लाँकडाऊन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
11 May 2021 - 3:55 am

विसाव्या शतकातील विसाव्या वर्षात लाँकडाऊन हा जुना सर्व सामान्यानां माहीती नसलेला शब्द प्रयोग बोलचालीचा झाला आणि घाटावरच्या " विसाव्या " चे वारंवार दर्शन घडवून गेला.
आता "विसावा ", या शब्दाची एवढी भीती बसली आहे की चुकनही कोणी त्याचा उपयोग केला तर अंगावर काटे येतात.

अशाच एका कडक लाँकडाऊन च्या दिवशी घरी बसुन कंटाळलो होतो म्हटंल चला जरा फेर फटका मारुन यावा. मी स्वताः बाहेर पडलो का नाही कारण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. पडू म्हणले तरी घरी बायको, मुले काँलोनीतले मीत्र, सिक्युरिटी स्टाफ आणी रोड वर पोलिसांचा कडक बंदोबस्त.करोनाची भीती ती वेगळीच.......

पण माझे मन ऐकतच नव्हते ते म्हणाले मी तर जाणारच तुला यायचे असले तर ये. आता मला सांगा, मनावर कोणाचा ताबा, ते तर बेछूट, निघाले , मी आपला गपचूप घरी बसलो.

बदोंबस्तावाले पोलिस,"अत्यावश्यक सेवा " आसे बोर्ड लावलेली काही वाहने, काही मेडिकलची दुकानां जवळ काही चिंताग्रस्त चेहरे सोडले तर सगळे रस्ते जवळ जवळ निर्मनुष्य. अचानकच कर्णकर्कश सायरनचा आवाजात जीव खात पळणारी आँम्बयुलन्स दिसत होती. एका ठिकाणी दवाखान्याचा मोठा बोर्ड, काही चार चाकी, दुचाकी, सुस्कारा सोडत चितांग्रस्त माणसे तोडांला मास्क व लटक्या चेहर्यानी इथे तीथे उभी दिसत होती.

माझे मन हे सगळे दृष्य बघताना गंभीर आणि हळू उदास होऊ लागले.फिरता फिरता "वैकुठा"जवळ आले. तीथे काही लोक बसली होती.थोड अतंर ठेवून तिथेच उभे राहिले आणि होणारा संवाद ऐकु लागले.

" मित्राच्या पत्नीचा कोरोनाने बळी घेतला, तो स्वतः ऑक्सिजन वर असल्याने त्याच्या अनुपस्थितीत अंत्यविधी करावा लागला, 4 दिवस झाले तो अनभिज्ञ आहे, त्याचा सारखा फोन येतोय विचारतोय ,"तब्येत कशी आहे, तिचा फोनच लागत नाही ", किती खोटं बोलायच.....

तो बरा होऊन आल्यावर त्याला कसे तोंड दयायचे हा मोठा प्रश्न आहे.

निदान तुमचे मित्र हॉस्पिटल मधून सुखरूप बाहेर निघे पर्यंत ही बातमी त्यांना अजिबात कळणार नाही ह्याची काळजी घ्या नाही तर धीर सुटला की माणूस उपचाराला ही दाद देत नाही .

तो नॉर्मल कंडिशनला येईल तेव्हा डिस्चार्ज घेण्यापूर्वी डॉक्टरच्या सल्ल्याने सांगायचे ठरले आहे

खूपच हृदयद्रावक परिस्थिती आहे मित्राला धिर द्या काही निमित्ताने सतत संवाद साधा थोडा मित्र व्यवस्थित झाल्यावर जे झाले ते तो स्वतः पचवेल पण सतत संपर्क ठेवा हे ही दिवस निघून जातील.

नाही आम्ही स्वतः कमीच फोन करतो कारण बोलण्याच्या ओघात संयम हवा, जेव्हा त्यालाच विचारतो वहिनी कशा आहेत तेव्हा थोडं दाटून येतं.

खुपच गाढ मैत्री होती वाटते,

हो ना आगदी लहानपणापासून,भावा पेक्षाही जास्त जवळचे नाते. पुढच्या पिढीत ते आणखीनच खोल रुजत गेले.

हक्काच घर होतं ,वहिनीच्यां हातच्या चिकन मटणाच्या पार्ट्या कितीनदा झाल्यात, त्यांनी कधीही कंटाळा केला नाही, त्यांचा हाताला खूप चांगली चव होती.

दादा, ज्या वहिनीच्या हातचे कित्येकदा खाल्ले त्या दोन दिवसात होत्याच्या नव्हत्या झाल्या . ज्या हाताने त्यांनी केलेले चिकन मटण चापून चोपून खाल्ले त्याच हाताने सरणावर झोपवले. कुणाच्या ही नकळत फोटो काढलाय.

मित्राला किती मुले आहेत...असेल तर मित्राच्या मुलांना माहीत का आई निघून गेली ते... व सध्या त्यांचा सांभाळ कोण करतंय

मुलगा जाणता आहे धीट आहे खंबीर आहे, वडिल चांगले होण्याची वाट पाहतोय.

संवाद चालू होता मधेच एक जण म्हणाला ,हो ना आज Covid ICU ला एक पेशंट गेला. त्याच्याच बाजूला तीन बेड सोडून त्यांचा मुलगा होता. मला खूप वेळा त्याने त्याच्या वडिलांची तब्येत विचारली पण त्याला सतत खोटं सांगाव लागल.ड्युटी मधलं सगळ्यात अवघड काम माझ्यासाठी तरी हेच खोटं बोलण.

ऐकुन मन सुन्न झाले माझे.....

काय परिस्थिती आली आहे . अर्धांगिनी गेल्याचे इतरांकडून समजणार . शेवटची भेटही नाही . हे सर्व कधी संपेल ?

आम्हाला नेहमी कर्ण सारखा मित्र हवा असतो परंतु कर्णासारखे होऊ इच्छित नाही.

तिथले संभाषण ऐकताना माझे मन भरून आलं आता हुंदका नाही आवरू शकलो तर...

ही तर एकच सत्य घटना आशा कितीतरी, खूप कुटुंब उध्वस्त झालीत. लवकरात लवकर संपलं पाहिजे हे सर्व.

माणसातला देव दिसला,त्याला मनोमन साष्टांग दंडवत घालत, "आपला मित्र ह्या संकटातून लवकर बरा होऊन बाहेर येवो व हे दुःख पेलण्याची इश्वर त्यांना शक्ती देवो ", हीच प्रार्थना करत माझं उदास अधिकच विषण्ण होत तिथून बाहेर पडले

ढुढंता नही मै किसी
खुदा या भगवान को
किसी मंदिर, मस्जिद गुरूद्वारे मे।
पता चला है मुझे
आजकल रहते है वो सभी
अस्पताल और शमशानो में।
११-५-२०२१

कथाअनुभव

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

13 May 2021 - 3:19 pm | तुषार काळभोर

पण हे ही दिवस जातील.
जेव्हा रात्रीचा अंधार खूप गडद होतो, तेव्हा उषःकाल जवळ आलेला असतो, या आशेवर लढायचे.

बंट्या's picture

13 May 2021 - 7:30 pm | बंट्या

आज ह गेला ..काल तो गेला ,आयुष्यात असे दिवस येतिल वाटले नव्हते