देशप्रेमी तील ही गफलत

Primary tabs

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
17 Nov 2021 - 4:39 pm
गाभा: 

'देशप्रेमी' या चित्रपटाच्या अखेरीला एक प्रसंग आहे.
मास्टर दीनानाथला उचलण्याकरिता काही गुंड येतात. मास्टर दीनानाथच्या वेषातील टोनी या दीनानाथांच्या मुलाला पकडतात. मास्टरने वस्तीतील अनेकांना मदत केलेली असते. त्यामुळे ती मंडळी गुंडांना रोखू पाहतात. वस्तीतील दीनानाथांचे बंगाली, पंजाबी, मुसलमान व दाक्षिणात्य सहकारी एकजुटीने गुंडांना प्रतिकार करतात व मास्टर दीनानाथांची यशस्वीपणे सुटका करतात.
इथे एक तार्किक गफलत दिसते. ---
बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य व्यक्तीं या भाषांच्या प्रतिनिधी आहेत. चौथी व्यक्ती धर्माची प्रतिनिधी आहे. चौथी व्यक्ती कोणत्यातरी चौथ्या भाषेची प्रतिनिधी दाखवले असते तर तर्कशुध्द झाले असते.
हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती व शीख असे धार्मिक प्रतिनिधित्व दाखवण्याचा पर्यायही होता. हेही योग्य झाले असते.

काय वाटते ?
तुम्हाला तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील अशा त्रुटी, चुका दिसल्या आहेत का? असतील तर वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

17 Nov 2021 - 5:10 pm | आंद्रे वडापाव

हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पिक्चर आजकालच्या काळात चालणार नाही ...

त्यातील चुका शोधण्याऐवजी , त्याच्यात बदल करून पुनःनिर्मित /प्रक्षेपित केला तर काही आशा वाटत्येय !

(पुनर्निर्मिती साठी परराष्ट्रीय लोकांकडून भांडवल येऊ शकत .. अक्षय कुमारचा विचार व्हायला हरकत नाही )

तर , फरक असा करा ..
युपी बिहारी बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य, मराठी हिंदू लोकांची कॉलनी दाखवा (सगळे संस्कृत मध्ये भांडण वैगरे करतात )
, दीनानाथ पात्राचे नाव बदला, दीनदयाळ करा ...
आणि व्हिलन मुसलमान दाखवा (भाषा त्याची उर्दू दाखवा )...

बघा पिक्चर हिट्ट होतो कि नै !

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2021 - 11:02 pm | चौथा कोनाडा

अश्या कित्येक चुका त्रुटी किती तरी आढळतील, त्याकडे डोळे झाक करणे हेच उत्तम असे मला वाटत आलेले आहे. असल्या कलाकृती करमाणुकीसाठी. लॉजिक लावायचे तर या पेक्षा वेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायला हवेत (उदा. मराठीतला कोर्ट)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2021 - 11:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गफलत म्हणजेच मनमोहन देसाईंचा मसाला.!
प्रांत/भाषावाद भारतात होताच. रफी साहेबांचे ते गाणे लोकप्रिय होते. "मेरे देशप्रेमियो..."
"पूरब पश्चिम उत्तर डाकखां वालो मेरा मतलब है
इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मज़हब है"

विजुभाऊ's picture

23 Nov 2021 - 11:29 am | विजुभाऊ

एका पडेल सिनिमाचे इतके शवविच्छेदन कशाला करायचे

मनजी एकदम पेशल होते. त्यांना बोलायच काम नै!
अमर अकबर अन्थनी पाहिला तर बाकी उदाहरणे फिकी पडतील.

असं रक्तदान जगात कुठं झालं नसेल. :)

w

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Nov 2021 - 12:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक सोडुन हजार उदाहरणे सापडतील हिंदी चित्रपटांमध्ये अशा बिनडोकपणाची. पण काय आहे ना? सगळीकडे डोके वापरायचे कशाला? त्यालाही थोडा आराम द्यायला हवा की नको? ती सोय आपल्याला हिंदी चित्रपटांनी करुन दिली आहे त्याचा फायदा घ्यावा.

उदा. गोविंदा आणि डेविड धवनच्या काळचे चित्रपट आठवा. किवा गेलाबाजार सलमानचे दबंग आणि तत्सम चित्रपट. आता सलमानने शर्ट काढुन बेटकुळ्या दाखविल्या , आणि गोविंदाने आचरट विनोद केले तर तो चित्रपट चालणार. बाकी फालतु कथेबिथेकडे बघायला वेळ कोणाला आहे?

तर्कवादी's picture

28 Nov 2021 - 6:39 pm | तर्कवादी

बिनडोकपणा हॉलिवूडमध्ये चालत नाही असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज म्हणावा.. अनेक उदाहरणं देता येतील पण आजच मी SkyBound नावाचा चित्रपट प्राईमवर पाहिला... तद्दन थिल्लर कथा आणि पटकथाही. हवेत उडत्या विमानातला नायक बाहेर येवून एका छोट्या कुर्‍हाडीने विमानाचे इंजिन तोडतो आणि ते तोडून विमानापासून वेगळे करतानाच स्वतःचे बलिदान देतो. आणि हे सगळं का तर दोन इंजिनापैकी एक इंजिन कमी केले तर विमानाचे वजन कमी होवून विमान अधिक दूर जावू शकेल.