राधे ,पेन्शन योजना

Primary tabs

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
14 May 2021 - 7:38 pm

राधे ,पेन्शन योजना
नोंद सपरिवार बघू नका

सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा
दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय
दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे

एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता
तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते
ह्या सगळ्या पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी

पूर्ण चित्रपट ४ थीत लया मुलांसाठी आहे एवढा बालबोध आहे
१) जॅकी सलमान ला म्हणतो I आम two dangerous तेव्हा त्याला हाताची २ बोटे पण दाखवावी लागतात मग जोक कळतो
२) सलमान खान जो उकडलेला ऑक्टोपस चा चेहेरा आणि गेंड्याची बॉडी घेऊन असतो त्याला छोटी दिशा म्हणते तुला बॉडी वर काम करावे लागेल
३) पोलीस फक्त मार खाण्यासाठीच असतात का ?
४) हॉटेलमध्ये २ मर्डर,लगेच रात्री राधे चा आयटम सोंग पोलीस चा इन्फॉर्मेर मेला लगेच गाणे
५) सलमान खान चक्क dc चा फ्लॅश आणि marvel चा quicksilver दाखवला आहे

६) मुख्य व्हिलन कडे फक्त २ गुंड असतात आणि प्रविंद तरडे इत्यादी छोट्या भाई लोंकांकडे फौज
७) टॉप ची मॉडेल एकाला लिफ्ट देते आणि लगेच मैत्री होते प्रेम होते,मला आख्या भारतात एक अशी मुलगी दाखवा जी अनोळख्या माणसाला लिफ्ट देईल
https://imgur.com/49VVjNs

बाकी सलमान आपल्या फ्यान च्या अपेक्षा पूर्ण करतो
शर्ट काढतो ,डान्स कसा बस(?) करतो ,गाडी चालवून लोंकाना तुडवतो

चित्रपटप्रतिभा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 May 2021 - 5:17 am | टवाळ कार्टा

इतके लिहिण्यासाठी पिच्चर बघितला?? मला तर पोस्टरपण बघावेसे नाही वाटत

कॉमी's picture

15 May 2021 - 8:14 am | कॉमी

सिनेमाच्या नावात "Your most wanted bhai" हे पाहूनच हसू आले.

पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी
आग्गागा... जुनं मराठी संकेतस्थळ आता राहिले नाही :)

गामा पैलवान's picture

15 May 2021 - 2:57 pm | गामा पैलवान

मुळातून असले पिच्चर म्हणजे काळापैसा धुवून पांढरा करायचे धंदे आहेत.
-गा.पै.

१.५ शहाणा's picture

15 May 2021 - 3:38 pm | १.५ शहाणा

खूप सहनशीलता लागते , देव लोकांना पाहण्याची सहनशक्ती देवो ही प्राथना .

मदनबाण's picture

15 May 2021 - 6:46 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI

संबळांग खान ची बॉडी तुमको ना भुल पायेंगे ची CGI केल्यासारखी दिसत होती.

हस्तर's picture

17 May 2021 - 2:54 am | हस्तर

चौथा कोनाडा's picture

17 May 2021 - 11:48 am | चौथा कोनाडा

ज्यां प्रेक्षकांचे यात पैसे गेलेत, आरथिक फटका बसलाय त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.
परमेशवर निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !

💀

गामा पैलवान's picture

17 May 2021 - 10:25 pm | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

लोकांचे पैसे गेले तर गेले. त्याचं दु:ख नाही. लोकांनाही नसेल.

पण हेच वाया गेलेले पैसे काळा पैसा धुवून पांढरा करण्यासाठी वापरले गेलेत. याचं दु:ख आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

18 May 2021 - 5:43 pm | चौथा कोनाडा

अगदीच सहमत !

असल्या भुरट्यांनी बराच डल्ला मारला आत्ता पर्यंत. पण सुजाण लोकं एकत्र येऊन असल्या भुरट्यांचं पितळ उघडं करुन सिनेमा पाडतात !

टवाळ कार्टा's picture

18 May 2021 - 5:58 pm | टवाळ कार्टा

आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !

म्हणजे??? =))

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 1:32 pm | चौथा कोनाडा

त्ये आत्मा ल्हायचं होतं बगा, पन गडबडीत टंकायचंच र्‍हायलं की हो !

😆

समीर वैद्य's picture

19 May 2021 - 3:21 am | समीर वैद्य

दुसरी जॅकी ( फडणवीस) ??

फर्नांडिस म्हणायचंय का?