सिलबीर उर्फ टर्किश एग्स : तुर्की तडका

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in पाककृती
23 Jul 2022 - 2:19 pm

आज एकंदरीतच Brunch प्रकारातील काहीतरी करण्याची ईच्छा होती पण फार साग्रसंगीत घाट घालण्याची तयारी नव्हती कारण पावसाळी आळस अन आठवडाभर कामानं पडलेला पिट्ट्या.

अश्यात दमदमीत काहीतरी पण लवकरात लवकर होईल असे करायचे डोक्यात आल्याने आज सिलबीर उर्फ टर्किश एग्स करून बघितली, अन महाराजा फर्स्ट अटेम्प्ट जीआरई क्लिअर होऊन मनाजोगती युनिव्हर्सिटी फुल स्कॉलरशिपवर मिळावी इतकी जबरदस्त जमली.

ही रेसिपी तीन भागांत असते, योगर्ट बेस, ऑईल्स आणि कम्पोजिशन ऑफ द डिश.

साहित्य खालीलप्रमाणे

पोच एग्स/ हाफ फ्राय एग्स करता अंडी -
१ किंवा २

योगर्ट :-
१. चार चमचे मध्यम आंबट किंवा गोडसर दही, मी वारणा कप मधले वापरले (अर्धे दही पाणी काढून घट्टसर त्यात अर्धे दही नॉर्मल दोन्ही फेटून तयार ठेवावे)
२. मिरी पावडर १/४ छोटा चमचा
३. काश्मिरी मिर्ची पावडर १/२ चमचा
४. मोठी असल्यास १ लहान असल्यास २ लसूण कळ्या ग्रेटर मधून बारीक किसून.

अलेप्पो बटर :-
१. अमूल बटर - १ चमचा
२. चिली फ्लेक्स - एक पुडी (डोमिनोजवाली वापरली)
३. तिखट पूड किंवा स्मोक पापरीका - १/२ चमचा
४. जिरेपूड - १/४ चमचा

चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल :-
१. तिखट हिरवी मिर्ची - १ बारीक तुकडे करून
२. कोथिंबीर पाने ४-५ काड्यांची धुवून
३. ऑलिव्ह ऑइल किंवा ते नसल्यास कुठलेही स्वीट ऑइल (मी शेंगदाणा तेल वापरले घाण्यावरचे) - १ चमचा.
४. अगदी चवीपुरते मीठ.

कृती :-

१. योगर्ट -
फेटलेल्या दह्यात मिरी पावडर, मिर्ची पावडर आणि बारीक किसलेली लसूण कळी घालून ते एकजीव करावे. हे दही बाजूला ठेवावे , ह्यात आपल्याला मीठ घालायचे आहे पण प्लेटिंग करेपर्यंत घालू नये, ऐन वेळेवर घालायचे असते.

२. अलेप्पो बटर -
तडका करण्याच्या भांड्यात चमचाभर किंवा आवडत असल्यास २ चमचे अमूल बटर गरम करावे, बटर वितळून त्याचा "crackling" आवाज होत बुडबुडे फुटू लागले की ह्या स्टेजला त्यात चिली फ्लेक्स, तिखटपूड/ पापरीका पूड व जिरेपूड घालून लगेच गॅस वरून उतरवून ढवळून घ्यावे, हे बटर असलेला तडका पॅन तसाच बाजूला ठेवावा.

३. चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल -
लाकडी खलबत्यात किंवा असेल त्या खलबत्यात किंवा मिक्सर मध्ये मिर्चीचे तुकडे आणि कोथिंबीर पाने फिरवून घ्यावीत गंध पेस्ट करायची नाही ओबडधोबड सरबरीत करायची असते, आता एका वाटीत ही पेस्ट काढून त्यावर कच्चे शेंगतेल/ ऑलिव्ह ऑइल अन चवीनुसार मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवावे

प्लेटिंग -
वरती सांगितल्या प्रमाणे दह्यात चिमूटभर मीठ घालून फेटून घ्यावे. एका प्लेटमध्ये वरती तयार केलेले योगर्ट/ दही घालून चमच्याने नीट एकसमान पसरून घ्यावे, पसरताना त्यात चिली ऑइल व अलेप्पो बटर टाकायला कंगोरे करून घ्यावेत

त्या दह्यावर आता वरती बनवलेले चमचाभर चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल पसरून घालावे,

इतके झाले की अंडे वाटल्यास पोच (poach) किंवा हाफ फ्राय करून त्या योगर्ट बेड वर ठेवावे, मी हाफ फ्राय केले कारण मला पोचिंगचे परत नवीन भांडी करून कुटाने करणे मनापासून नको वाटत होते,

हे झाले की त्यावरून गार झालेले अलेप्पो बटर ड्रीझल करावे, सोबतीला पिटा ब्रेड खातात जनरली, पण मी घरी होती तीच ब्राऊन ब्रेड कडा कापून कडक भाजून घेतले होते, चालत असल्यास अगदी चपाती घेतली सोबत तरी चालेल.

.

.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Jul 2022 - 3:42 pm | प्रचेतस

लैच खतरा प्रेझेन्टेशन.
अंडी खात नसलो तरी पाकृ मात्र एकदम वेगळी आणि जबरा.

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 3:45 pm | जेम्स वांड

टर्की मध्ये हँगओव्हर फूड म्हणून ही अंडी प्रसिद्ध आहे (म्हणे), आधी मला पण वाटलं होतं की कच्चा लसूण किसून घातलेलं दही अन अंडी कशी लागतील पण तुफान जमलं होतं प्रकरण.

प्रचेतस's picture

23 Jul 2022 - 3:55 pm | प्रचेतस

भारीच जमलंय की. अशाच नाविन्यपूर्ण पाककृती टाकत राहा.

यश राज's picture

23 Jul 2022 - 6:58 pm | यश राज

अंडी खात नसलो तरी रेसिपी आवडली. एकदम जबराट

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 7:14 pm | जेम्स वांड

अंडी का ऑफ डिमांड गेलीत ! माणसे अंडी का खाईनात आजकाल ! प्रचेतस भाऊ पण नाही अन तुम्ही पण नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2022 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडली. ट्राय करतो.
मागे तो दिवाळी अंकातसा ईराणी भात ट्राय केला होता. पण काहीतरी भयानक बनलं होतं.

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 8:15 pm | जेम्स वांड

हे सोपं असतंय, ट्राय कर आवडेल तुला.

गवि's picture

23 Jul 2022 - 8:10 pm | गवि

लै भारी.

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 8:17 pm | जेम्स वांड

गवि, प्रभातसुख मटार करंजीच्या जवळ जाणारं सुख असतं हे पण ! जरूर ट्राय करा.

सुरिया's picture

23 Jul 2022 - 8:18 pm | सुरिया

बेस्ट च रेसिपी. लैच कष्ट घेतलाय जणू.
.
पण काय की अंड्याचे आणि पोटाचे काहीतरी वाकडे आहे. आवडते भुर्जी हाफ फ्राय अंडा टोस्ट पण खाल्ले की सकाळ बिघडते च.
त्यामुळे सध्या पास.
बाकी फौजदारी आवडली होती तुमची. बाजार आमटी आठवली होती मंगळवेढे येथली.
.
बाकी लगे रहो किचन मे. शुभेच्छा.

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 8:23 pm | जेम्स वांड

अंडी खाऊन पोटाला त्रास होत असेल तर एकदा दाखवुन द्या डॉक्टरला, क्रोनिक इन्फेक्शन वगैरे असले तर बरेही होऊन जाईल. कारण अंडी एक जबर प्रोटीन सोर्स आहे तो मिस करू नये एकंदरीत.

कपिलमुनी's picture

23 Jul 2022 - 8:47 pm | कपिलमुनी

उद्याच सकाळी ट्राय करतो

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 8:56 pm | जेम्स वांड

मुनिवर, अन फीडबॅक द्या आम्हाला पण ! आजची रेसिपी ही पहिल्यांदा वाचली केली झाली टाईप आहे !

तुषार काळभोर's picture

25 Jul 2022 - 2:27 pm | तुषार काळभोर

अंडे हा बारमाही आवडता प्रकार!!
हाफ फ्राय हा प्रकार पूर्वग्रहदूषित मनाने नकोसा वाटायचा. गेल्या वर्षी आमच्या सात वर्षांच्या चिरंजीवाने टिव्हीवर पाहून हाफ फ्राय करायला लावलं. तो मनापासून खायचा. एकदा मी हिम्मत करून ट्राय केलं तर चक्क आवडलं!

सरळ साधं हाफ फ्राय इतकं चांगलं असतं, तर त्याला इतकं निगुतीने सजवल्यावर चार चाँद लागतील.

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 9:38 pm | जेम्स वांड

अहो मिष्टर तुका पैलवान,

हाफ फ्राय कसे नाही खाल्लेत, पूर्वग्रहग्रस्त होऊन पाहायला आपल्याकडे राजकारणी आहेत हो, कृपया त्या मांदियाळीत अंडी नका ठेवू.

फुल बेष्ट प्रकार असतो हाफ फ्राय, हा प्रकार करून पहा, आवडेल, तसेही ब्रेड टोस्ट अंड्याच्या घट्ट पिवळ्या बलकात बुचकळून खायला जी मजा येते ती अवर्णनीय आहे.

तिता's picture

25 Jul 2022 - 9:22 am | तिता

मस्त रेसिपी. ग्रीक yohurt मिळत असेल तर वापरावे. Hung curd is a fantastic alternative. Poached egg चांगले लागते पण करायला skill हवे. Fried egg सोप्पे आणि पटकन होणारे आहे. तुमच्या रेसिपी प्रमाणे करून बघणार नक्की

जेम्स वांड's picture

25 Jul 2022 - 10:12 am | जेम्स वांड

मूळ रेसिपीत ग्रीक योगर्ट म्हणलं आहे, पण मला ते आपल्याकडे चक्का मिळतो तितपत घट्ट वाटलं, मला काहीतरी मिडल आल्टरनेटिव्ह हवं होतं म्हणून मी पंधरा मिनिटे टांगलेलं दही अन नॉर्मल घट्ट वारणा दही अर्धे अर्धे फेटून वापरले.

पोच एग्स अन न फुटलेला होलेंडेज सॉस बनवणे एक आचिवमेंट असते, मुळात रेसिपी जितकी सिम्पल वाटते ती तितकी क्लीष्ट असते, साधा फ्रेंच लोफ किंवा न्योकी बनवताना ते पटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2022 - 1:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

करुन बघण्यात येईल,

वेगळे काहीतरी खाल्ल्याचा आनंद मिळेल याची फोटो पाहून खात्री पटली

पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

25 Jul 2022 - 3:43 pm | जेम्स वांड

नक्की करून पाहा,

वाचून कुटाना वाटतो पण होते झटपट एकदम, फक्त अंडी हाफ फ्राय करणे व अलेप्पो बटर बनवणे ह्या दोनच शिजवण्याच्या क्रिया बाकी सगळे मिक्स करून अन खलबत्यात कुटून ओक्के होतात कार्यक्रम, खरा आनंद येतो प्लेटिंगचा, खरोखर एखाद सुंदर चित्र कंपोज केल्याचा आनंद मिळतो ते पाहून (फोटो तुम्ही बघितला आहेच)

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 2:09 pm | टर्मीनेटर

Sunny-side up/ हाफ फ्राय हे आवडते पदार्थ!
अर्थात वर तुका शेठ म्हणालेत तसा मी पण आधी पूर्वग्रहामुळे हाफ फ्राय खात नव्हतो 😀
मग बनवणाऱ्याला पलटी मारायला सांगून दुसरी बाजू पण भाजून घेऊन खाऊ लागलो. आता नुसता हाफ फ्राय पण खायला आवडतो!
दही / योगर्ट बरोबर हाफ फ्राय चवीला कसे लागेल ह्याचा अंदाज बांधता येत नाहीये, पण फोटोज कातिल असल्याने डिश एकदम यम्मी दिसत आहे त्यामुळे करून बघावीच लागेल.

जेम्स वांड's picture

25 Jul 2022 - 3:50 pm | जेम्स वांड

दही अन अंडी ह्या कॉम्बो बद्दल मला पण रिझर्व्हेशन होतीच, पण काही लक्षात घेण्यालायक मुद्दे म्हणजे दही नॉर्मल नाही त्यात लसूण कळी किसून घातली आहे, मिरेपूड आहे अन लाल तिखट आहे चिमूटभर, ते वेगळं होतं एकदम टेस्टी.

ओरिजिनल रेसीपीत तर ग्रीक योगर्ट म्हणत होते, पण ते चक्क्या सारखे घट्ट दही काही माझ्या मनाला उतरले नाही, त्यावर शक्कल लढवून मी वारणा डेअरीचे दही घेतले, पाककृतीत सांगितले आहे त्याच्या अर्धे पंधरा मिनिटं सुती कापडात टांगून घट्ट करून घेतले मग त्यात उरलेले अर्धे दही कवड्याच टाकून दोन्ही हळुवार हाताने फेटून घेतले. परफेक्ट थिकनेस अन टेक्सचर आले बघा.

रांधा आनंदभरे

- (औटघटकेचा बल्लवाचार्य) वांडो

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 4:41 pm | टर्मीनेटर

वारणा डेअरीचे दही घेतले, पाककृतीत सांगितले आहे त्याच्या अर्धे पंधरा मिनिटं सुती कापडात टांगून घट्ट करून घेतले मग त्यात उरलेले अर्धे दही कवड्याच टाकून दोन्ही हळुवार हाताने फेटून घेतले. परफेक्ट थिकनेस अन टेक्सचर आले बघा.

देसी जुगाड भारी आहे... 👍

जेम्स वांड's picture

25 Jul 2022 - 5:08 pm | जेम्स वांड

बनवून बघा शेठ, बोटं चाटत राहाल अन मला दुवा द्याल !!

चौकस२१२'s picture

25 Jul 2022 - 6:37 pm | चौकस२१२

ग्रीक योगर्ट म्हणत होते, पण ते चक्क्या सारखे घट्ट दही काही माझ्या मनाला उतरले नाही
ग्रीक योगर्ट मलईदार असते पण चक्यासारखे घट्ट कुठे असते?
कदाचित चक्का फेटुन मग थोडे श्रीखंड जेव्हा होते तसे अधिक पातळ तुम्हाला म्हणायचं आहे का?

कारण येथे भारतीय प्रकारचे दही ( थोडे आंबट असते ) आणि ग्रीक योगर्ट दोन्ही मिळते आणि निश्चितंच चक्क वेगळ्या पोतिचा ( कन्सिस्टंसी ) असतो
खार इतर श्रीखंड बनव्याला आम्ही भारतीय दह्या ऐवजी ग्रीक योगर्ट वापरतो कारण मलईदार होते

जेम्स वांड's picture

25 Jul 2022 - 8:39 pm | जेम्स वांड

मी चक्क्यासारखे म्हणल्यामुळे कदाचित चूक झाली असेल पण अगदीच चक्का नका समजू त्या म्हणण्याचा अर्थ