1

बातमी : “महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत चंद्रकांत पाटलांचा सवाल

Primary tabs

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
14 Sep 2021 - 10:31 pm

एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, ​शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते.
.
काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात. परस्परावलम्बना बाबतच्या समजूती बदलत जात असतात, श्रद्धा,स्वप्नं, आकान्क्शा बदलत जात असतात.
“प्रत्येक भारतीयाला भारतात कोठेही स्थायीक होवून राहण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूकीत मतदान करण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूक लढवीण्याचा अधीकार आहे.”
हे तीन ही ‘पूर्वीच्या शहाणपणातून आलेले वीचार’ आजच्या काळात सरसकट स्वीकारणे योग्य आहे का?
प्रत्येक भूमीची स्पन्दने वेगळी आहेत. याच कारणामूळे ठरावीक प्रान्त ओलाण्डला की भाशेत बदल होतात, रीती-भाती बदलतात, खाद्य सवयी (दैनन्दीन) व परम्परा (सण व ऋतूवार) बदलत जातात, वैचारीक स्पन्दन व आत्मचीन्तनाचा कल* बदलत जातो. *= वीदर्भाची लोकं प्रतीकूल परीस्थीतीचा दबाव वाढला की आत्महत्या करतात, कोकणातील लोकं एक वेळ वेडे होतील पण आत्महत्या करीत नाहीत.
.
म्हणूनच, दूसर्‍या राज्यातून स्तलान्तरीत झालेल्या लोकान्ना महाराश्ट्र राज्यात आल्या-आल्या पावूल ठेवताच, कोणत्याही नीवडणूकी तसेच अन्य वीशया सन्दर्भातील अधीकार देणे येथील जनतेच्या हीताचे नाही. जसे की, कोणत्याही नीवडणूकीत मतदान करण्यासाठी असो वा नीवडणूक लढण्याबाबत असो काही एक वरशान्ची मर्यादा घालणे गरजेचे आहे.
.
ज्या राज्यात जी व्यक्ती जन्माला येते त्या राज्याच्या जमीनीशी, मूलाधाराशी तीची नाळ जोडलेली असते. आपले मूळ राज्य सोडून आलेल्या, नाळ तोडून आलेल्या लोकान्ना काही वरशासाठी (नव्या भू-स्पन्दनाशी, अवकाश-स्पन्दनान्शी मीळते-जूळते घेण्यासाठी) काही अधीकारान्पासून वन्चीत ठेवायला हवे. त्यात ही जे परप्रान्तीय धनवान उद्योजक असतील, द्न्यानी-वीचारवन्त असतील, सेवाभावी प्रवृत्तीची लोकं असतील त्यान्ना काही प्रमाणात सूट देता येवू शकते.

समाजविचार

प्रतिक्रिया

संख्या कोणत्याच राज्यात असली नाही पाहिजे .
नाहीतर राज्याराज्यांत असंतोष वाढेल.
राज्यघटनेत भारतीय नागरिकांना देशात कुठे जाण्याचा ,राहण्याचा ,उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार आहे.
हे राजकीय वाक्य आहे.
असे अनिर्बंध स्वतंत्र घटनेने पण दिलेले नाही.
स्थलांतरित लोकांची नोंद ठेवणे ,त्यांची माहिती ठेवणे.आणि गरज पडली तर परप्रांतीय लोकांवर राज्यात येण्यास मज्जाव करण्याचा अधिकार पण राज्य घटनेने राज्यांना दिलेला आहे .
अनधिकृत पने अतिक्रमणं करून तिथे बांधकाम करून सरकारी जागा हटप करण्याचा अधिकार राज्य घटनेने कोणालाच दिला नाही.
तेरी सर्रास मोकळी मैदाने,फूट पथ,सरकारी जागा परप्रांतीय लोकांनी हडप केलेल्या आहेत.
ते कायद्यात कसे बसवलं.जाते.

वाचाय्लाच या धाग्यावर ह्जेरी आहे… लिहित र्हा

स्थलांतरित लोकांची नोंद ठेवणे ,त्यांची माहिती ठेवणे.

ह्यालाच रेशियल प्रोफायलिंग म्हणतात ...

अतिक्रमण , पाकिटमारी हे गुन्हे तर लोकल लोकही करतात.
मूळचे आगरी कोळी सोडले तर मुंबईत सगळेच स्थलांतरित आहेत.

सरकारने नोंदणी ठेवावी , पण ती नेमकी कशी ठेवणार ? खाजगी नोकरीत मालक आणि नोकर राजी असतील तर त्यांचे त्यांचे आपोआप जुळते.

कॉमी's picture

15 Sep 2021 - 8:35 am | कॉमी

सहमत.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Sep 2021 - 8:55 am | चंद्रसूर्यकुमार

स्वतः ठाकरे मुळच्या बिहारी वंशातले ना? त्यांचे राजकारणातील दुकान वर्षानुवर्षे चालू आहे ते शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करत. ते शिवाजी महाराजही सिसोदीया वंशातील म्हणजे मुळच्या राजस्थानातील वंशातले. मानवजातीची सुरवातच आफ्रिकेत झाली ना?

म्हणजे आफ्रिका सोडून सगळीकडे स्थलांतरीतच भरले आहेत की.

आणि सिसोदिया हे आर्य च असणार आणि आर्य हे भारतीय च नाहीत दुसऱ्या देशातून आलेले.
इतके पाठी जावून त्यांना पण घुसखोर ठरवता येईल.
Interstate migration हा प्रश्न राज्याच्या खराब प्रशासकीय कारभार मुळे निर्माण होतो आणि उत्तर पण तिथेच शोधायचे आहे.
ठाकरे कुठले,शिवाजी महाराज कोणत्या वंशाचे होते हे मुद्ध्ये च गौण आहेत.
राज्य सरकार ना त्यांच्या भूभागात ,त्या राज्यातील लोकांच्या हितासाठी कोणता ही निर्णय घेण्याचा हक्क असलाच पाहिजे आणि तो आहे पण.

बाकी दक्षिणेतील राज्य एका सुरात बोलतात .महाराष्ट्रात राज्य हिताची बाब असली तरी रज्यविरोधी मत व्यक्त करत असतात.
चंद्रकांत पाटील,आणि इथले चंद्रसूर्य कुमार
ह्यांच्या मता वरून लक्षात येतेच.
अगदी यूपी,बिहारी नेते पण चुकीचे असेल तरी एका सुरात राज्याच्या प्रश्न विषयी बोलतात .
प्रतेक राज्याची आर्थिक सामाजिक स्थिती वेगळी का आहे?
प्रतेक राज्यातील शिक्षण,कायदा सू व्यवस्था ह्याची स्थिती वेगळी का आहे?
प्रतेक राज्य वेगवेगळी सरकार चालवत आहेत.
प्रतेक राज्य सरकार ची कुवत आणि लायकी वेगवेगळी आहे.
सामाजिक स्थिती ,गुन्हेगारी वृत्ती वेगवेगळी आहे.(मुस्लिम अतिरेकी वृत्ती चे असतात हाच नियम इथे पण)
गुन्हेगारी वृत्ती ची लोक काही राज्यात जास्त च आहेत त्याला तेथील सामाजिक स्थिती जबाबदार आहे.
इथे ठाकरे कुठले. आहेत,आफ्रिकेतून कोणाला हा मुद्धा इथे नाही.
उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना त्रास होत आहे .उत्तम राज्यकारभार न करणाऱ्या राज्यांचा बोजा बाकी राज्यांनी का घ्यावा.
दिल्ली,मुंबई,पुणे ,नाशिक ह्या शहरांवर ह्या अशा नाकर्त्या राज्यातील लोकांची संख्या वाढत आहे .आणि त्या शहरात त्या मुळे गुन्हेगारी वाढत आहे.उत्तरेतील राज्यात गुन्हेगारी वृत्तीचे लोक जास्त आहेत.
हे पोलिस डायरी पहिली तरी माहीत पडेल.

महाराष्ट्रातील लोक इतर दक्षिणी राज्यात जाऊनही नोकर्या करतात, अंदमानातपण नोकरीला जातात.

अमेठीचा माजी खासदार वायनाडला जातो, गुजरातचा खासदार पुढच्या निवडणुकीत वाराणसीत जातो , त्यांना कुठला कायदा अडवत नाही , बाकी लोकांनी काय घोडे मारले आहे ?

मराठी लोकांचे प्रमाण किती टक्के आहे हे बघा प्रश्न तिथे आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यातील लोकांचे प्रमाण राज्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे हे बघा.
फरक लगेच माहीत पडेल आणि मुद्धा काय आहे पण तुमच्या लक्षात येईल.
वाढणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या संख्ये मुळे मराठी लोकांना असुरक्षित वाटत आहे.
दक्षिणेतील राज्य पण उत्तरेतील लोकांच्या वाढणाऱ्या संख्ये मुळे स्वतःला असुरक्षित समजतं आहेत.
हा प्रश्न अजुन इतका गंभीर झाला नाही सोडवण्या सारखा आहे आताच सोडवला पाहिजे.
नाही तर गंभीर रूप धारण केल्यावर हातात काहीच राहणार नाही.
असे पण भारतीय सत्ताधारी लोकांची खासियत आहे प्रश्न जो पर्यंत चिघळत नाही अतिशय गंभीर रूप धारण करत नाही तो पर्यंत त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे.
ठिणग्या दिसल्या तरी पाणी ओतायचे नाही जेव्हा आग गंभीर रूप घेईल तेव्हा अग्निशामक दल स्थापन करण्या विषयी चर्चा करायची.

hrkorde's picture

15 Sep 2021 - 1:54 pm | hrkorde

दक्षिणेत महाराष्ट्र चे लोक कमी आहेत , ह्याचा अर्थ तिकडे कमीच गेलेत , असा आहे, पण जर 4 जाऊ शकतात तर 400 ही जाऊ शकतील,
पण महाराष्ट्रात शेती वाडी वाडे ह्यांना चिकटलेले लोक भरपूर आहेत , ते मुंबई पुण्यात सुद्धा येत नाहीत, मग चेन्नईला कुठे जाणार ?

यूपी बिहारवाले लोक 10000 वर्षांपासून दक्षिणेकडे येत आहेत , अयोध्या सोडून लोक नाशिकला आले, मुंबईत बाण मारून वाळकेशवर निर्माण केले , मग लंकेलाही गेले. गोकुळ मथुरा सोडून लोक गुजरातला द्वारकेत गेले. आता तुम्ही कुणाला अन कसे अडवणार आहात ?

युपी बिहार वाले अल्प भु धारक पावसात चार महिने शेती करतात , मग सात आठ महिने मेट्रो शहरात येऊन मोलमजुरी करतात आणि पुन्हा पावसाळ्यात शेतीला निघून जातात , त्यांचे अर्थकारणच तसे आहे. नेपाळचे लोकही असेच करतात. ह्यातले बहुतेक सारे व्यवसाय हे अल्पशिक्षित लोकांचे आहेत.

प्रचंड प्रमाणात उत्तरे मधून महाराष्ट्र किंवा बाकी राज्यात लोक स्थलांतरित येत आहेत त्या मुळे महाराष्ट्र सहित बाकी संबंधित राज्यातील लोकामध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे.
त्याचा परिणाम म्हणून मनसे सारखी आंदोलन बाकी राज्यात पण होत आहेत.
दोन वर्षापूर्वी गुजरात मध्ये पण उत्तर भारतीय लोकांविरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते.पंजाब मध्ये झाले होते,आसाम मध्ये झाले होते.
तामिळनाडू ,केरळ तर त्यांच्या शी फटकून च असतो हिंदी पासून उत्तरेतील संस्कृती ला पण त्यांचा विरोध असतो.
१०००० वर्ष पूर्वी ची उदाहरणे ध्याल तर लोकांचे देव पण बदलतील.
नवी मुंबई हे शहर महाराष्ट्र बसवू शकतो तर लहान उत्तम शहर यूपी,बिहार मध्ये केंद्र सरकार स्वतःच्या अधिकारात का निर्माण करत नाही.
की संघर्ष तीव्र होण्याची वाट बघितली जात आहे.
एक तर लोकसंख्या नुसार लोकसभेत प्रतिनिधी देण्याच्या आपल्या पद्धती मुळे लोकसंख्या नियंत्रण करून उत्तम काम करणारी राज्य नाराज आहेत त्यांच्या चांगल्या कामाची त्यांना कमी प्रतिनिधी मिळून शिक्षा मिळत आहे.
केंद्रीय फंड अविकसित राज्य(लायकी नसलेली राज्य सरकार असलेली)ना विकसित राज्य न पेक्षा जास्त दिला जातो.
म्हणजे जे काहीच सुधारणा करत नाहीत त्यांना बक्षीस आणि जे चांगले काम करत आहेत त्यांना शिक्षा .
असे विकसित राज्य समजतात.
त्या मुळे ती नाराज आहेत
खुद्द मोदी नी पण मुख्यमंत्री असताना ह्या पद्धतीचा विरोध केला होता.
अनियंत्रित migration ha गंभीर मुद्धा आहे.
अमेरिका,ऑस्ट्रेलिया मध्ये पण भारतीय लोकांवर हल्ले होतात त्याला हेच कारण कारणीभूत आहे.

hrkorde's picture

15 Sep 2021 - 3:11 pm | hrkorde

शहर कुणी मुद्दाम वसवत नाही,

मुंबई बंदर आहे, विमानतळ आहे, मध्यवर्ती आहे, पूर्वी कापड व धान्य व्यापार होत होता, म्हणून तसे वसत गेले.

आता योगीजी तिकडेही बॉलिवूड उभे करत आहेत म्हणे. मग होईल नवनिर्माण तिकडेही

Rajesh188's picture

15 Sep 2021 - 3:17 pm | Rajesh188

पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.आंध्र नी हैद्राबाद प्रगत करून दाखवले,कर्नाटक नी बंगलोर ,तमिळ nadu नी चेन्नई.
उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Sep 2021 - 8:01 pm | रावसाहेब चिंगभूतकर

पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.

डोळे पाणावले. काय काय मोठी कामं केली महाविकास आघाडीने. आम्ही उगीचच समजत होतो की ही शहरे स्वातंत्र्यापूर्वी पण भारतात होती.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Sep 2021 - 9:03 pm | चंद्रसूर्यकुमार

उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.

तुम्ही उत्तरेतील गुरगाव, नॉयडा, चंडीगड आणि काही अंशी फरीदाबाद आणि गाझीयाबाद ही शहरे बघितली आहेत का? वाटत नाही. कारण बघितली असतीत तर असे काही लिहिले नसते. मोठ्या शहरांविषयी बोलाल तर दिल्लीतील रस्ते, मेट्रो वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी अधिक चांगले आहे. आज दिल्लीत कुठेही असले तरी एखाद-दीड किलोमीटरपेक्षा लांब मेट्रो स्टेशनसाठी जावे लागत नाही. दिल्लीतील डीटीसी बसची सुविधाही खूप चांगली आहे. मेट्रो आणि डीटीसी बस यामुळे दिल्लीत कुठूनही कुठेही जाणे खूप सोपे आहे. अर्थात उत्तरेतील, विशेषतः दिल्लीच्या लोकांचा स्वभाव (फसवाफसवी, गोड बोलत हातोहात शेंड्या लावणे, जरा काही खुट्ट वाजले तरी हमरातुमरीवर येणे वगैरे) बदलता येणार नाही. त्याविषयी मी बोलतही नाही. माझा मुद्दा तिकडच्या पायाभूत सुविधांविषयीच आहे.

तेव्हा उत्तरेत चांगली शहरे नाहीत हा मुद्दाच तथ्याला धरून नाही.

Rajesh188's picture

15 Sep 2021 - 11:58 pm | Rajesh188

तर तुम्ही उल्लेख केलेली सर्व शहर दिल्ली पासून 25 ते 40 km अंतरावर आहेत.
दिल्ली ची उपनगर च आहेत ती.
ठाणे मुंबई पासून 33 km वर आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे.
उत्तरेतील दोन तीन राज्यच थोडी प्रगत आहेत.
पंजाब,हरियाणा आणि हिमाचल प्रदेश .
ह्या राज्यातील लोक मुंबई ,महाराष्ट्रात विपुल प्रमाणात नाहीत जाडी यूपी,बिहार ची दोन दोन फुटांवर एक व्यक्ती भेटतो तसे.
यूपी,बिहार, झारखंड मधून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप प्रचंड आहे.
त्या मध्ये महाराष्ट्र हिंदी ला राष्ट्र भाषा समजणारा एकमेव नॉन हिंदी प्रदेश आहे..
त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात.
हे असे महाराष्ट्र राज्य ज्या राज्यात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत.सरकारी जागेवर,रस्त्यावर राहण्याची उत्तम सोय आहे,पाणी ,वीज चे कनेक्शन पण दिले जाते.
परत काही वर्षात सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट.
घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
अशा सर्व सुविधा मिळत असल्यामुळे यूपी,बिहारी महाराष्ट्रात येवून सुखात जगत आहेत उलट हक्कानी.
राज्याने निर्माण केलेल्या सोयी सुविधांवर त्या मुळे ताण येत आहे.
बकालपणा राज्याला येत आहे.
प्रश्न गंभीर आहे.
आणि हो मराठी लोक च त्यांचं इथे येवून राहणे हा कसा त्यांचा हक्क आहे ह्याचे प्रवचन पण देतात.
इतकी अनुकूल जागा त्यांना पूर्ण भारतात कुठे च मिळणार नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Sep 2021 - 9:39 am | चंद्रसूर्यकुमार

चंडीगड दिल्लीपासून २५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहे? ऐकावे ते नवलच.

दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे.

त्याच न्यायाने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती चांगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे. दिल्लीत जुनी दिल्ली बकाल आहेच पण मग त्याप्रमाणेच मुंबईत बकाल भाग नाहीत का? कुर्ला, कलिना वगैरे ठिकाणच्या किंवा रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्ट्या बघितल्या आहेत का? भायखळ्याचा मुस्तफा बाजार आणि नागपाड्याचा ए.एच.अन्सारी चौक वगैरे भाग बघितले आहेत का? अगदी न्यू यॉर्कच्या मॅनहटनला लाजवतील असेच सुंदर भाग आहेत नाही का ते? मुंबईजवळचे डोंबिवली-कल्याण-बदलापूर वगैरे भाग केम्प्स कॉर्नर किंवा बान्द्रा पश्चिम-खार सारखे थोडीच आहेत? ते काहीही असले तरी मुद्दा हा की दिल्लीत रस्ते, बस, मेट्रो वगैरे पायाभूत सुविधा मुंबईतल्या पेक्षा कितीतरी जास्त चांगल्या आहेत.

त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात.

यातील गर्वाचे या शब्दाचे काय? गर्व से कहो हम हिंदू है मधला गर्व आणि मराठीतील गर्वाचे घर खाली मधला गर्व यात फरक आहे ना? मग तुम्ही स्वतः वापरलेला गर्व हा शब्द मराठीतील आहे की हिंदीतील?

सुबोध खरे's picture

16 Sep 2021 - 7:08 pm | सुबोध खरे

सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट.
घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

यात दोष कुणाचा आहे?

मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षांनी काय केलं?

उगाच दुसऱ्याला दोष कशाला देताय?

मराठी कामगार कशी कामं करतात ते पहा आणि भैये कशी कामे करतात तेही पाहून घ्या.

कोकणात शेती करायची असली, काजू आंब्याची बाग करायची म्हटली तर स्थानिक माणूस मिळत नाही.

आठवड्याला ३ दिवस मनरेगा मध्ये काम करून १००० रुपये मिळतात. ते घेऊन पुढचे ७ दिवस दारू पिऊन पडून राहतात आणि मग परत ३ दिवस काम करायचे.

मनरेगा मध्ये वर्षात १०० दिवस रोजगार मिळतोच. मग स्थानिक उद्योजक काय करेल?

कोकणात सर्वत्र आंब्याच्या बागेत केवळ नेपाळी लोक दिसतील.

माझ्या भावाच्या दोन कारखान्यात आजतागायत गेल्या ३० वर्षात एकही परप्रांतीय माणसाला त्याने कायम नोकरी दिलेली नाही. परंतु स्थानिक माणसांचे अनुभव फारसे उत्साहवर्धक नाहीतच.

काम न करता दांड्या मारणे, सतत पैसे उधार मागणे, गौरी गणपती दिवाळी होळीला ४ दिवस सांगून जायचे आणि १५ दिवसांनी उगवायचे, जास्त काम असले तरी ओव्हर टाइमला नकार देणे हे सर्रास करणारी कामगार मंडळी १०० % मराठीच आणि स्थानिक आहेत.

कंत्राटदाराचे कामगार भय्ये लोक रात्री ७-८ पर्यंत सहज थांबतात आणि आपले लोक साडे चार पासून आवरायला सुरुवात करतात.

केवळ तत्वासाठी अजून तरी भावाने परप्रांतीय घेतलेला नाही. पण कोव्हीड नंतर परिस्थिती तशीच राहील का याची शंका वाटते.

बाकी चालू द्या

प्रतीसाद आवडला!

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 12:39 pm | चौथा कोनाडा

घटणा
सउवीधान
लोकान्च्या
मीळालेले
परस्परावलम्बना
आकान्क्शा
स्थायीक
नीवडणूक
वीचार
भाशेत
वीदर्भाची
वीशया
वरशान्ची
द्न्यानी-वीचारवन्त

निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.

रंगीला रतन's picture

15 Sep 2021 - 11:07 pm | रंगीला रतन

निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.

नीबंधातील शूद्हलेखन आवडले हे आवरजून नमूद करू इचहीतो असे म्हणायचे आहे काय तूम्हाला? :) :) :)

चौथा कोनाडा's picture

16 Sep 2021 - 1:01 pm | चौथा कोनाडा

व्ह्यय म्हाराजा !

😃

चुकीबद्दल क्षमा असावी रंगीला रतन महोदय ! :-)

वाचता वाचता पार गांगलुन गेलो राव. तुमचं नाव शुभानन वगैरे आहे काय?

सतीश रावले's picture

15 Sep 2021 - 9:45 pm | सतीश रावले

माझ नाव रावले. सतीश रावले!

रावसाहेब चिंगभूतकर's picture

16 Sep 2021 - 10:53 am | रावसाहेब चिंगभूतकर

The name is Rawle. Satish Rawle. (Moonraker?).
जमतंय की.

प्रदीप's picture

16 Sep 2021 - 2:04 pm | प्रदीप

:)

कपिलमुनी's picture

15 Sep 2021 - 11:09 pm | कपिलमुनी

तूम्चा लेख कूप आवडलं

Rajesh188's picture

16 Sep 2021 - 2:23 pm | Rajesh188

तर अनेक धाग्यावर स्व तची मत व्यक्त होत नाहीत.
मी इथे तीन चार पॉइंट मांडले.
1) मुळ रहिवासी असलेल्या मराठी लोकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची टक्के वरी खूप जास्त आहे .
त्या मुळे मराठी लोक असुरक्षित स्वतःला समजत आहेत.
आणि अशी स्थिती भविष्यात दक्षिण भारतात पण निर्माण होईल .
ह्या वर कोणीच भाध्य केले नाही.
२) स्थलांतरित लोकांमुळे स्थानिक संस्कृती धोक्यात येते ..ह्या वर कोणीच मत व्यक्त केले नाही
३) राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यात परप्रांतीय लोकांचे प्रमाण जास्त आहे कारण गुन्हेगारी हाच गुण असलेल्या राज्यातून इथे आले आहेत.
४) राज्याच्या infrastructure वर परप्रांतीय लोकांच्या मुळे ताण येतो ह्या वर कोणीच व्यक्त झाले नाही
उत्पादक कंपन्या,मुळे महाराष्ट्रात ची नैसर्गिक संपत्ती प्रदूषित होत आहे .
पण काहीच नुकसान न होता रोजगार आणि कर देशाला मिळत आहे.
गुन्हेगारी वाढत आहे
बकालपणा वाढत आहे.
ह्या एक जरी इथे ह्या राज्यावर प्रेम करणारा असेल तर त्यांनी स्वतःचे मत व्यक्त करावे.
आता सुधारला नाही तर.
पुढची मराठी लोकांची पिढी आताच्या चामडी बचाव लोकांना भर चौकात चप्पल नी मारेल.

केंद्र सरकार CAA आणणार आहे , PAN झाले , aadhar झाले त्यांचे त्यांना मोजणे जमेना , फक्त इलेक्शननंतर कमी पडणारे आमदार मोजले की त्यांचे पुण्यकर्म संपते.

राज्यांनी तरी नेमके काय करायचे ?

मूळ महाराष्ट्रातले म्हणजे तरी नेमके कोण ?

सुबोध खरे's picture

16 Sep 2021 - 6:57 pm | सुबोध खरे

मोगा खान

येथे CAA चा काय संबंध आहे?

PAN आणि आधार चा काय संबंध आहे इथे?

उगाच तुमचं ठसठसणारं गळू इथे कशाला उघडं करताय?

देशातील आतील बाहेरील गणना ठेवणे जसे केंद्राला अवघड आहे, तसेच राज्यांना अंतरराज्यीय जनगणना ठेवणे अवघड आहे

शंकर पाटलांची माकडाची शिरगणती ही गोष्ट आठवली

https://www.youtube.com/watch?v=uixqvodZxQ0

खेळखंडोबा . शंकर पाटील

Rajesh188's picture

18 Sep 2021 - 10:06 am | Rajesh188

अगदी काही ही चूक न होता तंतोतंत दुसऱ्या राज्यातील लोकांची गणना झालीच पाहिजे .चूक नको व्यायला .
अशी अपेक्षा नाही
पण पुरेसा दबाव निर्माण करण्यासाठी राज्यात येणाऱ्या लोकांची गणना केली जाईल असा नियम गरजेचा आहे.

ह्यांना ह्यांची च नातवंडं थोपडतील .घरात फोटी असेल तरी तो कचऱ्यात तेच टाकतील.

कासव's picture

17 Sep 2021 - 12:07 am | कासव

मागच्या गणपती वेळी मला घरात थोड लाकूड काम करायचं होत. मी आवर्जून मराठी सुतार निवडला. ह्या भाऊने काम सुरू करायला दसरा निवडला. आजी च आजारपण मुलीचं बाळंतपण असली कारण देत. दिवाळी दरम्यान हा पुन्हा गायब काम तर काहीच झालं न्हवत समान मात्र आणून टाकलं होत. शेवटी मी एक बिहारी बघितला ३ दिवसात २ माणसांनी सगळं काम संपवून टाकले. वर कमी पैसे घेतले. आपला भाऊ दिवाळी नंतर उगवला आणि म्हणतो काय साहेब तुमच्या सारख्या लोकान मुळे बाहेरचे येतात. १-२ दिवस उशीर झाला तर अस करू नये. मी परत तुमच्याकडे येणारच नाही. इथे मी ह्या साठी २ महिने वाट पाहिली ती गेली कुठे?

ही घटना दापोली मधील आहे पुणे मुंबई ची नाही.

सर्वच नाही पण मराठी मुले तोंडात मावा लावून नेत्याच्या मागे फिरण्यात धन्यता मानतात मग बाहेरचे येणारच ना. वर ह्यांचे लॉबिंग दादागिरी पण सहन करा. कोकणातल्या बागा असोत वा पश्चिम महारष्ट्रातील गुळाचे gurhal असो आपली मुले असली काम करायला मागत नाहीत. मग कोकणात पण बिहारी आंबे विकतो आणि आपण हॉटेल मध्ये बिहारी वेटर ला टीप देता देता असले विषय चघळत बसतो

चित्रगुप्त's picture

17 Sep 2021 - 8:10 am | चित्रगुप्त

रावले साहेब, तुमचे दोन्ही लेख वाचण्याचा प्रयत्न केला. लेखातील आशय काय आहे हा भाग वेगळा ठेऊन सध्या एवढेच सुचवावेसे वाटते की काहीही लिहील्यावर ते लगेच प्रकाशित करण्याची घाई न करता दोन-चार वेळा वाचून, लिखाणातीत सर्व चुका काळजीपूर्वक दूर करून शेवटी अगदी खात्री झाल्यावरच प्रकाशित करण्याची सवय लावून घेणे योग्य ठरेल. कितीही चांगला मजकूर असला तरी अशुद्ध लेखनामुळे चोखंदळ वाचकांचा विरस होत असतो.
मिपावर कच्चे लिखाण तात्पुरते साठवून ठेवण्याची सोय नसल्याने लिहीलेला मजकूर ड्राईव्ह वा अन्य ठिकाणी ठेऊन पूर्णत्व आल्यावर पुन्हा मिपावर चोप्य्पस्ते करता येतो.
कृपया राग मानू नये. मिपावर सकस, दर्जेदार आणि निर्दोष लिखाण यावे ही सर्वांचीच इच्छा आणि जबाबदारी पण असते, हे लक्षात घेऊन थोडासा प्रयत्न केल्यास ते सहज जमू लागेल.

तूमच्या अथवा इतर कोणाच्याही प्रतीसादाचे मला वायीट वाटण्याचे कारण नाही.
तूम्हाला माझा लेख 'पाहून' वायीट वाटले ह्यावर मी काय करू शकतो!
लेखातील वीचारान्वर टीका केली असती, चूका दाखवून दील्या असत्या तर त्यावर काम करायला नक्कीच आवडले असते, आवडेल.

ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं!!

रावले साहेब. तुम्ही राहु द्या. तुम्हाला नाही झेपायचे ते.

सतीश रावले's picture

17 Sep 2021 - 9:55 pm | सतीश रावले

तूमचं जे काय जड, वजनदार आहे ते मी का बरे उचलू?

प्रदीप's picture

18 Sep 2021 - 11:19 am | प्रदीप

काहीच्कोणाच्न काउचलू.आम्हीतु मचेलिखा ण्झेपण्याचा वेडसरप्रत न्करतोआहो त. तुमचेचा लूद्या.

मला तुमची स्वाक्षरी मिळेल का?
तुमचा सुगम, सुवाच्च लेख वाचुन इथल्या स्वामि१ आणि हस्तर या महान लेखक द्वयींची खुप खुप आठवण आली.
आता लेखन थांबवु नका, मी वाचायला आतुर आहे.

Rajesh188's picture

17 Sep 2021 - 1:37 pm | Rajesh188

खरे साहेब आणि कासव जी करू नका.
इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे.
आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत.
स्थिती खूप वेगळी आहे .
ठरवून उत्तर भारतीय लोकांची संख्या वाढावी आणि व्होट बँक तयार करण्यासाठी ठरवून ,प्लॅन करून हालचाली चालू असतात.
मोकळ्या जागा,फूट पथ,,डोंगर ,रस्ते ह्या वर झोपटी बांधून ह्यांची राहण्याची सोय राजकीय पातळीवर केली जाते.
पाणी connection, वीज जोडणी राजकीय पक्ष कायद्यात बसत नसले तरी घेवून देतात.
अनधिकृत बांधकाम ना राजकीय पातळीवर संरक्षण दिले जाते.
महाराष्ट्र वर राजकीय वर्चस्व मिळवण्याची इच्छा देश पातळीवर आहे.
आणि राजकीय वर्चस्व मराठी लोकांच्या हातात च राहवे ही काळजी ह्या राज्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या अनेक लोकांना आहे.
आणि विरोध ह्याला आहे.
गैर मराठी
सुतार चांगला काम करतो मराठी करत नाहीत हा वर वर चा विचार झाला
तिबेट ताब्यात घेण्यासाठी चिनी लोकांना तिबेट मध्ये वसवले गेले,काश्मीर ताब्यात घेण्यासाठी हिंदू लोकांना तिथे ठरवून स्थायिक करायला हवे हाच विचार 370 हटवण्या मागे आहे.
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे त्या वर मराठी लोकांचे वर्चस्व कमी करणे हा देश स्तरावर चा कुटील हेतू आहे.
कर्नाटक मध्ये पण सेने, मनसे सारखी कन्नड लोकांची संघटना आहे
अशा संघटना गैर राजकीय म्हणून राजकीय पक्ष च स्थापन करतात राज्य हित जपण्यासाठी.
सर्वपक्षीय लोकांचा त्याला पाठिंबा असतो.
म्हणून तर सेने ल वसंत सेना म्हणत.

रंगीला रतन's picture

17 Sep 2021 - 1:58 pm | रंगीला रतन

इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे.
आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत.

तुम्ही म्हणताय म्हणजे हे बरोबर च असणार त्याचा प्रतिवाद करणे चूक च.

Rajesh188's picture

17 Sep 2021 - 1:49 pm | Rajesh188

उत्तर भारतीय नेते कृपा,संजय , अब्बु ह्यांना इथे कोणी मोठे केले त्या त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने .
कृपा तर गृहमंत्री झाला होता हे घडले फक्त केंद्रीय पातळीवरून राज्य पातळी वरील नेतृत्व व दबाव आणला गेला.
आपले ब्रीद च आहे पाहिले भारतीय नंतर मराठी.
हे ब्रीद असे आहे.
जसे युद्धात सैनिक मेला की त्याला हुतात्मा घोषित करायचे.
हुतात्मा म्हणजे काय माणूस मेल्यावर पण परत येतो का?

Rajesh188's picture

17 Sep 2021 - 1:59 pm | Rajesh188

महाराष्ट्र सोडला तर बाकी राज्य अत्यंत सावध असतात..
मुंबई मध्ये गुजराती दुकानातून काही खरेदी केले तर ते बिल गुजराती भाषेत च लिहून देतात.
मुंबई मध्ये असे वागत असतील तर गुजरात मध्ये ते कसे वागत असतील.
दक्षिण भारत,बंगाल मध्ये येत असेल तरी ते ठरवून हिंदी बोलत नाहीत .
मी अनुभव घेतला आहे.
फक्त महाराष्ट्रात मराठी समोरचा हे आड नावाने जरी परप्रांतीय वाटला आणि मराठी पण बोलत असेल तरी त्याच्या शी हिंदी मधूनच बोलतात.

आ बैल मुझे मार .
अशी वृत्ती.

hrkorde's picture

17 Sep 2021 - 10:51 pm | hrkorde

हिंदू मुस्लिम , मराठी युपी सगळ्या गणना संपल्या की नेरळ कर्जतचे लोक तिथूनच बसुन आल्याने ठाणावाल्याना लोकलमधी बसायला शीट मिळत नाही , म्हणून डब्बानिहाय कर्जतचे किती अन ठाण्याचे किती ह्याची गणना करणे ठाणा व कर्जत नगर पालिकेने मनावर घ्यावे असा धागा काढण्यात यावा