मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
29 Sep 2021 - 7:37 am
गाभा: 

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकरहो!
आपला कट्टा नाशिक येथे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे होणार आहे. आपणा सर्वांना या निमित्ताने तेथे कुटूंबासहीत उपस्थित राहण्याचे हार्दीक निमंत्रण आहे.

एकत्र जमण्याचे ठिकाणः नाशिक, अशोक स्तंभ - सर्कल थिएटर (किंवा ठरणार्‍या हॉटेलातही सरळ यावे)
वेळः मिसळ खाण्याची, अर्थात सकाळची, ९:३० वाजताची.

पुन्हा एकदा सर्व मिपा परिवाराला एकत्र येण्याचे हार्दीक निमंत्रण आहे.

#मिपाकट्टा, #मिसळपाव.कॉम-कट्टा, #मिपाकट्टा@नाशिक, #चला-नाशिकला, #mipakatta@Nashik, @katta-nashik

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Sep 2021 - 9:09 am | प्रचेतस

नाशिकला असतो तर नक्की आलो असतो.
कट्ट्यास शुभेच्छा आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2021 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाश्कात असतो तर, आलो असतो.
शुभेच्छा.

मिपाकट्टे जगभर होत राहीले पाहिजे.

-दिलीप बिरुटे

खेडूत's picture

29 Sep 2021 - 10:10 am | खेडूत

कट्ट्याला शुभेच्छा!
वृत्तांत मात्र येऊदे. . मागचा कधी वाचला हेही आठवत नाही इतके दिवस लोटलेत!

अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने उपस्थित मिपाकर काळजी घेतील..

पाषाणभेद's picture

29 Sep 2021 - 10:22 am | पाषाणभेद

हो काळजी घेवू.

गॉडजिला's picture

29 Sep 2021 - 10:37 am | गॉडजिला

कोरोना मास्क वगैरे नियम पाळुन.

थोडे ओडिओसुद्धा घ्या.
----
पण रामकुंडावर श्राद्धानिमित्त नाशकात गर्दी आहे ना??

पाषाणभेद's picture

29 Sep 2021 - 12:05 pm | पाषाणभेद

रामकुंडावर आताच कुठे जायचे? जायचे ते शेवटचा घास घ्यायला!

hrkorde's picture

29 Sep 2021 - 12:01 pm | hrkorde

छान

सुरिया's picture

29 Sep 2021 - 12:09 pm | सुरिया

खाण्यापिण्याची चंगळ करा. मज्जा करा.
शुभेच्छा.

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2021 - 1:00 pm | चौथा कोनाडा

मस्तच !
नाशिककर नसल्याने अर्थातच येऊ शकणार नाही.
कट्टयास अ. हा. शु,
बर्‍याच दिवसात मिपा कट्टा झालेला नाहीय, वृतांत वाचण्यात आलेला नाहीय, तेव्हा हे वृत्त खुप आश्वासक आहे !

🥂
चीयर्स मिसळपाव, चीयर्स मिपा कट्टा !

कुमार१'s picture

29 Sep 2021 - 1:05 pm | कुमार१

कट्ट्यास शुभेच्छा

रंगीला रतन's picture

29 Sep 2021 - 1:40 pm | रंगीला रतन

कट्ट्यास शूभेचहा :=)
सोशल डीस्टनन्सीग चे पालन करून मज्जा करा.

टर्मीनेटर's picture

29 Sep 2021 - 1:42 pm | टर्मीनेटर

कट्ट्यास शुभेच्छा!
फोटोंसहित व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत.

नावातकायआहे's picture

29 Sep 2021 - 1:46 pm | नावातकायआहे

कट्ट्यास शुभेच्छा! व्रुत्तांत येइलच!!

सतिश गावडे's picture

29 Sep 2021 - 1:50 pm | सतिश गावडे

नाशिकला असतो तर नक्की आलो असतो.
कट्ट्यास शुभेच्छा आहेतच.

प्रचेतस's picture

29 Sep 2021 - 1:57 pm | प्रचेतस

शौकीनने अशोकस्तंभाजवळच कायमस्वरूपी गाळा घेतलाय म्हणे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Sep 2021 - 1:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्याच दिवशी त्याच वेळी पुण्यात कट्टा होऊ शकतो का?
ठिकाण डेक्कन(पाताळेश्वर), औध,बाणेर किवा तत्सम

बादवे नाशिक कट्ट्याला शुभेच्छा!!

हे वाचुनच माझ्यात अंमळ तारुण्य निर्माण झाले आहे असे वाटत आहे :)

पुणे कट्याला माझ्या मनपुर्वक शुभेच्छा

नि३सोलपुरकर's picture

29 Sep 2021 - 2:20 pm | नि३सोलपुरकर

कट्ट्यास शुभेच्छा!

...व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत.
नि३

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Sep 2021 - 2:21 pm | अमरेंद्र बाहुबली

कट्ट्यास शुभेच्छा. वृत्तांत जरूर कळवावा.

शुभेच्छा. येणे शक्य नाही.

पाषाणभेद's picture

30 Sep 2021 - 9:31 am | पाषाणभेद

पेरूची वाडी

https://g.page/peruchi-wadi-chulivarachi-misal?share

Address: Mungsare Phata Makhmalabad Girnare, highway, Nashik, Maharashtra 422003, India
Hours:
Open ⋅ Closes 4PM
Phone: +91 95033 02007

ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ या पत्यावर सकाळी 9:30 च्या सुमारास पोहोचावे.

वाहनाची सोय नसणार्‍यांनी मध्यवर्ती ठिकाण अशोकस्तंभ, सर्कल थिएटरच्या कंपांऊंड साईडला थांबावे. म्हणजे त्यांना शोधणे अन पीक अप करणे सोपे होईल.

शक्यतो वेळेबरहूकूम पोहोचलात तर लवकर खाणे होईल व इतर स्पॉटही भटकंती करता येईल.

तुषार काळभोर's picture

30 Sep 2021 - 10:02 am | तुषार काळभोर

पुण्यापासून अंमळ दूर असल्याने उपस्थिती शक्य नाही. पण बर्‍याच वर्षांनी जाहीर मिपा कट्टा होत असल्याने मनःपूर्वक शुभेच्छा!
सविस्तर वृत्तांत आणि भरपूर फोटो टाका. जमल्यास दोन चार जणांनी मिळून धावता वृत्तांत + फोटो टाकत राहा...

अनन्त्_यात्री's picture

30 Sep 2021 - 8:10 pm | अनन्त्_यात्री

काढताना मास्क काढावा ही नंब्र विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2021 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि फोटोखाली क्याप्शन टाकून हे हे यांचं नाव आहे, डावीकडून, उजवीकडून, क्रमांक अनुक्रम, बसलेले उभे... वगैरे ठळक खुणा सांगाव्यात समजायलाही सोपं जाईल. ;/

-दिलीप बिरुटे

जुइ's picture

30 Sep 2021 - 8:21 pm | जुइ

वृत्तांत येऊद्यात.

लई भारी's picture

1 Oct 2021 - 5:52 am | लई भारी

वृत्तांत येऊ द्या फोटोसकट!

MipaPremiYogesh's picture

3 Oct 2021 - 10:08 am | MipaPremiYogesh

वाह बऱ्याच दिवसांनी कट्टा..मस्त..येऊ द्यात लेख..

पुणेकरांनो घ्या मनावर कट्ट्याचे

कुमार१'s picture

3 Oct 2021 - 1:04 pm | कुमार१

पुणेकरांनो घ्या मनावर कट्ट्याचे

2019 च्या दिवाळी पूर्व पाताळेश्वर कट्ट्याची पुनरावृत्ती व्हावी
ऐकताय ना मालक मंडळी :))

नाशिकचा वृत्तांत अजून का येईना?
तमाम महाराष्ट्रीय मिपाकरांचे डोळे लागून राहिले आहेत !!

तुषार काळभोर's picture

3 Oct 2021 - 10:24 am | तुषार काळभोर

कोण कोण आलंय?
धावता वृत्तांत टाकत राहा..

पाऊस असल्याने कट्ट्याला माझा ब्रेक पण दुपारी महाराजा काठीयावाडी ढाब्यावर जेवायचे नक्की आहे... कोणी आहे का फ्री ? मस्त जेवण अशी चव फक्त अन् फक्त नाशकातच.

संगणकनंद's picture

3 Oct 2021 - 1:11 pm | संगणकनंद

डोंबीवली फास्ट न पकडता आल्याने कट्ट्याला हजर राहू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.

तिथूनच ओडिओ टाकला होता. (अनिवासी यांच्यासाठीचा डॉ. सुहास म्हात्रेंनी बोलावलेला.)

पाषाणभेद's picture

4 Oct 2021 - 6:36 pm | पाषाणभेद

मंडळी,
मिपाकट्टा@नाशिक २०२१ अगदी उत्साहात संपन्न झाला. वृतांतलेखन जमल्यास टाकतो.
पण फोटो आपल्या मिपाच्या फेबू पत्यावर टाकले आहेत. त्याचा लाभ घ्यावा.

पाषाणभेद's picture

4 Oct 2021 - 6:38 pm | पाषाणभेद

https://scontent.fbom19-2.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244261687_4292767110...

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१  मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).

तुषार काळभोर's picture

4 Oct 2021 - 6:45 pm | तुषार काळभोर

एकदम फ्लेक्स वगैरे!!!

गॉडजिला's picture

4 Oct 2021 - 7:35 pm | गॉडजिला

बहूतेक पहिल्यांदाच मीपा कट्टा असा सुन्दर व बहुमान वाढवणारा आयोजित झाला असावा.

फ्लेक्स बघुन मन अतिशय उचंबळून आलं.

सुरेख.

कुमार१'s picture

4 Oct 2021 - 6:47 pm | कुमार१

अभिनंदन !
आनंद झाला पाहून...

पाषाणभेद's picture

4 Oct 2021 - 6:57 pm | पाषाणभेद

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).

निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट).

सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).

निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट).

सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट), सौ. कुलकर्णी मॅडम - (हिरवा पंजाबी सुट)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).

श्री. जानू (सर्वेष सर व त्यांचे कुटुंब जरा उशीरा आले होते. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकर त्यांच्या कुटूंबीयांसोबत मिपाकट्याला आले होते. उपस्थित: डावीकडून: सौ. कुलकर्णी मॅडम, सौ. बोरसे मॅडम, झाडावर बसलेली कु. स्वराली, कु. आरूष, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा.

(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

लहान मुले धबधब्याच्या टोकावरच्या टेकडीवर गेले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्टा साजरा झाला त्याच्या जवळील दरी गावाजवळ असलेले दर्‍याईमाता देवस्थान.

पाठमोरे असलेले श्री. सर्वेष सर (मिपाआयडी - जानू.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी, तसेच लांबवर दिसणारे काश्यप्यी धरणाचे पाणी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन लवकरच करतो.

आणि त्या दऱ्यायी जागाही छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

4 Oct 2021 - 8:10 pm | श्रीरंग_जोशी

नाशिक येथील मिपाकट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पाषाणभेद साहेबांचे व उपस्थित मिपाकर व त्यांच्या कुटूंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन.
कट्ट्याचे व भटकंतीचे फोटो छान आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2021 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाकट्टा यशस्वी केल्याबद्दल पाषाणशेठ आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन. फ़ोटो वृत्तांत आवडला. लै भारी.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

4 Oct 2021 - 8:44 pm | चौथा कोनाडा

व्वा, व्वा ! सुंदर प्रचि. दर्‍याईमाता ठिकाण खुप निसर्गरम्य दिसते
जोरदार कट्टा ! पाभे, बेटे मौज कर दी |
मिपा बॅनर बघून सेंटीमेंटल व्ह्यायला झालं !
💖
एक बेंचमार्क सेट केलात की आपण !

(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)

मिपाकर लेखकांना काही मार्गदर्शन मिळू शकते का ?

ते फार आवडले. शिवाय बंदिस्त जागेतला कट्टा नाही.

प्रचेतस's picture

5 Oct 2021 - 7:00 am | प्रचेतस

सहीच पाभे, जोरदार कट्टा झालेला दिसतोय.
फ्लेक्स लै भारी.

Bhakti's picture

5 Oct 2021 - 7:16 am | Bhakti

छान!

खूप छान कट्टा झाला आहे. सर्व छा. चि. खूप छान आली आहेत.

गुल्लू दादा's picture

5 Oct 2021 - 8:50 am | गुल्लू दादा

खूप सुंदर. वृत्तांत येऊ द्या लवकर.

खूप दिवसांनी कट्ट्याचा धागा आला आणि कट्टादेखील जोरदार झालेला दिसतोय.
फोटो मस्तच.
सविस्तर वृत्तांताची वाट बघत आहे.

पाषाणभेद's picture

11 Oct 2021 - 11:36 pm | पाषाणभेद

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ - वृत्तांतलेखन

बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेत असणारा "मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१" त्याच दिवशी म्हणजे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे "पेरूची वाडी" या हॉटेलात साजरा झाला त्याचा हा वृतांत. या भेटीचे फोटो आधीच प्रसिद्ध झाले असल्याने ते पुन्हा येथे डकवत नाही.

मिपाकर वरचेवर कट्टाभेट म्हणजेच गाठभेट किंवा गेट टुगेदर करतात. नाशकात आजपर्यंत जाहीर मिपाकट्टा कधी झाला नाही. या आधी आम्ही नाशिककर वरचेवर भेटत असतोच. या कोरोनाकाळात त्याला अल्प विश्रांती भेटली होती. त्यावर उतारा म्हणून मिपाकट्टा नाशिक येथेच करण्याचे आम्ही नाशिककरांनी ठरवले होते. बाहेरगावातून येणार्‍या पाहूण्यांची सरबराई करण्याची, त्यांची ठेप, व्यवस्था राखण्याची जय्यत तयारी आम्ही नाशिककरांनी केली होती. पण या कट्याला बाहेरगावचे कुणीही पाहूणे आले नाहीत हे सत्य आहे. आमचा त्यांचेवर राग असणार आहेच. असो.

तर कट्याचे नियोजन कसे करायचे यासाठी नाशिक तसेच इतर ठिकाणच्या मिपाकरांशी संपर्क साधला. त्यात कट्याचा दिवस व ठिकाणावरून बरीच खलबते झाली. अनेक जणांनी यंदाचा कट्टा मुंपुठाच्या (मुंबई, पुणे, ठाणे) आसपासच घ्यावा असा आग्रह धरला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नाशिकला जाहीर कट्याचे प्रायोजकत्व कधीही मिळाले नसल्याने आमचा आग्रह ह्या कट्यासाठी नाशिक शहराला होता. एकदाचे नाशिक ठिकाण जाहीर करून या प्रश्नावर तोडगा काढला गेला. तसेच या भेटीत मिपाकर त्यांचे कुटूंबीय सदस्य देखील आणू शकतात हा ठराव मान्य करण्यात आला. आपले कुटूंबीय जर अशा कट्टा भेटीत सामील केल्याचा आनंद वेगळाच असतो.

एकदाचे ठिकाण ठरल्यानंतर आता भेटीसाठी हॉटेल शोधणे आले. नाशकात अनेक हॉटेल्समध्ये मिसळ मिळते. नाशकात एक खडा मारला की तो खडा दहा मिसळवाल्यांना लागतो (असे मीच म्हणतो.) मुंबई तसेच पुण्याच्या रस्त्याच्या हॉटेल्सला वगळण्यात आले. कारण असे की, तेथे शांततेने मिसळीचा आनंद घेता आला नसता. नाशकातल्या उत्तरेकडील बाहेरच्या भागात मखमलाबाद गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य वातावरण आहे. हे गाव नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येते तरीदेखील गावाने गावपण अजून जपले आहे. (येथेच अभ्या अन लतीकेची मराठी मालीका 'सुंदरा मनामध्ये भरली' याचे चित्रीकरण होत आहे.) तेथील गंगापूर गाव व धरणाकडे जाणार्‍या रस्त्याला अनेक हॉटेल्स आहेत. तेथले एक 'पेरूची वाडी' या नावाचे हॉटेल ठरवले. आदल्या दिवशी तेथे फोन करून आमचे टेबल बूक करण्यात आले.

त्या आधी मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ अशा अर्थाचे दोन बॅनर्स मिपाच्या लोगोसहीत छापून घेतले. बॅनर तयार करणारा मुलाशी (दुकान मालक) बॅनर तयार होत असतांना गप्पा मारत बसलो. त्याला असल्या कट्याचे अप्रूप वाटले. त्याने लावलेल्या रेट बोर्डावरील रेट पेक्षा ५०% कमी रक्कम तो आकारत होता. मी त्याला त्याचे कारण विचारले तर तो म्हणाला की, "तुम्ही एवढे चांगले काम करत आहात. मग तुमच्याकडून कमीच पैसे घेईन वगैरे." मी त्याला सगळे पैसे देऊ करूनही तो पैसे कमीच घेत होता. मग मात्र मी जास्तीचे १०० रूपये तेथल्या एका मुलाच्या हातात दिले. त्या दुकानदार मुलाला मी मिपावरील लेख वाचन करण्यास सांगितले. त्यानेही वेळ मिळाल्यास वाचेन असे आश्वासन दिले.

बॅनरवर मिसळपाव.कॉम असे लिहील्याने मिसळपावच हॉटेलातला मेन्यू आपोआप ठरला गेला. सकाळी साडेनऊ वाजता हॉटेलात भेटण्याचे ठरले गेले. तशा अर्थाची झुम मिटींग आदल्या दिवशी झाली.

मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ रोजी हजर असलेले मिपा सदस्य व त्यांच्या कुटूंबीयांची नावे येथे आधीच लिहीतो म्हणजे लिखाणाला/ वाचनाला संदर्भ लागेल.

- मिपाआयडी- वकिलसाहेब असलेले श्री. संतोष भोई सर.
- मिपाआयडी- हर्‍या असलेले श्री. शिरीष कुलकर्णी साहेब, सौ. कुलकर्णी मॅडम, चि. पार्थ.
- मिपाआयडी पाषाणभेद असलेला सचिन बोरसे, सौ. अर्चना बोरसे, कु. स्वराली.
- मिपाआयडी जानू असलेले श्री सर्वेष लोहार सर, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा, चि. आरुष.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
( कट्टाभेटीचे हे केवळ प्रातिनिधीक छायाचित्र आहे. या आधीच कट्टा भेटीचे इतर छायाचित्रे प्रकाशीत केले आहेत. कृपया ते पहावेत.)

तर मिपा कट्याच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक ०३/१०/२०२१ रोजी आपले वकील साहेब हॉटेलमध्ये सर्वात आधी म्हणजे नऊ वाजेच्या दरम्यान पोहोचले होते. मी देखील त्याच दरम्यान पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण नेमके आनंदवली पुढे चांदशीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने मला पुन्हा माघारी यावे लागले व लांबचा रस्ता जवळ करावा लागला. त्यात वेळ गेला. अर्थात मी जास्त वेळ न जाता मी 9:40 च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर कुलकर्णी साहेबांचा फोन आला. त्यानंतर ते घरून निघाले. ते जवळच राहत असल्याने व त्यांना चांदशीच्या नव्या होणार्‍या रस्त्याचा बायपास माहीत असल्याने ते लगोलग पोहोचले.

हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यांची व एकमेकांच्या कुटूंबातील सदस्यांची ओळख पाळख झाली. पेरूची वाडी हॉटेल हे पेरूच्या बागेतच केले आहे. पेरूची झाडे पेरूच्या बहाराने लगडलेली होती. सर्वेष सर (जानू) व कुटूंबीय अजून पोहोचले नव्हते. त्यामुळे जमलेल्या मंडळींनी पेरूच्या बागेत फोटो काढले. कुणी झाडावर चढून तर कुणी झोक्यावर बसून मजा केली. तेथेच ताजे पेरू विक्रीला होते. मंडळींनी ते पेरू विकत घेतले. सर्वेष सर अजूनही हॉटेलात पोहोचले नव्हते. ते देखील चांदशीच्या नव्या रस्त्यात अडकले होते. मग कुलकर्णी साहेबांनी त्यांना फोनवरून मार्गदर्शन केले. तो पर्यंत मिसळीची ऑर्डर दिल्या गेली होती. मंडळी मिसळ पावाचा आस्वाद घेत होती. जरा वेळाने सर्वेष सर त्यांच्या कुटूंबासमवेत हॉटेलात पोहोचले. मग लगोलग त्यांच्या डीशची ऑर्डर दिल्या गेली. तेथेच ओळख होवून गप्पा सुरू झाल्या. महिला वर्ग गप्पात रंगला होता. मिसळीचा आस्वाद घेणे सुरू होते. तिनही महिला शाळेत मराठी विषय शिकवत आहेत हा एक योगायोग होता. त्यामुळे त्यांच्या गप्पांना निराळाच संदर्भ लाभला.

मिसळ खाऊन झाल्यानंतर गुळाच्या जिलेबीच्या रिपीट ऑर्डरी दिल्या गेल्या. त्यानंतर तेथे पेरूच्या स्वादाचे आईस्क्रीम छान मिळते अशी बातमी कुलकर्णी सरांनी दिली. त्याचा आस्वाद घेण्यात आला. एकूणच आईस्क्रीम छान होते. आता हॉटेलमध्येही गर्दी वाढलेली होती.

खाणे झाल्यानंतर पेरूच्या बागेत पुन्हा फोटो काढल्या गेले. या ठिकाणाहून जवळच आठ एक किमीवर डोंगरावर एक दर्‍या धबधबा आहे. तेथे जाण्याचे आमचे ठरले. वकीलसाहेबांना कामामुळे लगेच निघायचे असल्याने त्यांनी निरोप घेतला. कुलकर्णी दांपत्यानेही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. सर्वेष सर व माझे कुटूंब यांनी धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. धबधब्याचे जवळचे गाव दरी आहे. रस्ता छान शेतातून जाणारा होता. पावसाने शेती बहरली होती. हिरवीगार शेती व वळणाचा डोंगरावर जाणारा रस्ता पाहून मन प्रसन्न होत होते.

धबधब्याच्या बाजूलाच दर्‍या मातेचे डोंगरातल्या कपारीत मंदीर आहे. तेथे जाण्यासाठी पायर्‍या आहेत. मंदीरातून समोरची दरी, बाजूचा धबधबा समोरच्या धरणाच्या पाण्याचा विस्तार दिसत होता. सर्वेष सर मुलांना, महिलांना धबधब्याच्या टेकडीवर चढून गेले. वरती एक छोटासा बांध होता. मी धबधब्याच्या खाली असलेल्या छोट्या पुलाच्या खाली बसून विश्रांती घेतली. कु. प्रज्ञा, चि. आरूष व कु. स्वराली या मुलांनी धबधब्याच्या परिसराचा खरा आनंद घेतला. ते चारही जण भरपूर वेळ धबधब्याच्या काठावर, वरती टेकडीवर होते.

त्यानंतर तेथून निघण्याची वेळ झाली. मखमलाबाद पर्यंत आमच्या गाड्या एकत्र धावल्या व नंतर आमचा मार्ग निराळा होवून आम्ही एकमेकांच्या कुटूंबाचा निरोप घेतला.

अशा रितीने मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ साजरा झाला.

या प्रतिसादाच्या आधीच कट्याच्या भेटीचे, हॉटेल तसेच धबधब्याचे, दर्‍या मातेच्या मंदीराजवळील फोटो टाकले असल्याने आपणास कोण कोण आले होते याची कल्पना आलीच असेल.

कार्यबाहूल्यामुळे मिपाकट्याच्या वृतांता टाकण्यास खूपच उशीर झाला असल्याने क्षमस्व. (शुद्धलेखन तपासले नसल्याने लिखाणातल्या चूकांकडे दुर्लक्ष करावे.)

नाशकात होणार्‍या आगामी कट्ट्यास तुम्हा सगळ्या मिपाकरांस आताच आमंत्रण देत आहे, हे सांगून मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन येथेच थांबवतो.

कळावे,

तुमचाच,
पाषाणभेद.
११/१०/२०२१

श्रीरंग_जोशी's picture

12 Oct 2021 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

पाषाणभेद साहेब, नाशिकच्या पहिल्या जाहिर मिपाकट्ट्याचा वृत्तांत उत्तम आहे.
पुढील कट्ट्यासाठी शुभेच्छा!!

प्रचेतस's picture

12 Oct 2021 - 6:58 am | प्रचेतस

वृत्तांत एकदम मस्त.
नाशिक कट्टा हुकल्याची हुरहूर लागली आहे. आजोळ जरी असले तरी किमान 4/5 वर्षात येणे झालेले नाही, आता मात्र नक्कीच येणार आणि तुम्हा सर्वांना भेटणार.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 11:52 am | टर्मीनेटर

मस्त झाला कट्टा एकदम 👍
फोटो आणि वृत्तांत आवडला. पुढच्या कट्ट्याला उपस्थित राहाण्याचा प्रयत्न करीन!

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:07 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:07 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:08 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:09 pm | चौथा कोनाडा

पाभे,
एक नण्बर कट्टा वृतांत.
फोटो आवडले हे आधीच लिहिलं आहे.
पुणे/पिंचिं कट्टयासाठी तुम्हाला कोच म्हणून बोलवायला हरकत नाही !

सचिन कुलकर्णी's picture

12 Oct 2021 - 12:57 am | सचिन कुलकर्णी
कंजूस's picture

12 Oct 2021 - 12:59 am | कंजूस

जागाही रम्य आहे.
रेल्वेच्या सोयीमुळे पुण्याच्या कट्ट्यांना दोनदा जाता आले. तासाभराच्या भेटीसाठी दहा तास जातात. लोणावळा कट्ट्याला मात्र अधिक वेळ मिळाला. सध्या मात्र रेल्वेच बंद आहे ( सामान्य प्रवासासाठी) आणि दोन स्टेशनेही युगेयुगे दूर झाली आहेत.

पाभे, सविस्तर आणि वाचनीय वृत्तांत लिहलाय.

सोत्रि's picture

12 Oct 2021 - 7:52 am | सोत्रि

फ्लेक्स खुपच आवडला आहे!

जोरदार आणि एकदम जंगी कार्यक्रम झाला आहे हे फोटोंवरून कळतंच आहे.

- (कट्टेकरी) सोकाजी

सुरसंगम's picture

12 Oct 2021 - 8:17 am | सुरसंगम

अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आयोजन करून तुम्ही सर्वानी मस्त कट्टा साजरा केलात.
आणि पुढील कसे कट्टे करावेत याचं उत्तम उदा. दिलेत.
सर्व कट्टेकरी त्यांचे अभिनंदन.

अनन्त्_यात्री's picture

12 Oct 2021 - 11:46 am | अनन्त्_यात्री

सध्या 2 दिवस नाशिक मुक्कामी आहे पण कट्टा मिसल्याचे दु:ख आहे.

सुरिया's picture

12 Oct 2021 - 12:36 pm | सुरिया

फारच छान कट्टा केला हो पाषाणभेद सर.
एकतर अप्रतिम पिलानिंग, उगीच खोडा घालणारे कुणी सदस्य नाहीत, मुख्य म्हणाजे मिपाच्या कट्ट्यासाठी पदरमोड करायची तयारी (असा जंगी फ्लेक्स बोर्ड मिपाइतिहासात पहिल्यांदाच झाला बहुधा) दांडगा उत्साह, आणि मुख्य म्हण्जए कट्ट्याला दिलेला कौटुंबिक रंग ह्यामुळे जी रंगत आली आहे कट्ट्याला की वावावा.
निसर्गरम्य वातावरणात, लॉकडाऊनच्या कैदेतून बाहेर पडून तुम्ही जो मिपाध्वज जोशात फडकवला आहे त्याला तोड नाही.
पाषाणभेद सर, जानू सर, भोई सर आणि कुलकर्णी सर तुम्हाला खूप शुभेच्छा.
आगामे काळात ह्यापासून काही प्रेरणा घेऊन जोशपूर्ण कट्टे पार पडतील, आम्हालाही येण्याची संधी मिळेल अशी आशा याटिकानी व्यक्त करुन मी माझे शब्द आटोपतो.
धन्यवाद

@ प्रचेतस: तुमचे आजोळ येथले आहे हे माहीत होते. तुमचे आगमन आवश्यक, अपेक्षीत होतेच. शौकीनचा गाळा सर्कल थिएटरच्या समोरच आहे. वडनगरेंचे यामाहाचे शोरूम आधी होते त्याच्या शेजारीच. बाकी नेहरू उद्यानाला असतेच त्याची गाडी. तेथे एकदा भेळ खाल्ली. त्याने ते काम भैयांना आऊटसोर्स केलेले दिसले. चव काहीच नाही अन पैसेही जास्त. असो.
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: मनकवडेपण. नुसते येतो म्हणा.
@ खेडूत: वृतांत दिलाय खाली. वेळ झाला लिहायला.
@ गॉडजिला: या, भेटा एकदा नाशकात.
@ कंजूस: ऑडीओ किंवा लाईव्ह रेकॉर्डींग शक्य झाले नाही. भेटीच्या वेळी शक्य नाही.
@ hrkorde: धन्यवाद सर!
@ सुरिया: कट्टाभेट छान झाली. एकदम निराळे वाटले. कुटूंबातील सदस्य देखील आल्याने छान वाटले. भेटी झाल्या. ओळखी झाल्यात.
@ चौथा कोनाडा: हो, भेटीगाठी झाल्या पाहिजे. कोच किंवा नियोजन करण्यात मला आनंदच आहे.
@ कुमार१: धन्यवाद डॉक्टर सर.
@ रंगीला रतन: धन्यवाद सर.
@ टर्मीनेटर: फोटो व वृत्तांतलेखन केले आहे.
@ नावातकायआहे: धन्यवाद सर.
@ सतिश गावडे: पुढल्या वेळी नक्की या.
@ राजेंद्र मेहेंदळे: पुण्यात करा कट्टा अन नाशकाही आले पाहिजे.
@ नि३सोलपुरकर: धन्यवाद. वृत्तांतलेखन केले आहे.
@ अमरेंद्र बाहुबली: येस, वृत्तांतलेखन, फोटो आता टाकले आहेत.
@ कॉमी: धन्यवाद आपणास.
@ तुषार काळभोर: धावता वृत्तांत शक्य झाला नाही. केवळ फोटो अन वृत्तांतलेखन केले आहे.
@ अनन्त्_यात्री: मास्क काढून फोटो काढले आहेत. तसेच फोटोंमधल्या ओळखीच्या खूणा सांगितलेल्या आहेत.
@ जुइ: होय, वृत्तांतलेखन केले आहे. ते कृपया वाचावे.
@ लई भारी: फोटोसहीत वृत्तांत आला आहे.
@ MipaPremiYogesh: धन्यवाद!
@ संगणकनंद: पुढच्या भेटीत नक्की भेटूया!
@ श्रीरंग_जोशी: धन्यवाद सर. कट्ट्याचे श्रेय सगळ्यांचे आहे. त्यांच्यामुळेच शोभा आली.
@ Bhakti: धन्यवाद आपणास.
@ सुरसंगम: धन्यवाद. आजकाल मोबाईलच इतके चांगले असतात की कुणीही चांगली छायाचित्रे काढू शकतो.
@ गुल्लू दादा: वृत्तांत आला आहे दादा. नजरेखालून घाला तो. उशीर झाला लिहायला.
@ सौंदाळा: होय, वृत्तांत लेखन केले आहे.
@ टर्मीनेटर: पुढल्या भेटीची आम्हालाही प्रतिक्षा आहेच, भेटूयात.
@ सचिन कुलकर्णी: तुम्ही आले नाहीत याचा (खोटा) राग आहेच. न येण्याचे कारण संयुक्तीक होते हे मान्य.
@ जानु: पुढच्या वेळी इगतपुरीला ठेवूया कट्टा. मुंपुठा वाले येतील.
@ सोत्रि: हो, छान झाली भेट. अविस्मरणीय. असा योग येत नाही लवकर.
@ सुरसंगम: आनंदात भर पडली.
@ अनन्त्_यात्री: तुम्ही आहात तर फोन करा. तोच आमचा कट्टा, भेट होईल.

तुम्हा सर्वांचे व वाचकांचे आभार. अशाच भेटीगाठी होत राहोत.

प्रचेतस's picture

13 Oct 2021 - 6:20 am | प्रचेतस

बाकी नेहरू उद्यानाला असतेच त्याची गाडी. तेथे एकदा भेळ खाल्ली. त्याने ते काम भैयांना आऊटसोर्स केलेले दिसले. चव काहीच नाही अन पैसेही जास्त

नेहरू उद्यानाची गाडी तर पहिल्यापासूनच आहे, शौकीनची भेळ बोगस आहे, मात्र पाणीपुरी जबरदस्त. फक्त त्यासाठी शौकीनला भेट द्यावी लागते.

दफोराव वृत्तांत आवडला, कट्टा मस्तच झालेला दिसतोय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rama Ashtakam (Ameya Records) Bhaje Visesha Sundaram!!! श्री रामाष्टकम्

विलासराव's picture

16 Oct 2021 - 11:29 pm | विलासराव

इगतपुरीच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करू.

MipaPremiYogesh's picture

31 Oct 2021 - 1:27 pm | MipaPremiYogesh

इतक्या वर्षांनी कट्टा झाल्याचे पाहून मस्त वाटले..बॅनर तर एक नंबर..डिसेंबर मध्ये नाशिक मध्ये मुक्कामी आहे 4-5 दिवस तेंव्हा काही कट्टा असल्यास भेटू..

मुक्त विहारि's picture

31 Oct 2021 - 2:56 pm | मुक्त विहारि

अप्रतिम