकुटुंब भटकंती आणि आराम करण्यासाठी एकदम निवांत जागा. शनिवार रविवार पण अतिशय कमी गर्दी.

मिसळ

हरीण

दोन्ही बाजूने कोरलेली मूर्ती

गडाची भिंत

गणेश मूर्ती

ढवळेश्वर मंदिर

शिवलिंग

फुलपाखरू

आजूबाजूचा परिसर

सहजच

वाडा

वाड्यासमोरील मंदिर

वाड्यासमोरील मंदिर

निसर्ग

प्रतिक्रिया

कॅलक्यूलेटर's picture

3 Aug 2022 - 5:19 pm | कॅलक्यूलेटर

गडावर जाताना चुन्याचा घाना लागतो त्याचा फोटो द्यायचा राहिला होता

कर्नलतपस्वी's picture

4 Aug 2022 - 8:41 am | कर्नलतपस्वी

थोडक्यात पण सुंदर वर्णन, वाडा पुरातन दिसतोय, कुणा शुर सरदाराचा असावा काही माहीती काढलीत का.

कॅलक्यूलेटर's picture

4 Aug 2022 - 10:46 am | कॅलक्यूलेटर

पेशवे कालीन वाडा आहे पण सध्या त्यांचे वंशज पुण्यात राहतात आणि फक्त कधीतरी रविवारी येतात. वाडा छान ठेवला आहे.

इथल्या माळरानांत हरणं, लांडगे चिक्कार आहेत.

कॅलक्यूलेटर's picture

4 Aug 2022 - 11:10 am | कॅलक्यूलेटर

लांडगे आहेत हे माहिती नव्हत पण जर लांडगे असतील तर थोडा धोकादायकच आहे इथे जाणं

कोणतेही वाहन दिसत नाही किंवा मनुष्य दिसत नाही. जाताना यवतवरून पावणेदहाची एसटी मिळाली पण येताना पंचाईत झाली. एखाददुसरी टूवीलर जायची. शेवटी एकदाचा एक छोटा टेंपो आला आणि त्याने मला यवतला सोडले.

सर्वात आवडलेली गैष्ट म्हणजे कोरडी ठक्क गार हवा. इकडे मुंबईत भारी गरम आणि दमटपणाने थकायला होते.

छोटासा लेख आवडला.

कॅलक्यूलेटर's picture

4 Aug 2022 - 12:06 pm | कॅलक्यूलेटर

हो. इथे वर खूप भन्नाट वाहतो आणि शांतता तर एवढी कि अस वाटत परत जाऊच नये.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Aug 2022 - 2:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

सहकुटुंब वन डे पिकनिकला चांगली जागा वाटतेय. सोबत पुरंदरही केला तर दिवस वसुल होईल.
रच्याकने- पुरंदरचे फोटो नाही टाकले?

कॅलक्यूलेटर's picture

4 Aug 2022 - 4:34 pm | कॅलक्यूलेटर

त्याचा वेगळा लेख लिहीन कारण एक तर मला मराठी लिहायला आणि मिपा वर फोटो चढवायला अजून खूप वेळ लागतोय. म्हणून कमी लिखाण आणि मोजके फोटो एवढाच करतोय सध्या. माझ्या गूगल ड्राईव्ह ला फोटो खूप छोटे दिसतात त्यामुळे कोणता फोटो अपलोड होतो हे पण कळत नाही. कोणाला काही कल्पना आहे का कि गूगल ड्राईव्ह वरचे फोटोस मोठे कसे करता yetat

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:38 pm | गोरगावलेकर

भुलेश्वर पर्यंत एकदा जाणे झाले आहे. आजूबाजूचा परिसरही सुंदरच.