अष्ट्ररा झेनिका ची पहिली लस घेतल्यावर

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
20 May 2021 - 10:26 am
गाभा: 

अष्ट्ररा झेनिका ची पहिली लस घेतल्यावर शरीरावर काय परिणाम व्हाययःची शक्यता असते?
- डॉक्तरांनि कल्पना दिली आहे कि हात दुखणे ,हुडहुडी भरणे आणि तपासारखे वाटणे हे होऊ शकते १-२ दिवसात
इतरांचा काय अनुभव आहे?
अष्ट्ररा झेनिका ची लस विविध देशात परवानगीने बनवली जाते .. त्यात फरक असू शकतो?

प्रतिक्रिया

काही तरुण माणसांच्या रक्तात गुठळ्या झाल्या होत्या या लशीमुळे असे वाचले होते.
अर्थात हे प्रमाण पण अत्यल्प होते.

कपिलमुनी's picture

20 May 2021 - 11:06 am | कपिलमुनी

ज्या हातावर लस घेतली तो एक दिवस प्रचंड दुखला , रात्री किंचित ताप आला , पॅरासिटोमोल घेतली त्यामुळे बरे वाटले.
दुसर्‍या दिवशी प्रचंड थकवा जाणवला. त्या नंतर काहीही त्रास नाही.

एक्स्ट्रीम साईड इफेक्ट - माझ्या बहिणीला (वय वर्षे ५६) तोंडावर पुरळ उठले (नागीण उठते तसे) . बरे व्हायला एक महिना लागला. तोवर प्रचंड दाह , अस्पष्ट उच्चार ,किंचित पस इन्फेक्शन झाले.

स्किन स्पेशलिस्ट म्हणले , लस घेतलेले काही पेशंट सेम प्रोब्लेम साठी येत आहेत. चेहरा , पाठ , पोट , दंड यांवर स्किन रॅश / पुरळ उठत आहेत.

shingle

** अशी लक्षणे दिसल्यास घाबरु नये इतकाच पोस्ट चा उद्देश आहे.

कुमार१'s picture

20 May 2021 - 11:41 am | कुमार१

AZ या लसीमुळे रक्तगुठळ्या होण्याचे प्रमाण खूप कमी असून आकडेवारी अशी आहे :

प्रति 10 लाख डोसेसमध्ये :
भारत ०.६१
ब्रिटन ४
जर्मनी 10

काळजी नसावी.
शुभेच्छा !

चौकटराजा's picture

20 May 2021 - 12:56 pm | चौकटराजा

मी बीपी ,( ३३ वर्षे ) मधूमेह( २२ वर्षे ) व किडनी( ७ वर्षे ) तिन्हीचा पेशंट आहे ! दोन्ही डोस घेतले काही म्हणता काही त्रास झाला नाही .
पत्नी अत्यंत कमी हिमोग्लोबिन ( नक्की कारण डॉक्टरांना सापडत नाही ! ) १५ वर्षे .तिचा पहिला डॊस झाला .अजिबात काहीही त्रास झाला नाही !

चौकटराजा's picture

20 May 2021 - 12:58 pm | चौकटराजा

बी पी ३३ वर्षे नसून २३ वर्षे आहे !!

चौथा कोनाडा's picture

20 May 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा

मी कोव्हिशिल्ड लस घेतलेली.
पहिल्यावेळी दुपारी,रात्री खुप झोप आली, दुसर्‍या दिवशी पासून ओके.
दुसर्‍यावेळी दंड किंचित दुखला, बाकी काही नाही.
अर्धांगिनीला मात्र पहिल्यावेळी रात्री प्रचंड थंडी वाजून आली, दुसरा आख्खा दिवस विश्रांती घ्यायला लागली.
आता ८४ दिवसांचा नविन नियम लागू केल्यामुळे दुसरी मात्रा विलंबित होणार !

विनायक प्रभू's picture

20 May 2021 - 1:14 pm | विनायक प्रभू

कधी ४२
कधी ५२
कधी ९०
कधी ८२
आता ९०

विनायक प्रभू's picture

20 May 2021 - 1:15 pm | विनायक प्रभू

६०

आई वडील दोघांनी कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतला, दोघे ५५+ आहेत. काही सुद्धा त्रास झाला नाही.

चौकस२१२'s picture

20 May 2021 - 1:18 pm | चौकस२१२

कोव्हिशिल्ड ? = अष्ट्ररा झेनिका ? manufactured under license?

चौथा कोनाडा's picture

20 May 2021 - 1:26 pm | चौथा कोनाडा

प्रश्न : कोव्हिशिल्ड लस अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे आहे काय?
उत्तरः होय, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारा निर्मित कोविशेलिड लस अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस प्रमाणेच पेटंट तंत्रज्ञानावर आधारित आहे.

ही माहिती भारताच्या मिनिष्ट्री ऑफ हेल्थ च्या साईटवर दिलेली आहे.

कॉमी's picture

20 May 2021 - 1:56 pm | कॉमी

हो.

सरिता बांदेकर's picture

20 May 2021 - 2:47 pm | सरिता बांदेकर

आम्ही दोघांनी लस घेतली मि.ना त्रास झाला नाही. मला ४/५ दिवस ताप येत होता. कुठचीही गोळी घेतली नाही.प्रचंड झोप येत होती आणि शुगर लेव्हल वर खाली होत होती.पण मी भरपूर पाणी पित होते. एक आठवड्यानंतर सगळं व्यवस्थित झालं.
दोन्ही वेळी सेमच होतं. पण कुठचीही गोळी न घेता पाणी पित राहिल्याने ताप पण थोड्या वेळात उतरत होता.

मराठी_माणूस's picture

20 May 2021 - 4:16 pm | मराठी_माणूस

स्पुटनिक : ह्या लसीबद्दल कोणी अधिक माहीती देउ शकेल का . फक्त एकच डोस घ्यावा लागतो हे वाचले आहे.
ती कुठे दिली जाते, कोणाला दिली जाते (वयाचे बंधन ?) हे काही माहीत नाही, नोंदणी वगैरे आहे का ?

घोरपडे's picture

24 May 2021 - 12:24 pm | घोरपडे

१) कोवॅक्सिन जर भेटत असेल तर घ्या
२) covid sheild चे रीझल्ट्स चांगले नाहीत
३) माझ्या भाऊने कोवॅक्सिन घेतली आणि वहिनींनी -- covid शेईल्ड ( २ डोस ) -- वहिनींनी ना कोरोना झाला आणि ७ दिवस ऍडमिट करावं लागलं( hrct १५) -- आता bp चा त्रास होत आहे
भाऊंना संपर्कात येऊन पण कोरोना नाही झाला
४) माझ्या सौ च्या काकांनी covid sheild घेतली होती ( २ डोस ) - शेवटी नाही वाचले
५) मामाचा मुलगा सायंन हॉस्पिटल मध्ये MD करत आहे covid sheild घेतली होती ( २ डोस ) कोरोना झालात पण आता तब्बेत ठीक आहे।

येथे फक्त अ‍ॅस्ट्रॅजेनेका चिच लस मिळते म्हणजे भारतीय संधर्भात कोव्हिशिल्ड... (फायझर आणि मॉदेरना मिळणार आहे पण त्याला वेळ लागेल) त्यामुळं तीच घेतली.. अपेक्षे प्रमाणे २ दवस अंग दुखणे आणि थंडी वाटणे आणि खास करून डोके दुखणे असा अनुभव आला बाकी ठीक माहिती बद्दल सर्वांचे आभार

अष्ट्ररा झेनिकाच्या लसीचा पहिला डोस घेतला. इथे (मलेशियात) सरकारतर्फे हीच लस देण्यात येतेय सर्वांना, विनमूल्य.

मला काहीही साइड एफेक्ट जाणवला नाही.
बायको दोन दिवस अंगदुखेनी आणि दोकेदुखीने बेजार होती
मुलाचा लस टोचलेला हात एक दिवसभर जड होता.

- (लस टोचून घेतलेला) सोकाजी