स्वप्न

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Apr 2021 - 6:11 am
गाभा: 

मी लहानपणी पणजी शहरांत जायचे. तिथे अल्तिनो ह्या टेकडीवर आमच्या एका नातेवाईकांचे घर किंवा त्याला बांगला म्हणणे जास्त उचित ठरेल. कुणीतरी जुन्या काळांत बांधला होता. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच त्यामुळे त्या बंगाल्यांत सुख सुविधा अश्या कमीच होत्या मी गेले कि ज्या खोलीत राहायचे तिथे एक टेबल फॅन होता. हा पोर्तुगीज कालीन असावा कारण तो तांब्याचा आणि पितळचा होता. त्याचे वजन प्रचंड होते पण कित्येक दशके विना तक्रार तो चालत होता. त्याला बटन सुद्धा एकच होते. ज्या खोलीत मी झोपायचे त्याला एक खिडकी होती ज्यातून बाहेरील रास्ता दिसायचा आणि तिथे एक मोठी सिमेंटची कचऱ्याची पेटी होती. तिथे म्युनिसिपाल्टी वाले सकाळी कचरा नेण्यासाठी यायचे.

तर हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे कित्येक वर्षे झाली तरी त्या फॅन चा आवाज अजून डोक्यांत आहे. रात्री झोपताना तो फॅन ऐकत झोप यायची आणि सकाळी उठताना त्या ख्रिस्ती पोदेराच्या सायकलच्या हॉर्नचा आवाज, आणि कचरा न्यायला येणाऱ्या रिक्षेचा धडाम धुडूम आवाज अजून डोक्यांत आहे आणि त्या हवेचा वास अजून नाकांत दरवळतो. मजेची गोष्ट अशी कि मी जास्त काळ पणजीत वास्तव्य नाही केले तरी सुद्धा लहानपणीची आठवण म्हणून तो फॅन चा आवाज आयुष्यभर माझ्या सोबत आहे.

कधी कधी असे वाटायचे कि मी अजून त्याच खोलींत झोपले आहे आणि इतर सर्व काही स्वप्न आहे. अचानक स्वप्न भंग होईल आणि मी त्या खोलींत त्या फॅन च्या आवाजांत जागी होईन. असा विचार करायला मी मूर्ख आहे असेच मी लहान पाणी समजत असे पण नंतर लक्षांत आले कि अनेक लोकांना अगदी हाच अनुभव आहे. काहींच्या बाबतीत असे अनेक क्षण असतात जे पूर्णपणे सामान्य असले तरी आठवणीत राहतात.

अॅलन वॉट्स ह्या अमेरीकन विद्वानांची भाषणे मला फार ऐकायला आवडत. अॅलन वॅट्स ने विविध धर्मांचा अभ्यास केला आणि तो हिंदू धर्माच्या प्रेमात पडला. इतर लोकांप्रमाणे अॅलन हिंदू धार्मिक गुरु वगैरे बनला नाही पण वेदिक तत्वज्ञान साधारण आणि मनोरंजक पद्धतीने समजावण्यात त्याचा हातखंडा होता. आणि एक गोष्ट तो आधीच सांगायचा कि हेच सत्य आहे किंवा हेच जीवनाचे वास्तव आहे असे तो कुणालाही सांगू इच्छित नाही. मोझार्ट जेंव्हा आपले संगीत ऐकावयाचा तेंव्हा तुम्हाला सुद्धा संगीत निर्माण करण्याची प्रेरणा देण्याचा त्याचा उद्ध्येश नव्हता, निव्वळ मनोरंजन म्हणून तो तुम्हाला ते ऐकवत होता. संगीताची आवड हि त्याची स्वतःची होती.

अॅलन चे स्वप्न ह्या विषयावर सुदंर व्याख्यान आहे.

समजा तुम्हाला एक सुपर पावर दिली कि तुम्ही तुम्हाला पाहिजे ते स्वप्न तुम्ही पाहू शकता आणि वाट्टेल तितका वेळ त्या स्वप्नाच्या दुनियेत घालवू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही काय स्वप्न पाहाल ? बहुतेक व्यक्ती एक सुखद जीवन जिथे सर्व प्रकारचे वैभव तुमच्या पायाशी लोळण घेत आहे असे स्वप्न पाहाल. पण प्रत्येक गोष्ट विचार करता क्षणीच तुमच्या समोर येत असल्याने त्यांत तुम्हाला रस असणार नाही. त्यामुळे हळू हळू तुम्ही ऍडव्हेंचर प्रकारची स्वप्ने पाहाल. तुम्ही युद्धांत भाग घेताय, परग्रहावर फिरत आहात इत्यादी. त्यातून रोमांच हि भावना तुमच्या मनात निर्माण होईल. पण तरी सुद्धा हे सर्व स्वप्न असल्याने तुम्ही तितके घाबरणार नाही. हळू हळू रोमांचाची भावना सुद्धा बोथट होत जाईल.

स्वप्नाची मजा सुद्धा घ्यावी पण अतिरेकाने ती भावना बोथट सुद्धा होऊ नये तर मग काय करावे ? तर तार्किक दृष्ट्या एकाच उपाय उरतो. तुम्ही स्वप्न निर्मिती कराल पण हे स्वप्न आहे हि मेमोरि स्वतःच्या मनातून डिलीट कराल. सर्व स्वप्न पाहून तुम्ही स्वप्नांत जेंव्हा मराल तेंव्हा तुम्ही सत्य दुनियेत पुन्हा जागे व्हाल.

अॅलन वॅट्स ह्यालाच "माया" असे हिंदूंनी संबोधिले आहेत असे सांगतात. माया हि खोटी नाही. स्टेज वर चाललेल्या रामायणांत राम खरा राम नसला तरी स्टेज ती व्यक्ती आणि कथानक हे सत्य आहे. माया हि त्याच प्रकारची आहेत. जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी माया निर्माण झाली आहे पण ह्या मायेच्या पलीकडे आमचे अस्तित्व आहे आणि ह्या अस्तित्वांत आम्ही खूपच व्यापक आणि शक्तिशाली आहोत. ख्रिस्ती गॉड प्रमाणे आपण गॉड नाही आहोत पण आपण स्वतः ब्रम्ह म्हणजे त्या रिऍलिटीचे करते करवते आहोत फक्त ह्या माया स्वरूपी जीवनात आम्हाला त्याचा विसर पडला आहे. ह्या मायेत मी आणि इतर असा फरक नाहीच कारण सर्वच ड्रीम आम्ही स्वतः निर्माण केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=wU0PYcCsL6o

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 7:25 am | मुक्त विहारि

लेख आवडला....

गॉडजिला's picture

22 Apr 2021 - 10:40 am | गॉडजिला

ज्या प्रमाणे पचनसंस्था कशी चालते हे कीतीही व्यवस्थीत समजुन घेतले तरी भुक लागणे बंद होउ शकत नाही तसेच हे जग सत्य, माया, स्वप्न वगैरे वगैरे आहे असे काहीही समजले तरी त्यामुळे आपले मुल स्वरुप उमजुन येत नाही... किंबहुना सर्वकाही माया अथवा स्वप्न समजणे मनुश्याच्या आळशीपणालाच खतपाणी घालणारी बाब ठरु शकते.

आसो...

स्वप्नाची मजा सुद्धा घ्यावी पण अतिरेकाने ती भावना बोथट सुद्धा होऊ नये तर मग काय करावे ? तर तार्किक दृष्ट्या एकाच उपाय उरतो. तुम्ही स्वप्न निर्मिती कराल पण हे स्वप्न आहे हि मेमोरि स्वतःच्या मनातून डिलीट कराल.

खरे तर तार्किक दृष्ट्या स्वप्ने होपलेस असतात या अनुभवाधारीत निश्कर्शावर न येता हे स्वप्न आहे हि जाणच स्वतःच्या मनातून डिलीट करायचा उद्योग करणे म्हणजे...