रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - २

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
22 Nov 2021 - 11:06 am

महाबलीपूरम - दिवस पहिला :
रेल्वे ने निघालो आणि महाबलीपूरम च्या जवळचा स्टेशन चेंगळपट्टू ला उतरलो रेल्वे जवळपास दोन तास उशिरा पोचली. रेल्वे स्टेशन जवळच बस स्टॅन्ड होतं तिथून मग एक दोन जणांकडे चौकशी करून एका बस मध्ये बसलो. बस पूर्ण खचाखच भरलेली होती. तिथल्या एक दोन जणांनी सांगितलं कि महिलांना बस चा तिकीट नाही त्यांना मोफत प्रवास आहे पण त्या प्रवासाचा तिकीट कंडक्टर कडून घ्या. सगळे सोपस्कार पार पडले जवळपास एक तासाने मग आम्ही महाबलीपूरम च्या बस स्टॅन्ड ला पोचलो. बुकिंग.कॉम वर हॉटेल अगोदरच बुक करून ठेवलेला होतं. गुगल मॅप वर हॉटेल तर जवळच दाखवत होतं मग चालतच हॉटेल वर पोचलो. त्याने आधीच सांगितलं कि फक्त इंग्लिश मध्ये बोला आम्हाला हिंदी येत नाही. मग सगळयांचे ओळखपत्र दाखवून खोल्या ताब्यात घेतल्या हॉटेल च्या रूम आणि आजूबाजूचा परिसर तास छान होतं आणि प्रत्येक मजल्यावर दोरीचा झोपाळा टांगलेला होता. मुले त्यातच बसून लगेच खेळायला पण लागली. मग आम्ही फ्रेश होऊन थोडासा खाऊन आजच्या उरलेल्या दिवसात काय करता येईल हे बघत होतो, तर जवळच सी शेल म्युझीयम होत. मग तिकडे रिक्षा करून गेलो. ३५० रुपये एन्ट्री फी प्रति व्यक्ती भरून आत गेलो. आणि शंख शिंपले यांचे असंख्य प्रकार आणि तेच वापरून केलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आणि डिनोसॉर पार्क हे बघून मुले खुश झाली. तिथेच खूप वेळ गेला. तिथून पुन्हा रिक्षा ने हॉटेल जवळ आलो आणि तिथेच रात्रीचा जेवण करून झोपायला गेलो.

हॉटेल

शिंपल्यां मधून साकारलेल्या वेगळ्या वेगळ्या कलाकृती

म्युझीयम

डायनो पार्क

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा

फोटी दिसत नाहीत.

माहितीसाठी व्यनि केला आहे.

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2021 - 8:23 pm | चौथा कोनाडा

शंख शिंपले, डायनोसॉर म्युझियमचे फोटो छान आहेत.
पुन्हा योग आला तर पहायला पाहिजे हे !