कोरोनाने दगावलेल्यां कुटूबांस सहाय्यक योजना

अर्जुन's picture
अर्जुन in काथ्याकूट
25 Apr 2021 - 12:36 am
गाभा: 

सध्या कोरोनामूळे अकाली मरणांचे प्रमाण वाढलेले आहे. कर्ता पुरुष अथवा स्त्रीच्या जाण्यामूळे घ्ररातल्या माणसांचे आणि मूलांचे हाल होत आहेत. त्याला खालिल पर्याय असु शकतो.
जिथे कर्ता व्यक्तीचे पालक हयात असतील आणि रहाते किंवा ईतर घर जर त्यांच्या मालकीचे असेल तर ते रिव्हर्स मॉर्गएजच्या मार्गाने चरितार्थ चालवू शकतील.
ही योजना स्टेट बेंक ऑफ इंडियामधे उपलब्ध आहे.
या योजनेची मी ठळक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जाणकारांनी अधिक माहिती व अनुभवाची भर टाकून, क्रुपया सहकार्य करावे ही विनंति,
पात्र व्यक्ती:-
१.60 वर्षांवरील घर मालक घराचे रिव्हर्स मॉर्गएज [उलट गहाणवट] करू शकतो आणि संपूर्ण गहाणवट रक्कम सुरवातीलाच किंवा नियमित [ उदा. मासिक] उत्पन्न मिळवू शकतो.उलट तारण कर्ज पात्रता निकष
२. जर एखाद्या जोडप्याने निवड करण्याची इच्छा केली तर पती / पत्नीचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त असावे.
3. कर्जदाराचे संपूर्ण मालकीचे घर असणे आवश्यक आहे. जोडप्याच्या बाबतीत, त्यापैकी कमीतकमी एखाद्याचे घर असले पाहिजे.
४. ही मालमत्ता किमान 20 वर्षांपासून अस्तित्वात असावी.
5. व्यावसायिक वापरासाठी सोडल्या जाणार्‍या किंवा वापरल्या जाणार्‍या मालमत्ता पात्र नाहीत.
उलट तारण मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
उलट तारण घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील आहेत.
1. ओळखीचा पुरावा [aadhar card]
2. निवास किंवा पत्त्याचा पुरावा [ration card]
नियोक्ता ओळखपत्र
मालमत्ता कागदपत्रे
सर्व बँक खात्यांकरिता मागील 6 महिन्यांचे खाते विवरण
मागील एक वर्षाचे कर्ज खाते विवरण (असल्यास)
उलट तारण वरचे 3 कर लाभ
कर्जदारास बँकेतून मिळणारे उत्पन्न करमुक्त असेल.
या पैशांसह घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती केली गेल्यास, नूतनीकरण किंवा दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम उत्पन्नाच्या मोजणीत कपात करण्यास पात्र असेल.
कर्जाची मुदत संपल्यानंतर कर्जाची परतफेड कपात करण्यायोग्य मानली जाणार नाही.
रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये लक्षात ठेवण्यासाठी 7 पॉइंट्स
या योजनेंतर्गत दिले जास्तीत जास्त कर्ज एक कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते
कर्जाची किमान मुदत 10 वर्षे असते तर जास्तीत जास्त मुदत बँक ते बँक वेगवेगळी असते.
कर्जदार एकतर मासिक, तिमाही, वार्षिक किंवा एकरकमी देयके निवडू शकतो.
बँक किंवा गृहनिर्माण कंपनीने दर 5 वर्षांनी मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
रिव्हर्स मॉर्टगेजचे दर बँक ते बँक वेगवेगळे [SBI che 7 to 7.5 % varshik darachya aaspas aahet.]असतात.
रिव्हर्स मॉर्टगेजची प्रोसेसिंग फी बँकेनुसार बदलते.
कर्जदाराने कर्जाच्या मुदतीच्या वेळी कोणत्याही वेळी कर्जाची पूर्तता केली जाऊ शकते.

प्रतिक्रिया

अर्जुन, अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
सध्या लोक त्यावर खूप विचार करत नाहीत, कारण प्रत्येकाचा थेट संबंध नसतो. पण ज्यांना अश्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यांनी विचार करायला हवा.

याच्या जोडीने आज महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इच्छापत्र करून ठेवणे. मुळात मालमत्तेत कायदेशीर पेच असतील तर वरील पर्याय असून वापरणे शक्य होणार नाही.. आपल्याला काही होणार नाही या समजुतीने किंवा तसला विचार नकोच, म्हणून कदाचित हे करणे टाळले जाते.

चौकस२१२'s picture

27 Apr 2021 - 8:14 am | चौकस२१२

रिव्हर्स मॉर्गएज [उलट गहाणवट] उलट तारण...
हि कल्पना विचार करण्यासारखी आहे यात शंका नाही परंतु यात पडण्यापूर्वी ग्राहक म्हणून काही गोष्टी नीट समजावून घेणे महत्वाचे आहे
खेडूत यांनी म्हणल्याप्रमाणे आधी घर कोनाच्या नावावर आहे ते बघणे, इत्यादी
- जर घर नावर बायकोच्या नावावर असेल तर एकाचा मृत्यू झाल्यास , दुसरी व्यक्ती जिवंत असे पर्यंत हे रिव्हर्स मॉर्गएज चालू राहते का आणि त्यात खंड ना पडत ते चालू राहते का ? त्यासाठी फार किचकट काही करावे लागते का ?
- निगेटिव्ह बॅलन्स होणार नाही ना? म्हणजे समजा व्यक्ती १०१+ पर्यंत जगली आणि एकूण घर किमती पेक्षा जास्त रक्कम घेतली गेली असले तर?
- वारसदार कर्जाची रक्कम भरून घर ताब्यात घेऊ शकतात का ?
- रक्कम घेत असताना आयकर या कडे कसे बघते ?
तेव्हा जपून पाऊल टाका...
या प्रकारच्या सोयी बद्दल भारताबाहेर कधी कधी " ग्राहक हितासाठी" सरकार ला बंधने आणावी लागली होती
काही दुवे
https://www.investopedia.com/mortgage/reverse-mortgage/5-signs-reverse-m...
https://download.asic.gov.au/media/4851420/rep-586-published-28-august-2...