ठाणे जिल्ह्यातील दुर्गम किल्ला: गुमतारा

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
18 Sep 2021 - 2:40 pm

गुमतारा किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक दुर्गम किल्ला आहे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर हा किल्ला वज्रेश्वरी देवस्थानाच्या परिसरात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यत्वेकरून दुगाड किंवा मोहिली या गावांतून जाता येते. दुगाड गावातून जाणारा रस्ता तुलनेने सोपा असल्याचे कळले पण मी दोन्ही वाला मोहिली या गावातूनच गेलो आहे. प्रस्तुत व्हिडीओ हा सुद्धा मोहिली गावातून जातानाचाच आहे. इथे पोचण्यासाठी ठाण्याहून यायचे असल्यास ठाणे - भिवंडी - दुगाड फाटा - मोहीली/दुगाड असे येता येते. तसेच वसई/विरार मार्गे यायचे असल्यास वसई/विरार - शिरसाड फाटा - वज्रेश्वरी - महाळुंगे फाटा - मोहीली/दुगाड असे येता येते.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Sep 2021 - 10:16 am | कंजूस

म्हणजे कल्याणपासून १०० किमी वसई विरार परिसर आहे. तिकडे एक वसईचा किल्ला ( जो पूर्वी शाळेच्या सहलीत असायचाच) सोडला तर इतर भाग नाही पाहिला. उदाहरणार्थ कामणदुर्ग किंवा अर्नाळा किंवा तांदुळवाडी किल्ला. पण तुंगारेश्वर देऊळ, आणि वरचा आश्रम इथे गेलो आहे. वनविभागात असल्यामुळे ( ३६/-रु तिकिट आहे प्रवेश )भरपूर पक्षी ,फुलपाखरं, झाडं आहेत.

दुसरी जागा म्हणजे नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार धरण.
( स्टेशनपासून १२ किमी. ,बस जाते) या परिसरात म्हशींचे गोठे आणि शेण असल्याने इवनिंग ब्राउन प्रकारातील ( फुलांचा मध याऐवजी शेण खाणारी )फुलपाखरे बरीच आहेत. सेप्टेंबर ,ओक्टोबर ,नोव्हेंबर हा सीजन असतो फुलपाखरांचा. नऊनंतर फुलपाखरांचे फोटो मिळत नाहीत कारण ऊन खाल्ल्यावर ती फार उडतात.

विडिओ पाहिला. रम्य भाग दिसत आहे. पण स्वत:चे वाहन लागेल बहुतेक.

इरसाल कार्टं's picture

20 Sep 2021 - 12:03 pm | इरसाल कार्टं

स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अन्यथा दुगाड फाट्यापर्यंत बसने येऊन पुढे रिक्षाने जावे लागेल

तिथून नित्यानंद महाराज मंदिराचा कळस सुरेख दिसतो गुमतारा कधिच जाणे झाले नाही, पणं आता नक्की जाईन.

इरसाल कार्टं's picture

20 Sep 2021 - 12:07 pm | इरसाल कार्टं

या परिसरात गुमतारा आणि कोहोज हे किल्ले आहेत. पैकी कोहोजवर उन्हाळ्यातही सहज पाणी मिळते. आणि कॅम्पिंग करता येते.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 9:02 pm | चौथा कोनाडा

सुंदर !
+१

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 9:02 pm | चौथा कोनाडा

सुंदर !
+१

किसन शिंदे's picture

6 Oct 2021 - 6:36 pm | किसन शिंदे

व्हिडिओ सुरू केल्यानंतर ठणाणा पार्श्वसंगीतामुळे मोजून दुसर्‍या मिनिटाला व्हिडिओ बंद केला.

चौथा कोनाडा's picture

8 Oct 2021 - 1:30 pm | चौथा कोनाडा


व्हिडिओ सुरू केल्यानंतर ठणाणा पार्श्वसंगीतामुळे मोजून दुसर्‍या मिनिटाला व्हिडिओ बंद केला.


😨
आम्ही हुशार म्हणायचो. मिनिमम आवाज किंवा म्युट करुन बघायची सवय आहे !
पण आजकाल असा ट्रेण्ड आहे म्हणे. आवाजी पडघम वाजवले नाहीत तर व्हिडोला फाऊल धरतात म्हणे !