रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - १

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
20 Nov 2021 - 5:34 pm

पहिल्यांदाच प्रवास वर्णन लिहायचा प्रयत्न करतोय तरी सर्व मिपाकर समजून घेतील अशी अपेक्षा करतो.
दर वर्षी दिवाळी मध्ये कुठे जायचं याची तयारी माझ्या मित्रांचे कुटुंब जून जुलै मधेच ठरवतो आणि तसे मग ट्रेन चे बुकिंग करतो. बाकी सगळे नेहेमी प्रमाणे एक एक कारण सांगून बाहेर पडले आता उरलो मी आणि माझा एक मित्र असे आम्ही दोघेच. तर या वर्षी ठरला कि तिरुपती आणि महाबलीपूरम करावं. तसे ट्रेन चे बुकिंग बघितले पण दिवाळी च्या नंतरचे सगळे बुकिंग वेटिंग लिस्ट ला होते. पण ९ च वेटिंग असल्यामुळे पुणे ते तिरुपती हे बुकिंग करून ठेवले होते.आणि त्या अनुषंगाने पुढची सगळी बुकिंग पण करून ठेवली ती सगळी कन्फर्म होती . आता फक्त वाट पाहणे बाकी होतं.
माझे आणि मित्राचे अधे मध्ये वेगळी वेगळी ठिकाण शोधणं पण सुरूच होतं. मग या सगळ्या शोध शोधी मध्ये आम्ही रामेश्वरम आणि मदुराई पण आमच्या ठिकणा मध्ये ऍड केलं मग आता उरलेले ट्रेन चे बुकिंग केले.पण सस्पेन्स काही शेवटपर्यंत संपणार नव्हता.
आमच्या जायच्या ट्रेन चे आरक्षण कन्फर्म होताच नव्हता आमचा जीव टांगणीला लागला, मधेच मित्राचा फोने पण आला कि यावर्षीचा सगळं बुकिंग कॅन्सल करूयात का थोडी अडचण आहे. माझ्या आशा पण मावळायला लागल्या होत्या. मग तेवढ्यात कोल्हापूर ते तिरुपती हि स्पेशल ट्रेन दिसली आणि त्याचा पटकन बुकिंग करून टाकला. ट्रेन ११.४० ची होती. पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही कोल्हापूर ला राज्य परिवहन च्या गाडी ने गेलो आणि नाश्ता करून धावत पळत आमच्या ट्रेन मध्ये स्थानापन्न झालो. आणि सुरु झाली आमची एक यादगार सफर दक्षिण भारत.

दिवस १ रेल्वे प्रवास.
दाटले रेशमी आहे धुके धुके

झुक झुक आगीनगाडी

माझा मुलगा

रिक्षा वाल्यांचा वाईट अनुभव मागे टाकून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला

श्री कालहस्ती मंदिर गोपुर

इस्कोन मन्दिर

रेणीगुंटा स्टेशन च्या शेजारच्या हॉटेल जवळ शिवाजी महाराजांचा फ्लेक्स

पाऊस तर जोरात सुरु होता आणि मंदिरांमध्ये मोबाइलला परवानगी नव्हती मग तिथे जास्ती फोटोस काढता आले नाहीत

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Nov 2021 - 7:06 pm | चौथा कोनाडा

व्वाव्वा, सुंदर भटकंती, वर्णन आणि देखणी प्रकाशचित्रं !
पुढील धाग्यासाठी शुभेच्छा !

कॅलक्यूलेटर's picture

22 Nov 2021 - 11:14 am | कॅलक्यूलेटर
अनिंद्य's picture

21 Nov 2021 - 9:08 am | अनिंद्य

फोटो दिसत नाहीत :-(

कॅलक्यूलेटर's picture

22 Nov 2021 - 11:15 am | कॅलक्यूलेटर

माझ्या संगणकावर आणि मोबाइलला वर दिसत आहेत काय चूक झालीये ती कोणी सांगू शकेल का?

उपयोजक's picture

21 Nov 2021 - 9:13 am | उपयोजक

दिसत नाहीयेत

कॅलक्यूलेटर's picture

22 Nov 2021 - 11:16 am | कॅलक्यूलेटर

माझ्या संगणकावर आणि मोबाइलला वर दिसत आहेत काय चूक झालीये ती कोणी सांगू शकेल का?

दुरुस्ती -
फोटो >> share link>> "change" click करणे
मग " anyone with the link can view"
दिसेल. त्यावर क्लिक करून नंतर येणारी लिंक कॉपी करून वापरणे.

कॅलक्यूलेटर's picture

22 Nov 2021 - 5:09 pm | कॅलक्यूलेटर

तुम्ही सांगितलं तस करून पहिला तर आता हे असा दाखवतेय

दिसतच राहतात.
वेगळी इमेल वापरल्यास फोटो दिसणार नाहीत.

कॅलक्यूलेटर's picture

22 Nov 2021 - 5:35 pm | कॅलक्यूलेटर
कंजूस's picture

23 Nov 2021 - 9:00 am | कंजूस

तुम्ही जी लिंक दिली आहे ती shared आहे पण ती 'direct image Link नाही. त्यातून फोटो मिळवला. त्या फोटोवर 'open in new tab' असे दोन वेळा केल्यावर अड्रेस बारमध्ये हवी ती
lh3_googleusercontent_dot_com ने सुरू होणारी लिंक मिळाली. ती वापरून फोटो.

----------------------

यासाठी अगोदर लेख लिहिले आहेत त्यात योग्य बदल केले आहेत.

गुगल फोटोज अथवा ब्लॅागर यांवरून फोटोची इमेज लिंक कशी मिळवावी

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2021 - 12:57 pm | चौथा कोनाडा

TRYDH

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2021 - 8:11 pm | चौथा कोनाडा

आता दिसताहेत सगळे फोटो !
वर्णन आणि फोटो झकासच.
ग्रेट. रेशमी नधुक्याचा फोटो खास सुंदर टिपलेला आहे.
इतकी खुप धडपड करून फोटो डकवले, तुमच्या कष्टला सलाम.

येवू द्या आणखी भटकंती वृत्तांत !

कॅलक्यूलेटर's picture

24 Nov 2021 - 11:36 am | कॅलक्यूलेटर

धन्यवाद.