दक्षिणवार्ता - मे २०२१ - भाग १

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
2 May 2021 - 11:46 am
गाभा: 

दक्षिण भारत हा आम्हा मराठी लोकांसाठी तिकडच्या भाषा वेगळ्या असल्याने तसा कमी परिचयाचा प्रांत. तरीही ज्यांच्यासाठी हा अौत्सुक्याचा विषय आहे त्यांच्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू , केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण ही राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील घडामोडींसंबंधी माहिती देणारा दक्षिणवार्ता हे वाहते पान आजपासून सुरु करत आहे. आपणही ही पाच राज्ये नि एक केंद्रशासित प्रदेश इथल्या घडामोडींबद्दल अवगत करुन या प्रवाहास यथाशक्ती हातभार लावीत जावे ही विनंती. _/\_
-----------------------------------------------------
आज तमिळनाडू , केरळ या राज्यातील विधानसभांचे निकाल आहेत. ते थोड्या वेळात येतीलच. पुदुच्चेरीतल्या मतांची मोजणी आज होते आहे. तमिळनाडूत DMK आणि AIDMK दोघांच्यात फार कमी तफावत आहे.कमलाहासन बहुतेक जिंकतील.केरळमधे नेहमीप्रमाणे काँग्रेस जिंकेलंसं वाटतंय.

तमिळ अभिनेते सुपरस्टार आणि स्पोर्टसकारचे संग्राहक अजितकुमार यांचा काल वाढदिवस झाला. त्यांना शुभेच्छा.

बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एका तरुणीची नोकरीच्या निमित्याने फसवणूक करुन अश्लील व्यवहार केल्याचा आरोप होतो आहे.त्याबद्दलची ही बातमी

https://www.youtube.com/watch?v=xnLftWcCMDA&t=12

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 May 2021 - 12:46 pm | कंजूस

आणखी चार कडबोळी सरकारं आली तर काय होणार?

उपयोजक's picture

2 May 2021 - 12:52 pm | उपयोजक

तमिळनाडूत हिंदूद्वेष्टे द्रमुक आणि काँग्रेस ची युती येईल. जयललिता वारल्याने अण्णा द्रमुकचा घाम निघाला.

उपयोजक's picture

2 May 2021 - 12:49 pm | उपयोजक

महानगरपालिका स्थापनेला ५० वर्षे पूर्ण.
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/cities/Madurai/madura...

केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे भाकीत करणारे तुम्ही एकटेच.

उपयोजक's picture

2 May 2021 - 8:18 pm | उपयोजक

कम्युनिस्ट लिहायचं होतं. माय मिष्टेक :(

सुरिया's picture

2 May 2021 - 11:26 pm | सुरिया

बोम्मारिलू आणि रंग दे बसंतीचा अभिनेता म्हणून ओळख असलेल्या सिद्धार्थला भाजपाकडून ५०० च्या वर खून, रेप च्या धमक्या. एका भाजपा सदस्याने त्याचा नंबर लीक केला. धमक्या देणारे सर्व नंबर त्यांच्या डीपीसहीत रेकॉर्ड करुन पोलीसांकडे देत असल्याची माहिती त्याने दिली.

उपयोजक's picture

3 May 2021 - 2:27 pm | उपयोजक

कर्नाटक : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजनअभावी 24 जणांचा मृत्यू; येडियुरप्पांनी बोलावली बैठक

द्रमुकच्या विजयानंतर द्रमुक पुरस्कृत गुंडांनी जयललितांच्या नावाने गरीबांसाठी सुरु केलेल्या अम्मा उनवुक (अम्मा कँटीन) ची जागोजाग नासधूस सुरु केली आहे.
https://youtu.be/9EURnwIZbG8

असेंब्लीतूनही जयललितांचा फोटो हटवला.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 May 2021 - 10:19 am | अनिरुद्ध.वैद्य

बंगालपासुन इन्स्पायरेशन घेतलं वाटते!

उपयोजक's picture

5 May 2021 - 8:04 pm | उपयोजक

इळय्याराजांचे सुपुत्र युवन संकर राजा उर्फ अब्दुल खालिक

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/yuva...

इळय्याराजांचे सुपुत्र युवन संकर राजा उर्फ अब्दुल खालिक
हा धर्मांतरीत झाला आहे तर ! पहिल्यांदा काही टोटलच लागली नव्हती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

उपयोजक's picture

5 May 2021 - 10:44 pm | उपयोजक

पण इळय्याराजांना त्याचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता.

श्रीगुरुजी's picture

6 May 2021 - 10:12 pm | श्रीगुरुजी

इळय्याराजांचा गंगैय्यामरन नावाचा एक भाऊ सुद्धा संगीतकार आहे ना?

उपयोजक's picture

6 May 2021 - 10:37 pm | उपयोजक

धाकटा भाऊ गंगै अमरन्

कर्नाटक : कोविड बेडच्या वाटपात सुरु असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आता कर्नाटकातील वातावरण तापले आहे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या वादग्रस्त आणि गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी तेजस्वी सूर्या यानी बंगळुरू महानगरपालिकेने वॉर रूममध्ये नियुक्त केलेल्या 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या प्रकरणी एका महिलेसहीत 8 ते 10 जणांना अटक करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण?

बंगळुरु महानगरपालिकेचे काही अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी आणि काही दलाल कोविड बेडच्या वाटपाचे रॅकेट चालवत होते. यामध्ये रुग्णांना लाच घेऊन कोविड बेड उपलब्ध करुन दिला जात होता. रुग्णालयातील एखादा बेड रिक्त झाल्यानंतर तो ब्लॉक केला जात असे.त्यानंतर गरजू व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याला हा बेड दिला जात असे. एखादा बेड विकला गेला नाही तर तो पुन्हा अनब्लॉक केला जात असे.
तेजस्वी सूर्या यांचा 17 मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर सवाल? भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू महानगरपालिकेच्या वॉररुममध्ये 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या प्रकरणाला ‘धार्मिक रंग’ देण्याचाही प्रयत्न केला आहे. तेजस्वी सूर्या यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे की, हे लोक कोण आहेत, त्यांना कोणी नोकरीवर ठेवले? तुम्ही एखादा मदरसा चालवण्यासाठी लोकांची भरती केली आहे का?, असा सवाल तेजस्वी सूर्या यांनी उपस्थित केला.

पालिका आयुक्त सरफराज नवाज यांनाही आरोपाच्या झळा :

या आरोपाच्या झळा महानगरपालिका आयुक्त सरफराज नवाज यांच्यापर्यंतही पोहचल्यात. माझ्यावर आरोप करून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय यासाठी मला दु:ख होतंय, अशी प्रतिक्रिया नवाज यांनी व्यक्त केली. बेड वाटप प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही. मी सध्या कोविड केअर सेंटर आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामात गुंतलो आहे. बेड वाटपात माझा कोणताही सहभाग नव्हता. मला त्याबद्दल काहीही माहिती नाही, असे सरफराज नवाज यांनी म्हटले. त्यानंतर आपण देखरेख तेजस्वी सूर्या यांनी आपण नवाझ यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच माफीही मागितली.
बीबीएमपी कोविड-19 वॉररुमचे प्रभारी डॉ. रेहान यांच्यासह आठ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. रात्री वॉर रूमवर छापा घालून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयित कोरोना बाधित रुग्णांना 3 बेड देऊन त्यांच्याकडून 1.7 लाख रुपये वसूल करीत असल्याची निश्चित माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणासंबंधी संशयित नेत्रावती (वय 42 व रोहित (वय 32) यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. कोरोना रुग्ण डिस्चार्ज होताच 30 सेकंदात बेड्स ब्लॉक करण्यात येत होते. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण व कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या
रुग्णांच्या नावे बेड्स ब्लॉकिंग करण्यात येत होते. एकाच्या नावावर 10 बेड्स ब्लॉक केल्याचे आढळून आले आहे.
बाधित रुग्णांना मदत देण्याच्या उद्देशाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. त्या सर्व ग्रुपवर नेत्रावती सदस्य होती. ग्रुपवर बेड्स हवा असल्याचा संदेश येताच नेत्रावती त्यांच्याशी संपर्क साधायची. खासगी बेडस मिळतील, परंतु त्यासाठी तातडीने बुक करणे आवश्यक आहे, असे ती सांगायची. बेड्स हातचा जाईल या भीतीपोटी रुग्णांचे नातलग तिच्या खात्यावर पैसे जमा करायचे.

बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब

बेळगाव : बेळगावात मराठी ठसा पुसून कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यात येत आहे. कानडीकरणाचा वरवंटा सीमाभागात अधिकच तीव्र झाला आहे. मराठी बहुभाषिक असणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम भागातील उचगाव परिसरातूनच मराठीला हद्दपार करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू झाला आहे. उचगाव नाक्यावर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतून मजकूर लिहिला असून मराठीला डावलण्यात आले आहे. यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उचगाव ते अतिवाडपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यापैकी काही रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. संबंधित कामाच्या ठेकेदाराने प्रवाशांच्या सोयीसाठी उचगाव नाक्यावर दोन फलक उभारले आहेत. यामध्ये परिसरातील गावांची नावे लिहून अंतर लिहिले आहे. यासाठी केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. या भागात ९९ टक्के मराठी भाषिक आहेत. त्याचबरोबर शेजारच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील प्रवाशांचा सतत प्रवास असतो. त्यांना कन्नड भाषा अवगत नाही. सीमाभागातील मराठी भाषिकांनाही कन्नड भाषेतील फलक वाचता येत नाही. यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे.

स्थानिकांच्या सोयीसाठी स्थानिक भाषेत फलक असणे आवश्यक असतात. यापूर्वी या भागातील सर्व फलक मराठीतूनच होते. मात्र कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यासाठी मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड भाषेबरोबर मराठीतूनही उल्लेख करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे. मराठी भाषिक संतप्त फलकावरुन मराठी भाषेला डावलण्यात आल्याने मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड, इंग्रजीबरोबर मराठीतून माहिती लिहिण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील मराठी भाषिकांतून देण्यात आला आहे.

belgaon

इरसाल's picture

14 May 2021 - 10:22 am | इरसाल

मराठी कानडी वादाचा मुद्दा बाजुला ठेवुन....
सिंह झोपलाय तर माकडाने त्याचे कान ओढले तर सिंहाने पंजा मारला तर (तो काय व्हाटस्पमधला सिंह नाही आजुन कान ओढ माझे सांगायला) काय होईल?
कुणी तरी माकडाने म्हणे अशीच गर्जना केलेली मग सिंह चिडला तर जबाबदार कोण ?
अस झाल तर त्यांच राज्य आहे कानडी कानडवणारच सॉरी कानफटवणारच नं ?

उपयोजक's picture

13 May 2021 - 6:16 pm | उपयोजक

यांनी इझराईलमधे पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मल्याळी महिलेला आदरांजली वाहिल्यावर मल्याळी मुस्लिमांचे पित्त खवळले आहे. हॅशटॅग चालवताहेत.

https://www.facebook.com/oommenchandy.official/photos/a.1015333424947640...

सुखीमाणूस's picture

14 May 2021 - 5:55 am | सुखीमाणूस

मुस्लिम सहिष्णु आहेत असे म्हणणारे आता डोळेझाक करतील.

उपयोजक's picture

16 May 2021 - 4:37 pm | उपयोजक

हैदराबादमधल्या हुसेनसागर तलावात, कोरोनाव्हायरसचं जेनेटिक मटेरियल आढळून आलं आहे. एखाद्याला कोरोनाव्हायरस झाला की त्याचा काही अंश त्या माणसाच्या विष्ठेमध्ये येतो, आणि वर सांगितलं तसं हे सांडपाणी तलावात लीक झालं तर हे मटेरियल तलावाच्या पाण्यातही मिसळतं. हैदराबादमधल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'शी संबंधित २ संस्था गेले ७ महिने यावर अभ्यास करत आहेत, आणि या मटेरियलच्या कमी जास्त होणाऱ्या प्रमाणावरून कोरोनाच्या पुढच्या लाटेचा पत्ता अधिक लवकर लागणं शक्य आहे, असा निष्कर्ष त्यांनी नुकताच काढलेला आहे. ही पद्धत वापरणं हे एका फटक्यात शहरातल्या जवळपास सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यासारखं आहे, आणि हे दर थोड्या थोड्या दिवसांनी परत परत करणंही शक्य आहे!

फेबुवरुन साभार

उपयोजक's picture

16 May 2021 - 4:41 pm | उपयोजक

प. बंगालमधे भाजप कार्यकर्त्यांवर होणार्‍या हल्ल्यांबद्दल काही का दाखवत नाही असा प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीला उद्धटपणे उत्तर देणार्‍या एशिया नेट या केरळमधील प्रमुख वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना राज्य भाजपच्या कोणत्याही प्रेस मीटला न बोलवण्याचा निर्णय केरळ भाजपने घेतला आहे. या निर्णयाविरोधात केरळ टिव्ही वृत्तवाहिन्यांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

उपयोजक's picture

16 May 2021 - 4:44 pm | उपयोजक

या जातीप्रथेवर टीका करणार्‍या तमिळ सिनेमाचा सध्या चांगलाच बोलबाला होतो आहे. अॅमॅझोन प्राईमवर उपलब्ध आहे.