५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
2 May 2021 - 9:02 am
गाभा: 

आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

3 May 2021 - 8:42 pm | चौकटराजा

पवार आदिना जेंव्हा असा अन्दाज आला की काँग्रेसची दिवसेंदिवस पिछेहाट होते आहे त्यामुळे केन्द्रात तरी मिलीजुली सरकारे स्थापन होण्याचा काळ सुरू होत आहे ! अशावेळी चोर जसे लुटलेली संपत्ती वाटून घेतात तसे सत्तेची वाटणी ही करता येईल या फार्म्युल्याचा उपयोग राज ठाकरे ,रामदास आठवले पासून सर्व करू पाहात आहेत ! सबब सेना- मनसे ,आठवले-आंबेडकर , दि एम के ,एएआयडीएमके ,काँग्रेस -टीएमसी हे एकत्र येत नाहीत येणारही नाहीत ! या सर्वांचा अंदाज मोदी यांनी चुकविला .मोदींचा प्रभाव कमी होत असला तरी आता भाजपाने देशात पकके पाय रोवले आहेत . एकमेव आमदार रामभाऊ म्हाळगी ते १०५ आमदार अशी भाजपाची प्रगती महाराष्ट्रात झाली आहे जिथे कमालीचा ब्राहमण द्वेष होत आलेला आहे !त्या अर्थाने भाजपा सर्वसमावेशक झाला आहे गुंडगिरी सह !

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 10:06 pm | श्रीगुरुजी

पवार १९९८ मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेता होते. १९९९ मध्ये वाजपेयी सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर, आपण विरोधी पक्षनेता असल्याने आपल्याच नेतृत्वाखाली पर्यायी सरकार स्थापन होईल असे त्यांना वाटत होते. परंतु सरकार स्थापनेसाठी नेता म्हणून सोनिया गांधी राष्ट्रपतींंकडे गेल्या व 'वी हॅव थू सेवंती थू' असा प्रसिद्ध दावा त्यांनी केला होता. जेव्हा भविष्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल तेव्हा सोनियाच पंतप्रधान होतील व आफली एखाद्या मंत्रीपदावर बोळवण होईल हे पवारांच्या लक्षात आल्याने संतापून ते बाहेर पडले होते.

विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री/पंतप्रधान वेगळ्या व्यक्ती असण्याची कॉंग्रेसची परंपरा आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, परंतु विरोधात बसल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेता होते. परत सत्ता मिळाली असती तर विखे पाटील मुख्यमंत्री न होता पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले असते. हिमालय प्रदेशात सत्ता मिळाली की वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होतात, परंतु विरोधात असताना विद्या स्टोक्स विरोधी पक्षनेता असायच्या. ही कॉंग्रेसी परंपरा पवार कसे विसरले याची कल्पना नाही.

तात्पर्य - पवार कॉंग्रेस सोडण्यामागे फक्त स्वार्थ होता.

ममता सुरूवातीपासून डाव्यांच्या विरोधात होत्या. १९८४ मध्ये डाव्यांविरोधात त्यांनी काढलेल्या एका मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्याने ११ कॉंग्रेस कार्यै मरण पावले होते. त्यामुळे ममतांचा संताप पराकोटीला पोहोचला होता. त्यांनी डाव्यांना सत्तेतून घालविण्याचा पण केला होता. या ११ कार्यकर्त्यांचा स्मृतिदिन ममता अजूनही पाळतात.

१९८७ मध्ये वि. प्र. सिंह कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधींनी डाव्यांशी जमवून घ्यायला सुरूवात केली होती. त्यांनी ज्योती बसूंना पाठिंब्याची विनंती केली होती. नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते. १९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये इंंद्रजित गुप्ता व चतुरानन मिश्रा हे भाकपचे मंत्री होते व या सरकारला डावे व कॉंग्रेसचा पाठिंबा होता.

डावे व कॉंग्रेसचे एकमेकांना होणारे सहकार्य ममतांना मान्य नव्हते. परीणामी त्या कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या.

तात्पर्य - ममता कॉंग्रेस सोडण्यामागे निव्वळ स्वार्थ नव्हता.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 10:18 pm | चंद्रसूर्यकुमार

नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते.

हे कशावरून? उलट १९९१ मध्ये मनमोहनसिंगांनी देश विकायला काढला आहे, ते आय.एम.एफ चे एजंट आहेत वगैरे गोष्टी बोलण्यात डावे आणि समाजवादी सगळ्यात पुढे होते. किंबहुना अयोध्या प्रकरण तापायला लागण्यापूर्वी भाजप तोंडदेखल्या सरकारला विरोध करत असला तरी विशेषतः आर्थिक धोरणांवर भाजपचे नरसिंहराव सरकारला सहकार्य होते. पण डाव्यांचा नरसिंह राव सरकारला विरोध होता.

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 10:49 pm | श्रीगुरुजी

डाव्यांचा आर्थिक सुधारणांना विरोध होता तरी विरोधामुळे त्यांनी नरसिंह राव सरकार तुटेपर्यंत ताणले नव्हते, कारण भाजप त्यांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू होता व राव सरकार पडल्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल हे त्यांना समजत होते.

१९९२ मध्ये कॉंग्रेसच्या शंकर दयाळ शर्मांना त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. १९९२ मधील बाबरी प्रकरण, १९९२ मधील हर्षद मेहता प्रकरण इ. प्रकरणात त्यांनी नरसिंह राव सरकारवर खूप टीका केली होती परंतु त्यांनी सरकार पडून दिले नव्हते. सरकारला धारेवर धरणे परंतु भाजपला फायदा होऊ नये यासाठी सरकार पडू न देणे अशी त्यांची जुलै १९९३ पर्यंत भूमिका होती. शेवटी जुलै १९९३ मध्ये त्यांनी नरसिंह राव सरकार विरूद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. परंतु जनता दल व झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष फोडून नरसिंह रावांनी सरकार वाचविले होते.

साधारणपणे २००४ ते २००८ या काळात त्यांची अशीच भूमिका होती. शेवटी २००८ मध्ये त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर सरकार विरोधात मतदान केले. परंतु समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवून मनमोहन सिंगांनी सरकार वाचविले होते.

चौकटराजा's picture

4 May 2021 - 5:32 am | चौकटराजा

पवारांना काँग्रेस मधून काढले होते ना ...... ? की ते बाहेर पडले ..... ?

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 9:58 am | श्रीगुरुजी

तांत्रिकदृष्ट्या त्यांना काढले होते. परंतु काढले नसते तरी त्यांना व त्यांच्या समर्थकांंना राष्ट्रीय पातळीवर व राज्यातही अडगळीत फेकून दिले असते व त्यामुळे त्यांना समर्थकांना बरोबर घेऊन बाहेर पडावेच लागले असते.

स्वलिखित's picture

3 May 2021 - 7:58 pm | स्वलिखित

परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता.
>>>>> म्हणजे टी एम सी आणि भा ज पा चे होतं तर

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 10:09 pm | श्रीगुरुजी

१९९९ ची लोकसभा निवडणुक सुद्धा भाजप व तृणमूलने एकत्र लढून अनुक्रमे २ व ९ जागा जिंकल्या होत्या.

“निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला हिंसाचार; २४ तासांत ९ जणांचा मृत्यू”

https://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-erupted-in-west-benga...

ये तो होना ही था

गॉडजिला's picture

3 May 2021 - 9:38 pm | गॉडजिला

थोडक्यात दीदी वर्सेस मोदी असा सरळ सामना बंगालमधे झाला आणि कॉंग्रेसने मानच टाकल्याने भाजपा मतांच्या विभाजनाची इतर राज्यात वापरलेली हुकमी किमया साधु शकला नाही आणि ही बाबा दीदींच्या पथ्यावर पडली.

३ वरुन ८०+ झाले म्हणुन खुष व्हायचं की २०० म्हणता म्हणता शंभरीही गाठता आली नाही ही बाब दुख्खः समजायचं याचा निर्णय ग्लास आर्धा भरलेला समजावा की रिकामा याइतकाच कठीण असला तरी लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही.

लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही.
सहमत... लांब रेस चा घोडा ... २०० च्या वर हे जरा भीत भीतच म्हणले असतील... गड आधी आला नाही .. आता कुठे वेसण बसली आहे ...
पण अंधविरोधी आता "दीदी फॉर दिल्ली" वैगरे बर्ळतीलच
बाकी अजूनही बंगाली बाबुंचे काही कळत नाही.... इतर भारतातात एखादा मतदार काँग्रेस -भाजप / आणि स्थानिक असा बदल करेल तर त्यात आश्चर्य नाही .. पण बंगाली बाबू खरंच तिथे कम्युनिस्ट आणि एकदम भाजप अशी कोलांटी कशी मारतो ? दोन टोके

यश राज's picture

3 May 2021 - 9:41 pm | यश राज

दीदींच्या शांतताप्रिय समर्थकांनी जिंकण्याच्या उन्मादात अपेक्षेप्रमाणे हल्ले आणि जाळ पोळ सुरू केली आहे.

त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

www.indiatvnews.com/elections/news-bengal-post-poll-violence-tmc-bjp-mam...

रात्रंदिवस मोदिंच्या नावाने रडणारे इथले महाभाग ज्यांना दिदीचे खूप कौतुक होते ते सोइस्कररीत्या मौन धारण करतील.

कोरोनासाठी मोदींना जबाबदार ठरवणारे आता या tmc च्या उन्मादी समर्थकांच्या नाकावर मास्क आहे का हे चेक करतील का.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 10:11 pm | मुक्त विहारि

असा कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अलिखित नियम आहे ...

निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली आणि सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली आणि हिंदू माणसाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी, अब्दुल सत्तार यांनी दिली, तरी अशावेळी हे पक्ष गप्पच बसतात ....

अगदीच काही वाटले तर, थोडा फार निषेध व्यक्त करतात ....

आजानुकर्ण's picture

3 May 2021 - 10:15 pm | आजानुकर्ण

तुम्ही बातमी वाचली काय. मला ते पान सापडले नाही. की तुम्हाला बातमी न वाचताच त्यामध्ये काय लिहिले आहे ते दिसले?

माझा प्रश्न मुक्तविहारी यांना होता. न उघडणाऱ्या लिंकमध्ये काय लिहिलंय हे त्यांना कसं कळलं?

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 6:36 am | मुक्त विहारि

अनंत करमुसे मारहाण

https://www.dainikprabhat.com/anant-karamuse-assault-case-when-was-jiten...
.....

https://www.esakal.com/mumbai/jitendra-awhad-3-bodyguard-policemen-arres...
------------

निवृत्त नौसैनिकाला मारहाण

https://www.google.com/amp/s/www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/bj...
-----------
अब्दुल सत्तार यांनी दिलेली धमकी
https://m.lokmat.com/politics/shiv-sena-minister-abdul-sattar-video-vira...
--------
थोडं गुगलला विचारलेत तर, ह्या प्रकरणांच्या बाबतीत, बरेच काही मिळेल.....

सुबोध खरे's picture

4 May 2021 - 10:16 am | सुबोध खरे

बंगाल मध्ये फार पूर्वीपासून कम्युनिस्ट सरकारे आणि विचारसरणीचा प्रभाव होता. कम्युनिस्ट विचारसरणी ( रक्तरंजित क्रांती इ इ) सरळ सरळ हिंसाचाराचे समर्थन करते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने सुद्धा कम्युनिस्टांना विरोध करताना हिंसाचाराचा मार्ग सर्रास चोखाळला होता. त्याचीच फळे इथे दिसत आहेत. हीच स्थिती केरळ मध्ये आहे. तेथे भाजप किंवा रा स्व संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या होताना दिसते.

भाजपाला या स्थितीतूनच पुढे जायचे आहे.

याच कम्युनिस्ट विचारसरणी मुळे बंगालमध्ये उद्योगधंद्याची अपरिमित हानी झाली आणि बंगालची आर्थिक स्थिती खालावत गेली इतकी कि १९६० मध्ये डॉ बिधान चंद्र रॉय असताना तिसऱ्या क्रमांकावर असणारे हे राज्य आता १७ व्या स्थानावर पोचले आहे. मा माटी आणि मानुष चा उदो उदो करताना दीदी नि उद्योगांचे उच्चाटन केले आहे. त्यामुळे जर आपले आर्थिक धोरण सुधारले नाही तर ( अमित मित्र सारखा फिक्की चा अध्यक्ष घेऊनही काही फरक झाला नाही) येणार काळ तेथील जनतेला अजूनच वाईट असणारे

आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. पुनावालाला शिवसेनेने धमकी दिल्यानंतर (आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला प्राधान्याने लस मिळावी अशी भूमिका ठेवल्यानंतर) आता सिरम ने आपला पुढचा प्रकल्प गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे ठिकाणी हलवला तर नवल वाटणार नाही. मग हे बोंबलतीलच प्रकल्प पळवला म्हणून. नतद्रष्ट अडाणी आणि झोपडपट्टी सरकार आहे हे.

ती बिचारी गरीब माणसे असतात. मिळाल्या पैशाला जागणारी. त्यानी पैशासाठी फक्त काम केलेले असते.. त्यान्ची झोपडपट्टिमधुन बाहेर पडायची इछ्चा असते.

ही राजकिया माणसे नतद्र्ष्ट आहेत. याना समाधान नसते. कोणत्याही थराला जातात. याना झोपडपट्या टिकायला किवा वाढायला हव्या असतात.

कुठलीही गोष्ट मोफत मिळणे ही जी मानसिकता आहे ती कितपत चांगली आहे? तुम्ही म्हणता तसे लोकही असतील, पण शहरातली prime land गिळंकृत करणे, त्यावर पक्की घरे बनवणे, शासन दुसरीकडे जागा देत असतानाही झोपड्या न सोडणे इत्यादी प्रकारच बहुसंख्येने असतात. गुन्हेगारी जास्त असते. स्वच्छतेचा बोर्या वाजलेला असतो. पक्ष यांना निवडणुकीपूरते वापरतात. शहरांना काही सौंदर्य वगैरे हवे की नको? सतत कुठून तरी लोक शहरात येत राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. जे कर भरतात आणि जागा खरेदी करून रहातात त्या नागरिकांना शहरात झोपडपट्टी नको, गुन्हेगारी नको वगैरे म्हणण्याचा अधिकारच ठेवला गेला नाहीये. तुम्ही आयुष्यभर कष्ट करून फ्लॅट विकत घेणे हे जेव्हा नागरिक करत असतात तेव्हा दुसरे कुणी तरी शहरातली prime land बळकावून रहाणे हेही होत असते. त्या मानसिकतेला दुसरा काय शब्द आहे मला माहित नाही.

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 2:00 pm | श्रीगुरुजी

आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे.

शिवसेना नोव्हेंबर २०१९ पासून अशी आहे का आधीपासूनच अशी आहे? आधीपासूनच असेल तर साधारणपणे केव्हापासून अशी आहे?

पूर्वी पासूनच शिवसेनेची प्रतिमा तशीच आहे. फक्त त्यांचे पहिले सरकार असताना निदान सुशिक्षित लोक तरी त्यांच्याकडे होते. मनोहर जोशी, नवलकर इत्यादी. आता आहेत संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम आणि तत्सम.

संपादित

दिगोचि's picture

4 May 2021 - 9:51 am | दिगोचि

नंदीग्राम मध्ये EVM चा विजय >>> बन्गाल, तामिळनाडु व केरळ मधे भाजपाचा पराभव होऊन सुद्धा अजून काहीजण EVMवर अविश्वास दाखवत आहेत हे वाचून आश्चर्य वाटले.

यश राज's picture

4 May 2021 - 10:09 am | यश राज

नंदीग्राम मध्ये EVM चा विजय

हा प्रतिसाद मीच sarcastically लिहिला होता . ममता बानूच्यां पार्टीचा इतर ठिकाणी दणाणून विजय झाला तो पक्षाच्या मेहनतीने पण नंदीग्राम मध्ये ममता हरली तो केवळ EVM मुळे असे मला म्हणायचे होते.

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 11:16 pm | श्रीगुरुजी

असा नेता असल्यास पक्ष खड्ड्यातच जाणार.

पिनाक's picture

5 May 2021 - 12:06 am | पिनाक

राहुलजींना 100 वर्षांचे आयुष्य लाभो आणि शेवटपर्यंत ते काँग्रेसचे अध्यक्ष राहोत

चौकटराजा's picture

5 May 2021 - 9:22 am | चौकटराजा

या माणसाचा खरंच आय क्यू तपासून पहिला पाहिजे ! पूर्वी असे म्हणत की लतादीदींच्या स्वरयंत्राचा शास्त्रोक्त अभ्यास होणार आहे तसाच राहुल गांधी यांच्या मेंदूचा झाला पाहिजे !

आपल्या परसदारी काय जळतंय ते दिसत नाही कि काय ह्यांना !
आता बहुतेक चिंतनास कांचन बुरी किंवा पताया ला जातील

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची अवस्था Ipl चीयर्स गर्ल्स सारखी झाली आहे.
चौका, छक्का कोणीही मारो, यांना नाचावे लागते.

हस्तर's picture

7 May 2021 - 11:51 pm | हस्तर

निवडणूक आणि निकाल follow केले नाही.
थोडेफार न्यूज माहिती आहे पण जास्त नाही..

तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले..

पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?

आणि ५०% जरी ते असे लोक असतील तर भाजपा ने हि पाठ बडवून घेण्यात अर्थ आहे का?

असो..

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 5:05 am | मुक्त विहारि

आणि म्हणूनच, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची बोंबाबोंब सुरू आहे...

हिंदू हा प्रश्नच नाहीये..

तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..

हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?

सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..

बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..

यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 10:14 am | मुक्त विहारि

मग काहीच बोलण्यात अर्थ नाही .....

राम मंदिराला विरोध करणारी कॉंग्रेस, आमच्या सारख्या हिंदूंना तरी पसंत नाही....

बाय द वे,

तृणमुल कॉंग्रेसने भाजपच्या लोकांवर हल्ला केला, त्याबद्दल आपले मत काय आहे?

हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी केला असेल तर त्यांचा निषेध आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाही झालीच पाहिजे..

माझे मत हे पक्ष बदलून नक्कीच बदलत नाही..
आणि राजकारणी म्हणजे आपले बाप नाहीत कि त्यांचा पाठपुरवठा करायला..

जेल मध्ये टाकून बडवले पाहिजे जे हिंसा पसरावतात, बलात्कार करणार्यांना सोडवतात.. आणि बरेच..

-

बाकी

या देशाचे सगळे जाती धर्मीय भारतीय आहेत.. यात हिंदू मुस्लिम.. ब्राह्मण.. ब्राम्हानेतर.. मराठा -माळी असले जात, पात धर्म उराशी बाळागून त्याप्रमाणे वागणाऱ्यांची मला किव येते..

असो..

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 6:26 pm | मुक्त विहारि

पाकिस्तान आणि बांगलादेश यांची फाळणी का झाली? हे वाचले आहे का?

टिपू सुलतान, हैदर अली, मलिक अंबर, रझाकार याबद्दल काहीही वाचलेले नाही, हे नक्की ....

अगदीच काही नाही जमले तरी कुराण नक्की वाचा.

त्यात काफिरांच्या बाबतीत काय केले पाहिजे? हे सांगीतले आहे.

आणि तेही नाही जमले तर, रोहिंग्या मुसलमानांना देश का सोडावा लागला?

पाकिस्तान आणि बांगलादेश मधले हिंदू अचानक कमी कसे होत आहेत? हे पण वाचा

आसाम मध्ये हिंदू लोकांना काय भोगावे लागत आहे, हे पण वाचा

काश्मिरी पंडितांच्या बद्दल, एका मिपाकराने लिहिले आहे, तो पण लेख जरूर वाचा .....

बरं, आता काय करायचे ? काय सोल्युशन ?

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 6:48 pm | मुक्त विहारि

हिंदू तितका मेळवावा ....

कॉमी's picture

8 May 2021 - 6:51 pm | कॉमी

म्हणजे नक्की काय ?

कॉमी's picture

8 May 2021 - 8:02 pm | कॉमी

बंगाल या धाग्यावर तुम्ही म्हणता कि कुराण वाचलं कि उदारमत वितळून जाते.
उदारमत वितळून गेल्यावर माणसाच्या वर्तनात काय फरक पडतो ?

कॉमी's picture

9 May 2021 - 5:44 pm | कॉमी

सांगा ना प्लिज.
काय करायचे उदारमत वितळल्यावर ?

मुक्त विहारि's picture

9 May 2021 - 6:06 pm | मुक्त विहारि

किंवा

दक्षिण कोरिया ....

ह्या देशांत उदारमतवाद नाही ...

अरेच्चा, सरळ उत्तर द्या की.
मी एक व्यक्ती म्हणून, उदारमतवाद वितळल्यावर काय करायचे ?

जपान आणि उत्तर कोरिया मधले काय करायचे आपण उदारमतवाद वितळल्यावर ?

जग तिकडे कसे हि नाचत असले तरी मानवतावाद हा मी आदर्श मानतो..

एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..

मानवता, समाजिक भावना ह्या माणसाच्या माणुसकीच्या खुणा आहेत..

राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे नेमके ह्या विरुद्ध वागतात.. कारण त्यांना फुट पाडून राज्य करायचे असते..

अरे असेल हिम्मत तर विकास आणि उन्नती वर राज्य करावे मग हिंदू तितुका फलाना न म्हणता.. भारतीय समाज म्हणणे योग्य होईल.. आणि सगळे बरोबर येतील..

आणि काही वाचायची गरज काय?

मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात राहतोय.. आणि त्यांचा इतिहास मला नक्कीच माहिती आहे..

असो..
स्वराज्य आणि सुराज्य ह्या दोन्हीची सांगड फक्त तेथे..

बाकी फोडा आणि राज्य करा हि नीती म्हणजे हिंदू एकत्रिकरण म्हणणे म्हणजे जाती पाती धर्म यांचा अवडंबर मानणे होय..
आणि मग किती हि वाचन करा ह्या भेदाच्या भिंती कधीच मिटत नाही...

मुक्त विहारि's picture

9 May 2021 - 8:30 am | मुक्त विहारि

फाळणीच्या सुमारास, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंचे होते...

असेच विचार, इराण मधील, पारशी लोकांचे होते ...

इतिहासातून कधीच काहीही धडा न घेणे, हे हिंदू लोकांनाच जमते ...

फाळणीला काय झाले, यावरून bjp हिंदू चा आहे म्हणुन त्याला मत द्यायचे?

फाळनीच्या वेळेस माझ्या सारख्या विचार असणाऱ्यांनी इतर धर्मीय लोकांना काही नसेल केले..
पण तुमच्या सारख्या धर्मात बुडालेल्यानी कत्तली केल्या असतील...

आणि अखंड हिंदुस्थान च्या घोषणा तुम्हाला प्रिय आहेत? अखंड हिंदुस्थान म्हणजे फक्त जमीन का त्यावर राहणारी लोक सुद्धा?

अवघड आहे..एक तर जात, धर्म असले माणून तसे वागणे चूक आणि त्यात तुम्ही त्याचा सरळ पाठपुरवठा करून हे वाचले का.. हे माहिती का विचारता..

मग पाकिस्तान मधील धर्माच्या नावा खाली तयार केले जाणारे दहशतवादी आणि तुमच्या विचारात असा काय फरक आहे..?

आणि काय काय वाचायचे पुढचा भाग आहे..
वाचन माणसाच्या विचाराला सुधरवत असते... जर वाचनविचार सुधारवण्या पेक्षा फक्त ते बदलवत असेल तर त्या वाचनाला तरी काय अर्थ आहे?

गॉडजिला's picture

9 May 2021 - 11:42 am | गॉडजिला

गणेशाजी विशीष्ठ लोकांच्या दंगली कोणत्या पक्षाने किती वेळा ठेचल्या याचा विदा तुमच्याकडे आहे का ?

आनन्दा's picture

9 May 2021 - 12:04 pm | आनन्दा

मी पण काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच विचार करत होतो.

माझ्या अनुभवांनी मला बदलले.

माझ्यासारखे अनेक हिंदू असतील जे proactively नव्हे तर reactively भाजपच्या बाजूला मत टाकत आहेत.

असे का बरे झाले असेल नेमके? तुमचे काय मत आहे याबाबत?

गणेशा's picture

10 May 2021 - 8:21 am | गणेशा

आनंदा,
हा रिप्लाय तुम्हाला देतोय पण नंतरचे प्रश्न सर्वांसाठी आहे..

अनुभव तुमचे...विचार तुमचे बदलले.. आणि तुम्ही असे का झाले असेल?
हा प्रश्न मला विचारता आहात..

कोणी bjp ला किंवा काँग्रेस ला वोट दिल्याने तो वाईट किंवा मूर्ख ठरत नाही..
त्याला जे योग्य वाटते ते चांगलेच असेल..तुम्ही मी काही वाईट नाही..

पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते..

मी जर मोदींना मत देत असतो आणि त्यांचा पुरस्कार करत असतो, तर मी जाहीर म्हणालो असतो की हिंदू ना बळ मिळावे म्हणुन मोदींना मी वोट देतो.. बाकी party with differance.., पर्याय नाही.. अच्छे दिन.. देशाची अवस्था हे सगळे मी बघत नाही..

पण मोदी आणि bjp म्हणजे यांव त्यांव पण करायचे.. आणि हिंदू एकीकरण पण म्हणायचे.. अवघड आहे..
जे आहे ते तरी स्पष्टच असावे...

चौकस२१२'s picture

11 May 2021 - 11:30 am | चौकस२१२

पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते..
याला काराणे
- हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे ...
- भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार
- देश हित साठी काह्ही केलं कि ते म्हणजे हिंदुत्ववकडे वाटचाल असा खोटा प्रचार इंदिरा गांधींनी जे देशासाठी ७१ साली केले तसे जर या सरकारने काही केले तर ते मात्र "हिंदुत्वासाठी केलं" असा ढोंगी प्रचार

.. कमालिचा भाजप द्वेष ( भाजपला साथ देणारा सुद्धा म्हणेल कि काँग्रेस सारखा राष्ट्रीय जुना पक्ष अगदीच विरून जाऊ नये ... पण तेच तुम्ही डाव्या आणि काँग्रेसनं विचारआ . त्यांचं मते भाजप अस्तत्वातच असू नये सत्ता तर दूर एवढा कमालीचा द्वेष )

येथे हिंदू आणि मुस्लिम कोणी सुरु केले हे तरी बघा..

माझा सवाल होता ३ चे ७७ झाले चांगली गोष्ट आहे.. पण यात मूळचे भाजपाचे किती..

यात वावगे असे काही नाही..
कोणी तरी लिंक दिली कि ४ जण tmc चे आहेत फक्त..
जर तसे असेल तर चांगले आहे.. भाजप वाढतोय.. तसे नसेल तर त्यांनी हि पाठ थोपटण्यात अर्थ नाही..

--


.हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे

येथे हिंदू. मुस्लिम कोणी सुरु केले?
ह्याचे उत्तर वरती मिळेलच..मुवि हे पहिले होते.. मग काय करणार आता?

२.

भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार

बरोबर, राजकारणी आणि त्यांचे पक्ष हे कोणत्या जातीच्या विरुद्ध आहेत हे पसरवने चुकीचेच आहे.. असे कोणी पसरवत असेल तर त्या पक्षाच्या लोकांनी, त्यांच्या संघटनांनी तशी त्या विरुद्ध न्यायालयात रीतसर कारवाही करावी..

पण त्याच वेळेस त्यांनी आपण कोणत्या तरी धर्मासाठी लढतोय.. वगैरे सुद्धा बोलू नये..

३.

कमालिचा भाजप द्वेष

काँग्रेस मुक्त भारत हा विचार भाजपाच आहे..
या आधी भाजप मुक्त देश कोणी म्हणाले हि नव्हते..

द्वेष हा पक्षा वर नसावा..द्वेष हा त्या त्या वेळी अवलंबलेल्या त्यांच्या नीती वर किंवा कार्यावर असावा..

जे चूक ते चूक.. जे बरोबर ते बरोबर..

--
येथील चर्चा हिंदू मुस्लिम कशी चालू झाली ते आपण पाहणार नाही आणि इतर उदाहरणे दिल्यास त्याचा काय अर्थ आहे?

असो..

https://en.wikipedia.org/wiki/Azad_Maidan_riots
हा २०१२ सालचा इतिहास आहे फार दुरचा नाही.

जगभरात मुस्लीम धार्मिकता धोकादायक ठरते आहे म्हणुन तरी सावध रहायला हवे.
https://en.wikipedia.org/wiki/Bengali_Muslims

आग्या१९९०'s picture

9 May 2021 - 12:15 pm | आग्या१९९०

कोरोनाने लाखो लोक ( सर्व धर्माचे ) मृत्युमुखी पडत आहेत ते केंद्र सरकारला दिसत नाही का? हिंदू हिंदू करून सगळ्यांनाच संकटात टाकलेय ह्या अडाण्यांने .

प्रसाद_१९८२'s picture

9 May 2021 - 2:11 pm | प्रसाद_१९८२

काय संबध आहे या धाग्याशी ?
मुस्लिम धर्मांधता संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरत आहे सध्या.
बंगालमधे हिंदूच्या कत्तली सुरु आहेत व महाराष्ट्रात पोलीसांची धुलाई सुरु आहे दिवसाढवळ्या. या धुलाई करणार्‍यांपैकी एकाला तरी अटक केल्याची बातमी आहे का कोणाकडे ?

संबंध तर मुस्लिम धर्मांधतेचा तरी कुठाय या धाग्याशी ? तरी काढलाच की तुम्ही आणि मुक्त विहारींनी विषय.
धागा आहे- विधानसभा निवडणुकींचा.

निवडणूक झाल्या नंतर, भाजप कार्यकर्त्यांच्या वर झालेले हल्ले हेच दाखवत आहेत....

अजूनही काही दाखले हवे असतील तर, Youtube वर काही व्हिडियो आहेत, ते बघा ....

भाजप म्हणजे हिंदू धर्म आहे की काय ? राजकीय हाणामारी बंगालमध्ये जुनी आहे. आणि TMC पण अर्थात दोषी आहे, शंकाच नाही. त्यांनी ना हिंसा रोखण्याचा प्रयत्न केला ना निषेध केला, आणि तिथेही केंद्रावर दोष मढण्याचा प्रयत्न केला.

पण,

इथे हिंदू धर्मावर हल्ला ही थाप आहे. TMC सुद्धा हिंदू बहुसंख्य पक्ष आहे. TMC मधल्या प्रिस्युमेबली (निदान काही) हिंदू गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. जिथे तिथे धार्मिक ट्विस्ट देणे भाजपाचा USP आहे. काय आधार आहे सांगा तुमच्या म्हणण्याला.

आणि माझा मुद्दा अवांतर बाबत होता.

कॉमी's picture

9 May 2021 - 4:54 pm | कॉमी

पूर्ण सहमत.

मानवतावाद हा मी आदर्श मानतो..
अहो सगळेच मानतात हो ... त्यात काय !
कोणाला हिंदुराष्ट्र कर्यायाचे नाहीये ... भाजप ला मत देणारे पण या गोष्टीतील तयार नाहोये ना कोणाला अफगाणिस्तान पासून बंगाल पर्यंत "अखंड भारत" करण्याचे वेध लागलेत
अनेकांना या "गांधीगिरी " आणि टायपेक्षा हि वाईट म्हणजे "काँग्रेसी फसवेगिरी आणि दाव्याचा "शातिर " पण याचा प्रथम उबग आणि चीड आली आहे
आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ?

जाता जाता
एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार.. आपण म्हणता ते बरोबर
मग हे हि ऐका
बहुतेक मांसाहारी हिंदू हलाल पद्धतीचे खायला नाही म्हणणार नाही .. एक मुस्लिम दाखवा जो झटका पद्धतीचे मास खायला तयार होईल
एकतरी .. पळपुटा उत्तरे नकोत .. जर माझा हिंदू धर्म मुसलमानाच्या हातचे खाल्याने बुडत नाही तर त्याला उलटे का वाटतेय ?
होऊनच जाऊद्या सर्वधर्म समभाव आता प्रश्न "व्ययक्तिक वैगरे काही नाही " रोख ठोक

रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे?

आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ?

जेथून हि चर्चा सुरु झाली त्यात मुक्त विहारी ह्यांनी भाजपात लोक येत आहे हे हिंदू एकीकरण होते आहे असे ते म्हणाले
त्यावर माझ्या प्रतिक्रिया होत्या..

आता मला सांगा.. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय..
तर bjp हिंदू वर राजकारण करते म्हणतात वगैरे प्रश्न तुम्ही मला का विचारताय? मी म्हणालोय का?

दुसरे काँग्रेस ने राष्ट्रवादी ने काय केले.. अहो त्यांनी शेण खाल्ले म्हणुन bjp ने पण खाल्ले पाहिजे का?
हा साधा प्रश्न आहे..

मानवता वाद सगळेच मानतात असे तुम्ही म्हणता.. मग सर्व धर्म जाती मधील लोक मानव नाहीयेत का?

आहेत ना? मग हिंदू एकीकरण.. मुस्लिम धार्जिणे.. दलित पँथर हे काय आहे.. मूर्ख पक्ष आणि मूर्ख जनता..

एका विरोधात बोलले कि तुम्ही दुसऱ्याला समर्थन देणारेच असले समज का?
रोखठोक बोलता येणे आणि ते उग्र भाषेत सोशल मांडणे यात फरक असतोच..

असो...
बाकी हलाल पद्धत चुकीची कि बरोबर हा विषय येथे का? त्यावरून जातीय राजकारण योग्य कि अयोग्य ठरते का?
असे वेगळे मुद्दे मांडल्याने मुळ मुद्द्यात काही बदल होतो का?

आणि सर्वात महत्वाचे..
माझे हिंदू मित्र आहेत, तितकेच जिगरी मुस्लिम मित्र सुद्धा आहेत आणि इतर धर्मीय सुद्धा..
त्यामुळे मी वयक्तिक कुठलीही जात पात धर्म मध्ये आणत नाही..
काँग्रेस चुकीची मानली म्हणुन लाथाडली.. मग bjp पण तेच करत असेल तर फक्त तो आपला धर्म आहे म्हणुन बरोबर म्हणायचे?
आणि याला रोखठोक म्हणायचे?

कसे आहे ना..
मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो..

असो

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 4:45 pm | चौकस२१२

कसे आहे ना..
मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो..

मानवतावादी असल्याचा दावा आपण केला होता .. जणू काही इतर जण पण तसे विचार करत नसतील... भाजपाला पाठिंबा दिला कि लगेच तो माणूस धर्मांध झालाच असे होत नाही हो ...

मला एक कळत नाही, तुम्ही मला का हे सांगताय..

मी म्हणालो आहे का कि bjp ला वोट दिले म्हणजे धर्मांध?

तुम्हाला वरती धर्मावर कोणी कमेंट केली ते हि सांगितले..
त्यांच्याशी मी बोलताना त्यांना मी काय बोललो त्यातील काही वाक्य तुम्ही घेऊन मला प्रतिसाद दिला..

ठीक आहे..

अहो तुम्ही जातीय वादी नाही आणि प्रगतीसाठी bjp ला वोट देताय मान्य आहे..
पण मग मी कुठे म्हंटले आहे bjp ला वोट देणारे सगळे जातीय वादि आहेत..

ज्या माणसाने वरती हिंदू एकीकरण लिहिले त्याला बोलत होतो ना मी?

इतरजण मानवता विरोधात आहे मी म्हणत नाही.. पण जातीय कमेंट bjp म्हणजे आता हिंदू एकीकरण असले बोलणाऱ्याला फक्त तो bjp बद्दल बोलतोय म्हणुन काहीच बोलायचे नाही काय?

तुमचे जे म्हणताय ना.. Bjp ला वोट देणारे सगळे धर्मांध नसतात.. ते माहिती आहे, आणि त्याबद्दल तसे मी कधी म्हणालोय ते सांगा..

तुम्ही इतर कोणी तसे बोलत असेल तर मला का सांगताय?

आणि हेच मी पण म्हणतोय bjp ला वोट न देणारा पण काही लगेच चमचा.. नोकर.. व्यक्तीपूजक.. मुस्लिम धार्जिणा.. भ्रष्टाचार पुरस्कारता असला नसतो..
असे दोन्ही हि बाजूने जो विचार करतो तो महामूर्ख.. नालायक माणुस असेल..

त्यामुळे.. तुम्ही मी काय बोललोय त्यावरच मला बोला किंवा जबाबदार धरा..
नाही तर राहूद्या..

हा घ्या जेथून मी बोलायला लागलो त्या हिंदू जातीय प्रतिसादावरील माझा पहिला प्रतिसाद

यात काय चुकीचे लिहिले आहे, आणि हिंदू हा येथील प्रश्न नाही सरळ बोललो होतो ना?

मग जे हिंदू जातीय लिहितात त्यांना सोडून तुम्ही मला का विचारताय?
मी बोललो का ते..?


मुवि,

हिंदू हा प्रश्नच नाहीये..

तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..

हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?

सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..

बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..

यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..

एक मुस्लिम दाखवा जो हलाल...

मी स्वतः शाकाहारी आहे, पण अनेक मांसाहारी जेवणावळींमध्ये सर्व प्रकारच्या आणि सर्व धर्माच्या मित्रांसोबत कित्येकदा गेलो आहे, आणि तिथे हलाल आणि झटका शब्द उच्चारले गेले नव्हते.

एक मुस्लिम दाखवा जो झटका खाईल हे इतक्या आत्मविश्वासाने म्हणताय यावरून तुमचे मुस्लिम लोकांसोबत जेवण्याचे प्रसंग कमी आले आहेत किंवा तुम्ही आऊटलायर्स बद्दल बोलताय, असा निष्कर्ष निघतो.

आऊटलायर्स बद्दल बोलायचे तर असेही असते- ऑफिस मध्ये कधीही अंडे किंवा मांस डब्यात आणणाऱ्या (कोणत्याही धर्माच्या) व्यक्तीला आपल्या सर्कल मधून शक्य तेव्हडे बाहेर टाकणे. ह्याच्यावरून सर्व शाकाहारी लोकांबद्दल मत प्रदर्शन करणे योग्य आहे काय ? वरील प्रकार खूप वेळा पहिला आहे.

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 3:53 pm | चौकस२१२

मी अनुभवावरून बोलतोय
दुबई, मराठी भाषिक मुस्लिम
ऑस्ट्रेलियात : अफगाणी कामगार मित्र , लेबनीज अनि इरनि , भारतीय हैद्राबादी मुस्लिम
लगेच ते "आऊटलायर्स " वा !
शब्धशा अर्थ घेताय असलतील काही मुस्लिम ज्यांना फरक पडत नसेल किंवा बाहेर काही पर्याय नसेल .. पण जगभर " हलाल इकॉनॉमी आणि त्याचा इतरांवर दबाव " यावर पहा आणि मग विचार करा बहुसंख्यान्का "हालचालच " लागते .. तेवढे संकुचित हिंदू मांसाहारी नसतात, किंवा आपल्यास्तही लागेचच तो "धार्मिक प्रश्न सहसा होत नाही " एवढेच माझे म्हणणे होते एक उदाहरण आपण हिंदूंवर एवढा धार्मिक पगडा नसतो ... आपण सहिष्णू आहोत याचे अजून काय उदाहरण द्यायचे ?
येथे शाकाहारी मांसाहारी याचा काही संबंध नाही २ मांसाहारी लोकांबद्दलच चाललंय

वामन देशमुख's picture

12 May 2021 - 11:25 am | वामन देशमुख

एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..

ग वि बेहरेंच्या सोबत या साप्ताहिकात, "Hindus are most gullible people" अशा अर्थाचे लिखाण कुणीतरी करायचे त्याचा प्रत्यय हे शहामृगी वाक्य वाचून आला.

तथापि, सत्य परिस्थिती अनेक वेळा वेगळीच असते - श्रीलंकेतील एका शांतीप्रिय डॉक्टराचे प्रकरण माहित असेलच. शांतीप्रिय नसलेल्या सुमारे चार हजार स्त्रियांना वंध्य करण्याचा तो प्रकार होता.

या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय?
त्या डॉ ला अटक झाली..मग न्यायालयाने पुर्ण जातीला नष्ट केले पाहिजे असे म्हंटले आहे का?

आणि तसे करणे आणि मानणे योग्य आहे का?

उद्या एखादा हिंदू गुन्हेगार असेल तर समस्त हिंदू.. तुम्ही आणि आम्ही गुन्हेगार असता का?

आणि तुम्ही जे वाक्य ठळक केले आहे ना,
ते म्हणजे मला म्हणायचे आहे, माणुस कर्तव्य पार पाडताना जात पात बघत नाही.. आणि राजकारण करताना असे फुट का?

असो..
७७ मध्ये किती मुळ भाजपा चे लोक आहेत ह्या साध्या प्रश्ना नंतर इतके ऊत्तरे देत बसावे लागतेय..
पार हिंदू.. मुस्लिम.. कुराण फलाना.. म्हणजे येथिल लोक भाजपा विरोधात बोलले तर कसे स्वैर बोलून मुद्दा भरकटावतात हे नविन नाही..

असो..

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 5:51 pm | चौकस२१२

या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय?
आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो
आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो
१) असे सरसकट सगळ्या धर्माला १०० % दोषी ठरवायचे नसते एवढे मला वाटते सगळ्यांनाच कळते ... ( परत तुम्ही जातीला असे का म्हनता कोण जाणे ?मुस्लिम / ख्रिस्ती = धर्म , क्षत्रिय = जात ... असो ) लोक जेव्हा उदाहरण देतात तेव्हा पॅटर्न दाखवणे ( कल दाखवणे ) हा असतो ते समजून घ्या जरा

२) "सर्व मुस्लिम काही आतंकवादी नाहीत पण संख्येने बघितले तर आतंकवाद्यात मुस्लिम खूप आहेत " हे आपण वाचले असेल
३) जगातील अनेक धार्मिक भांडणे घ्या .. त्यात साधी संख्या मोजा, कि हिंदूंची किंवा बौद्ध किंवा शीख लोकांची अशी किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत आणि त्याच्या तुलनेने मुस्लिम धर्मियांची किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत ... ?

साधे उदाहरण घ्या
- ख्रिस्ती ब्रिटिशांनी हिंदू आणि इतर भारतीयांवर जुलुमी राज्य केले म्हणून आजमितीला किती हिंदू आणि किती शीख आज जगभर ब्रिटनच्या किंवा जगातील एकूणच क्रिस्टी लोकांची कत्तल करीत सुटलेत ?
- जपानी ( बुद्ध / शिन्तो) लोकांचे अमेरिकेशी ( ख्रिस्ती ) एवढे भांडण झाले आज किती जपानी लोक अमेरिकेत जाऊन ९/११ करतात ?
- आता हाच तर्क मुस्लिमांचे इतर सेकुलर देशातील वागणे / भांडणे आणि सतत चा जिहाद याची संख्या बघा ...
"मजहब नही सिखाता आपस में बैर रखना" ... हे अगदी नागपूरच्या हेड क्वार्टर ला पण हे माहित आहे .. पण सतत " हमारा मजहब खतरे मी है " हि आरोळी ऐकण्याचा आणि त्याचा पाठपुरावा ऐकण्याचा अगदी कंटाळा आला आहे आणि खास करून डोळे झाकलेल्या हिंदूंकडून !

बर हे काही फक्त बहुधर्मीय भारतातातच नाही तर इतर बहू धर्मीय आणि बहू वर्णीय देशात पहिले आहे ... उगाचच कोणाला शेंड्या लावताय ...
"जेथे जातो तेथे तू माझा संगती" या वाक्यप्रमाणे "प्रेमळ धर्माच्या " लोकाची संख्या जमली कि ... आधी हलाल + देश आधी कि धर्म आधी असे विचारले कि एक तर गुळमुळीत उत्तर नाही तर धर्मच हे उत्तर ( मग लेको बहुधार्मिक देशात जाता कशाला राह्यला ??? सौदी आणि मलेशियात आहेत चांगले जीवन ... बोटी भरून का येता "ख्रिस्ती बहुधार्मिक ऑस्ट्रेल्यात " जिथे एक देश एक कायदा आहे ... मग त्यात ख्रिस्ती धर्माचा पगडा असला तरी माझ्या सारख्या अल्पसकनख्यांक हिंदूला फार त्रास वाटत नाही .. कारण माझ्यसाठी देश आधी मग धर्म ...

माफ करा कोणाला हा प्रतिसाद विखारी वाटला तरी चालेले किंवा त्यामुळे कोणी मला मिपावरून उडवणार असले तरी चालेल... कंटाळा आलाय या बोटचेप्या गांधीगिरी, गोल गोल जिलंबाय पडणाऱ्यांचा...
एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...

वामन देशमुख's picture

12 May 2021 - 7:53 pm | वामन देशमुख

एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...

पवित्र पुस्तकाचा सारांश!

इरसाल's picture

12 May 2021 - 9:46 pm | इरसाल

एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...

मिपावरचा "त्यांच्या" बाजुने लिहीलेला प्रतिसाद दाखवुन स्वतःला वाचवता येईल काय?

कॉमी's picture

12 May 2021 - 2:55 pm | कॉमी

वरील बातमी ज्या वृत्तपत्रात आली आहे, त्यांनी कोणत्याही आधाराशिवाय आरोप केला आहे. पोलीस आणि हॉस्पिटल मधून मिळालेल्या महितीवरून, इतकेच आधार आहेत, कोणते हॉस्पिटल आणि पोलीस सांगितले नाही.

सदर डॉक्टर आणि परिवाराने गुन्हा अमान्य केला आहे. कोर्टाने इसमास बेल दिली आहे.

त्यापुढे, श्रीलंका CID ला कोणताही पुरावा सापडला नाही आणि कोर्टात दिलेल्या रिपोर्ट नुसार CID म्हणते-

"There is no justification for the arrest of Dr. Shafi," the CID concluded in a 210-page report.

विखारी लोकं असल्या बातम्यांनी उत्फुल्लीत होऊन follow up ना घेता तेच तेच उगाळत राहतात.

https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/world-news/doctor-arrested-for...

https://www.google.com/amp/s/mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1T71HS

https://mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1UK2SN

Agra: ANM Niha Khan found not injecting Covid-19 vaccine after inserting needle, FIR to be filed for throwing away loaded syringes

ही शांतीप्रिय महिला कर्मचारी, रुग्णांना कोविडची लस देताना केवळ सुई टोचायची आणि लसीचे औषध तसेच डस्टबिन मध्ये टाकून द्यायची असा आरोप आहे. असे करण्यामागची प्रेरणा भारतभूमीवर शांतता पसरवणे हीच आहे नाही का?

अर्थात, भारतीय प्रजासत्ताकात, प्रत्येकाला स्वतःची प्रार्थनापद्धती (religion) पाळण्याचे स्वातंत्र्य आहे!

उत्तरदायित्वास नकार लागू.

गॉडजिला's picture

31 May 2021 - 2:08 pm | गॉडजिला

कठोरात कठोर शिक्षा झालिच पाहिजे

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 6:35 pm | मुक्त विहारि

मी सत्यनारायण कधी वाचला नाही..
तेथे कुराण वाचला का किंवा वाच हा काय प्रश्न किंवा सल्ला आहे?

आणि न वाचता हि मी सांगतो..
बायबल, कुराण, गीता.. कुठलेही ग्रंथ असुद्या माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ मानला असणार..आणि जर त्या ग्रंथाचे माणुस आणि माणुसकी हा गाभा नसेल तर धर्म आणि जात इतकेच त्याचे मुळ असेल तर असल्या सर्व ग्रंथाना वाचण्यात वेळ घालावण्यात काय अर्थ आहे?

असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत..

वाईट माणसे हि माणुसकी ला काळिमा असतात.. मग ती कुठल्याही जाती धर्माची असुद्या..

मुळ मुद्दा..
एक सहज प्रश्न विचारला होता..७७ मध्ये मुळ भाजपाई किती..
त्यावरून पार इतके अवांतर.. अवघड आहे..

गॉडजिला's picture

11 May 2021 - 11:06 am | गॉडजिला

असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत..
तुमच्याबाबत विषयच नाही चिंतेचा... प्रश्न हा आहे जे असे ग्रंथ वाचतात व भेदाच्या भिंती मनात, देशात, समाजात उभ्या करतात मग ते कोणतेही धर्मीय असो त्यांना काउंटर करायचा कृतीकार्यक्रम तुमच्याकडे आहे का ? निव्वळ तुम्ही योग्यपणे जगत आहात त्याबद्दल गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे लोक तुमच्या नादाला लागणार नाहीत असा तुमचा समज आहे का ?

गणेशा's picture

11 May 2021 - 11:25 am | गणेशा

Hello,
नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत..
----
समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात..
उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय..

पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते.

मी रस्त्यावर गाडी व्यवस्तिथ चालवत असेल तर रस्त्यावर इतर काही जण व्यवस्थित चालवणार नाही म्हणुन मी माझी स्व रक्षण करण्यास काय करेल हे माझ्या पाशी आहे.. बेल्ट लावणे.. हेल्मेट घालणे वगैरे..
पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक..

गुन्हेगार हा कुठल्या हि जातीचा धर्माचा असु शकतो..

तुमच्या कडे त्याला काउंटर करायचा पर्याय नसेल तर त्याला गुन्हेगार नजरेतून बघणे हा काउंटर आहे का?

गॉडजिला's picture

11 May 2021 - 11:32 am | गॉडजिला

पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते.
असं म्हणता ?
असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय..
मंग आस्स कस्सं करता ? माझे मत काय त्याचा आशय काय याची खात्री तुम्हास नाही तरीही तुम्ही....

पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक..
सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?

सुबोध खरे's picture

11 May 2021 - 11:56 am | सुबोध खरे

उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे

तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का?

आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम? अशा विचाराच्या वृत्तींनी लष्करी उत्पादनाच्या कारखान्यात( ऑर्डेनन्स फँक्टरी) मध्ये शस्त्रास्त्रांऐवजी एस्प्रेसो कॉफी मेकर बनवायच्या ऑर्डरी दिल्या आणि चीनच्या युद्धात दयनीय अशी हार झाली हा इतिहास आपण विसरला असाल तर स्वा.सावरकरांचे "सन्यस्त खङग" हे नाटक जरूर वाचून पहा.

बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.

येथे खुप चिंचोळे प्रतिसाद होत आहे म्हणुन उत्तर separate खाली देतोय

तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का?

स्व संरक्षण हवेच.. पण जो अत्याचार करील त्याच्या विरुद्ध..
मग तुम्ही bjp ला वोट देऊन त्याचा बिमोड करणार आहे काय?

मग पुढील शस्त्र धारी हा कुठल्या जातीचा असतो हे तुम्हीच ठरवून त्याच्या पुर्ण जातीला च बदनाम ठरवणार आहे काय?

जो हिंसा भडकवेल तो चूक कि त्याची पुर्ण जात आणि धर्म?

जातीय म्हणुन bjp ला वोट द्यायचे कि प्रगती साठी.. अच्छे दिन म्हणुन?
नक्की काय ते ठरवा..

डॉ. साहेब.. तुमच्या कडे येणारा पेशंट हिंदू आहे का मुस्लिम यावरुन तुम्ही नक्कीच इलाज करत नसताल..
माझे हि तेच म्हणणे आहे पुढील व्यक्ती हा गुन्हेगार आहेच हे आपण फक्त त्याच्या धर्मावरून का ठरवायचे?

आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.

पण आपण शाकाहारी असलो आणि समोरील माणुस मांसाहारी असला तरी समोरील माणुस मला खाणार नाही हे तर नक्की आहे ना?

आपण माणसां बद्दल बोलतोय.. जंगली प्राण्याबद्दल नाही..

बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.

मी १००% अहिंसेचा पुरस्कारता नक्कीच नाही..
पण हिंसा हा एकच पर्याय प्रत्येक वेळेस आपल्याकडे आहे काय?
अराजका विरुद्ध.. गुन्हेगारा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. वेळ प्रसंगी त्याच्या शी दोन हात केले पाहिजे..

पण समोरचा गुन्हेगारच आहे हे फक्त त्याच्या जाती धर्मा वरून ठरवायचे.. आणि त्या साठी bjp ला हिंदू एकीकरण करतायेत म्हणत पाठपुरवठा करायचा हे मला चूक वाटते..

Bjp अजून ७० वर्षे राज्य करो.. मला आनंद आहे..

पण हिंदू मुस्लिम.. वगैरे मुद्द्यासाठी नाहि तर प्रगती आणि उन्नती साठी त्यांनी झटले पाहिजे आणि समर्थकांनी त्या साठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे...
आणि ते जर तसे करत नसतील तर असल्या लोकशाही म्हणजे तुमच्या माणुसकीची बोळवन करण्यास जन्माला आल्या आहेत काय?

स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम

अहिंसक विचार असणाऱ्यांचे हे मत असते असे तुम्ही सरसकट कसे म्हणू शकता?
मला लष्कर महत्वाचे वाटते.. तुम्ही चुकीच्या गोष्टीत सरसकट लोकांना का तोलता?

आणि सिंह, किंवा लष्कर असे मुद्दे भाषेचे सामर्थ्य वापरवून मुळ मुद्दे divert का करता?
शक्यतो कोणी म्हणत नाही कि सिंह मला खाणार नाही.. किंवा लष्कर गरजेचे नाही..हे मुद्देच नाहीयेत

सुबोध खरे's picture

12 May 2021 - 9:57 am | सुबोध खरे

मुसलमान व्यक्ती आणि गट यांच्या वागण्यात फार मोठा फरक आहे.

जगभरात जेथे जेथे मुसलमान बहुसंख्य झाले आहेत तेथे फुटीरता वाद धर्मांधता वाढीस लागते हा जगभरचा गेल्या १५ शतकांचा इतिहास आहे.

हिंदू मुळात सहिष्णू आहेत याचा कायम गैरफायदा घेतला गेला आहे.

भाजपला मी सरसकट पाठिंबा देत नाही पण ७० वर्षे काँग्रेसने मुसलमानांचा एक व्होट बँक म्हणून वापर केला आणि शाहबानो प्रकरणात आम्ही संख्याबळावर भारताची घटना बदलून घेऊ शकतो हा एक दंभ आणि फाजील आत्मविश्वास तयार झाला होता त्याला विरोध म्हणून राम जन्मभूमी आंदोलन सारख्या गोष्टींना पाठिंबा मिळत गेला.

आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.

हा कायदा किंवा तीन तलाक वर बंदी सरसकट कुटुंब नियोजनाचा कायदा का अस्तित्वात येऊ शकला नाही याचा मूलगामी अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी ही व्होट बँक आहे.

जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो.

बाकी भाजप किंवा मोदी हेच १०० टक्के बरोबर असे माझे अजिबात मत नाही. परंतु सद्यस्थितीत सर्वात चांगला आणि निर्णयक्षमता असणारा पक्ष म्हणजे भाजपच आहे आणि सध्या तरी त्याला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे.

समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा

आपले गुळगुळीत युक्तिवाद चालू द्या

आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.

( माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच). अंतिम सत्य इ काथ्याकुटात मला अजिबात रस नाही

शाम भागवत's picture

12 May 2021 - 10:30 am | शाम भागवत

प्रतिसाद आवडला.

मोहन's picture

12 May 2021 - 10:41 am | मोहन

+१००

प्रदीप's picture

12 May 2021 - 10:49 am | प्रदीप

नेहमीप्रमाणेच डॉ. खरे एकदम 'बँग ऑन स्पॉट' आहेत.

यश राज's picture

12 May 2021 - 10:55 am | यश राज

प्रतिसाद पटला.

वामन देशमुख's picture

12 May 2021 - 11:03 am | वामन देशमुख

पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

प्रसाद_१९८२'s picture

12 May 2021 - 11:04 am | प्रसाद_१९८२

सडेतोड प्रतिसाद आवडला.

सॅगी's picture

12 May 2021 - 11:21 am | सॅगी

हा स्ट्रेट ड्राईव्ह आवडला आहे.

गणेशा's picture

12 May 2021 - 1:16 pm | गणेशा

उत्तर separate प्रतिसादात देतो, येथे खुप निमूळते झाले आहे

गणेशा's picture

12 May 2021 - 1:38 pm | गणेशा

@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय )
-----

आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.

आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही..
सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि..

घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही..
पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे..
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता..
मग निवडून आल्यावर काय केले..
बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय?

मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही?
का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का?

अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना..
आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे..

उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो..
काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही..

असो..

आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.

तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..

माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)

प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो..
तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल...

एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..
आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले...

तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून..
असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो..
तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या..

पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही..

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

खाली हा प्रतिसाद पुन्हा दिलाय

शाम भागवत's picture

12 May 2021 - 2:30 pm | शाम भागवत

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.

मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण;
३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते.
पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये.
तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय.
सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय.

थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय.
समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत
तर
भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्‍या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 6:02 pm | चौकस२१२

समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा
आपले गुळगुळीत युक्तिवाद...

सडे तोड ,शतप्रतिसद सहमत
.. डॉक्टर तुम्हाला एक ग्लास फुल्ल सोलकढी आणि मिसळ प्लेट लागू आपल्या कडून - कारण भाजपचं आयटी सेल च्या पगारात तेवढेच परवडणार आपल्याला !!!)
एकवेळ वारीस पठाण परवडला पण हे गुळगुळीत आत्मघातकी " गांधीगिरी " वाले नकोत ... एवढेच बोलतो आणि माझे शब्द थांबवतो...
लै कावायला होत बघा ...

गॉडजिला's picture

11 May 2021 - 11:59 am | गॉडजिला

Hell o, गणेशा तुम रेहना संग हमेशा... कट्टा कधी करायचा ते बोला साहेब
नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत..
आशा करतो हा तुमचा शेवटचा प्रतिसाद नसवा, आणि तुमचे विचार्/कवीता आमास्ने भरभ्रुन वाचायला मिळुदेत...

सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?

याचे उत्तर द्या ना तुम्ही..
अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे?
आणि पूर्णपणे पुढच्यांचा नायनाट कसा करायचा हे बघायचे?
सांगा तुमचा काउंटर काय?

माझे उत्तर एकच आहे..

खातरजमा झाली असेल तर ते सगळे पुरावे न्यायालयात दाखवून कारवाही करावी..खातरजमा व्हायला पुरावे पण हवे ना..
कि पुढून येणारी गाडी मला उडवनारच आहे हे म्हणुन त्याला गुन्हेगार मानणे म्हणजे काउंटर आहे का?

असो

थांबतो.. तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय..
उगाच इतर चर्चा करण्यात अर्थ नाही आणि वेळ हि वाया घालवू नये असे वाटते..

वयक्तिक घेऊ नये

गॉडजिला's picture

11 May 2021 - 12:11 pm | गॉडजिला

याचे उत्तर द्या ना तुम्ही..
अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे?

उत्तर मी का द्यावे स्वतःच शोधा की ही सवय का बरे लागली ? कारण शांतताप्रीय गाडीवाल्यांनी धडका देउनही त्याना साधा जाबही विचारला गेला नाही म्हणूनच ना ? आठवा मुंबै वेठीला धरल्याबद्दल काय कारवाइ झाली ? आता असे म्हणून नका सुमडीत कारवाइ झाली आम्ही ते जाहीर करत नसतो... वगैरे .

थांबतो..
मी कोण आडवणार ?

तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय..
तसे असे तर तुमच्याशी चर्चा का केली असती ? मला तुम्हे चर्चा करणे अपेक्षीत आहे कारण मी शॅलो इंटरेस्टचे गोल गोल राणी प्रकरण करत नाही मला मुलभुत गोश्टींवर नेमकी व कमी श्ब्दात चर्चा करायला आवड्ते

३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी १३ जणांना तिकीट मिळाले.

आणि १३ पैकी फक्त ४ जिंकले.

https://www.businessinsider.in/politics/elections/news/final-tally-of-su...

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 6:13 pm | चौकस२१२

म्हणजे हे म्हणणे बरोअबर होईल का कि ७७ पैकी ४ जणच मूळचे भाजप वाले नाहीत?
तसे असेल तर एकूण ३ वरून ७३ वर गाडी नेली हे हि नसे थोडके आणि ते सुद्धा ३०% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात ... पण हे कोणी कबुल करणार नाही बहुतेक . कारण मग फॅशिष्टांची थोडी तरी जीत झाली असे म्हणल्यासारखेच होईल नाही का?

बंगालात भाजपला 38 टक्के मते मिळाली.

उप्र सारखी चौरंगी निवडणूक झाली असती तर 40 टक्के मते पुरतात 200 सीट मिळवायला..
यावेळेस थेट लढत झाली, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचा फटका बसला असे माझे मत आहे.

मुक्त विहारि's picture

9 May 2021 - 6:07 pm | मुक्त विहारि

उदारमतवादी हिंदूंची मते निर्णायक ठरली ...

महाराष्ट्रात १०५ /१०६ झाले ते पण फोडलेले होते ना ? जाऊ द्या

श्रीगुरुजी's picture

12 May 2021 - 2:21 pm | श्रीगुरुजी

तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?

भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत.

https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-fa...

बंगाल मध्ये हरल्यावर पण सामना मध्ये अग्रलेख नाही आला ? अजब आहे

गणेशा's picture

12 May 2021 - 1:39 pm | गणेशा

@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय )
-----

आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.

आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही..
सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि..

घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही..
पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे..
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता..
मग निवडून आल्यावर काय केले..
बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय?

मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही?
का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का?

अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना..
आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे..

उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो..
काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही..

असो..

आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.

तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..

माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)

प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो..
तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल...

एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..
आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले...

तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून..
असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो..
तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या..

पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही..

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

गॉडजिला's picture

12 May 2021 - 2:02 pm | गॉडजिला

तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..

आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात.

तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्‍या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.

कॉमी's picture

12 May 2021 - 2:14 pm | कॉमी

संयत आणि तर्कपूर्ण.
दोनदा बहुमताने निवडून आलेल्या सरकारला विचारण्याऐवजी सोशल मीडियावर "आवेशाने" दुसऱ्यांना मूलमुळीत म्हणून "का आला नाही समान नागरी कायदा?" असे गुरकावणे म्हणजे एकदम विनोदी प्रकार.
ते पण ऍक्टिव्हली कधीही सनाका चा विरोध न केलेल्या, उलटे समर्थनच करणाऱ्या माणसाला !

श्रीगुरुजी's picture

12 May 2021 - 2:22 pm | श्रीगुरुजी

एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..

वर उत्तर दिलंय.

शाम भागवत's picture

12 May 2021 - 2:31 pm | शाम भागवत

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.

मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण;
३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते.
पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये.
तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय.
सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय.

थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय.
समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत
तर
भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्‍या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.

राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.

बरोबर, हे झाले तर भाजप कडून होईल असे मला हि वाटते.. काँग्रेस ला हे जमणार नाही...
(तो जाहीरनामा आठवायचे कारण, तो वाचुन मी त्यावेळी भाजपाला वोट दिलेले होते..)

आणि मला समान नागरी कायदा आवडतो.. तो सर्व लोक समान आहे हि माझी भावना आहे..

त्याचे कोणाला काय फायदा.. वगैरे त्यामागे काही माझी भावना नाही..
माझ्या म्हणण्याने..

ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध
असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत...
कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी..

झाले गेले वाईट होते पण प्लिज माणुस म्हणुन एक राहू असे माझे म्हणणे आहे...

औरंगजेबाने आणि मुघलांनी आक्रमण केले.. अनेक दुष्कर्म केले ते चुकीचेच.. पण म्हणुन आता अजूनही इतर धर्मीय सर्व सरसकट लोकांना जर आपण गुन्हेगार म्हणुन पाहत असेल तर अवघड आहे..

मग आपण कसली समान नागरी कायड्याची पाठराखन करतोय..?
आधी आपल्या मनात समानता आहे काय?

येथे कुठेही मी गुन्हेगार लोकांचे समर्थन करत नाही..

समजा उद्या मुस्लिम गुन्हेगार म्हणुन भारता बाहेर लावले.. किंवा हिटलर नीती वापरून मारून टाकले..
मग पुढे काय?

मग दलित विरुद्ध उच्च जातीय दरी आखून युद्ध करायची आहेत काय?
म्हणजे धर्म झाले कि जाती वर यायचे काय?

आणि याला उत्तर एकच आहे.. सर्व जण माणसे आहेत.. त्यात जातीय आणि धार्मिक फुट नको..

असो
धृवीकरण

ध्रुवीकारण झाले तर हरकत नाही.. पण काय चांगले काय वाईट यावर व्हावे.. विचार सारखे नसतात सगळ्यांचे..
पण धर्मा वरून जातीवरून ते होत असेल तर अवघड आहे..

बरं उद्या फक्त समान नागरी कायदा पहिला आणला आणि त्याच वेळेस आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सगळ्यात भारताचे पार कंबरडे मोडणार असेल तर priority wise सगळे नीट करू पाहणाऱ्या बद्दल मत चांगले असणे कधी हि चांगले..
कधी काही गोष्टी करण्यास वेळ लागतो.. ते मी मान्य करतो...

एक समान नागरी कायदा आणू शकले नाहीत म्हणुन अटल जी असो वा मोदी त्यामुळे त्यांचा विरोध नाहीच..
पण ज्या पद्धतीने आता राजकारण चालू आहे, ते वयक्तिक मला चुकीचे वाटते..
अर्थ विभागात तर सपशेल fail आहे bjp..
मग कोणाला या अश्या कारणा साठी काँग्रेस योग्य वाटत असेल तर ह्या साठी तसे माणनारा माणुस म्हणजे लगेच व्यक्तिपूजा.. घराणेशाही माननारा.. आणि हिंदू विरोधी होत नाही..आणि असे ज्याला वाटते तो माणुस महामूर्ख असावा..
पण हे सांगण्यात तासन तास घालावावे लागत आहे, किती वाईट आहे हे..

जातीय ध्रुवीकरण नेहमी वाईटच...

शाम भागवत's picture

12 May 2021 - 3:26 pm | शाम भागवत

सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो.
या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो. कोणत्या प्रकारचे राजकारण करून ते सत्तेत येतात याबद्दल मी जास्त खोलात शिरत नाही कारण त्यातील खर्‍या बाबी सर्वसामान्यांना कधीच कळत नाहीत. जातीभेद नष्ट करणार्‍या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.

शाम भागवत's picture

12 May 2021 - 3:29 pm | शाम भागवत

जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत
जास्तीत जास्त भाग लाभार्थिंपर्यंत

सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो.
या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो.

तुमच्या मताचा आदर आहेच..
प्रत्येकाचे मत आणि विचार सारखे नसतात..
वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..

आता इतरांनी लगेच वाढवू नये कि पर्याय काय आणि काय काय fail आहेत.. ते कसे successfull आहे..
आहेत तर असुद्या.. तुम्ही असेच वोट द्या आणि बहुमताने ते निवडून येऊद्या..

जातीभेद नष्ट करणार्‍या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.

हो.. पण म्हणुन त्याची पाठराखण करणे चूक आहे हेच माझे म्हणणे आहे...
आणि india deserves this only .. कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...

वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..

लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचण्याचे प्रयत्न करण्यासाठी, मोदींचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना भरपूर वेळ देऊन झालेला आहे. त्यामानाने मोदींनी गेल्या पाच वर्षात चांगले प्रयत्न केलेले आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसच्या नंदन निलकेणींना ही असं वाटतं हा हव तर तुम्ही अपवाद समजू शकता. कारण तुमच्याही मतांचा आदर आहे.

कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...

हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.

प्रसाद_१९८२'s picture

12 May 2021 - 4:40 pm | प्रसाद_१९८२

हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.

टोला जबरदस्त आहे.

गणेशा's picture

12 May 2021 - 5:07 pm | गणेशा

कसला टोला?
ते काय म्हणाले आणि मी काय म्हणालो. ते त्यांना आणि मला माहित.
त्यांच्या वयक्तिक मताला माझा आक्षेप नाहीच..

तुमच्या सारखे मध्ये येऊन जे असे आगीत तेल ओतणारे असतात ना म्हणूनच सोशल मिडीया आणि विशेष करून मिपा पार राजकीय धुराळ्यात गुरुफ़ुटून गेले आहे..

मी उत्तर देणे टाळले होते.. कारण त्यांना तसे वाटत होते कि bjp कमी भ्रष्टाचार करते.. असुद्या प्रत्येकाला सारखे वाटत नसतेच..

खाली लिहितोय...

हिंदू हा प्रश्नच नाहीये..

तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..

हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?

सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..

बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..

यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..

हा माझा हे संभाषण चालू झाले तेंव्हाचा पहिला प्रतिसाद..

तरीही विषय हिंदू.. कुराण.. काँग्रेस.. मुस्लिम असले सगळे वाढवून इतके सगळे लिहून भरकटत न्ह्यायाचा आणि शेवटी bjp कसे भ्रस्टाचार मुक्त हे दाखवायचे...

आणि याला शेवटी टोला म्हणायचे?

Bjp भ्रष्टाचार कमी करणारी पार्टी आहे असे म्हणणेच मला चूक वाटते..
उलट आधी काँग्रेस ला शिव्या घालत होतो.. आता ह्यांच्या राजकारणा मुळे आधीचेच जास्त योग्य असे मला वाटते...

असो थांबतो..

कदाचीत नेक्स टाइम आपला फक्त शेअर मार्केटचा धागाच सुसंगत धरण्यात येइल... असो. भेटु कधी तरी मुवी काकांनी योग जमवला कट्याचा तर. तो पर्यंत पुलेशु.

सुबोध खरे's picture

12 May 2021 - 7:50 pm | सुबोध खरे

ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध
असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत...
कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी..

मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे?

आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे?

मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?

Prithviraj Chavan says the Marathas and Muslims have been given reservation without affecting existing reservation for the SCs, STs and OBCs
https://www.livemint.com/Politics/1RomndWQy1wh8iH0dsBMiI/Maharashtra-gov...
Maharashtra to provide 5% quota to Muslims in education: Nawab Malik

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharashtr...

मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे?

माझ्या मते सगळे भारतीय एक आहेत, आणि सर्वांना सारखे नियम असावेत..

जे गरीब आर्थिक दुर्बल असतील मग ते दलित असो, ब्राम्हण असो वा मराठा त्यांच्या शिक्षनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पर्यत्न झाले पाहिजेत..

डॉ. माझी मते ठाम आणि पक्की असतात..
त्यात कोणाचा तिरस्कार नसतो कि कोणाच्या चुकीची पाठराखन नसते...

मुसलमान, हिंदू असे जे तुम्ही बोलत असता, तरीही एक डॉ म्हणुन तुमच्या कडे येणार्या पेशंट मध्ये तुम्ही भेदभाव करत नसताल असे मला वयक्तिक वाटते..

कारण माणुस परखड असला तरी तो वाईटच असतो असे नाही.. असे मला वाटते..

पण तुम्ही नेहमी मला असले प्रश्न करता.. मी केला कधी तुम्हाला, मुसलमान बाई सोनोग्राफीला आली तर तुम्ही काय करता..
कारण मला अजूनही खात्री आहे.. डॉ हे माणसातले देव असतात..
आणि जर तुम्ही कर्म करताना जे भाव मनात ठेवता ते मी येथे समाजात वावारताना ठेवतो..
याला तुम्ही गुळमुळीत म्हणा हरकत नाही.. पण ते आहे तसे...

तशीच माझी मते आहेत,
मला माणुस म्हटल्यावर धर्म जात दिसत नाही..
तसे मी बोललो तर तुम्हाला गूळमुळीत वाटत असेल, पण वयक्तिक रित्या मी तसा नाही..मी जहाल आहे.. अगदी खुप भांडणारा..

उरुळी कांचनला मी गेलो तरी शफिक पण माझ्या गळ्यात हात टाकून बोलतो... आणि राम पण..
त्यात काय एव्हडे..

असो थांबतो..
आता आणखिन नको...

सुबोध खरे's picture

13 May 2021 - 10:09 am | सुबोध खरे

आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे?

मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?

याला आपण उत्तर दिलेले नाही.

आणि

मी सुरुवातीलाच म्हटले आहे कि मुसलमान व्यक्ती आणि गट म्हणून वागणे संपूर्णपणे वेगळे असते.

त्यामुळे मुसलमान व्यक्तीला मी माणूस म्हणूनच वागवतो. माझे रुग्ण, आंबेवाला किंवा ए सी चा मेकॅनिक मुसलमान आहेत यामुळे मला फरक पडत नाही.

हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)

कितीही पुन्हा लिहिणार नाही म्हणालोय तरी लिहावे लागतेय..पण संपवतोय..
कृपया आपण येथे थांबू..निदान हा शेवटचा रिप्लाय असावा आपल्यात येथे अशी माझी request आहे..

हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)

धन्यवाद.. प्लिज वाढवू नका..

पण मी कुठे तुमच्या वयक्तिक निष्ठेवर घसरलोय.. तुम्ही गैरसमज करताय.. उलट मला तुमच्या निष्ठेवर शंका नाही असेच मी म्हणालोय..
जर तुम्हाला तसे वाटले असेल तर मला दाखवून द्या..
तसे असेल तर नैतिकता म्हणुन मी मिपा सदस्य पणाचा त्याग करेल
...

उलट आपले विचार किती हि जुळले नाही तर तुमचा वयक्तिक व्यवसाय आणि डॉ म्हणजे माणसांतले देव असेच मी म्हणालोय..
आणि नक्कीच टाळ्या थाळ्या वाजवून कृतज्ञता दाखवण्या पेक्षा मनातून असे खरे वाटणे मला जास्त योग्य वाटते.
आणि ते तसेच आहे..
उलट मला खात्री आहे तुम्ही निष्ठेने उपचार करत असताल हेच म्हणालोय.

मग तुम्ही जे मला वर पासून परखड जहाल बोलताय वगैरे म्हणताय ते का?
मी कधी कुठल्या हिंसक लोकांचे समर्थन करतोय..हिंसक गट हे मुसलमान असु शकतात, हिंदू असु शकतात आणि कोणीही..

त्यामुळे माणुस म्हणुन समाजात वावरताना मला वयक्तिक सर्व धर्म समभाव पणे इतरांशी वागणे मला समाजा प्रती निष्ठा वाटते .. मग तुम्ही माझ्या वयक्तिक निष्ठेला गुळमुळीत कसे म्हणू शकता..
तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलल्याने निदान हे तरी समजले असेल कि मी काय म्हणतोय..म्हणजे तुम्ही वयक्तिक व्यवसायात भेदभाव करणार नाही पण मी वयक्तिक वागताना तसे करू नये म्हणताना यात असे काय वेगळे आहे कि मी चूक ठरतो?
मी कुठल्याही गटाबद्दल थोडेच बोलतोय...आणि कोणत्या गुन्हेगारांना थोडेच पाठराखण करा म्हणतोय..

दुसरे डॉ म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, आणि शेती हा माझ्या बापाचा व्यवसाय आहे तर त्यावेळेस तुम्ही जे सरसकट बोलता तेही चूकच असते.. तुम्ही जेंव्हा सरसकट बोलता ना त्यावेळेस जे त्यातील चांगले आहेत त्यांना हि तुम्ही त्यांच्या कार्यावर प्रश्नच उपस्तिथ करत असता..
असो तो विषय येथे घेत नाही..

दुसरी गोष्टी क्रिमि्लेअर म्हणजे काय हे मला माहित नाही.. Obc साठी असते असले शाळेत ऐकल्याचे जाणवते.. मला ते माहिती नाही.. नसू शकते माहिती.. एका माणसाला सगळ्या गोष्टीं माहित असाव्यात असे काही नाही.. म्हणुन त्यावर मी बोलू शकलो नाही..

मला मात्र कधी क्रिमी लेअर लावावे लागले नाही त्यामुळे मला माहिती नाही त्याबद्दल

(कृपया यांनंतर काहीही रिप्लाय आला तरी राजकीय या धाग्यावर मी बोलणार नाही..
प्रश्न किंवा वयक्तिक बोललो असे वाटल्यास आणि काही बोलायचे असल्यास ९९८७६७३३३२ वर बोला बिनधास्त.. येथे नाही..)

समाप्त..

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 7:18 pm | चौकस२१२

बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय?
उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो..
आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत... काय च्या काय सेल्फ सर्टिफिकेट देताय तुम्ही
अहो साधे ३७० हटवले तर केवढा गदारोळ घातलात .. धर्म सोडा ,पक्ष सोडा देशाच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने तरी त्यावर तुमच्या सारखया विचारच्या लोकांनी हरकत ना घेता मनमोकळे पनाणे साथ नाही दिली... आणि बोलताय समान नागरी कायद्याचे !
एक एक करीत करत आहेत .. ते अजेंडयावर येण्याची शक्यता आहे
जरा याचा विचार करा दुटप्पी कोण ते एकीकडे समानता म्हणायचे , भाजप एकांगी म्हणून बोलायचे आणि समान नागरी कायदा ६० वर्शे सत्तेत असून सुद्धा त्यादृष्टीटीने काह्ही पावले उचलायची नाहीत आणि पहिली ५-७ वर्षात ते करून का नाही दाखवले म्हणून भाजपच्या नावाने ओरडायचे
६० वर्षे भिजत घोंगडे जे काँग्रेस ने ठवलेय त्याच्यावर किती रोड रोलर चालवावा लागेल/// सगळी फिल्डिंग लावावी लागेल

उद्या आला कायदा तर नुसते भारतातील विरोधी नाही जगभरातील "उम्मा " काय गदारोळ घालेल याची कल्पना आहे का? तेवहा अतिशय काळजी पूर्वक ते पाऊल उचलावे लागणार आहे त्याला फारुख अब्दुल्ला पासून ओवेसी पर्यंत विरोध आणि खोटा प्रचार करतील ( सीए ए च्या वेळी सारखा ) पण त्याहून हि दुखद म्हणजे बारामती पासून बंगाल ची वाघिणी पण गप्प बसून फुसकुल्या सोडतील ...

गणेशा's picture

12 May 2021 - 9:44 pm | गणेशा

जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. - सुबोध खरे.

---=

तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता..
आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात..

आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत.

नाही, असे मी म्हणालोय काय?
तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि

जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे..
आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा...
ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल..

उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मते

सुखीमाणूस's picture

12 May 2021 - 10:42 pm | सुखीमाणूस

१९५१ साली मुस्लिम ९.९ टक्के होते जे २०११ मध्ये १४.२ टक्के झाले आहेत.
आणि अजुन माहिती येथे मिळेल
https://en.wikipedia.org/wiki/Islam_in_India#Population_growth_rate

राजकारणी स्वताचा स्वार्थ साधायला समाजाचे दुरगामी भले कशात आहे हे बघत नाहीत. नुसते सात पिढ्यान्साठी सम्पत्ती जमवतात. पण त्या पुढच्या पिढ्याना सुखाने जगण्यासाठी निकोप समाज व्यवस्था असेल का याचा विचार करत नाहीत. आज आम्ही हिन्दु स्त्रियाना मोकळा श्वास देतो आहोत पण भविष्यात त्या बुरख्यात जायची शक्यता तर निर्माण करत नाही ना? याना परत वैदिक सन्स्क्रुती रुपी पारतन्त्र्य यायची भीती वाटते पण नजिक असलेला धोका दिसत नाही. कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..

चंद्रसूर्यकुमार's picture

12 May 2021 - 11:17 pm | चंद्रसूर्यकुमार

कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..

१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने के.आर.गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जरी जाहीर केले होते. केराच्या (नारळाच्या झाडांच्या) भूमीत के.आर.गौरीअम्मांना राज्य करू द्या असे मल्याळम भाषेत यमक होणारी पक्षाची निवडणुकीसाठी घोषणा होती. निवडणुका डाव्या आघाडीने जिंकल्याही. पण निवडणुक झाल्यावर मात्र गौरीअम्मांना मुख्यमंत्री न करता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यावेळेपर्यंत कधीच नसलेल्या ई.के.नयनार यांना मुख्यमंत्री केले. इतकेच नाही तर १९९४ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आपण नक्की काय चूक केली म्हणून पक्षातून काढले हा प्रश्न त्यांनी विचारला होता.

https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/may/11/kr-gouri-amma...

१९९६ च्या केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये डावी आघाडी जिंकली तरी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्ही.एस.अच्युतानंदन यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर परत एकदा कोणाला मुख्यमंत्री करायचे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हाही सुशीला गोपालन यांना मुख्यमंत्री न करता ई.के. नयनार यांना परत एकदा मुख्यमंत्री केले गेले. ए.के.गोपालन या ज्येष्ठ नेत्याची पत्नी असलेल्या सुशीला गोपालन यांनाही तीच वागणूक मिळाली. मग कोणतीही मुळातली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गौरीअम्मांना वेगळी वागणूक मिळेल ही अपेक्षा करणेही चुकीचेच. वृंदा करात यांना पक्षाच्या सरचिटणिस केले गेले नाही. आणि हेच लोक भाजप-संघात स्त्री कधी सर्वोच्च स्थानावर जाणार हा प्रश्न विचारत असतात. आहे की नाही मज्जा?

अन्यथा ही चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यामुळे मला फार रस राहिला नव्हता पण कम्युनिस्टांचा उल्लेख आला म्हटल्यावर झोडपायला मी आलोच.

परवाच के.आर.गौरीअम्मांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्याविषयी ताज्या घडामोडींच्या धाग्यात लिहायचा विचार करत आहे.

वामन देशमुख's picture

12 May 2021 - 8:01 pm | वामन देशमुख

या धाग्यावरील अनेक प्रतिसादांची लेखनशैली, कल, विचार पाहून, Rajesh_118 यांची आठवण येते आहे.

हे विधान प्रतिसादांमधील मजकूरांबद्धल आहे, लेखकाबद्धल नाही.

प्रचेतस's picture

12 May 2021 - 8:22 pm | प्रचेतस

फक्त विरुद्ध बाजूने ;)

स्वतः फेक विखारी बातम्या टाकायच्या, आणि खंडन झाले की दुर्लक्ष करून उपहासात्मक खवचट टीका करायची.

सुखीमाणूस's picture

12 May 2021 - 9:34 pm | सुखीमाणूस

बाबत कोणालाच कमी लेखायला नको.
सेक्युलर पत्रकारीता ही या सगळ्या फेक प्रकारात सर्वात आघाडिवर आहे..

गणेशा's picture

12 May 2021 - 11:08 pm | गणेशा

फक्त एक प्रश्न विचारला.. तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती.. तर माझा जवळ जवळ खुप वेळ त्यावरील प्रतिसादाला उत्तर देण्यात गेले..कारण त्यावर हिंदू.. Bjp फलाना चालू करण्यात आले..

हिंदू हा शब्द आला तेंव्हाच हा मुद्दा नाहीच आहे असे स्पष्ट लिहिले तरी तेच तेच हिंदू मुस्लिम यावरच चर्चा आणली गेली..

अरे जो माणुस पहिल्यांदा म्हणतोय येथे काय संबंध धर्म आणायचा.. त्यावर शाब्दिक बोलुन.. हे असे न हे तसे..
मग लगेच काँग्रेस आणि फलाना..

अरे काय आहे हे..

तुमच्या विचारां सारखे विचार नसले कि पुढचे काय फक्त काँग्रेसी चमचे किंवा मूर्खच असतात काय?

स्वतः धर्म जात मानायची आणी इतर कोणी सर्व धर्म समभाव म्हणाले कि त्याच्यावर पुर्ण लिहिलेल्या आणि कोणाला तरी उत्तर द्यायला लिहिलेल्या प्रतिसादातुन ४ लाईन्स bold करून हे असेन ते तसे लिहायचे..

मला अत्यंत खेदाने म्हणावे लागतेय..
तुमचेच खरे..
तुमच्याशी बोलण्यात मी माझा वेळ वाया घालवला याचे दुःख होतेय..
बस..

मते वेगळी असावीत.. पण आपलेच ते सत्य आणि आपणच तो काय बरोबर आणि इतर म्हणजे मूर्ख हे साधे येथे १० माणसात तुम्हाला वाटते यातच मी समजुन जायला हवे होते कि अर्थ नाही...

येथे बोलायचे म्हणजे.. मिपा म्हणजे जणू bjp चे मुखपत्र आहे.. ते लगेच तुमच्यावर ह्याव त्यांव हल्ला करणारच..
अरे तुम्ही bjp माना नाही तर काँग्रेस... हिंदू माना नाही तर मुस्लिम..
अरे पण माणुस म्हणुन पुढच्याला मते असतात..तुम्ही माणुस म्हणुन वावरा ना फक्त..

बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो..
मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे..

आणि मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...

चालू द्या..

शाम भागवत's picture

13 May 2021 - 1:24 am | शाम भागवत

वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...

हे मात्र खरे आहे.
कारण २०१४ च्या अगोदर भाजप सगळ्यांचं गुपचुप ऐकून घेत असे.
:)

प्रचेतस's picture

13 May 2021 - 8:23 am | प्रचेतस

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2021 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेशाच्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

13 May 2021 - 9:41 am | कॉमी

एक नंबर.

मिपावरचे काही Bjp समर्थक लैच insecure बुवा. जरा खुट्ट वाजलं कि धावत येतात. टीका करणारा काँग्रेसचा आहे ठरवून टाकतात, आणि स्वतःच्या पक्षावरील टिकेकडे दुर्लक्ष करून whataboutry करतात. सेक्युलर, फुरोगामी वैगेरे शब्द फेकतात, आणि काय आर्ग्युमेन्ट केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटतात.

गोंधळी's picture

13 May 2021 - 10:27 am | गोंधळी

वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...

सहमत.

गॉडजिला's picture

13 May 2021 - 11:07 am | गॉडजिला

तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती..
शुन्य असोत त्याने फरक काय पडतो? उलट मुळ भाजपेयी नसलेले ही तेथे दाखल झाले असतील तर इतर पक्षांच्या प्रमुख नेत्रुत्वावर गाढ शंका आणी भाजपाच्या नेत्रुत्वावर प्रगाढ विश्वास निर्माण होतोय...

मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...

आता पुरातन कार्डच खेळणार असाल तर विषयच मिटला. कारण विधाने करुन त्यामागील स्पश्टीकरण आपण पार लपवत आहात गणेशाजी. २०१४ नंतर पुर्वीचे सदस्य बिघडले की २०१४ नंतरचे सदस्य हे तुम्ही स्पश्टच केलं नाहीयें फक्त मिपा गढुळ झालयं इतकच. क्मॉन तुमच्या सारख्या व्यक्तीने विधाने न्हवे अ‍ॅनॅलसीस दिले पाहिजे.

बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो..
मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे..

मुद्दा राजकीय असेल तर राजकीय धुरळा उडणारच ना हो.

रात्रीचे चांदणे's picture

13 May 2021 - 7:57 am | रात्रीचे चांदणे

.वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
गणेशा, कदाचित तुम्हाला देशातील वातावरण 2014 नंतर गढूळ झालंय आस म्हणायचं असेल. 2014 नंतर भरपूर बदल आपल्या देशात झालेत.
1) 2014 पूर्वी MIM सारख्या धर्मांध पक्षाचा खुलेआम पाठिंबा घेऊन सुद्दा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवता येत होतं
2) 2014 पूर्वी देशाच्या साधनसंपत्ती वरती अल्पसंख्याकाचा ( मुस्लिमांचा) पहिला हक्क आहे असे धर्मांध विधान देशाचा पंतप्रधानाला करता येत असे.
3) 2014 पूर्वी हिंदू दहशतवादाची प्रकरणे नसताना सुध्दा हिंदू दहशतवादी म्हणून हिंदूंना बदनाम करता येत असे त्याच वेळी अतिरेकी शांतताप्रिय समाजाचे असतील तर मात्र दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो असे म्हणायची सोय होती आणि ह्यात आघाडीवर हिंदूच असत.
4) 2014 पूर्वी एखाद्या चकमकित शांतताप्रिय समाजाचे अतिरेकी मेले असतील तर त्यावेळच्या सर्वांत मोठ्या पक्ष्याच्या प्रमुखाला रात्रभर झोप येत नसे आणि महत्वाचे म्हणजे झोप न येण्याची गोष्ट आपल्या समर्थकाकारवी शांतताप्रिय समाजाला काळावलीही जात असे.
5) 2014 पूर्वी सरकारी खर्चातून दर्ग्यावर्ती चादरी चढवल्या जात असत परंतु श्री राम मात्र काल्पनिक आहे अस म्हणणाची सोय होती.
6) 2014 पूर्वी संरक्षण दृष्टीने एखादा मोठा व्यवहार झाला आस माझ्यातरी वाचण्यात नाही आलं, 2014 नंतर मात्र असे भरपूर व्यवहार पूर्ण झाले.

बापूसाहेब's picture

13 May 2021 - 11:51 am | बापूसाहेब

वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...

कितीही समजावलं तरी ही मुळमुळीत लोक सुधारणार नाहित. सर्व धर्म सम भाव या फालतुगिरी च्या मोहजालात हे अडकले आहेत. जेव्हा १९४७ किंवा १९७० सारखा तडाखा यांना व्यक्तिशः बसेल तेव्हाच हे सुधारतील. पण तेव्हा देखिल सुधारायला ते या भूतलावर नसतील.!! कारण ते कोणत्या तरी भाई चा "चारा" बनलेले असतील.
सर्व मुस्लिम लोकांनीं देश सोडून जावे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकावा किंवा त्यांच्यावर आपण हिंसात्मक कारवाई करावी असं माझं म्हणणं नाही पण वेळीच पावले उचलून अखंड भारताचा अजुन एक तुकडा पडण्यापासून भारताला वाचवावे असं वाटते. इतिहासातून धडा घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला १ , २ नव्हे तर ५०-६० वेळेला चुना लावला असेल तर अश्या लोकांशी डील करताना सावध राहावे इतकी देखिल अपेक्षा करणे चूक कसे काय?? २०१४ पर्यंत सेकुलारिजम आणि अल्पसंख्यक अश्या गोंडस नावाखाली एका विशिष्ठ समाजाला नेहमीच झुकते माप देउन व बहुसंख्य समाजाचा नेहमीच अपमान आणि बदनामी करून याआधीच्या सरकारांनी नेमके काय मिळवले??? तर स्वतः च्याच देशात ९ राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यक झाले आणि तसे होऊन सुध्दा इतर अल्पसंख्यक लोकांनां हिंदूंनी दिलेल्या सुविधा ते स्वतः साठी वापरू शकत नाहीत..
एक नाही अश्या शेकडो हजारो गोष्टी आहेत. एक अखलाख मेला तर UN मध्ये जायची भाषा करणारे तूम्ही फुटोगमी लोकं, लाखो हिंदूंची भरदिवसा त्यांच्या घरात हत्या झाली.. त्यांनी आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावे लागले.. त्यांच्यासाठी साधा एक शब्द पण बोलला नाही.. इथेच तूम्ही फुटोगामी लोक उघडे पडलात.. अश्या एक नव्हे.. शेकडो हजारो घटना झाल्यात आणि त्या बोलून दाखवल्या की लगेच वातावरण गढूळ झाले का ??

१०० कोटी लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम यांना काल्पनिक व्यक्ती म्हणणे आणि त्याचवेळी ५-६ वेळेला भोंगा वाजवून अल्लाह हाच एकमेव देव आहे असे सांगणे म्हणजे तुमचे सेकुलारिजम असेल तर खड्ड्यात गेले तुमचे सेकुलारिजम.

पाणी तेव्हाच गढूळ होते जेव्हा पाण्याच्या बुडाशी भरपूर "चिखल" जमा झालेला असतो..
तुम्हाला आज पाणी गढूळ झालेले दिसते पण शेकडो वर्षे जमा होणारा चिखल दिसला नाही का ???

आग्या१९९०'s picture

13 May 2021 - 12:04 pm | आग्या१९९०

भोंग्यावर बंदी आणा ,कोणी रोखलय ? सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना एकच नियम लावा.

बर मग आता काय करायचं ? काही सजेशन्स ?

आग्या१९९०'s picture

13 May 2021 - 12:17 pm | आग्या१९९०

कान असतील तर ऐकतील.

बापूसाहेब's picture

13 May 2021 - 12:43 pm | बापूसाहेब

बर मग आता काय करायचं ? काही सजेशन्स ?

हो आहेत ना.

१) समान नागरी कायदा आणणे.
२) मदरसे , मिशिनारिज ई हिंदूंच्या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक शिक्षण देणारे सर्व दुकाने बंद. !!!
३) सरकारी जमीन बळकावून उभ्या केलेल्या मशिदी जमीनदोस्त करणे.
४) अल्पसंख्यक आयोग, अनुदान, आणि त्यांच्यबरोबर त्यांच्या सर्व सुविधा बंद करणे.
५) मंदिराप्रामाने इतर सर्व प्रार्थनास्थळे सरकारी नियंत्रणात आणणे.
६) पाकिस्तानच्या नागरिकत्व मिळवण्याच्या प्रोसेस चा अभ्यास करून ज्या व्यक्तींना पाकिस्तान मधे जायचे आहे अश्या लोकांना मदत आणि आर्थिक सहाय्य पुरवणे.
७) घटनाबाह्य पद्धतीने घुसवलेले सोशलिस्ट आणि सेकुलर हे दोन्ही शब्द राज्यघटने मधुन काढून टाकने.
८) काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन करणे. त्यांना सरकारी मदत करणे. नोकरी देणे.
९) इतिहासातील हिंदूंच्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणे ( सोमनाथ मंदिर सारखे )
१०) वाफ्फ बोर्ड सारख्या धार्मिक संस्थांना दिलेले अधिकार आणि खैरती प्रमाणे वाटलेल्या जमिनी परत घेणे.
११) सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब घालणं बेकायदेशीर करावे.
१२) आतंकवादी संघटना किंवा आतंकवादी कृत्य करणारे किंवा त्यांना मदत करणारे ( आर्थिक सामाजिक राजकीय कायदेशीर) सर्वांना जन्मठेप किंवा फाशी दोनच शिक्षा असाव्यात.
१३) शिक्षण हक्क कायदा रद्द करावा.
१४) सर्व पर्सनल बोर्ड रद्द
१५) हिंदुव्यातिरिक्त भारतात कोणत्याही धर्मप्रसार कार्यक्रमास बंदी. केल्यास आजन्म कारावास..
१६)
१७)

अजुन बरेच आहेत

आता तुम्ही म्हणणार के हे सर्व शक्य नाही वगैरे वगैरे... पण अजुन ५००-६०० वर्षांनी हिंदू हा शब्द ऐकण्याईतपत जरी जिवंत ठेवायचा असेल तर हे सर्व आज ना उद्या करणे आवश्यक आहे... !!
नाहीतर ज्याप्रकारे पर्शिया चा इराण झाला त्याप्रमाणे भारताचा दुसरा पाकिस्तान होणारं हे नक्की.

बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!

चंद्रसूर्यकुमार's picture

13 May 2021 - 12:46 pm | चंद्रसूर्यकुमार

हे सगळे करायच्या आधी एक अतिशय महत्वाची पायरी आहे

०) डाव्या विचारवंतांचे शिक्षण संस्था, मिडिया इत्यादी ठिकाणचे महत्व पूर्णपणे पुसून टाकणे

कॉमी's picture

13 May 2021 - 1:06 pm | कॉमी

Free market strikes again !

गॉडजिला's picture

13 May 2021 - 1:17 pm | गॉडजिला

डावखुरे लोक इंटलेक्चुअल्स ना बेमालुमपणे गळास लावतात कारण हेच लोक सर्वप्रथम असतात ज्यांच्याकडे शिक्षण, आत्मविश्वास, (चालु)राजकारणाबद्दल चिड, इतिहासातील चुकांबद्दल द्वेश, अंधश्रध्दांबद्दल तिरस्कार या गोष्टी मुबलक प्रमाणात असतात( व अजुन बरीच कारणे ज्यामुळे अस्वस्थता वाटत असते).

आता अशा गोश्टी असुनही जेंव्हा ते चालु स्माजात बदल घडवु शकत नाहीत तेंव्हा ते नैसर्गीकपणेच आतुन क्षुब्ध असतात, तुंबलेले असतात व आतिल भावनांना वाट मोकळी करायचा मार्ग हुडकत असताना अचानक एखादी व्यक्ती/संघटना त्यांच्या उपरोक्त गुणांचे पध्दतशीर कौतुक करुन त्यांना डोक्यावर घेते तेंव्हा हे नैसर्गीकपणेच त्याविचारसरणीकडे आकर्षीत न झाले तरच नवल...

कारण डावखुरेपणा कितीही स्वप्नाळु असला/ भासमान असला तरी ती आधुनीक काळाची देणगी आहे म्हणून हे प्रकरण नया है वो, भुल पाडणारे आहे हे सत्यच, यांना कुठल्या पुस्तकातील देवाचे राज्य पृथ्वीवर पसरावयाचे नसुन यांचा उहापोह सामान्य माणसांच्य प्रश्नाशी जास्त असतो म्हणून कोणालाही त्याचे आकर्षण नेमकं पडु शकतं अ‍ॅज लोंग अ‍ॅज ते नवखे आहेत.... सुशीक्षीत आहेत, सेंटर ऑफ अटेंशन आहेत.

"हिंदू सोडून कुठलाही धर्म भारतात चालणार नाही" हे थेट न म्हणता इतर सगळया प्रयत्नांनी तोच संदेश द्यायचा तर.
बऱ्याचश्या गोष्टी मान्य नाहीत, आणि तीव्र विरोध आहे. यादीतल्या एखाददुसऱ्या गोष्टी कधीच अमान्य नव्हत्या, फक्त प्रयोरिटी वाईज फार फार खाली.
असो, तुमचे मत समजले, आभार.

बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!

अच्छा, असं आहे तर.

बऱ्याचश्या गँमतीशिर बाबी पण वाटल्या. उदा-
सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द असून काय फरक पडतोय ? कायदे आणि इतर संविधान आहेच सेक्युलर. बाबासाहेब तर सेक्युलर हा शब्द पुन्हा घातला तर redundant होईल असे म्हणायचे. पण नुसत्या सेक्युलर शब्द असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो ? संविधानाचे कोअर तत्व आहे सेक्युलॅरिझम. प्रिअम्बल मधून शब्द काढा अथवा घाला, काही फरक पडत नाही.

Secularism was inherent to the Constitution’s structure and he felt that mentioning it in the preamble would be redundant

त्यामुळे फक्त सेक्युलर शब्द काढून तुमच्या २,६,११,१५ या इच्छा पूर्ण होणार नाहीत.

सोशलिस्ट पण तेच. शब्द ठेवा अथवा काढा, हु केअर्स. लोकोपयोगी कामे करत राव्हा म्हणजे बस.

आग्या१९९०'s picture

13 May 2021 - 1:16 pm | आग्या१९९०

१) समान नागरी कायदा आणणे.
बहुमतातील सरकारला लवकरात लवकर का कायदा आणायला भाग पाडा.
आंतरधर्मीय विवाहांना बंदी घालायची की नाही?

शाम भागवत's picture

13 May 2021 - 11:38 am | शाम भागवत

गोंधळ किंवा गदारोळ याबाबत २०१४ च्या ऐवजी मी २०१२ म्हणेन.

२०१२ च्या अगोदर प्रिंड मिडिया व टीव्ही चॅनेल्स यांचे वर्चस्व होते. ते जे दाखवतील किंवा जे काही छापले जाईल त्यावर लोकांवर विश्वास असायचा. मोदींविरूध्द इतकं काही चालू असताना ते बहुमताने कसे काय निवडून येत असत याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे.

२०१० च्या आसपास इन्टरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. मनोगत, मायबोली वगैरे ब्लॉग्स सुरू झालेले होतेच ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. त्या अगोदर हा सगळा प्रकार आयटी मधील श्रीमंत वर्गात प्रचलित होता.

२०१२ च्या अगोदर मला प्रथमच मानुषी या डाव्या विचारवंतीणीचा ब्लॉग वाचायला मिळाला व मी चक्रावून गेलो. मोदी विरोधक ते मोदी प्रशंसक हा त्यांचा प्रवास मला थक्क करणारा वाटला.

प्रिंट मिडिया व चॅनेल्स जे दाखवत नाहीत ते वाचायला मिळायला लागले. पुराव्यानिशी अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या.

२०१४ नंतरचा बदल मात्र जास्त झपाट्याने व्हायला लागला. प्रस्थापीतांनी मांडलेले विचार निमूटपणे मान्य करणे व त्यावर विश्वास ठेवणे ह्या प्रथेला तडे जायला लागले. विरोधी मते मांडली जायला लागली. प्रश्न विचारले जायला लागले. खळबळ उडायला लागली.

जीओ च्या यशानंतर फारच बदलून गेलंय. जगात सर्वात स्वस्त अशी आंतरजालीय जोडणी भारतात उपलब्ध झालीय.
काहींना गोंधळ वाढलाय असं वाटतंय.
काहींना बोलायचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचा आनंद होतोय.
तर काहींना आपण बोलायचे व इतरांनी निमूटपणे मान डोलवायची याची झालेली सवय नडतीय.

थोडक्यात २०१४ नंतर गोधळ किंवा वैचारिक प्रदूषण खूपच वाढले आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती.
आपले मत मांडताना दुसर्‍यांचा अपमान होईल अशी भाषा न वापरणे हा एकमेव मार्ग यावर आहे.
मग मात्र मतभेद राहतील पण इथला वावर सुसह्य असेल.
त्यामुळे या गदारोळापासून लांब राहणारेही इथे यायला लागतील.
भागही घ्यायला लागतील.
इकडचे ४-५ व तिकडचे ४-५ अशी सध्याची विचारमंथनाची पध्दत बदलून जाईल.
मग मात्र अभ्यासपूर्वक लिखाण वाढायला लागेल.

तोपर्यंत काय?
वेळ काढत राहायचा.
वाट पहात राहावयाचे.