ताज्या घडामोडी मे २०२२

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
1 May 2022 - 5:32 pm

गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.

निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.

https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor-...

प्रतिक्रिया

जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत मग ते कोणत्याही आर्थिक स्तरातील असोत ,किंवा कोणत्याही राजकीय पक्ष शी संबंधित असतो .
कठोर मधील कठोर शिक्षा ती पण लवकर त्यांना मिळालीच पाहिजे.
आणि हीच जनतेची अपेक्षा असते.

मुक्त विहारि's picture

2 May 2022 - 10:51 am | मुक्त विहारि

सहमत आहे

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

निनाद's picture

2 May 2022 - 4:58 am | निनाद

निशा सिंग प्रमाणे तरुण वर्गाची वाट लावण्यात आप हा पक्ष आघाडीवर आहे. त्या नंतर तृणमूल आणि राष्ट्रवादी वगैरे असावेत.

“चांगले गुण मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारा”: तामिळनाडूतील शाळांचा नवा फंडा!
तामिळनाडूतील शाळा आणि ट्यूशनमधील विद्यार्थ्यांना हिंदू धर्माचा तिरस्कार करण्यास आणि ख्रिश्चन जीवनशैली स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. सातवी आठवीतील विद्यार्थ्यांना, येशूची प्रार्थना करण्यास सांगितले जात आहे. अन्यथा त्यांना जीवनात अपयश येईल तसेच आणि त्यांच्या शरीरातील विकृती तयार होतील असे मिशनरी भीती घालत आहेत. अंनिस अशा वेळी बरोब्बर गप्प कशी काय असते? आता त्यांना कंठ का फुटत नाही?

मुक्त विहारि's picture

2 May 2022 - 12:09 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद .....

डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या शपथेवरुन वाद; जाणून घ्या ‘हिप्पोक्रॅटिक शपथ’ विरुद्ध ‘चरक शपथ’ वाद...

https://www.loksatta.com/explained/new-row-over-charak-shapath-what-is-i...
--------
No Comments...
--------

फालतू राजकारण चालू आहे.जे नेते स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी भावना भडकवत आहेत.
हिंदू वादी पक्षांकडे हिंदू च्या आर्थिक उन्नती चा काहीच कार्यक्रम नाही. आणि त्या विषयात ते चुकून पण बोलणार नाहीत.
भाषिक राजकारण करणाऱ्या नेत्यांकडे स्थानिक भाषिक लोकांची आर्थिक उन्नती करण्याचा काहीच कार्यक्रम नाही.
इथे सेना, मनसे सर्वांस बघितले.
आर्थिक उन्नती,सामाजिक उन्नती करण्याचा कार्यक्रम असेल तर त्या साठी धर्म बदलणे हा काही मोठा त्याग नाही.
ही सामान्य लोकांची भावना आहे.जे अनेक त्रास सहन करत आहेत पण त्यांचा धर्म,भाषा त्यांना मदत करत नाही.

हिंदू च्या आर्थिक उन्नतीचा एखादा कार्यक्रम तुम्ही सुचवा ....
सामाजिक उन्नती करण्याचा कार्यक्रम असेल तर त्या साठी धर्म बदलणे हा काही मोठा त्याग नाही. हे मौलिक विचार वाचून आपल्या विचारधारेबाद्द्ल सखेद आश्चर्य वाटत आहे.

सौन्दर्य's picture

6 May 2022 - 11:36 pm | सौन्दर्य

आर्थिक उन्नती,सामाजिक उन्नतीचा धर्माशी काय संबंध आहे हे कळले नाही. धर्म म्हणजे अंगावरचे कपडे नाहीत की जे ऋतूप्रमाणे बदलले. आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे आर्थिक व सामाजिक उन्नती हे देशाचे धैय आहे.

काल महाराष्ट्र दिवस होता
राज ठाकरे.
भोंगे,शरद पवार,जेम्स लेन .
संपले विचार.
महारष्ट्र चे आणि मराठी लोकांचे प्रश्न संपले.
देवेंद्र फडणवीस..
नरेंद्र मोदी,योगी,ठाकरे ह्या व्यतिरिक्त काही बोलण्याची कुवत नाही.
राज्याच्या समस्या,देशाच्या समस्या ह्यांचे कोणाला देणेघेणे आहे .

चंद्रसूर्यकुमार's picture

2 May 2022 - 4:38 pm | चंद्रसूर्यकुमार

हेच लिहायचे असेल तर सगळे लिहा की. असे अर्धवट का लिहिता?

कोथळा, खंजीर, अफजलखान, पोट फाडले, बोटं तोडली, गद्दारी, मनगटातील रग, छाताडावर थयथया नाचू, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, वगैरे वगैरे.... च्या पुढे मामुंची झेप नाही हे पण लिहा की.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 4:57 pm | अमरेंद्र बाहुबली

राष्ट्रहीत, नेहरूंच्या चुका, प्रत्येक आंदोलनात मी होतो, जे चालल ते राष्ट्रहीतासाठीच, जे होनार आहे ते राष्ट्रहीतासाठीच, मोदीजी मोदीजी, मी पुन्हा येईन, क्लिनचीट, आणी आज ह्या ईथे, अध्यक्षमहोदय ह्यापुढे माजीमामूंची झेप आहे का?

स्वतःच्या फालतू स्वार्थ साठी बकवास राजकारण करून नका.
१९९३ ची दंगल होती तेव्हा माझा मुस्लिम मित्र असलम मला मुस्लिम भागातून सुखरूप बाहेर घेवून येत होता.
स्वतःच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी देशाला वेढीस धरू नका.

धर्मराजमुटके's picture

2 May 2022 - 4:48 pm | धर्मराजमुटके

मला पण एक प्रश्न आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे हे मी माझ्या जन्मापासून ऐकतो आहे. असे काही होईल की नाही हे मला माहित नाही मात्र साधारणपणे असे घडले तर नक्की मुंबई कुठून कुठपर्यंत तोडतील ?
म्हणजे एक एक टोक कुलाबा मानले तर दुसरे टोक कोणते असेल ? इकडे मध्य रेल्वेच्या नकाशाप्रमाणे गेले तर मुलूंड हे शेवटचे ठिकाण असेल आणि तिकडे बोरीवली शेवटचे ठिकाण असेल काय ? की आमचे ठाणे पण त्यात येणार ? नवी मुंबईचे काय होईल ? ती पण केंद्रशासित होणार की कसे ?
तोडण्याचा डाव असलेल्यांनी आणि तो डाव हाणून पाडणार्यांनी साधारणपणे या गोष्टीवर विचार केला असेल किंवा कसे ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 May 2022 - 4:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुंबई तोडण्याचा हा कथित कुटील डाव दिल्लीत १९६० पासुन निरंतर शिजत आहे रे धर्मराजा. कट शिजवणारे हे स्वयंपाकी फक्त बदलतात. ह्या कटाचा वास दादरच्या शिवसेना भवनातच येतो. अधून मधून सत्ता मिळाली किंवा युती झाली की मग तात्पुरती सर्दी होते आणि मग कटाचा वास येत नाही.
गंमत अशी की आमचा माजी स्मार्ट संपादकालाही(कुमार केतकर) हा वास अधुन मधुन येत असतो. त्याला तर मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचेही वास येत असतात.

वामन देशमुख's picture

2 May 2022 - 6:02 pm | वामन देशमुख

त्याला तर मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचेही वास येत असतात.

बरोबर आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 5:05 pm | अमरेंद्र बाहुबली

तोडण्याचा डाव असलेल्यांनी
मुंबईतील कार्यालये “आपल्या” गुजरात ला हलवणे, युपी बिहारी आणून मुंबईच्या माथी मारणे, हिंदी ही राष्ट्रभाषा असा अपप्रचाप करून हिंदी लादणे नी मराठी डावलणे, शिवसेना, मनसे अश्या मराठी लोकांच्या पक्षाचे खच्चीकरण करणे, त्यांना केंद्रात हलके मंत्रीपद देणे, अडीच वर्षे मामूपद देऊ म्हणून सांगणे नी नंतर दगाबाजी करणे, पहाटे ऊठून शपथा घेणे, मराठी पाट्यांची मुंबईत सक्ती नको म्हणून कोर्टात जाणे, मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणे, मराठी सिनेमांना थेटर मिळू न देणे, ही काही वरची ऊदाहरणे. निरंतर कट अजून शिजतच राहनार….

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 May 2022 - 5:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

युपी/बिहारवाले तर इंदिरा पंतप्रधान असल्यापासुन येत आहेत मुंबईत रे अमरेंद्रा. राजकारणाचे म्हणशील तर आपले मराठी पक्ष- शिवसेना व मनसे.. स्पष्ट सांगायचे तर ह ग रे आहेत . आताच अजय देवगण व किच्च्च्च सुदीप ह्यांनी हिंदीचा मुद्द्दा काढला होता. "हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे " असे अजय देवगण म्हणाला. तेही मुंबईत. पण शिवसेना/मनसे चिडीचूप. ह्यां दोन्ही पक्षांना स्व्तःचे असे धोरणच नाही. वारा वाहील ती दिशा. कधी मराठीचा मुद्दा तर कधी राम मंदीर तर कधी मशीदीवरील भोंगे. मोठे राजकीय पक्ष ह्यांचा फायदा न करून घेतील तर नवल.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 5:23 pm | अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट सांगायचे तर ह ग रे आहेत . आताच अजय देवगण व किच्च्च्च सुदीप ह्यांनी हिंदीचा मुद्द्दा काढला होता. "हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे " असे अजय देवगण म्हणाला. तेही मुंबईत. पण शिवसेना/मनसे चिडीचूप
भोंगा कोण वाजवतंय नी हिंदी राष्ट्रभाषा वगैरे मुद्दे आताच का बाहेर काढले जाताहेत हे न समजायला सेना दुधखुळी नाही. कारस्थान करनार्यांचे सर्व वाया जाताहेत. काही दिवस जाऊद्या अजून नविन मुद्दे येतील पण सरकार काही पडनार नाही. ऊगाच नाही १०६ घरी बसवलेत सेनेने.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 May 2022 - 5:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

इंग्रजी ऐवजी लोकानी एक्मेकांशी हिंदीत संवाद साधावा असे काहीसे विधान अमित शहा ह्यांनी केले होते. त्यावर अनेक पक्षांनी विरोध केला पण मनसे/शिवसेना गप्प. हिंदीविरुद्ध काही बोलले तर जवळीक असणारे बॉलिवूडवाले दुखावले जातील ही चिंता?
तामिळ्नाडूत तर जोरदार निदर्शने चालु झाली आहेत(https://www.youtube.com/watch?v=b2MgQN0LTUM) .ह्यात द्रमुक्/अ.द्रमुक, दोन्हीही पक्ष आहेत.
म्हणजे दोन्ही सेनांचे मराठीप्रेम तोंडी लावण्यापुरतेच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 6:57 pm | अमरेंद्र बाहुबली

अमीत शहा काहीही बोलत असतात. त्यांच्या कडे दुर्लक्ष केले असावे दोघांनीही.

श्रीगुरुजी's picture

2 May 2022 - 8:00 pm | श्रीगुरुजी

राजकारणाचे म्हणशील तर आपले मराठी पक्ष- शिवसेना व मनसे.. स्पष्ट सांगायचे तर ह ग रे आहेत .

वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद! Couldn't agree more.

पण शिवसेना/मनसे चिडीचूप. ह्यां दोन्ही पक्षांना स्व्तःचे असे धोरणच नाही. वारा वाहील ती दिशा. कधी मराठीचा मुद्दा तर कधी राम मंदीर तर कधी मशीदीवरील भोंगे. मोठे राजकीय पक्ष ह्यांचा फायदा न करून घेतील तर नवल.

पुन्हा एकदा वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद!

प्रारंभीच्या काळात शिवसेना वसंतसेना होती व साम्यवाद्यांना संपविण्यासाठी कॉंग्रेसने त्यांना वापरले. नंतरच्या काळात शिवसेना भाजपसेना होती व कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने त्यांना वापरले. २०१९ पासून शिवसेना शरदसेना झाली आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

नंतरच्या काळात शिवसेना भाजपसेना होती व कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने त्यांना वापरले. स्वत भाजपला राज्यात ठावठीकाणा नव्हता आणी त्यांनी शिवसेनेला वापरले. खी खी खी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 May 2022 - 5:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एकेकाळी राज्याच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट सादर करणारे मशीदीच्या भोंग्यापर्यंत खाली आले. सभेत मिळणारा प्रतिसाद पाहिला तर "पेट्रोल महाग झाले तरी चालेल्,नोकरी नसली तरी चालेल पण भोंगे काढले पाहिजेत" असेच अनेकांचे मत दिसते. शिवसेनाही "मुस्लिमांचे लांगुलचलन करणारा पक्ष'च आहे अशी प्रतिमा राज ठाकरेना करायची आहे असे दिसते. महाविकास आघाडी आधीच बदनाम झालेली आहे. तेव्हा सेनेची 'हिंदू'वाली मराठी मते मनसेला मिळतील असा हिशोब असावा.

श्रीगुरुजी's picture

2 May 2022 - 8:35 pm | श्रीगुरुजी

मुळात राज ठाकरेंना स्वत:चे कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळेच प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा पण मराठी मराठी करून उत्तर भारतीयांवर हल्ले अशी परस्परविरोधी भूमिका त्यांनी घेतली होती.

नंतर भाजपला पाठिंबा पण काही काळानंतर भाजपला कडाडून विरोध पण स्वतःच्या पक्षाला निवडणुकीपासून दूर ठेवणे अशी अत्यंत विचित्र भूमिका राज ठाकरेंनी घेतली.

आता अचानक मराठी बाण्याचा मुखवटा उतरवून भगवी शाल परीधान करून हिंदुत्ववादी बाणा स्वीकारून मशीदीवरील भोंगे, अयोध्याभेट असा अत्यंत निरूपयोगी मुद्दा उचलून पुन्हा एकदा भाजपजवळ जायचा प्रयत्न सुरू झालाय.

या सर्व प्रवासात राज ठाकरेंनी कोणत्याही भूमिकेवर ठाम न राहता अनेक परस्परविरोधी भूमिका घेतल्या पण एक भूमिका कायम ठेवली ती म्हणजे शिवसेना विरोध.

सरडा जितक्या वेगाने रंग बदलतो त्यापेक्षा जास्त वेगाने राज ठाकरे भूमिका बदलत राहतात. त्यामुळे जनतेच्या मनातून ते केव्हाच उतरलेत व मतदानाच्या दिवशी जनता ते दाखवून देते.

सध्या भाजप मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नात आहे अशा बातम्या येत आहेत. जनतेत कणभरही स्थान नसलेल्या व जेमतेम अर्धा पाऊण टक्के मते मिळणाऱ्या मनसेशी २५% मते असणाऱ्या भाजपने युती करणे हा शुद्ध मूर्खपणा ठरेल. राज ठाकरेंच्या सभेला कितीही गर्दी जमली तर त्यापैकी १० टक्के सुद्धा मतदार मनसेला मत देत नाहीत हे प्रत्येक निवडणुकीत दिसले आहे. यावेळीही काही वेगळे होण्याची सुतराम शक्यता नाही. राज ठाकरे आता चमत्कार घडविणार असे भाऊ तोरसेकरांना कितीही वाटले तरी तसे घडणार नाही. युती करायचीच असेल तर भाजपने मनसेला २८८ पैकी जास्तीत जास्त १० जागांपेक्षा जास्त जागा देऊ नये. खरं तर भाजपने कोणत्याही सेनेशी युती करण्याची अत्यंत गंभीर घोडचूक पुन्हा करू नये.

पुढील निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप विरूद्ध शिवसेना अशी तिरंगी लढत होईल. या निवडणुकीत एकट्याने लढून शिवसेनेची पूर्ण वाट लागणार आहे. शिवसेनेपासून दूर जाणारी मते भखजपटडे जाणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत अचानक हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राज ठाकरेंना रिंगणात आणले आहे. शिवसेनेपासून दूर जाणारी काही मते मनसेकडे जावी हा उघड उद्देश आहे. राज ठाकरेंच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमागे थोरले पवार असण्याची शक्यता आहे. याच्या बरोबरीने राज ठाकरेंनी स्क्रिप्टेड भाषण करून महाराष्ट्रात २००४ प्रमाणे ब्राह्मण-मराठा वाद उफळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कालपासूनच टिळक-फुले, बाबासाहेब पुरंदरे असे वाद सुरू झाले आहेत. याचा फायदा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमागे मराठा मतदार एकत्रित उभे राहतात. २००४ मध्ये जेम्स लेन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, बाबासाहेब पुरंदरे असे वाद निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला होता. तसेही राज ठाकरेंना राजकारणात महत्त्वाकांक्षा वगैरे राहिलेली नाही. निवडणुक जवळ आली की ठरवून एखादी स्क्रिप्टेड भूमिका घ्यायची व कालांतराने त्या भूमिकेच्या पूर्ण विरूद्ध भूमिका घ्यायची असे त्यांना आता व्यसन लागले आहे. राज ठाकरेंनी आता अचानक घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका व भाजपशी जवळीक हा अशाच एखाद्या स्क्रिप्टचा भाग आहे. भाजपने हे वेळीच ओळखून मनसेपासून दूर राहणे आवश्यक आहे.

सध्या चाललेल्या घटना पाहता पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची मध्यावधी निवडणुक होऊन त्यात २००४ प्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता आहे.

तुमची मिमांसा पटती आहे. पण राज ठाकरे नेहमीच बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूने होते असा माझा समज होता.

अर्थात हा पुरंदरे लेनचा शिळा मुद्दा अचानक वर का आला ह्याचे तुमचे कारण योग्य वाटते आहे.

तीन लाख वर्ग किलोमीटर पेक्षा थोडे मोठे असलेले महाराष्ट्र राज्य आहे.
अनेक देश ह्या पेक्षा लहान आहेत.
१२ कोटी लोकसंख्या आहे.
Gdp भारतात सर्वात जास्त आहे.
इतके महत्वाचे राज्य ..
आणि राजकीय पक्ष आणि त्यांची प्राथमिकता.
१)भोंगे उतरले पाहिजेत.
२) हनुमान चालीसा.
३) हिंदुत्व.
४) मुद्धाच नाही..
प्राथमिकता कशाला हवी .
इथे मोठे महत्वाचे राज्य आहे
१) शेती साठी पाणी पुरवठा.
२)पिण्यासाठी पाणी पुरवठा
३) अखंड वीज.
४) कायदा आणि सू व्यवस्था.
५)शिक्षण.
६) गरीब साठी योजना
७) आरोग्य सुविधा.
८) रस्ते.
मोडकळीस आलेल्या इमारती.
असे अनेक प्रश्न ..

आणि सर्व राजकीय पक्ष जोकर सारखे वर्तन करत आहेत
अतिशय बकवास वर्तन.
हास्य जत्रा ची टीम वाटत आहे.

कॉमी's picture

2 May 2022 - 9:59 pm | कॉमी

मी तुमच्याशी संपूर्ण सहमत आहे. हे हिंदुत्व बिंदुत्व मंदिर मशीद हिंदी मराठी सगळं बाजूला ठेवावं.

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2022 - 8:58 pm | रात्रीचे चांदणे

सध्या चाललेल्या घटना पाहता पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची मध्यावधी निवडणुक होऊन त्यात २००४ प्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता आहे.
मागणी नसतानाही आणि गळीत हंगाम संपायच्या आधीच राज्य सरकारने उसाला प्रतिटन 200 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्र्राचा दौरा जाहीर केला आहे. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करायची घोषणा केली की मध्यवर्ती निवडणुका नक्की होतील.
राज ठाकरेंनी त्यांच्या हिंदुत्व बरोबरच विकासाचा मुद्दा घ्यायला पाहिजे. सध्या भरपूर मुद्दे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. केजरी प्रमाणे स्वतःच वेगळेपण दाखवुण द्यायला पाहिजे तरच, थोडी फार मत मिळतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 9:00 pm | अमरेंद्र बाहुबली

अभ्यासपुर्ण. मनसे ने भाजपसोबत युती करावी. आपले मतदार वाढवावे, १० आमदार (जिंकनार असतील तर) जिंकवीन घ्यावे नी भाजपपासून बाजूला व्हावे. भाजप युती करनार नसेल तर आपले ऊपद्रव मूल्य दाखवून द्यावे जसे २०१९ लोकसभेवेळी दाखवले होते.

सुक्या's picture

2 May 2022 - 10:04 pm | सुक्या

राज ठाकरे यांनी वारंवार आपल्या भुमिका बदलुन आपली विश्वासार्हता शुन्यावर आणुन ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी मतदार मिळत नाही. "मला एक हाती सत्ता द्या, सगळ्यांना सुतासारखे सरळ करतो" वगेरे फक्त वल्गना आहेत हे कुणीही सांगु शकतो. त्यामुळे त्यांना असे वेगवेगळे मुद्दे उचलावे लागतात.

राष्ट्रवादी पक्ष जातियवाद या एका विषयावर ठाम आहे. कालपासुन बंटी आव्हाड जे काही बरळतो आहे तो त्याचाच परिणाम आहे. जातीय फुट पाडुन पोळी शेकुन घेणे या एका गोष्टी साठी ते कायम मुस्लिम लांगुनचालन व ब्राह्मण्द्वेष हे एकाच वेळी करतात. लोकमान्य टिळकांवर काल केलेली टीका / आरोप व बाबासाहेब पुरंदरे यांवर केलेले आरोप याचाच भाग आहेत.

पुढच्या निवडणुकीत भाजपा ने कुणाशीही युती करु नये या मताचा मी आहे. बघु काय होते ते.

हिंदुत्व
मुस्लिम मत्व.
बुध्द मतव.
जाती मत्च.
हवच कशाला.
इथे आता जे काही धर्माची लोक आहेत ती भारताचे नागरिक आहेत
प्रत्येकाचे हीत जपावच लागणार आहे .
सरकार नी फक्त कायदा आणि सुव्यवस्था .
आणि देशाचा आर्थिक विकास .
गरीब लोकांचा आधार .
देशाच्या सीमेचे रक्षण.
इतकेच बघावं .
धार्मिक,जातीय राजकीय पक्षांची देशाला गरज नाही
हिंदुत्व ची पण गरज नाही .
आणि मुस्लिम लोकांचे फालतू लाड करायची पण गरज नाही
आणि बौद्ध म्हणून सरकार चे जावई पण नकोत.

देशातील कोणत्याच राज्याला मुंबई नको आहे.
फक्त मुंबई चा फायदा हवा आहे.
देशातील करोडो लोकांचे मलमुत्र ह्या भूमीत जाते .
प्रचंड प्रदूषण.
मुंबई साठी अखंड वीज .
महत्वाची शेती . वीज निर्मिती ह्या साठी लागणारा पाणी साठा देशभरातील फुकट्या साठी खर्च करावा लागतो.
देश भारतील भिकारी लोकांनी केलेला रोज चा लाखो टन कचरा ..
प्रचंड नुकसान करतो.
मुंबई आम्हाला नकोच.
सर्व आर्थिक फायदा मुंबई चा केंद्र च घेते त्याच्या जिवावर भारत सरकार fokadari करतं असतें

मुंबई आम्हाला नकोच.
मुंबई लं
वीज पुरवठा
पाणी पुरवठा महाराष्ट्र बिलकुल करणार नाही.
मुंबई चा कचरा महारष्ट्र च्या भूमीवर बिलकुल नाकों

मुंबई मुळे महाराष्ट्र चे वातावरण प्रदूषित झाले तर
प्रचंड मोठी रक्कम केंद्राने महाराष्ट्र सरकार ल advance माध्ये दिली पाहिजे.
मुंबई हा पांढरा हत्ती आज च भारत सरकार नी घेवून टाकावी .

राजेश१८८ उपप्रतिसाद देताना मूळ प्रतिसादातल्या निदान एका किंवा दोन वाक्यांचा तरी विचार करत. पण ९७ शब्दांच्या प्रतिसादातल्या मोजून तीन शब्दांवर प्रतिसाद म्हणजे मिपामधला विक्रम म्हणला पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2022 - 5:18 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही थोडा वाट पहात जा ५ वाजताच “बसणं” म्हणजे फार घाई होते निदान संध्याकाळचे ८ तरी वाजू देत जा. मागे तुम्ही स्वित्झर्लंड ला स्विडन समजून पेरतिसाद दिला आता १८८ समजून प्रतिसाद देताय. कंट्रोल ऊदय कंट्रोल.

कॉमी's picture

2 May 2022 - 5:23 pm | कॉमी

शेवटी व्यक्तिगत बोलण्यावर गाडी येतेच.

sunil kachure's picture

2 May 2022 - 5:32 pm | sunil kachure

मुंबई महाराष्ट्रात असणे हेच महाराष्ट्र साठी विनाशकरक आहे
महाराष्ट्र मधील ...
अत्यंत अमूल्य अशा पाण्याचा पुरवठा मुंबई ला करावा लागत आहे
नैसर्गिक साधन संपत्ती चा विनाश करून निर्मित होणारी वीज मुंबई साठी वापरावी लागत आहे ..नैसर्गिक साधन संपत्ती ची किंमत मानव निर्मित कोणत्याच चलनात होवू शकत नाही.
नैसर्गिक साधन संपत्ती अमूल्य आहे त्याचे मूल्य मानव ठरवू शकत नाही .
ह्या देशभरातील लोक जो कचरा करतात.
त्या मुळे ह्या राज्याचे अमूल्य पर्यावरण धोक्यात येते
आणि मुंबई चा फायदा कोण घेते

सर्व फुकटे,आणि भिकारी.
केंद्र सरकार टॅक्स वसूल करते..फुकटे फक्त हक्क दाखवण्यास तयार असतात.

sunil kachure's picture

2 May 2022 - 7:27 pm | sunil kachure

मुंबई देशाला देवून च टाकावी.पण अटी टाकून.
ज्या कायदेशीर पण आहेत.
मुंबई म्हणजे जास्तीत जास्त ठाणे आणि वेस्ट
ला अंधेरी .
वेस्ट लं जास्त हाव असेल तर पूर्ण घ्या.

पण महारष्ट्र मधून वीज पुरवठा बिलकुल होणार नाही
पाणी पुरवठा बिलकुल होणार नाही.
वीज आणि पाणी हवं असेल तर त्याचा दर महाराष्ट्र ठरवेल.तो काही ही असेल .पाणी अगदी 100रुपये प्रति लिटर पण असेल.
मुंबई चा कचरा महाराष्ट्र च्या भूमीवर बिलकुल नको.
घटने प्रमाणे मराठी लोकांचे अधिकार अबाधित असतील
उद्या नाही आताच मुंबई घ्या.
सफेत हत्ती.,

sunil kachure's picture

2 May 2022 - 7:42 pm | sunil kachure

स्वतःचे बलिदान देवून नैसर्गिक साधन संपत्ती चा विनाश करून .उर्वरित प्रदेशावर अन्याय करून..
बंगलोर,चेन्नई, कोचीन, विशाखापट्टणम,कन्या कुमारी,हैद्राबाद,सिकंदराबाद,मुंबई,पुणे,नागपूर,औरंगाबाद,नाशिक,नवी मुंबई,बेळगाव,कलकत्ता ,हावडा ,अहमदाबाद,सुरत ,अशी आणि अशीच खूप प्रगत शहर राज्यांनी निर्माण करावीत .
बलिदान देवून...
आणि आयत्या बिळावर रेगोट्या ओढायला काहीच कामाचा नसलेल्या प्रदेशातील लोकांनी यावं..कोण सहन करणारं आहे

sunil kachure's picture

2 May 2022 - 10:46 pm | sunil kachure

https://www.sumanasa.com/go/ddYzh6

ज्यांना राज्याच्या सर्वांगीण विकास शी काही देणंघेणं नाही.स्वतःच्या मतदार संघातील लोकांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत

आणि हे लोक प्रतिनिधी आहेत.
कोकणी लोकांनी पण डोकं आपटून घेतले असेल कोणाला निवडून दिले.
ह्यांना जमीन न देण्यात च राज्याचे हीत आहे आणि बाकी लोकांना इशारा पण आहे

sunil kachure's picture

2 May 2022 - 11:00 pm | sunil kachure

त्यांनी महाराष्ट्र bjp ल महारष्ट्र मध्ये कोणत्या मुद्द्यावर सरकार विरोधी आंदोलन करायचे आहे ,ह्याची जाणीव करून द्यावी .
भोंगे,हनुमान चालीसा हे असले प्रकार महाराष्ट्रात चालत नाही .हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही ..
राज्य हिताचे मुद्धे राज्याच्या समस्या ह्याच्या कडे महाराष्ट्र bjp. नी लक्ष द्यावे .
माकड चाळे करू नयेत .
माकड चाळे फक्त यूपी,बिहार मधील लोकांनाच आवडतात
अगदी मोदी च्या गुजरात ल पण माकड चाळे aawdat नाहीत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 May 2022 - 12:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"भोंगे,हनुमान चालीसा हे असले प्रकार महाराष्ट्रात चालत नाही"
१९९२ साली अयोध्येत जे झाले त्याची प्रतिक्रिया मुंबईत आधी उमटली. तेव्हा महाआरत्यांचे जे पेव फुटले होते , सर्वात जास्त महाराष्ट्रात. राज ठाकरे ह्यांच्या सभेचे व्हिडियो पहा. प्रचंड प्रतिसाद मिळतोय. शिट्या व टाळ्या वाजवणारे मराठमोळे लोकच आहेत. बिहारी किंवा उ.प्र.चे नाहीत.
आपण मराठी जन ईतर् राज्यांतील लोकांच्या तुलनेत श्रेष्ठ आहोत हा गैरसमज मनातून काढुन टाका.

सुबोध खरे's picture

3 May 2022 - 6:44 pm | सुबोध खरे

माई

कुठे त्या कचरे बुवांच्या नादाला लागताय?

त्यांचा उजवा मेंदू विचार करतो आणि डावा मेंदू टंकन

पण त्या दोन मेंदूचे एकमेकात अजिबात पटत नाही आणि ते एकमेकांशी संबंध ठेवून नाहीत.

ह्यात फरक असतो

अशा वेगळ्या विचारसरणी असलेल्या लोकांना प्रतिसाद न देणेच उत्तम ...

आपलाच वेळ वाया जातो ....

तुम्ही डॉक्टर आहात किंवा असाल असे प्रतिसाद देताना तुमची भाषा असते ती वाचून वाटत नाही.
भारतीय नाविक दलात तुम्ही काम केले असेल असे पण वाटत नाही
काय झपरी भाषा असते तुमची.

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 8:37 pm | मुक्त विहारि

तुम्ही त्यांचे आधीचे लेख वाचलेले दिसत नाहीत?

डाॅक्टर खरे ह्यांच्या बाबतीत, तुमच्या ह्या दोन्ही शंका बिनबुडाच्या आहेत....

वैयक्तिक अनुभव सांगतो... माझ्या बायकोच्या आजारपणात, सोनोग्राफी, डाॅक्टर खरे यांनीच केली होती

आणि माझ्या ओळखीतले एक एयर फोर्स ऑफीसर, डाॅक्टर खरे यांना, ते संरक्षण खात्यात असल्या पासून ओळखतात ....

वैयक्तिक सांगायचे तर, तुमच्या कुठल्याही प्रतिसादाला, उत्तर मी देत नाही... पण, कुणाच्या चारित्र्याचा प्रश्र्न असेल तर, गोष्ट वेगळी आहे ...

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 8:55 pm | मुक्त विहारि

वरील प्रतिसाद नीट वाचलांत तर, डाॅक्टर खरे, हे संरक्षण दलांत होते, हे मला तरी नक्कीच समजले ...

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 6:40 pm | मुक्त विहारि

प्रेयसीचा मृतदेह नाल्यात दिला फेकून, भाजप नेत्याने केला लव्ह जिहादचा आरोप

https://lokmat.news18.com/mumbai/boyfriend-mohammad-ansaril-arrested-in-...

मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लाच्या (sonam shukla murder case ) हत्ये प्रकरणाचा छडा लावला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी (Mohammad Ansari) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने घरी बोलावून सोनमचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.

बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली; वृत्तपत्रांत देवतांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याचा मुद्दा

https://www.loksatta.com/mumbai/ban-rejected-high-court-issue-publishing...

न्यायालयाचा, योग्य निर्णय....