ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Aug 2021 - 3:58 pm

आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः।
पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य

(ऋ. १०/१८९/१)

अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.

ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.

गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण:

वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.

पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत.

दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला प्रथमच कळले कि पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 4:45 pm | गॉडजिला

पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता.

संस्कृत भाषेचा अभ्यास नासा करते कारण...जसे सोप्या बेरीज वजबाकी अथवा गुणाकारामधे जशी संख्यांची जागा बदलली तरी उत्तर तेच येते जसे ३००+ १२० = ४२० अथवा १२० + ३०० = ४२०.

तसेच संस्कृत ओळीतील शब्दांची जागा बदलली तरी त्याचा अर्थ तोच राहतो जसे अहम अस्मि ब्रम्हा == अहम ब्रम्हा अस्मि.

पण I am bramha != am I bramha. इंग्लिशमध्ये मात्र अर्थ बदलतो... म्हणूनच अत्यंत स्टेबल languge म्हणुन नासा संस्कृतचा अभ्यास करत आहे वापरही करायचे प्रयोजन ठेवते... पण

मुद्दा हा आहे की आपण गुलाम नव्हतो तेंव्हा १००% लोकाना संस्कृत येतं होती ? नाही तर त्यामागे कोणती गुलामी मानसिकता होती ?

बाकि आपलं असो की परक्याचे जे योग्य त्याचा उचित सन्मान झालाच पाहिजे पण उठसूठ गुलाम मानसिकतेच्या नावाने गळे काढत बसणे अज्ञान होय.

मग इंग्रजांनी जेंव्हा त्यांचे ज्ञान भारतीयांना शिकवण्यासाठी (त्यांचे कारकून तयार करायला) संस्कृत भाषा निवडली तेंव्हा सर्वांना ही भाषा येतं नाही म्हणून भारतातील समाज सुधारकांनी त्यास आक्षेप घेतला (जसे राजा राम मोहन रॉय वगैरे) व तुम्हीं आम्हाला इंग्रजीतून ज्ञान द्या ही शिफारस केली तर ते चूक अथवा गुलाम मानसिकतेचे ठरतात ?

मग गुलाम मानसिकता इंग्रजानी रुजवली की आपल्यात ती आगोदरच होती ?

प्रसाद गोडबोले's picture

3 Aug 2021 - 9:07 am | प्रसाद गोडबोले

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 2:38 pm | गॉडजिला

मी आपल्याच प्रतिक्रियेची वाट बघत होतो...

असो प्रतिसाद कळला नाही जरा सविस्तपणे लिहाल का

प्रसाद गोडबोले's picture

3 Aug 2021 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले

म्हण्जे तुम्ही अगदी उत्कृष्ठ प्रतिनिधी आहात गट क्र. २ चे ! इतकेच म्हणायचे होते !

बाकी संवाद करण्यात काहीच अर्थ नाही !

शुभं भवतु !

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 11:51 pm | गॉडजिला

मी तुमचे हे म्हणने वाचण्यात बिजी होतो....

मला आता कोणत्याही ग्रूप आयडेंटीटीचा तिटकारा वाटायला लागलाय ! काय फरक पडतो तुम्ही कोणत्याजातीत जन्माला आला म्हणुन ? त्यात तुमचे काय कर्तृत्व ? जनरली , कोणत्याही व्यक्तीवर त्याची व्यक्तिभिन्नता पुसुन ग्रूप आयडेंटी लादणारी व्यक्ती / सिस्टीम केवळ त्याचा दुरुपयोग करुन घेत असते असे माझे ठाम मत बनले आहे

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2021 - 12:12 am | प्रसाद गोडबोले

ती वैयक्तिक पॉलीसी आहे, म्हणजे कसं की स्वतःला कोणताही ग्रुप आयडेंटिटी मध्ये विभागुन घ्यायच नाही, पण इतरांना मात्र ( विशेषतः गट क्र. २ मधील लोकांना ) त्यांचा ग्रुप किती भारी आहे , त्यांची ग्रुप आयडेंटिटी किती हुच्च आहे , त्यांची ग्रुप आयडेंटीटी ही त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे हे दाखवुन द्यायचे !

अजुन सोप्प्या शब्दात सांगायचं तर इतरांसाठी ध्येयवाक्य - " शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा "

आणि स्वतःसाठी ध्येयवाक्य " पारंपारिक शिक्षण घेऊ नका, संघटित तर मुळीच होऊ नका आणि संघर्ष करायचा तर विचार सुध्धा मनात आणु नका " !

:)

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 12:17 am | गॉडजिला

अजुन येउद्या... तुमचे विचार वाचायला मजा येते(सगळेच पटत नाहीत तरीही). कृपा करा जसे आहात तसेच रहा अर्थपुर्ण लिखाणाच्या अजिबात फंदात पडु नक्का..

तुषार काळभोर's picture

3 Aug 2021 - 4:43 am | तुषार काळभोर

यह सदा गमनशील और तेजस्वी सूर्य उदयाचलको प्राप्त हुआ है|
और पूर्व दिशा में अपनी माता पृथिवी को प्राप्त करता है|
अनंतर अपने पिता द्युलोक की ओर शीघ्रतासे जाते समय अत्यंत शोभायमान होता है|

This moving many coloured (Sun) has arrived, he has sat down before his mother (Earth) in the East and advances to his Father Heaven.

हिन्दी संदर्भ

इंग्रजी संदर्भ

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या वेदिक हेरिटेज (वैदिक वारसा) या संकेतस्थळावर हे सुक्त आणि त्याचे हिंदी + इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.

प्रचेतस's picture

2 Aug 2021 - 8:31 pm | प्रचेतस

हाच अर्थ अचूक आहे आणि त्याच्या पुढचे दोन श्लोक सुद्धा ह्याच अर्थाची पुष्टि करतात.

स्वधर्म's picture

3 Aug 2021 - 4:00 pm | स्वधर्म

अभिनंदन. असा नेमका संदर्भ हुडकून प्रतिवाद करणे खूप कमी जणांना जमते. तोही वैदिक ज्ञानाच्या संकेतस्थळावरून शोधला आहे, म्हणजे वादच नाही. धागाकर्त्यांनी कृपया प्रतिसाद द्यावा, ही माफक अपेक्षा.
कालच यू ट्यूबवर एक जुना सिनेमा पहात असताना त्यात विनोबांचा गीताईमधला एक श्लोक दाखवला होता. त्याचा अर्थ इतका समाजहिताच्या विरोधी लागतो, की आश्चर्य वाटले. म्हणून एका गीतेच्या अभ्यासक मित्राला विचारले असता, त्याने अर्थ फिरवून बरोबर तो वाईट दिसणार नाही, अशा प्रकारचा खुलासा पाठवला. श्रध्दाळूंबरोबर सारासार चर्चा करता येत नाही, असाच आजवरचा अनुभव आहे. निदान विवेक पटाईत यांनी लावलेला अर्थ बरोबर नाही, आणि वैदिकांकडे त्यावेळी नेमके ज्ञान नव्हते इतकी कबुली मोठ्या मनाने दिली तर खूप बरे वाटेल.

प्रचेतस's picture

3 Aug 2021 - 4:13 pm | प्रचेतस

मुळात पृश्नि ह्या शब्दाला पृथ्वी असे समजल्यामुळे घोळ झाला असावा असे वाटते. पृश्नि ह्याचे विविध अर्थ आहेत -ठिपके, प्रकाश किरण, सूर्यपत्नी, एक ऋषी. ह्यापैकी ह्या श्लोकात सर्वात अचूक अर्थ आहे तो सूर्यकिरण अर्थात सूर्य हाच. शिवाय हे सूर्यसूक्त आहे आणि पुढील दोन श्लोकांत ह्याचाच अनुशंगाने सूर्याची स्तुती केलेली दिसते.
पृथ्वी सूयाभोवती फिरते असे धागालेखकाचे म्हणणे केवळ सिलेक्टिव्ह रिडींग आहे असे म्हणावेसे वाटते.

विवेकपटाईत's picture

12 Aug 2021 - 10:47 am | विवेकपटाईत

पसार झालो नाही. फक्त बघत होतो किती लोक आपल्या डोक्याचे वापर करतात. ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ" नाही. परिक्रमा सूर्य किरणे करत नाही. त्यामुळे गौ शब्दाचा अर्थ फक्त पृथ्वी होऊ शकते. पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो.

नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)

विवेकपटाईत's picture

7 Aug 2021 - 12:37 pm | विवेकपटाईत

हा सरकारी संस्थेचा चूक अर्थ आहे, हीच ती गुलामी मानसिकता. इथे वृषभ शब्द नाही गौ हा शब्द आहे. चुकीच्या भाष्यात गौः शब्दाचा अर्थ वृषभ असा केलेला आहे. किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा. ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ (वादळ) हा शब्द वापरला आहे. याच मंडळातील १०२ वे सुक्त. म्हणजे समकालीनच.

नि । अ॒क्र॒न्द॒य॒न् । उ॒प॒ऽयन्तः॑ । ए॒न॒म् । अमे॑हयन् ।वृ॒ष॒भम् । मध्ये॑ । आ॒जेः । तेन॑ । सूभ॑र्वम् । श॒तऽव॑त् । स॒हस्र॑म् । गवा॑म् । मुद्ग॑लः । प्र॒ऽधने॑ । जि॒गा॒य॒ ॥ १०.१०२.५
२. याशिवाय ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति
३. बाकी भक्त देवतेची परिक्रमा करतात. देवता नाही. शिवाने गणेशाची परिक्रमा केलेली नाही.
बाकी मी हा अर्थ वेदांचे गाढे अभ्यासक ब्रम्हमुनी यांच्या भाष्यातून घेतला आहे. स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी हाच अर्थ काढला आहे.

तुषार काळभोर's picture

7 Aug 2021 - 1:51 pm | तुषार काळभोर

किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा.
>> मला संस्कृत, तेही संयुक्त, केवळ तीन वर्षे होतं. त्यामुळे तुमच्या इतका मी प्रकांड पंडित नक्कीच नाही. मला स्वतःला जे कळत नाही, त्या बाबतीत, (स्वतःच्या डोक्याचा वापर करून) अधिकृत संदर्भ तपासणे, एवढेच मी करू शकतो. अर्थात वेदांचे गाढे अभ्यासक ब्रह्ममुनी, स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी काढलेला अर्थ हा अधिकृत अर्थापेक्षा जास्त अचूक असणार, यात शंका नाही.

ज्ञान आणि अभ्यास कमी आहे माझा तरी एक गोष्ट मला लक्षात येत नाही... वेदांमध्ये इतके सगळे अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे तर मग..

पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे...ग्रहणात राहु केतु सुर्य गीतात ह्या व यासारख्या भाकड कथा कोणी लीहील्या? आणि मुख्य म्हणजे काय लीहील्या.....त्यात कोणाचा फायदा होता?

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 3:13 pm | गॉडजिला

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2021 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे

हा हा विषयच संपला. आभार मानायला हरकत नै आता या धाग्यावर. ;)

-दिलीप बिरुटे

धागालेखकाने दिलेला अर्थ जरी खरा मानला तरी त्यातून भारतीयांची पृथ्वी सुर्याभोवती फिरते अशी समजूत होती इतकाच अर्थ निघतो. त्यात केवळ वडील मुलगी इत्यादी रूपके आहेत. कोणत्या निरीक्षणांवरून काय अनुमान निघाले याबद्दल काही नाही. त्यामुळे जरी श्लोकाचा अर्थ आहे तसा मानला तरी गुलामी वैगेरे जरा जास्त वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2021 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यामुळे जरी श्लोकाचा अर्थ आहे तसा मानला तरी गुलामी वैगेरे जरा जास्त वाटते.

जास्त नै अति.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2021 - 4:27 pm | टवाळ कार्टा

असे अजूनही बरेच वैज्ञानिक शोध बाकी असतील पण आपल्या पुराणांमध्ये आधीच लिहून ठेवले असतील...असे शोध जगासमोर आणायला आपल्याला कोणी थांबवले आहे का?
अजून किती दिवस्/आठवडे/वर्षे/दशके/शतके "हे आमच्या पुराणांमध्ये आधीच लिहून ठेवले आहे" असे म्हणत गार गार वाटून घेणार आहोत?

तो म्हणजे भारतीयांनी गमावलेली आधुनिक ज्ञानाच्या बाबतीत प्रभुत्वाची मानसीकता जागरूक अथवा तीव्र करणे. पण यासाठी गरजेची सीन्ससियरिटी, अभ्यासाची खोली आणि लिखाणाची सामावेशक वैज्ञानिक समज याकडे दुर्लक्ष करून निव्वळ आपली अस्मिता कुर्वाळून जेंव्हा जेंव्हा आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव जागवायचा प्रयत्न दिसतो तेंव्हां फक्त अलिबाग से आयेला है क्या असेच म्हणावेसे वाटते.

डाम्बिस बोका's picture

5 Aug 2021 - 8:35 pm | डाम्बिस बोका

कशाला अलिबाग चे नाव?
त्यापेक्षा सौदी वरून आला आहेस का, हे जास्ती प्रस्तुत वाटते. आपल्या OUTDATED कल्पनांना कवटाळून बसणारी सौदी जमात इथे FIT बसते

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2021 - 8:42 pm | टवाळ कार्टा

लै दिवसांनी दिसलात ;)

Rajesh188's picture

3 Aug 2021 - 7:53 pm | Rajesh188

पण त्या प्राचीन ज्ञाना चा वापर करून त्या मध्ये भर टाकण्यात भारतीय कमी पडले.
सर्व शास्त्र मध्ये प्राचीन ग्रंथात ज्ञान असून ते समजून त्याचा अभ्यास करून भारताने उत्तुंग झेप घेणे अपेक्षित होते.
पण आज अवस्था अशी आहे तंत्र ज्ञन, विज्ञान
आरोग्य शास्त्र, शस्त्र ,अस्त्र ज्ञान ह्या मध्ये भारत दुसऱ्या देशावर अवलंबून आहे.
लढावू विमान पण भारताला दुसऱ्या देश कडून मागवावे लागत आहेत.
दुनिया कर्तुत्व ला सलाम करते.

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 10:05 pm | गॉडजिला

दुनिया नुसत्या ज्ञानाला नाही तर कर्तुत्वाला सलाम करते.

नीळा,


वेदांमध्ये इतके सगळे अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे तर मग..
पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे...ग्रहणात राहु केतु सुर्य गीतात ह्या व यासारख्या भाकड कथा कोणी लीहील्या?

अचूक वैज्ञानिक ज्ञान म्हणजे नेमकं काय?

तुम्हांस एक गंमत सांगतो. इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो. ही सुद्धा एक भाकडकथाच आहे.

आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते. हीसुद्धा एक भाकडकथाच आहे. शालेय पुस्तकांत खरी म्हणून ठोकून दिलेली, पण प्रत्यक्षात भंपक अशी समजूत आहे.

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत ही पण एक पराकोटीची भाकडकथा आहे.

सांगायचा मुद्दा काये की शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे वगैरेसाठी केवळ हिंदूंना दोष देणे नको.

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

3 Aug 2021 - 9:44 pm | Rajesh188

तुमच्या मताशी सहमत आहे.प्रवाह बरोबर वाहत न जाणारा व्यक्ती च खरा विज्ञान वादी असतो.
आता जे विज्ञान म्हणून जे काही सांगितले जाते ते नवीन अंध श्रद्धा निर्माण करत आहे.
प्रवाह विरूद्ध स्वतःची मतं असणारी माणसं दुर्मिळ असतात.
त्या दुर्मिळ माणसात तुम्ही एक आहात.

गामा पैलवान's picture

4 Aug 2021 - 2:28 am | गामा पैलवान

Rajesh188,

स्तुतीबद्दल धन्यवाद. ती देवांनाही आवडते. मी तर पडलो मर्त्य माणूस! :-)

आता जे विज्ञान म्हणून जे काही सांगितले जाते ते नवीन अंधश्रद्धा निर्माण करत आहे, हे तुमचं विधान जाम सत्य आहे. विज्ञानाच्या नावाखाली अंधश्रद्धा माजू द्यायची नसेल तर तात्विक प्रशिक्षण घ्यावं लागतं. तात्विक प्रशिक्षण सार्थ करण्यासाठी श्रद्धा लागते. थोडक्यात काय, विज्ञान मुळातून शिकायचं असेल तर श्रद्धा हवीच. अंधश्रद्धेस श्रद्धाच संपवू शकते.

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 10:11 pm | गॉडजिला

तुम्हांस एक गंमत सांगतो....

ठीक काहे भरपूर हसलो आता आता गंमत बाजूला राहूदे भाकडकथा काय काय नाहीत ते सांगा बरे... ?

Rajesh188's picture

3 Aug 2021 - 11:18 pm | Rajesh188

भाकड कथा कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवणार कोण.
ज्या मुद्द्यावर प्राचीन ज्ञान भाकड कथा आहेत असे काही म्हणतात त्याच मुद्द्यावर आधुनिक संकल्पना ह्या पण भाकड कथा च ठरतात
हा सूर्य आणि हा जयद्रथ हे दोन्ही ठिकाणी सिद्ध होत नाही.
पण जेव्हा माणसाला कपडे घालायचे पण माहीत नव्हत तेव्हा अती प्रगत विचाराचे लिखाण झाले आहे , वास्तू शास्त्राचे अद्भूत रचना तेव्हा निर्माण झाल्या आहेत.
संस्कृती अती उच्च स्थानावर जावून नष्ट होते हा निसर्ग नियम आहे

प्राचीन ज्ञान ही ज्ञाना ची अतिउच्च पातळी होती त्या नंतर ती नष्ट झाली.
उद्या काही घडले आणि आताची संस्कृती नष्ट झाली तर काही लाख वर्ष नी२०२१ मध्ये माणसाने काय काय प्रगती केली होती ही भाकड कथा च असेल.
काहीच पुरावा सापडणार नाही.

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 12:58 pm | गॉडजिला

भाकड कथा कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवणार कोण.
तो प्रश्नच नाही.

गामा पैलवानाजी भाकडकथा कोणत्या नाहीत आता सांगतीलच... तुम्हीं जरा ऐकायचे काम करा बरं

आपल्या संस्कृतीत इतकं ज्ञान असताना ही चुकीची माहिती असलेली पुराण कोणी आणि का लीहीली?

आता उदाहरणार्थ ग्रहणात राहु केतु सुर्याला गीळतात?

हे कसे शीरले

बाकी अणु बीणु .... डार्विनला मधे न आणता सांगा बर

गामा पैलवान's picture

4 Aug 2021 - 2:40 am | गामा पैलवान

नीळा,

तुमचा प्रश्न रास्त आहे, पण माझ्याकडे निश्चित उत्तर नाही. म्हणून मी विज्ञानातल्या भाकडकथांचं उदाहरण दिलं. या भाकडकथांमुळे विज्ञानाचं काहीही बिघडंत नाही. तर मग वैदिक भाकडकथांमुळे भारतीयांचं तरी काही का बिघाडावं?

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2021 - 4:21 pm | टवाळ कार्टा

इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो.

आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते.

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत

या भाकडकथा आहेत असे म्हणायचे आहे का?

गामा पैलवान's picture

4 Aug 2021 - 7:48 pm | गामा पैलवान

हो.
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2021 - 3:44 pm | टवाळ कार्टा

इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो.

आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते.

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत

या सगळ्या भाकडकथा आहेत ते कशाच्या आधाराने लिहिले त्याचा रेफरन्स इथे देता का?

या भाकडकथांमुळे विज्ञानाचं काहीही बिघडंत नाही.
जेंव्हा जेंव्हा एखादी बाब वैज्ञानीक भाकडथा आहे हे विज्ञानच सिध्द करते तेंन्ह्वा विज्ञान धर्म, देश वगैरे अस्मिता न बघता त्याच्या चुका/ सुधारणा/ नावीन्य मान्य करते आपलेसे करते. त्याचा उपयोगही करते.

तर मग वैदिक भाकडकथांमुळे भारतीयांचं तरी काही का बिघाडावं?
तर मग वैदिक भाकडकथांमुळे काही भारतीयांचं तरी काही का बिघाडावं हा प्रश्न जास्त उचित होइल... पण तो चर्चेचा मुद्दा तुर्त नाही कारण वैदीक भाकडकथा मधुन कोणाचे बिघडले आहे याचा अभ्यास मिपाकर मार्कस ओरलस यांनी आधिच केला आहे.

कोरोना जितके थोतांड आहे तितकेच उत्क्रांती आणि इलेक्ट्रॉन भाकडकथा म्हणून मान्य आहेत :)

कपिलमुनी's picture

3 Aug 2021 - 10:42 pm | कपिलमुनी

धागाकर्ता प्रचारकी

पोस्ट टाकून पसार !

विवेकपटाईत's picture

12 Aug 2021 - 10:46 am | विवेकपटाईत

पसार झालो नाही. फक्त बघत होतो किती लोक आपल्या डोक्याचे वापर करतात. ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ" नाही. परिक्रमा सूर्य किरणे करत नाही. त्यामुळे गौ शब्दाचा अर्थ फक्त पृथ्वी होऊ शकते. पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो.

नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)

कोहंसोहं१०'s picture

4 Aug 2021 - 4:10 am | कोहंसोहं१०

वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे यात शंका नाही...पण ते भौतिक ज्ञान नाही तर आत्मिक अथवा आध्यात्मिक ज्ञान. कोणत्याच काळामध्ये भौतिक ज्ञान हे परिपूर्ण नव्हते आणि असणारेही नाहीं. ते काळाप्रमाणे विकसित किन्व सन्कुचित होत जाणार. आपण नेहमी हीच चूक करतो. उगाच आत्ता माहित असलेले भौतिक नियम आपल्या पूर्वजांनी आधीच शोधून काढले होते हे दाखवण्याच्या अट्टाहासापायी उगाच दोन गोष्टींमध्ये बादरायण संबंध दाखवत राहतो. अनेक भौतिक गोष्टींबद्दलचे ज्ञान आपल्या पूर्वजांना होते यात दुमत नाही पण त्याहूनही कितीतरी उच्च सत्य जे आपल्या उपनिषदांमध्ये आहे जे कालातीत आहे आणि राहणार आहे हेच नेमके आपण विसरलो आहोत. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ज्या आध्यात्मिक सत्याचा अविष्कार केला नि जे काही वेदांतात लिहून ठेवले आहे त्याचा आत्ता कुठे पाश्चात्य लोक विचार करत आहेत. अभिमान बाळगायचा तर वेदातील ज्ञानकांडामध्ये जे आध्यात्मिक ज्ञान सांगून ठेवले आहे त्याचा बाळगा आणि त्याचा प्रचार करा कारण त्याच्या वर असे दुसरे ज्ञानचं नाहीं. आणि या या अर्थाने भारतीय संस्कृती खरोखर श्रेष्ठ ठरते.

परंतु आपले दुर्दैव असे की आपण वेदांमधील कर्मकांड किंवा पुराणांमधील गोष्टीच उचलून धरतो आणि पुन्हा त्याकडे पाठ फिरवतो। केवळ काही उपनिषदे वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न जरी केला तरी समजून जाईल किती श्रेष्ठ ज्ञान सांगून ठेवले आहे।

धर्मराजमुटके's picture

4 Aug 2021 - 9:07 am | धर्मराजमुटके

उत्तम प्रतिसाद ! आमच्या पुस्तकात हे अगोदरच लिहुन ठेवले आहे हे सांगण्यात सगळ्याच धर्माच्या अज्ञानी व्यक्ती पुढे असतात. आपल्या ऋषीमुनींनी जे काही शोधले ते भौतिक ज्ञानापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ होते हे कळेल तो सुदिन !

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 3:38 pm | गॉडजिला

+१

गामा पैलवान's picture

4 Aug 2021 - 7:54 pm | गामा पैलवान

गॉडझिला,

भाकडकथा काय काय नाहीत ते सांगा बरे... ?

भाकडकथा हा शब्द माझा नाही. नीळा यांनी पौराणिक कथांना भाकड म्हंटलं. म्हणून त्या अनुषंगाने विचार करून मी विज्ञानातल्या काही विवादास्पद कथा शोधल्या. तुम्ही एखादी बिनभाकड कथा सांगितलीत तर त्या अनुषंगाने यथाशक्ती विचार करेन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

तुम्हाला ज्याला भाकडकथा म्हणता येणार नाही असे अस्सल काहीतरी माहिती असेलच की. मला ते फक्त जाणुन घ्यायचे आहे.

गामा पैलवान's picture

4 Aug 2021 - 11:09 pm | गामा पैलवान

गॉडझिला,

तुमच्या चौकस वृत्तीचा आदर आहे. पण माझ्या मतांनी असा काय फरक पडणारे? असतील काही गोष्टी बिनभाकड. ही सृष्टी अनंतप्रसवा आहे. भाकडकथांसोबत रसाळकथाही असतील. माझ्या मतांनी कुणालाही कसलाही फरक पडणार नाहीये. माझं स्वत:चं असं फार कमी आहे या जगात.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

फर्क पडणार आहे का नाही यासाठी वेगळा धागा काढु, त्यात नवीन विषय डोक्यात आला तर त्यासाठीही अजुन एक धागा काढु, इथे तो विषय नको, तुर्तास वर ज्याची विचारणा आपल्यास केली आहे त्याची पुर्ती करावी.

गामा पैलवान's picture

5 Aug 2021 - 2:06 am | गामा पैलवान

गॉडझिला,

पूर्ती अवश्य करेन. भाकडकथा या संकल्पनेचा मी उदाहरणाद्वारे विस्तार केला. तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया सांगावी. मग तिचा मी यथाशक्ती विस्तार करेन.

आ.न.,
-गा.पै.

तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया सांगावी

ही मी तुम्हाला केलेली विनंती आहे...

गॉडजिला's picture

5 Aug 2021 - 3:26 am | गॉडजिला

जाऊ दे गामा जी, तुम्हाला न झेपणारी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगितली याबद्दल मी तुमची क्षमा मागतो...

पण तुम्ही देखील आपली रेघ मोठी करण्याच्या नादात दुसऱ्याची रेघ पुसून लहान करायच्या फंदात उगीच पडलात... पहिली गोष्ट निव्वळ वैदिकाता म्हणजे हिंदुत्व न्हवे हे विसरलात अन हिंदुबाबत कोणी काही बोललं नसता हिंदू हा शब्दप्रयोग केला.

अन दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एखादी बाब भाकडकथा आहे असे सांगितल्या बद्दल तुम्हीं ती भाकडकथा नाही यावर विवेचन न करतां इतरही भाकडकथा सांगतात म्हणुन आमच्या भाकडकथना भाकड गणू नये असा अजब जावईशोध आपलासा केलात याबद्दल तुम्हीं मिपाकरांनी जाहीर माफी मागणे लागता तेव्हढे जरी केलें तरी ती स्वागतार्ह बाब असेल

कथा- काल्पनिक प्रसंगांची मालिका.
भाकडकथा = (कथा) + (कथा म्हणून प्रचलित नसून, सत्य घटना म्हणून प्रचलित असणे)

हेमावैम

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 8:51 pm | गॉडजिला

कोणीतरी सामण्य शब्दात सामाण्याना कळेल असे हे निःसंदिग्ध सांगेल का इथे की पृथ्वी गोल असून सूर्यभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही हा शोध जगात भारतीयांनी प्रथम लावला

कोण कोणा भोवती फिरत आहे हे आताच्या विज्ञाना तरी माहीत आहे का.
आकाश गंगा स्तरावर विचार केला तर सर्व आनंदी आनंद च आहे.
फुकाचा गर्व करू नका कोणाच्या तरी अंकित असणाऱ्या आधुनिक संशोधकांचा.
सर्व प्रश्नांची उत्तर अती प्राचीन ज्ञान ग्रंथात च मिळतील.

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 10:30 pm | गॉडजिला

कोण कोणा भोवती फिरत आहे हे आताच्या विज्ञाना तरी माहीत आहे का.

ओके विज्ञानाला माहिती नाही पण आपल्यासारख्या विद्वानांना माहीत आहे ना ?

मग जो प्रश्न सूर्यमालेच्या स्तराचा आहे त्याला आकाशगंगेचे पालुपद लावायची गरज काय ?

गॉडजिला's picture

5 Aug 2021 - 2:46 am | गॉडजिला

भारतीय जनतेमध्ये आधुनिक दृष्टिकोन हा दुर्दैवाने बाहेरील लोकांनी आणला त्यामूळे जे काही आधुनिक ते भारताच्या संस्कृती विरोधी असा बोभाटा करायला बुडातील स्वांत सुखाचे बुडबुडे फोडणारे मोकाट झाले

अन विरोधाभास म्हणजे स्वांत सुखाचे बुडबुडे मोकाट फोडणारे लोकच आता ज्यांनी आधुनकीक दृष्टीकोन भारताला दिला त्यांची चाकरी करायला भारताबाहेर जायलाही धडपडत आहेत.

हे तिकडे का जातात तर भारतीय संस्कृतीने त्यांच्या जीवनासाठी अधोरेखित केलेली उदिष्टे साध्य करायला न्हवे, तर पाश्च्यात्यांनी जी उद्दिष्टे भारतीय जनते समोर ठेवली त्याचे घनदाट वर्जन जगायला... आणि वरून प्राचीन भारतीय संस्कृती कशी महान याचा जालिय कळवळा दाटून येतो.

मग आजच्या भारतात एखादे आधुनिक भविष्यवेद किंवा भविष्यपुराण कसे रचले जाईल जे येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभ म्हणुन काम करेल ?

आशा परिस्थितीमध्ये हे आम्ही आधीच हुडकले होते म्हणायचा कोणाला काही अधिकार उरतो ?

कॉमी's picture

5 Aug 2021 - 7:46 am | कॉमी

रैट

Bhakti's picture

5 Aug 2021 - 4:07 pm | Bhakti

_/\_

Rajesh188's picture

5 Aug 2021 - 4:07 pm | Rajesh188

पण पाश्चिमात्य देशांना आदर्श समजून त्यांच्या पाढी पळण्याचे काही कारण नाही.
त्यांच्या मुळेच जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत
आहार लोकांचा त्यांनी बिघडवला आरोग्य साठी घातक अन्न पद्धती त्यांनी निर्माण केली आणि जगात अनेक आजार निर्माण झाले .
मधुमेह,blood प्रेशर ,आणि अनेक गंभीर आजार ही त्या पाश्चिमात्य देशांचीच देणं आहे.
शहरीकरण
एकाच जागेवर खूप प्रचंड लोकांना जमा करून शहर निर्माण करणे आणि बाकी भागाकडे दुर्लक्ष करून विकास थांबवणे ही त्यांचीच देणं आहे.
त्याचे घातक दुष्परिणाम आता दिसत आहेत.
हायब्रीड बी बियाणे,हायब्रीड जनावरे तयार करणे,विविध रासायनिक खत,कीटक नाशक,पिकांचे हार्मोन्स बदलणे .
हे सर्व पाश्चिमात्य देशांनी च केले आणि सकस आहार माणसाला मिळणे मुश्कील झाले.
आपण वेड्या सारखे त्यांच्या मागे धावत आहे.
विज्ञाना च्या गोंडस नावाखाली सर्व पाप लपवली जात आहेत.
पण प्राचीन भारतीय ज्ञान असे विध्वंसक नव्हते.

Rajesh188's picture

5 Aug 2021 - 4:07 pm | Rajesh188

पण पाश्चिमात्य देशांना आदर्श समजून त्यांच्या पाढी पळण्याचे काही कारण नाही.
त्यांच्या मुळेच जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत
आहार लोकांचा त्यांनी बिघडवला आरोग्य साठी घातक अन्न पद्धती त्यांनी निर्माण केली आणि जगात अनेक आजार निर्माण झाले .
मधुमेह,blood प्रेशर ,आणि अनेक गंभीर आजार ही त्या पाश्चिमात्य देशांचीच देणं आहे.
शहरीकरण
एकाच जागेवर खूप प्रचंड लोकांना जमा करून शहर निर्माण करणे आणि बाकी भागाकडे दुर्लक्ष करून विकास थांबवणे ही त्यांचीच देणं आहे.
त्याचे घातक दुष्परिणाम आता दिसत आहेत.
हायब्रीड बी बियाणे,हायब्रीड जनावरे तयार करणे,विविध रासायनिक खत,कीटक नाशक,पिकांचे हार्मोन्स बदलणे .
हे सर्व पाश्चिमात्य देशांनी च केले आणि सकस आहार माणसाला मिळणे मुश्कील झाले.
आपण वेड्या सारखे त्यांच्या मागे धावत आहे.
विज्ञाना च्या गोंडस नावाखाली सर्व पाप लपवली जात आहेत.
पण प्राचीन भारतीय ज्ञान असे विध्वंसक नव्हते.

मदनबाण's picture

5 Aug 2021 - 9:54 am | मदनबाण

The Vedic Sanskrit text Aitareya Brahmana (2.7) (c. 9th–8th century BC) also states: "The Sun never sets nor rises thats right. When people think the sun is setting, it is not so; they are mistaken." This indicates that the Sun is stationary (hence the Earth is moving around it), which is elaborated in a later commentary Vishnu Purana (2.8) (c. 1st century), which states: "The sun is stationed for all time, in the middle of the day. [...] Of the sun, which is always in one and the same place, there is neither setting nor rising." (See Haug, Martin and Basu (1974), Joseph (2000), Kak (2000) in Selin (2000), Teresi (2002) and Blavatsky (1877) for further information.)

संदर्भ :- Heliocentrism

जाता जाता :- नासा में लगती है 15 दिन की संस्कृत की क्लास

भारतात सगळे लोक संस्कृत मध्ये बोलत होते का ? कठीण प्रश्न ! कारण हा जगातला एकमेव खंड आहे जिथे फार मोठ्या प्रमाणात अनेक भाषा एकत्र नांदतात. पण आजही हिंदूस्थानात एक गाव आहे जिथे सगळे लोक केवळ संस्कृत मध्येच बोलतात. यावर बजाज ने एक जाहिरात बनवली होती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher

जॉन कार्टर मला आवडला नाही व नंतर आपल्या आर्थिक धाग्यावर मी माझे म्हणणे परखडपणे स्पश्ट केल्यानंतर आपण माझ्या कोणत्याही प्रतिसादावर साद दिली नाहीत.... इतका मनाचा शालो इंटरेस्ट चर्चा आणि संबंध दोन्हीसाठी मारक असतो त्यामुळे मी आपल्याशी साधकबाधक चर्चा करण्यात अर्थ नाही.

तरीहि या धाग्यावर आपण माझे काही म्हणणे वाचून आज जो प्रतिसाद लिहलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

(मैत्रीत विरोधी मताचा अधिकार मान्य करणारा)- गॉडझिला

जॉन कार्टर मला आवडला नाही व नंतर आपल्या आर्थिक धाग्यावर मी माझे म्हणणे परखडपणे स्पश्ट केल्यानंतर आपण माझ्या कोणत्याही प्रतिसादावर साद दिली नाहीत.
जॉन कार्टर मला आवडला मी तसे सांगितले, तुम्हाला नाही आवडला त्यावर मी काहीही उणे बोललो नाही, प्रत्येकाची आवड वेगळी असते. आर्थिक धाग्यावर ज्याला आपण परखड प्रतिक्रिया म्हणता ती मला तशी वाटली नाही आणि जे मला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन जाणवले ते तिथेच तसे सांगितले आहे.

इतका मनाचा शालो इंटरेस्ट चर्चा आणि संबंध दोन्हीसाठी मारक असतो त्यामुळे मी आपल्याशी साधकबाधक चर्चा करण्यात अर्थ नाही.
तुमच्याशी देखील चर्चा करण्यात अर्थ नाही हे मला त्याच धाग्यात कळले होते,त्यामुळे माझा अमूल्य वेळ तुमच्या प्रतिसांदवर खर्च करणे टाळण्यासाठी मी चर्चा तिथेच थांबवली.

तरीहि या धाग्यावर आपण माझे काही म्हणणे वाचून आज जो प्रतिसाद लिहलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
मी एकंदर धागा आणि सगळे प्रतिसाद वाचुन मग व्यक्त झालो, त्यात तुमचा प्रतिसाद देखील आला. फक्त तुमचाच प्रतिसाद वाचुन मी माझा प्रतिसाद दिलेला नाही.
मला उद्देशुन हा प्रतिसाद दिला असल्याने मी आता तुम्हाला प्रतिसाद दिला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher

जो तुम्हालाच दिला आहे आता परत टाईप करत नाही

प्रसाद गोडबोले's picture

5 Aug 2021 - 10:56 pm | प्रसाद गोडबोले

आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही

गॉडझिला , आपणही चर्चा करण्यात अर्थ नाही ह्या मताशी आलेला पाहुन आनंद झाला !

मुळातच कोणाशीच काहीच चर्चा करण्यात काही पॉईट नाही , कोणाला काही पटवुन देण्यात किंव्वा कोणाचे काहीही पटवुन घेण्याने आपला काहीही वैयक्तिक फायदा होत नसत्तो .

त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया घायलावयचा ? नुसतं हे सगळं "बामणाचे कसब" आहे इतके म्हणलं अन बामणांची संस्कृती बामणांसाठी सोडुन दिली की विषय संपतो !

बाकी टाईमपास करायचा असल्यास , मिपा , इथल्या गंभीर चर्चा वगैरे सगळं स्वान्तःसुखाय आहेच म्हणा !

ख्यॅ खॅ ख्यॅ

त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया घायलावयचा ? नुसतं हे सगळं "बामणाचे कसब" आहे इतके म्हणलं अन बामणांची संस्कृती बामणांसाठी सोडुन दिली की विषय संपतो !

मी तुमच्या या प्रवृत्तीशी सहमत नाही...

असेच प्रतिसाद लिहीत रहा वाचून मनोरंजन होते अर्थपूर्ण वगेरे लिखाणाच्या नादात पडू नका

_/\_

गामा पैलवान's picture

6 Aug 2021 - 1:49 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

या सगळ्या भाकडकथा आहेत ते कशाच्या आधाराने लिहिले त्याचा रेफरन्स इथे देता का?

देतो. मी ज्यांना भाकडकथा म्हणतो त्यांचा स्रोत इथे आहे : https://www.misalpav.com/comment/1114837#comment-1114837

१. अणुगर्भाच्या भोवती फिरणारा इलेक्ट्रॉन :

केंद्राभोवती गोल गोल फिरणारी वस्तू त्वरणांकित ( = accelerated ) असते. विद्युतभरीत वस्तू जर त्वरणांकित असेल तर तिने प्रारण ( = radiation ) उत्सर्जित करायला हवं. या प्रारणास लारमर प्रारण म्हणतात ( इंग्रजी संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Larmor_formula ). प्रारणाबरोबर ऊर्जा बाहेर पडल्याने सदर वस्तूची ऊर्जा कमीकमी होत जाते.

इलेक्ट्रॉन विद्युतभारित आहे हे सर्वमान्य आहे. तो जर अणुगर्भाभोवती गोलगोल फिरला तर प्रारण उत्सर्जित करीत अणुगर्भात पडायला पाहिजे. पण सर्वसाधारण अणूतून असं कोणताही प्रारण बाहेर पडतांना आढळून आलेलं नाही. तसंच इलेक्ट्रॉन कोलमडून अणुगर्भात पडलेला आढळून आला नाही.

म्हणजेच इलेक्ट्रॉन अणुगर्भाच्या भोवती फिरंत नसतो.

२. ढगांवर ढग घासून वीजनिर्मिती :

दीड लाख व्होल्ट उत्पन्न होतात का? घर्षणातनं एव्हढा प्रचंड प्रभार निर्माण व्हायला कुठल्या चक्कीचा आटा खातात हे ढग? घर्षण होण्यासाठी किमान एक पृष्ठभाग घन वा द्रव असावा लागतो. पण इथे तर ढग हा वायुगोळा आहे. तो कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हेच निश्चित नाही. phase boundary नसतांना एखादी वस्तू घासली कशीकाय जाऊ शकते?

शिवाय आकाशातनं वीज नेहमी खालीच का पडते? उलटी हवेत का उडून जात नाही? जर ढगांवर ढग घासले जाऊन विद्युतभार निर्माण होत असेल तर एका ढगावर धन व दुसऱ्यावर ऋण भर निर्माण झाले पाहिजेत. जर ऋणभारामुळे वीज जमिनीवर कोसळंत असेल तर धनभारामुळे विजेचा लोळ जमिनीतून आकाशात झेपावतांना दिसायला हवा. प्रत्यक्षांत वीज नेहमी खालीच कोसळतांना दिसते. काय गौडबंगाल आहे?

ढगांवर ढग घासून आकाशात वीज निर्माण होत नसते.

३. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत :

याविषयी इथे लिहून झालेलं आहे : http://www.misalpav.com/comment/955679#comment-955679

परत लिहितो. एकपेशीय जिवापासनं माणूस बनला हा तो तथाकथित उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. हा एकपेशीय जीव अमिबासारखा असतो ( इंग्रजी संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Amoeba ). गंमत अशीये की ही पेशी प्रचंड गुंतागुंतीची असते. कारण की जीवनावश्यक कार्ये एकाच पेशीत एकवटलेली असतात.

माणसाच्या अंगात अनेक प्रसंस्था आहेत. उदा.: शासन, पचन, पुनरुत्पादन, इत्यादि. या प्रसंस्थांची काम ते ते अवयव करतात. मात्र एकपेशीय जिवात ही सगळी कार्ये व तदनुरूप रचना सर्वकाही एकाच पेशीत सामावलेल्या असतात. साहजिकंच ही पेशी अतिशय हुरहुन्नरी व हुंबदांडगी होते. याउलट मानवी शरीरातली कोणतीही पेशी त्या त्या अवयवाचं कार्य करण्यापुरती सीमित असते.

एकपेशीय जिवाचा डीएनए उच्च प्रमाणावर सक्रीय असतो. मात्र मानवी शरीरातल्या कुठल्याही पेशीचा डीएनए फक्त ठराविक काम करण्यापुरताच म्हणजेच अत्यंत मर्यादित प्रमाणावर सक्रीय असतो. एकपेशीय जिवाची आणि मानवी शरीरातल्या कोणत्याही पेशीची फायटिंग लावली तर एकपेशीय जीव मानवी पेशीला क्षणभरात फस्त करेल.

मग उत्क्रांती नेमकं कशास म्हणायचं? शरीरातल्या पेशींना स्वतंत्रपणे जगण्यास नालायक बनवणं, हीच का ती उत्क्रांती?

उत्क्रांतीच्या नावाखाली बावळटपणा चालू आहे. तो टाळायचा असेल तर उत्क्रांती ही शरीरबाह्य जिवाची होते, असंच मानायला पाहिजे. डार्विनच्या पुस्तकात शरीरबाह्य चैतन्याविषयी एक अवाक्षर तरी आहे का? नाही ना? मग त्याची रवानगी कचऱ्याच्या डब्यात व्हायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2021 - 2:21 pm | टवाळ कार्टा

मी तुम्ही स्वतः लिहिलेल्या प्रतिसादांचा रेफरन्स मागितलेला नव्हता....तुम्ही जे दावे केलेत ते सिध्ध करण्यासाठी काही निरिक्षणे + त्याला आधार देणारे पुरावे + परत परत प्रयोग करुन त्यातून सारखेच निष्कर्ष आलेत याचे पुरावे असे काही आहे का? असतील तर ते जागतिक स्तरावर प्रकाशित करा.

तुम्ही जे ३ दावे केलेत ते जर तुम्हाला सिध्ध करता आले तर भारताला ३ नोबेल नक्की मिळतील आणि ३ नोबेल मिळवणारे तुम्ही आजपर्यंतच्या मानवी इतिहासातले पहिलेच असाल.

गामा पैलवान's picture

6 Aug 2021 - 2:41 am | गामा पैलवान

गॉडझिला,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.

जाऊ दे गामा जी, तुम्हाला न झेपणारी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगितली याबद्दल मी तुमची क्षमा मागतो...

क्षमा केली.

२.

पण तुम्ही देखील आपली रेघ मोठी करण्याच्या नादात दुसऱ्याची रेघ पुसून लहान करायच्या फंदात उगीच पडलात...

माझी रेषा लहानंच आहे.

३.

पहिली गोष्ट निव्वळ वैदिकाता म्हणजे हिंदुत्व न्हवे हे विसरलात

येस सर. विसरलो.

४.

अन हिंदुबाबत कोणी काही बोललं नसता हिंदू हा शब्दप्रयोग केला.

भाकडकथा हा शब्द नीळा यांनी हिंदू पुराणांना उद्देशून वापरला होता. म्हणून माझ्या विधानात हिंदू हा शब्द आला. मात्र तो अनावश्यक आहे हे मान्य. सुधारित वाक्य असं पाहिजे :

शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे वगैरेसाठी केवळ हिंदूंच्या पुराणांना दोष देणे नको.

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

6 Aug 2021 - 8:50 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.

मी तुम्ही स्वतः लिहिलेल्या प्रतिसादांचा रेफरन्स मागितलेला नव्हता..

मी ज्यांना भाकडकथा म्हणतो त्यांची यादी करायला हवी. ती मीच करणार ना?

२.

तुम्ही जे दावे केलेत ते सिध्ध करण्यासाठी काही निरिक्षणे + त्याला आधार देणारे पुरावे + परत परत प्रयोग करुन त्यातून सारखेच निष्कर्ष आलेत याचे पुरावे असे काही आहे का?

मी कुठलाही दावा केलेला नाही. फक्त प्रचलित समजुतीतले विरोधाभास दाखवून दिलेत. मी जी काही निरीक्षणं नोंदवली आहेत ती मी नोंदवली काय वा तुम्ही घेतली काय किंवा इतर कोणी नोंदवली काय, काय फरक पडतो? निरीक्षणं आहेत तशीच राहणार. त्यांना आजून कसले पुरावे जोडायची गरज नाही.

३.

असतील तर ते जागतिक स्तरावर प्रकाशित करा.

www.misalpav.com यामध्ये www आहे. त्याचा अर्थ world-wide-web असा आहे. म्हणजेच मी इथे जे काही लिहितोय ते आपोआपच जागतिक स्तरावर प्रकाशित होते आहे. त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यायची गरज नाही.

४.

तुम्ही जे ३ दावे केलेत ते जर तुम्हाला सिध्ध करता आले तर भारताला ३ नोबेल नक्की मिळतील आणि ३ नोबेल मिळवणारे तुम्ही आजपर्यंतच्या मानवी इतिहासातले पहिलेच असाल.

उपरोक्त संदेशात मी कुठलाही दावा केलेला नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या कुठल्याही कामगिरीस जर नोबेल पारितोषिक मिळालं तर ते भारताला मिळणार नाही.

बाकी, ३ नोबेल पारितोषिकं मला मिळाली तर मी मानवी इतिहासातला पहिलाच असेन हे तुमचं विधान बरोबर आहे. अर्थात हा इतिहास आत्तापर्यंतचा मानवी इतिहास आहे हे वेगळे सांगणे नलगे. तुमच्या आस्थेबद्दल आभार.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2021 - 5:25 pm | टवाळ कार्टा

इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो.

आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते.

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत

या सगळ्या भाकडकथा आहेत

@निलकांत, @प्रशांत आणि मिपा चालवणारे इतर

वर लिहिलेले कैच्याकै दावे मिसळपाववर मानाचे प्रतिसाद (Hall of fame) अशी यादी बनवून त्यात जतन करावेत.
भविष्यात हेच दावे पाश्चिमात्य देशांतल्या कोणी "पुराव्यासकट" सिध्ध केले तर आपण "हे तर आमच्याकडे पुराणांत मिसळपाववर आधीच लिहिलेले होते" असे म्हणायला मोकळे :)

गामा पैलवान's picture

8 Aug 2021 - 3:20 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

मी कुठलाही दावा केलेला नाहीये. केवळ निरीक्षणे मांडलीत. ती सिद्ध वगैरे करायची नसतात.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2021 - 5:26 pm | टवाळ कार्टा

दुसरं म्हणजे माझ्या कुठल्याही कामगिरीस जर नोबेल पारितोषिक मिळालं तर ते भारताला मिळणार नाही.

नक्की का? कारण या हिशोबाने कोणत्याच देशाला आजपर्यंत एकही नोबेल मिळाले नाही असा अर्थ होतो.

गामा पैलवान's picture

8 Aug 2021 - 3:19 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

करेक्ट! कोणत्याच देशाला आजपर्यंत एकही नोबेल मिळाले नाही. नोबेल मिळतं ते व्यक्तीस. देशास नव्हे. अपवाद शांततेचं नोबेल. पण त्याचा इथे संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

7 Aug 2021 - 12:43 pm | विवेकपटाईत

गुलामी मानसिकता असलेअल्या सरकारी संस्थेचा चूक अर्थ इथे एका प्रतिसादात दिला आहे. पण ऋचेत वृषभ शब्द नाही गौ हा शब्द आहे. चुकीच्या भाष्यात गौः शब्दाचा अर्थ वृषभ असा केलेला आहे. किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा. ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ (वादळ) हा शब्द वापरला आहे. याच मंडळातील १०२ वे सुक्त. म्हणजे समकालीनच.

नि । अ॒क्र॒न्द॒य॒न् । उ॒प॒ऽयन्तः॑ । ए॒न॒म् । अमे॑हयन् ।वृ॒ष॒भम् । मध्ये॑ । आ॒जेः । तेन॑ । सूभ॑र्वम् । श॒तऽव॑त् । स॒हस्र॑म् । गवा॑म् । मुद्ग॑लः । प्र॒ऽधने॑ । जि॒गा॒य॒ ॥ १०.१०२.५
२. याशिवाय ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति
३. बाकी भक्त देवतेची परिक्रमा करतात. देवता नाही. शिवाने गणेशाची परिक्रमा केलेली नाही.
बाकी मी हा अर्थ वेदांचे गाढे अभ्यासक ब्रम्हमुनी यांच्या भाष्यातून घेतला आहे. स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी हाच अर्थ काढला आहे.