शालेय गणिताचा दैनंदिन जीवनात फायदा ,भाग १

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
21 Jun 2021 - 12:15 am

नमस्ते मित्रांनो
आपण सगळे इंजिनेर / सी ये किंवा बाकी शिक्षणात advanced अर्थात अधिकांश गणित शिकला असाल पण जे १० पर्यन्त चे गणित आहे त्याचा किती वेळा उपयोग झाला आहे ?
कदाचित बेरीज वजाबाकी चा उपयोग खरेदी करताना झाला
चला आत्ता अधिक उपयोग करू

किती लोकांकडे jio चे सिम आहे

सगळ्यात स्वस्त प्लॅन कोणता ?
सगळ्यात स्वस्त डेटा कोणत्या प्लॅन मध्ये ?
नुसते calling साठी प्लॅन घ्याचा तर स्वस्त कोणता पडेल?

सांगा

साधे गणित आहे

आजच्या दिवसाला jio चे सर्व प्लॅन खालील प्रमाणे आहेत

चित्र दिसत नसेल तर इथे टिचकी मारा https://imgur.com/a/pU6VXVB

जिओ फोने वगळता सर्वात स्वस्त
डेटा प्लॅन २३९९
calling साठी स्वस्त १४९

तंत्र

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

21 Jun 2021 - 1:33 am | प्रसाद गोडबोले

तुम्ही टाईम व्हॅल्यु ऑफ मनी हिशेबात घेतलेली नाहीये. सध्याच्या रिस्क फ्री शॉर्ट टर्म ट्रेझरी बॉन्ड वरील यिल्ड सधरण ४% पकडुन प्लॅन च्या अ‍ॅडव्हन्स मध्ये भरणार आहात त्या पैशाची फ्युचर व्हॅल्यु काढा , सर्व प्लॅन समान मॅच्युरिटी पातळीला आणुन मग प्राईस पर जीबी , प्राईस पर डे कॅलक्युलेट करा अन तुलना करा तर ती अ‍ॅप्पल टू अ‍ॅप्पल कंपॅरिझन होईल =))))

त्यासाठी 12वि चे गणित लागेल..
Calculus वगैरे

ते 10वि पर्यंत चे गणित म्हणाले आहेत..
इतने गणित मे इतनाच मिळेगा

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2021 - 9:55 am | चंद्रसूर्यकुमार

या गणितात आणखी काही गोष्टींचा अंतर्भाव व्हायला हवा.

दर महिन्याला रिचार्ज करायच्या विरोधात
१. आपल्यासारखे टेक सॅव्ही लोक असतील ते ऑनलाईन रिचार्ज वगैरे करतील. पण टेक सॅव्ही नसलेले लोक दुकानात जाऊन किंवा जिओ गॅलरीत जाऊन रिचार्ज करतात. जिओचा एक महिन्याचा पॅक दररोज काही पैशांनी स्वस्त वाटत असला तरी अशा लोकांना दर महिन्याला रिचार्ज करायला कुठेतरी बाहेर जावे लागेल. त्यासाठी होणारी अडचण विचारात घेतली आहे का? त्याउलट एक वर्षाचा पॅक घेणार्‍यांना असे वर्षातून एकदाच बाहेर जावे लागेल.

२. आपल्यासारखे लोक ऑनलाईन रिचार्ज करतात. मी क्रेडिट कार्ड वापरून रिचार्ज करतो. माझ्या कार्डावर १५० रूपये खर्च केले तर ५ पॉईंट्स मिळतात. जर १४९ रूपये वर्षात १२ वेळा खर्च केले तर एकही पॉईंट मिळणार नाही. पॉईंट मिळवायला मुद्दामून गरज नसताना विनाकारण खर्च करायचे नाहीत पण जे खर्च करायचेच असतात त्यातून जास्तीत जास्त पॉईंट्स काढून मग ते पॉईंट्स फिरायला जायचे असेल त्यासाठी विमानाची तिकिटे/हॉटेलची बिले यासाठी वापरायचे हा माझा अगदी आवडता छंद आहे. थेंबेथेंबे तळे साचे या न्यायाने २३९९ चा रिचार्ज केल्यास ७५-८० रूपयांचे पॉईंट्स तरी मिळतील पण १४९ चा रिचार्ज १२ वेळा केल्यास एकही पॉईंट मिळायचा नाही.

३. २०१८ मध्ये एक वर्षासाठीचा रिचार्ज १६०० रूपयात केल्याचे आठवते. आता तोच प्लॅन २४०० मध्ये मिळत आहे. म्हणजे जिओ नवीन असताना एकदम स्वस्तातले प्लॅन्स मिळत होते त्यांचे दर आता वाढायला लागले आहेत. त्याप्रमाणे १४९ च्या रिचार्जचा दर वाढून १५४ किंवा १५९ झाला तर तो प्लॅन कदाचित महाग पडेल. तो दर तसा वाढणार नाही याची खात्री आहे का? त्यापेक्षा २३९९ चा प्लॅन घेऊन रिचार्ज केल्यास एक वर्षासाठी आपण दर फिक्स करून घेतो.

दर महिन्याला रिचार्ज करायच्या बाजूने
१. एखाद्याकडे एक वर्षाचा रिचार्ज करायला लागणारे २३९९ रूपये एकरकमी खर्च करायची क्षमताच नसेल/ तितके पैसेच गाठीला नसतील तर मग दर महिन्याला रिचार्ज करणे अपरिहार्य होईल.