1

काय वाचताय ?-२

Primary tabs

कॉमी's picture
कॉमी in जनातलं, मनातलं
14 Sep 2021 - 8:59 am

खालील गोष्टी वाचल्या-

१. ककोल्ड-

"little saint" अर्थात संत मिराबाईंच्या नवऱ्याचे आत्मकथन किरण नगरकरांच्या कादंबरीत आहे. कादंबरीची सुरुवात चांगलीच गुंतवणारी आहे. मध्यंतरी मात्र कादंबरी जेरीस आणते. पण शेवटी मात्र इतके मोठे पुस्तक वाचले, ते वर्थ झाले असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे मुख्य पात्र अतिशय उत्तमपणे बांधले आहे. मेवाडच्या राणा संग्राम उर्फ राणा संग यांचा मुलगा, मेवाडच्या गादीचा वारस (महाराज कुमार) - राजा भोज- हा कथेचा नायक, आणि, 'ककोल्ड' आहे. ककोल्ड म्हणजे व्यभिचारी स्त्रीचा पती. हा शब्द वापरला जातो तो पतीसाठी दौऱबल्यवाचक म्हणून.

महाराज कुमारचा मेर्ता (मीरत)च्या राजकन्येसोबत विवाह होतो- मीरेशी. तिचा काका राव विरामदेव हा एक ताकदवान आणि प्रभावशाली सेनापती असतो, आणि हिरव्या डोळ्यांची मीरा अतिशय सुंदर असते. म्हणजे, राजवारसासाठी अतिशय उत्तम स्थळ असते. त्यामुळे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कुमारला लग्नाच्या पहिल्या दिवशी कळणाऱ्या गोष्टी अतिशय धक्कादायक असतात. त्याची पत्नी त्याला सांगते की ती आधीच कुणाशीतरी विवाहित आहे. (अर्थातच, ती कृष्णाबद्दल बोलत असते.) यानंतर कुमारच्या आयुष्यातील होणाऱ्या घडामोडींवर हि कादंबरी आहे.

इतिहासात अत्यन्त कमी दखल घेतलेलं असं कुमारचं पात्र आहे. त्याबद्दल ठोस माहिती सुद्धा अतिशय कमी आहे. असं असताना त्यावर कादंबरी लिहिताना नगरकरांकडे त्यांचा स्वतःचा कुमार उभारण्याचे भरपूर स्वातंत्र्य होते. आणि त्यातून उभारलेला कुमार वाचकांच्या मनात खूप दिवस घर करून राहणार हे नक्की. कुमारचं पात्र अत्यंत खुबीने उभारलं आहे. त्याचे अंतःकरण वाचकांसमोर पूर्ण उघडे केले आहे. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, नैतिक मूल्य, त्याला लाज वाटणाऱ्या गोष्टी, त्याच्या लैंगिक इच्छा- सगळं आपल्यासमोर आहे. त्यामुळे कुमार हे पात्र हे प्रेडिक्टेबल आहे- पण ते चांगल्या अर्थाने. तो आता काय करेल, ह्याचा आपल्याला अंदाज येतो, पण काहीतरी क्लिशे गोष्टी घडतात म्हणून नव्हे, तर कुमारला आपण नीट ओळखतो म्हणून. Maharaj Kumar the character is as close a character can get to being perfect.

कादंबरीत बराच फॅन्टसी वाटण्याजोगा भाग आहे. आणि, तो भाग आणि चित्तोडच्या दरबारातील कुटील राजकारण याची किंचितही सरमिसळ होऊ दिली नाहीये. त्यातला फॅन्टसी टाईप भाग- हा बहुतेक मुद्दामून तृतीयपुरुषी वर्णनात लिहिला आहे, आणि इतर भाग मात्र कुमारच्या प्रथमपुरुषी निवेदनात आहे.

ककोल्ड अगदी न मिस करण्यासारखं पुस्तक आहे. पुढे मागे पुन्हा एकदा वाचीन असे म्हणतो.

2. स्वाम्प थिंग-

अॅलन मूर या सुप्रसिद्ध (कॉमि)ककार* लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेलं हे कॉमिक बुक आहे. व्ही फॉर व्हेंडेट्टा, वॉचमेन, द किलिंग जोक हे सुप्रसिद्ध कॉमिक्स त्याच्या नावावर आहेत.
मूरने स्वाम्प थिंगला आपल्या लेखणीखाली खाली घेतलं तोपर्यंत असे काही झाले असते-
अलेक हॉलंड आणि त्याची पत्नी लिंडा हॉलंड वनस्पतींच्या वाढीवर संशोधन करत असतात, जगातला अन्नाचा तुटवडा सोडवण्यासाठी. पण काही कारणाने तिथे स्फोट होतो का करवला जातो, आणि त्यात लिंडा ठार होते. तर मशाली सारखा जळणारा अलेक त्यांच्या घराजवळच्या स्वाम्प, म्हणजे दलदलीत आग विजवण्यासाठी पळत जातो. त्या दलदलीतल्या पाणवनस्पतींवर त्यांच्या प्रयोगशाळेत बनवलेले रसायन शिंपडले गेले असते. त्याचा परिणाम हा होतो, कि वनस्पतींनी वेढलेला/बनलेला, आणि अलेक हॉलंडच्या आठवणी असणारा प्राणी- स्वाम्प थिंग स्वाम्प बाहेर पडतो. संबंध 'ग्रीन' म्हणजे वनस्पतींशी त्याचा संपर्क असतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा वापर करून अमरत्वासाठी प्रयत्न करणार व्हिलन, स्वाम्प थिंगचा लिंडाच्या मारेकऱ्यांना शोषून संपवण्याचे सूडपर्व, त्याचा पाठलाग करणाऱ्या फौजा इत्यादी होऊन स्वाम्प थिंगचे हे पर्व त्याला 'स्कल पिअरसिंग' गोळी लागून आणि त्याचे अपेरेंटली देहावसान होऊन संपते.

इथे मूर स्वाम्प थिंगची गोष्ट परत सुरु करतो.

स्वाम्प थिंगचा तुटला फाटला (मृत?)देह सदरलँड नावाच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या प्रायव्हेट लॅबोरेटरीत फ्रीझर मध्ये पडून आहे. इथे डीसी कॉमिक्सच्या एका जुन्या
खलनायकाला पाचारण केले आहे- जेसन वूड्रयू. हे डीसी लोअर मधले बरेच जुने, पण कमी महत्वाचे पात्र असावे. डीसी मध्ये लिहिताना अॅलनला असली पात्रे जाम आवडतात. त्यांच्यासोबत हवे ते करायला स्वातंत्र्य मिळते ना! मूरच्या वॉचमेन या गोष्टीचेपण बहुदा तसेच आहे. त्यातले रोरशॅक हे पात्र बॅटमॅनच्या संकल्पनेला त्याच्या अंतिम सीमेला नेले तर काय होईल , अश्या अर्थाने लिहिले आहे.

तर हा वूड्रयू खरेतर झाडांच्या संबंधित असलेला ड्रॅयाड नावाचा प्रकार असतो. हे ड्रॅयाड्स 'ग्रीन'शी, म्हणजे झाडांच्या एकसंध नेटवर्कचा भाग असतात, पण काही कारणाने वूड्रयू यातून बाहेर पडला असतो, आणि पुन्हा त्या जाळ्यात जाणे त्याला जमत नसते. त्यामुळे तो माणसांच्या जगात राहत असतो, आणि बॉटनिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला असतो. पुन्हा ग्रीनमध्ये परत जाण्याची ओढ आणि झाडं कापणाऱ्या माणसांबद्दल तिटकारा असं त्याचं पात्र आहे.
या वूड्रयूला स्वाम्प थिंगचे शवविच्छेदन करायला सदर्लंडनी बोलावले असते. तिथे शवविच्छेदनात दिसणारी गोष्ट वूड्रयूला आश्चर्यचकित करते. स्वाम्प थिंगच्या शरीरात फुप्फुस, मेंदू, यकृत इत्यादी सर्व गोष्टी असतात, पण त्या पण लाकूड, पानांनी बनलेल्याच! त्या अर्थातच काम करत नसतात. वूड्रयूला मग प्लॅनेरीयन वर्म म्हणून एका अळीच्या जातीची आठवण येते. अडथळे पार करायचे शिकलेल्या वर्मचे तुकडे जर नवख्या वर्मला चारले, तर दुसऱ्या वर्मला सुद्धा अडथळे पार करणे शक्य होत असते. थोडक्यात या वर्म्समधून त्यांच्या आठवणी सुद्धा पास होत असतात.
वूड्रयूला समजते कि स्वाम्प थिंग हा अलेक हॉलंड नाहीचे मुळी ! हॉलंड तर त्या आगीतच बुडून मेला. हा स्वाम्प थिंग म्हणजे स्वतःला अलेक हॉलंड समजणारं झाड आहे फक्त ! त्या हॉलंडचे अवशेष त्या झाडांसाठी खाद्य बनतात, आणि हॉलंडच्या प्रयोगशाळेतील केमिकल्स मुळे हॉलंडच्या आठवणी आणि ओळख त्या झाडांमध्ये येते, आणि आपल्याला सुपरिचित असणारा आकार ते झाड धारण करते, ज्यातून स्वाम्प थिंग तयार होतो. आणि अर्थात निव्वळ सवय म्हणून असलेल्या मेंदूत गोळी लागून स्वाम्प थिंग ठार होणार नाही, कारण मुळात त्याचा मेंदू दिखावाच आहे! स्वाम्प थिंग निव्वळ मेंदूत गोळी लागल्याच्या शॉकने आणि भितीने जायबंदी झाला ! आणि एव्हाना वूड्रयू आणि सदरलँडचे वाजले असते त्यामुळे वूड्रयू स्वाम्प थिंगच्या फ्रिजमधले तापमान वाढवतो आणि पळून जातो. तापमान वाढल्याने स्वाम्प थिंग पुन्हा उठतो, आणि वूड्रयूचा अहवाल वाचतो. आपण अलेक हॉलंड नाही, आपण अलेक हॉलंड कधीच नव्हतो या सत्यामुळे स्वाम्प थिंग दुःखाने वेडापिसा होतो, आणि त्याला त्रास देणाऱ्या सदर्लंडला यमसदनी पाठवतो.
पण काहीतरी करून आपण पुन्हा आधीसारखं होऊ, हे त्याचे स्वप्न भंग झाले असते.

ही मूरच्या मालिकेची फक्त सुरुवात आहे. आणि ती कल्पनाच भन्नाट आहे- एक झाड जे स्वतःला माणूस समजतं- आणि त्याचा भ्रमनिरास होतो...

*- मूर चांगलाच सोशालिस्ट-अनार्किस्ट आहे.

३. चॉकी- जॉन विंडहॅम

गुडरीड्स जेव्हा चालू केलेलं तेव्हा अगदी सुरुवातीला मला चॉकी रेकमंड झालं होतं. आणि कथा रोचक वाटलेली. आणि कालपरवा दोन दिवसात हि लहानशी कादंबरी हातावेगळी केली.

हि गोष्ट आहे मॅथ्यू नावाच्या ११-१२ वर्षांच्या मुलाची. मॅथ्यूला त्याच्या डोक्यात एक आवाज ऐकू येतो हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येते. (निवेदन वडिलांचेच आहे.) आणि हल्ली मॅथ्यूचे प्रश्न सुद्धा काहीशे विचित्र झाले असतात. जेव्हा मॅथ्यूचे वडील मॅथ्यूचा स्वतःशी संवाद ऐकतात तिथेपण मॅथ्यू कोणाला तरी थोड्याश्या त्राग्यानेच 'महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?' अश्या प्रश्नांचे उत्तर त्याला जमेल तसे देण्यात व्यस्त असतो. मॅथ्यूचा शाळेतून सुद्धा असेच रिपोर्ट्स आले असतात- मॅथ्यू भूगोलाच्या शिक्षकांना विचारत असतो-पृथ्वी कुठे आहे ? पण सौर्यमाला कुठे आहे ? पण सूर्य तरी नक्की कुठे आहे ?

तर, मॅथ्यूचा वडिलांना समजते कि ह्या सगळ्या गोष्टी मॅथ्यू 'चॉकी' चे समाधान करण्यासाठी विचारत असतो. चॉकी म्हणजे त्याला जो आवाज येत असतो त्याला दिलेले नाव. चॉकी स्वतःबद्दल फार माहिती देत नसते, पण मिळालेली माहिती पण कोणालाही बुचकळ्यात टाकेल अशी असते.

यापुढे काही न सांगणे इष्ट- कथा कल्पना आवडल्यास कादंबरी वाचावी लागेल.

कादंबरी अत्यंत सहजसोप्या भाषेत आहे. (ककोल्ड नंतर मोठा आराम !) इतकेच नव्हे तर कथाशैली सुद्धा अत्यंत संयत आहे. अश्या प्रकारच्या गोष्टी बहुदा हिंस्त्र, किंवा अतीव दुःखी/भीतीदायक अश्या होत असतात. चॉकी मात्र कुठेही विशेष हिंदकाळे न देता संथ गतीने गोष्ट सांगते. हा संयतपणा वाचायला सुखद आहे. आणि कथा सुद्धा छानच आहे.

वाङ्मयमौजमजाआस्वादलेख

प्रतिक्रिया

अगदी हवा तसा धागा काढलात. अशाच समीक्षा लिहा. इतर ठिकाणी फक्त पुस्तक वाचले ती नावं टाकतात.

ककोल्ड मी मागच्या वर्षी वाचलं आणि त्यावर थोडक्यात छान लिहिलं आहे. खुशवंत सिंगनेही "हीस्टॅारिकल फिक्शन एट इटस बेस्ट" म्हटलं आहे.
तर नगरकर ( मागच्या वर्षी गेले) खूप चांगले गोष्टीवेल्हाळ होते.
रावणा एण्ड एडी याचा पहिला भाग चांगला होता.

लिहित राहा.

कॉमी's picture

15 Sep 2021 - 8:56 am | कॉमी

धन्यवाद कंजूसजी.

कंजूस's picture

14 Sep 2021 - 9:49 am | कंजूस

वाचायला घेतलं आणि अर्धवट सोडलं ते पूर्ण करतो. कारण इंडिका, स्टोरी ओफ हिंदुस्तान ही संपवली. सध्या घोडा - द स्टोरी ओफ द हॅार्स वाचतोय.

कुमार१'s picture

14 Sep 2021 - 9:53 am | कुमार१

छान आढावा.

महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?'

मला देखिल असे प्रश्न पडायचे जसे नउ नंतरच दोन आकडी संख्या दहा का येते ? दहा देखिल एक आकडी संख्या असती व अकरा पहीली दोन आकडी संख्या असते तर काय बिघडले असते वगैरे वगैरे वगैरे… मिपाचे नाव वडापाव असते तर ? इडली पदार्थ सर्वप्रथम कोणी तयार केला वगैरे वगैरे… वर वर पाहता असे प्रश्न प्रस्थापित गोश्टींवर निव्वळ टिका म्हणुन विचारणार्‍याची हेटाळणी सुरु होते… पण हळुहळु विचारांना यातुन योग्य दिशा मिळाल्यास सहज अनदेख्या झालेल्या गोश्टींची उकल रोचक होते जसे हाताला बोटे दहा म्हणुन नउ नंतर दहा ही दोन आकडी संख्या असावी हे निश्चीत केले तर आकडेमोड शिकणे करणे जास्त सुलभ होते वगैरे वगैरे वगैरे…. असो…

पुस्तकांची रोचक ओळख करुन दिली आहे धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2021 - 4:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

ककोल्ड वाचायला भरपुर पेशन्स पाहीजे. मी गो नी दांची शिवकाल वाचायला घेतली. ५०० पानांची कादंबरी आहे, पण एक एक वर्णने खिळवुन ठेवतात. मात्र नंतर नंतर पेशन्स संपला आणि कादंबरी खाली ठेवली ती ठेवलीच.

मुरलीधर खैरनार यांची "शोध" म्हणुन कादंबरी वाचली. सुरतेची लूट आणताना नाशिक-बागलाण भागातील किल्ल्यांवर ती दडवली होती आणि त्याचा आजच्या काळात जोडलेला संबंध असे काहीसे कथानक आहे. पण अजंठा-सातमाळा रांगेत फिरुन परीसराची मिळवलेली माहिती आणि डिटेलिंग यामुळे पुस्तक खिळवुन ठेवते.

सध्या मुलांना झोपताना गोष्टी सांगण्यासाठी शरलॉक होम्सचे पारायण चालु आहे.

कुमार१'s picture

14 Sep 2021 - 4:30 pm | कुमार१

मी सॅम्युअल बेकेट यांचे वैशिष्टपूर्ण नाटुकले Come and go वाचले.
त्यावर स्वतंत्र लेख लिहिला आहे.

हे नाटक फक्त तीन मिनिटांच्या कालावधीचे व सव्वाशे शब्दांचे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2021 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'टिश्यू पेपर' कादंबरी संपवली त्यावर मिपावर नव्या धाग्यात लिहायचं असा प्लान आहे. दुसरं 'बारबाला' हे बारबालांच्या आयुष्यावर आधारित वैशाली हळदणकर यांचं आत्मकथन वाचायला सुरु केलं आहे.

-दिलीप बिरुटे

साहना's picture

15 Sep 2021 - 12:00 am | साहना

ककॊल्ड हे कदाचित भारतीय इंग्रजी साहित्यातील सर्वांत चांगले काल्पनिक पुस्तक असावे. ककोल्ड संकल्पना आजकाल थोडी जास्तच वापरात येते आणि एक शिवी असल्याने उच्चारण करताना सुद्धा भीती वाटते. पण ज्या काळी हे पुस्तक वाचनात आले तेंव्हा हा शब्द ऐकून सुद्धा ठाऊक नव्हता आणि अर्थ पाहण्यासाठी मला शब्दकोश उघडावा लागला होता. पुस्तक थोडे छोटे झाले असते तर जास्त वाचनीय झाले असते.

स्वाम्प थिंग मला फार आवडते. दुर्दैवाने tv चित्रपटांत ह्याच्यावर जास्त चांगली कथानके निर्माण नाही केली. अॅलन मूर हे सोशालिस्ट असले तर माझ्या मते त्यांच्यातील कथाकार खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांच्या कथानकात तुम्हाला प्रवचन जाणवत नाही.

एक मजेशीर गोष्ट म्हणजे वॉचमन हि तुफान लोकप्रिय कॉमिक त्यांनी लिहिली. त्यावर स्नायडर ह्यांनी चित्रपट बनवला आणि तो एक कल्ट क्लस्सिक झाला. HBO ने त्याची कथा वाढवून एक अत्युतकृष्ट सिरीज बनवली.

ह्यातील एक पात्र आहे ते म्हणजे "रोर्शाश". चित्रपट लोकप्रिय झाला तेंव्हा हे पात्र खूपच लोकप्रिय झाले. बहुतेक लोकांचे हे आवडते पात्र होते आणि अनेकांना तर तोच प्रमुख नायक वाटला. अॅलन मूर ह्यांना हे पाहून बराच धक्का बसला. त्यांच्या मते हा खलनायक होता आणि एक वाईट पात्र होते. लोकांनी त्याला इतके गांभीर्याने घेतले ह्याचेच त्यांना आश्चर्य वाटले.

“I wanted to kind of make this like, 'Yeah, this is what Batman would be in the real world'. But I had forgotten that actually to a lot of comic fans, that smelling, not having a girlfriend—these are actually kind of heroic! So actually, sort of, Rorschach became the most popular character in Watchmen. I meant him to be a bad example. But I have people come up to me in the street saying, "I am Rorschach! That is my story!' And I'll be thinking: 'Yeah, great, can you just keep away from me, never come anywhere near me again as long as I live'?” - अॅलन

मूर म्हणूनच कथाकार म्हणून उजवे ठरतात. समाजवादी विचारसरणीत कुणी तरी शक्तिशाली आणि विद्वान माणूस सामान्य लोकांकडून त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि आपले निर्णय प्रसंगी इतरांवर हिंसेने थोपवून "ग्रेटर गुड" प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. लेनिन, स्टालिन, माओ, चे, कॅस्ट्रो म्हणूनच समाजवादी लोकांना प्रिय असतात कारण त्यांनी अपरंपार हिंसा केली तरी "ग्रेटर गुड" साठी केली अशी त्यांची विचारसरणी असते. ओझायमांदियास हे असेच पात्र आहे जे रशिया आणि अमेरिकेला एकत्र आणण्यासाठी एक खोटे एलियन अटॅक घडवून आणतो आणि लक्षावधी अमेरिकन लोकांना ठार मारतो. ह्याला एलियन अटॅक समजून रशिया आणि अमेरिका आपली दुष्मनी विसरतात. ह्यासाठी जे निरपराध लोक मेले ते आवश्यक होते असे ओझायमांदियास ह्याचे म्हणणे आहे. ओझायमांदियास हा एका अर्थी स्टालिन किंवा माओ आहे.

उलटपक्षी रोर्शाश आहे. हा नेहमीच एकटा सरदार आहे. मास्क घालून तो गुन्हेगारांना ठार मारतो. पोलीस, सरकार वगैरेंना तो मानत नाही. त्याच्यासाठी तत्वे महत्वाची असतात आणि सत्य महत्वाचे असते. ग्रेटर गुड पेक्षा सत्य लोकांसमोर यावे हीच त्याची धडपड. तो वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे आणि विक्षिप्त वाटला तरी बहुतांशी अनारको लिबरटेरिअन आहे. मूर ह्यांना तो आवडत नसला तरी ते पात्र त्यांनी इतके चांगले उभे केलं ह्यांत त्यांचे कथाकार म्हणून यश आहे असे वाटते.

कदाचित मूर हे कम्युनिस्ट नसून अनार्किस्ट असल्याने त्यांना हे सोपे पडले असावे. अनार्किस्ट मंडळी हि प्रचंड सरकार विरोधी असल्याने नेहमीच्या कम्युनिस्ट मंडळी पेक्षा थोडी वेगळी आणि जास्त विक्षिप्त असतात.

V for Vendetta ह्या कॉमिक मधून त्यांची अनार्किस्ट बाजू आम्हाला स्पष्ट दिसली होती anonimas ह्या हॅकर ग्रुप ने त्यांचे मास्क आपले चिन्ह म्हणून घेतले ह्यावरून एकूण जागतिक संस्कृतीवर किती प्रभाव पडला हे समजते. नंतर विविध साम्यवादी संघटनांनी सुद्धा हे मेड इन चायना मास्क घालून निदर्शने केली होती.

काहीही असो मूर हे खूप चांगले कथाकार आहे.

कॉमी's picture

15 Sep 2021 - 8:55 am | कॉमी

ककोल्ड नक्कीच सर्वोत्तम भारतीय कादंबऱ्यांपैकी एक आहे.
रोर्शाक किस्सा मस्तच.

समाजवादी विचारसरणीत कुणी तरी शक्तिशाली आणि विद्वान माणूस सामान्य लोकांकडून त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि आपले निर्णय प्रसंगी इतरांवर हिंसेने थोपवून "ग्रेटर गुड" प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

नाही, हे ओथोरिटेरियन झालं. लिबरटेरियन लेफ्ट पण असते ना. अमेरिकेतला सोशालिस्ट स्ट्रॉमॅन बरणी बघा. तो माओ स्टालिन वैगेरे वाटतो काय ?

आता ओझायमंदियास बद्दल. त्याचे कृत्य, अमेरिकेने जपान वर टाकलेल्या अणुबॉंब पेक्षा वेगळे कसे ? कथेचे प्रिमाईस मुळी असे आहे की ओझयमंदियास ने केलेल्या गोष्टीने कमीत कमी लोक मरणार असतात. आता रोर्शाश मुळे सगळंच फसत हे खरं असलं, तरी-
१. ओझयमंदियास जगातला सर्वात हुशार माणूस असतो.
२. भावनांचा कमीत कमी प्रभाव असलेला आणि देवसदृश्य डॉ. मॅनहॅटनला सुद्धा ओझयमंदियासचं लॉजिक मान्य करावं लागतं.

जस्ट गोज टू शो कि ओझयमंदियास आणि अमेरिकेचा अणुबॉंब- ह्या दोन्हींचे उद्दिष्ट जर मनुष्यहानी मिनीमाईझ करणे असेल, तर दोन्ही गोष्टी समान आहेत. त्यात डावे उजवे जरा ओढून ताणून आल्यासारखे वाटते.

मूर तुम्हाला आवडतात हे चांगलेच आहे. कुठलीही विचारधारा एक स्पेक्ट्रम असते, एका छत्रीखाली बहुढंगी बहुरंगी लोकं वावरत असतात, हे समजणे महत्वाचे आहे.

एका छत्रीखाली बहुढंगी बहुरंगी लोकं वावरत असतात, हे समजणे महत्वाचे आहे.

असल्या भंपक भिकारड्या म्हणण्याला आम्ही काडीची किंमत देत नाही उजवी बाजु सोडुन बाकी सर्व दिसेल तिथेच छाटुन टाकले पायजेल… त्यातच खरे सुख आहे हा सुबोध तुम्हास होइल त्यादिवसापासुन चंद्र अन सुर्य कुमार गणले जाणार नाहीत…

कॉमी's picture

15 Sep 2021 - 10:11 pm | कॉमी

हॅहॅहॅ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2021 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ककोल्ड, स्वाम्प थिंग, चॉकी ची ओळख आवडली. अशाच पुस्तकांवर लिहिते राहा. मला तरी ही पुस्तके आणि नावे पहिल्यांदाच ऐकलेली तेव्हा वाचायला आवडलेले. मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

15 Sep 2021 - 10:11 pm | कॉमी

धन्यवाद बिरुटे सर.

Bhakti's picture

15 Sep 2021 - 10:36 am | Bhakti

मस्त ओळख करून दिली.

राघव's picture

15 Sep 2021 - 2:34 pm | राघव

ओळख आवडली.

प्रचेतस's picture

16 Sep 2021 - 9:43 am | प्रचेतस

उत्तम परिचय.
नगरकरांची पुस्तके मात्र कधीच आवडली नाहीत. त्यांचं सर्वाधिक गाजलेलं 'सात सक्कं त्रेचाळीस' हे पुस्तक वाचण्याचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला पण झेपलं नाही. :)

सध्या महाभारतातील अनुशासनपर्व वाचणे सुरु आहे. साईड बाय साईड म.म. वा. वि. मिराशी यांचे 'शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख' वाचत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Sep 2021 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

मग एक परीक्षण येउंद्या की, आम्हालाही थोडी ओळख होईल

वाचून झाल्यावर प्रयत्न अवश्य करेन.

कुमार१'s picture

27 Sep 2021 - 12:28 pm | कुमार१

२१२१ : अ टेल फ्रॉम द नेक्स्ट सेंच्युरी’ या कादंबरीचा ( लेखिका : ब्रिटिश संसदेच्या खासदार असलेल्या सुझॅन ग्रीनफिल्ड) इथे दिलेला परिचय रोचक आहे. त्यातून पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण होते. इथल्या दर्दी वाचकांपैकी कोणी हे कधी वाचले तर त्यावर जरूर लिहा.

पुस्तक सारांश : तंत्रज्ञानाचा वापर ‘अति’ होत गेला तर काय होईल याचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे. आजपासून बरोबर १०० वर्षांनंतर आपला समाज कसा असेल? प्रेम, कुटुंब, स्वातंत्र्य, स्वत्वाची जाणीव या संकल्पनांचे काय स्वरूप असेल?

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2021 - 2:09 pm | श्रीगुरुजी

नगरकरांचे सात सक्के त्रेचाळीस हे पुस्तक वाचण्याचा बराच प्रयत्न केला होता. अत्यंत कंटाळवाणे पुस्तक व कोणतीही पात्रे व घटनांची संगती लागत नव्हती. त्यामुळे ७०-८० पानांनंतर नाद सोडला.

ककल्ड वाचताना अगदी हाच अनुभव आला. त्यामुळे ५०-६० पानांनंतर नाद सोडला.

किरण नगरकर, श्याम मनोहर, मेघना पेठे इ. लेखक काय लिहितात ते समजतच नाही. त्यांचे लेखन समजण्याइतकी माझी बौद्धिक क्षमता नाही.

To kill a mockingbird ही बरीच जुनी कादंबरी नुकतीच वाचली. थोडी कंटाळवाणी आहे, परंतु साधारणपणे निम्मी कादंबरी वाचून झाल्यानंतर थोडी रोचक होते.

टू किल अ मॉकिंगबर्ड वाचलंय. मस्तच पुस्तक आहे ते.

सतिश गावडे's picture

28 Sep 2021 - 8:28 am | सतिश गावडे

छान पुस्तक आहे हे.
मी या पुस्तकावर आधारीत चित्रपट आधी पाहीला, आवडला. म्हणून मग पुस्तकही वाचून काढले.

सौंदाळा's picture

27 Sep 2021 - 5:03 pm | सौंदाळा

'एक होती आजी' : श्री. ना. पेंडसे
४३० पाने
पेंडसेंनी लिहिलेली (कदचित) शेवटची कादंबरी
पण वाचून थोडी निराशाच झाली. कितीतरी ठिकाणी 'तुंबाडचे खोत' ची आठवण झाली. पात्ररचना, प्रसंग वगैरे 'तुंबाड'चेच वाटले.

कितीतरी ठिकाणी 'तुंबाडचे खोत' ची आठवण झाली. पात्ररचना, प्रसंग वगैरे 'तुंबाड'चेच वाटले.
श्री नांच्या बहुतेक कादंबऱ्या त्याच परिसरात घडतात त्यामुळे असेल कदाचित . तशीच माणसे आणि समाज
गारंबीचा बापू यांनतर त्यांची "गारंबीची राधा" हि कादंबरी जेव्हा वाचली तेव्हा थोडी अशी निराशा झाली होती खरे ... कारण गम्बीचा बापू मध्ये जी पत्ररचना होती त्यातला ताजेपणा पुढे नवहता
पण एक होती आजी वाचून माझी तशी निराशा अशी नाही झाली फार