गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
9 Apr 2021 - 5:13 am
गाभा: 

मला गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी काहीतरी विचार मांडायचे आहेत पण त्याआधी भारतातील काही माहिती हवी आहे
अ ) व्याज दर
१) सध्याचा सर्वसाधारण गृहकर्जाच्या व्याजाचा दर
२) धोका नसलेल्या म्हणजे राष्ट्रीय बँकेतील मुदत ठेवीचे दर ( १ वर्ष आणि जेष्ठ नागरिक नसलेल्यांसाठीचे )
३) ८० सी सी खाली आयकरात कपात होण्यास मदत होणाऱ्या राष्ट्रीय योजनेतून परतावा मिळतो त्याचा साधारण दर ( जर योजना ५ वर्षांची असले तर त्याचाच वार्षिक सरासरी परतावा किती )

ब) आयकर
४) नोकरदारांसाठी आयकराची टप्पे आणि दर?
५) निवृत्ती फंडासाठी काय सोयी आहेत आणि त्यावरील परतावा हा मार्केट रिस्क प्रमाणे असतो ना?
५) राहत्या घरावर विकल्यास आणि फायदा झाल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागतो का?
६) गुंतवणुकीचं घर विकल्यावर फायदा झाला तर त्यावर कर लागतो , आणि किती
७) गुंतवणुकीचं घर विकलेला नसताना त्यातून मिळणारे उतपन आणि आपण भरणारे कर्ज वय्याज आणि इतर गोष्टी यातून जर "वार्षिक तोटा" होत असेल तर तो तोटा हा तुमचं इतर उत्पन्नाच्या विरुद्ध धरले जाते का? ( येथे त्याला निगेटिव्ह गेअरिंग म्हणतात म्हजे समजा तुमचे उत्पन्न जर १ लाख डॉलर असेल आणि त्याच वेळी जर गुंतवणुकीच्या घरातून तुम्हाला वर्षाला ५ हजार डॉलर तोटा झाला तर तुमचे एकूण उत्पन्न हे ९५,००० धरले जाते आणि मग त्यावर आयकर लागतो १००,००० वर नाही )

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 5:35 am | मुक्त विहारि

वाखूसा

चौकस२१२'s picture

9 Apr 2021 - 5:47 am | चौकस२१२

?

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 6:03 am | मुक्त विहारि

वाचन खूण साठवली...

चौकस२१२'s picture

9 Apr 2021 - 7:16 am | चौकस२१२

ओह बरं .... वेळ मिळेल तेव्हा माहिती पाठवा जरूर

ह्या गोष्टीचा आणि माझा काहीच संबंध नाही...

मुलांना उपयोगी पडेल म्हणून, वाखूसा...

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 10:23 am | अमर विश्वास

गुगुलबाबा ला विचारा .. सर्व माहिती मिळेल

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 1:10 pm | चौथा कोनाडा

चौकसदोनशेबारा साहेब, जरा चौकसपणा दाखवा, या सर्व गोष्टी आंजावर उपलब्ध आहेत. यावर लेख आहेत, व्हिडियो आहेत ते संदर्भा. उत्तम लेख होईल तुमचा.
शुभेच्छा !

चौकस२१२'s picture

9 Apr 2021 - 2:18 pm | चौकस२१२

मला आळस आहे म्हणून नाही आणि यातील काही गोष्टी सहज उपलब्ध आहेत हे पण पण काही गोष्टीत धड माहिती मिळत नाही म्हणून विचारले कि कोना मिपाकराला झटकन सांगत येईल का . असो अपेक्षेबद्दल क्षमस्व

विचारण्याचे मुख कारण सांगतो ... सद्य चाललेली आर्थिक धाग्यांमध्ये आयकर आणि कर्ज याचाच फारसा कुठे उल्लेख नाही.. कारण त्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही म्हणून

साधारण ते गृहकर्ज ( स्वतःचं राहणी चे घर ) हे आयुष्यातील सर्वात मोठे कर्ज असते आणि त्या कर्ज ला " सर्वात वाईट कर्ज " म्हणतात ते टांगत ठेवण्यात अर्थ नसतो , याउलट गुंतवणुकीचे कर्ज हे ठेवले आणि त्यावर व्याज भारत राहिले तर ते आयकराचं दृष्टितीने उपयुक्त असते ( निदान माझ्य देशातील नियमांप्रमाणे )
तर कल्पना अशी कि "समजा गृहकर्ज जर 7 % असले तर महिना भर जे काय पैसे आपलीकडे येत असतात ( मग जोडधंद्याची असतो त किंवा इतर) ते इतर ठिकाणी ना गुंतवता आधी गृहकर्ज मिटवण्याकडे वापरावे ... ता इतर ठिकाणी जर "आयकर भरल्यानंतर" जो परतावा मिळतो तो त्या गृहकर्जाच्या 7% पेक्षा जास्त असेल "तरच" इतररत्र गुंतवावेत
आता प्रश असं येतो कि "इत्रत " म्हणजे काय तर समसमान तुलना कार्याची तर फक्त "कॅपिटल गॅरंटीड म्हणजे सरकारी रोखे किंवा बँक डिपॉझिट यांचयाशीच तुलना "

म्हणजे समजा गृहकर्ज ३.५% दराने आहे आणि आयकर दर ३०% आहे आणि रिस्क फ्री रेट ऑफ रितूर्न फक्त १.५% आहे आणि त्यातून जो परतावा मिळतो त्यावर ३०% आधी आयकर द्यावा लागतो
अर्हताःत कोणी म्हणले कि फक्त "कॅपिटल गॅरंटीड " मध्ये जास्तीचाच पैसे ठेवण्यापेक्षा थंडी "मार्केट रिस्क" का घेऊ नये जेणेकरून आयकर भरून सुद्धा तुम्ही वरील ३.५% पक्ष जास्त कमवाल..
हि कप्लना कदाचित पटणार नाही .. किंवा भारतातात राबवता पण येणार नाही .. पण एक कल्पना म्हणून मांडली

मराठी_माणूस's picture

9 Apr 2021 - 2:58 pm | मराठी_माणूस

वाचतांना खुप अडखळायला झाले.

सुबोध खरे's picture

10 Apr 2021 - 10:38 am | सुबोध खरे

आज गृहकर्ज ७ % च्या आसपास दराने मिळते आहे. त्याच्या पैकी दर वर्षी १,५०,००० व्याज आणि ५० हजार मुद्दल हे आपल्या करपात्र उत्पन्नातून वजा होऊ शकते.

म्हणजे एखाद्याचा पगार १ लाख रुपये महिना असेल ( १२ लाख रुपये वार्षिक) तर हे दोन लाख वजा करून त्याचे करपात्र उत्पन्न १० लाख होईल. आणि वरच्या २ लाखावर (३० % आयकर श्रेणीत ) त्याला ६० हजार रुपये कर भरावा लागणार नाही.

म्हणजेच त्याचा हप्ता जर रुपये १६ हजार ६६७ महिना असेल तर त्यातील ५ हजार रुपये हप्ता वाचल्यासारखा आहे आणि त्याला १२ ६६७ रुपये हप्ता भरावा लागेल.

एवढे वाकडे गणित करण्यापेक्षा आपले उत्पन्न वर्षाला १२ लाख किंवा जास्त असेल तर २ लाख रुपये वर्षाला पर्यंत सरकार/ बँक तुम्हाला ४.९ % ने कर्ज देत आहे. तेंव्हा जर आपण यापेक्षा जास्त व्याज मिळवू शकत असाल तर हे कर्ज न फेडणे हे जास्त फायदेशीर आहे.

आपले उत्पन्न वार्षिक ५ लाख ते १० लाख या मध्ये असेल तर आपल्याला २० % कर कपातीचा फायदा होईल आणि आपल्याला ५.६ % ने कर्ज मिळते

( सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत हेच पैसे आपण ठेवले( आपल्या आणि आपल्या बायको / नवर्याच्या खात्यात मिळून) तर आपल्याला ७. १ % ने व्याज मिळू शकते आणि पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि पैसे परत घेतांना करमुक्त आहेत)

चौकस२१२'s picture

10 Apr 2021 - 6:00 pm | चौकस२१२

धन्यवाद ..डॉ .
म्हणजे ७ % पेक्षा जास्त ( आयकर भरून मग) आणि कमी धोक्यात परतावा मिळत नसेल तर इतरत्र गुंतवणूक करण्यात अर्थ राहतो?
12 % जरी मिळाले तरी त्यावर प्रथम समजा ३०%आयकर भरला तर मग हातात राहतात ९% म्हणजे २% च जास्त ! आणि त्याबरोबर येणार धोका ... मग त्या २ % साठी धोका घ्य्याचा का?
माझा गोंधळ तर होत नाहीये ना?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हे EEE म्हणजे exempt exempt exempt या श्रेणीत येते. म्हणजेच पैसे गुंतवले कि १) तें आपल्या करपात्र उत्पन्नातून कमी होतात. २) त्यावरील व्याज कर मुक्त आहे आणि ३) जेंव्हा तुम्ही मुद्दल परत घेता तेंव्हा मुद्दल सुद्धा कर मुक्त आहे.

आपल्या कडे दर वर्षी २ लाख रुपये अतिरिक्त( गुंतवणूकयोग्य) आहेत. तर मुद्दा असा आहे कि आपण गृहकर्ज फेडून टाकावे का?

यासाठी दिलेला हा हिशेब आहे. कर्ज त्यावरील कर परताव्यामुळे ४.९ % ने मिळतय मग ते फेडण्यापेक्षा तेच पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये गुंतवले तर आपल्याला त्यातून दरवर्षी ७.१% व्याजाप्रमाणे (२ लाखाला २.२% म्हणजे) ४४०० रुपये नक्त नफा होतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हि जगातील सर्वात सुरक्षित ठेव आहे असे म्हटले जाते. कारण त्याला भारत सरकारची सार्वभौम हमी आहे.

आपण जर ४.९% पेक्षा जास्त पैसे बाजारातून मिळवू शकत असाल तर कर्ज परत करण्यापेक्षा ते किती तरी फायद्यात ठरते.

आपण जर ४.९% पेक्षा जास्त पैसे बाजारातून मिळवू शकत असाल तर कर्ज परत करण्यापेक्षा ते किती तरी फायद्यात ठरते.

हो बरोबर पण आपण जे "बाजारातून" हे म्हणताय ते म्हणजे सरकारी हमी रोखे / निधी कि खरा बाजार जिथे "मार्केट रिस्क " असते
कारण ४.९% पेक्शा जास्त तर अनेक गुंतवणुकीतून मिळतील .. पण त्याबरोबर बाजाराच्या चढ उताराची जोखीम पण असेल... बरोबर ना

अमर विश्वास's picture

10 Apr 2021 - 6:23 pm | अमर विश्वास

हे २ किंवा ५% वाचवायला कोणीही घर घेत नाही .

इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले घर हे अल्प मुदतीत रेंट च्या रूपाने आणि दीर्घ मुदतीत घराच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे (Appreciation) होणार फायदा गृहीत धरून विकत घेतेले जाते. गृहकर्जावरची व्याजाची वजावट हा added advantage आहे.

कृपया हे वाचा
https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/save/know-th....

चौकस२१२'s picture

10 Apr 2021 - 6:35 pm | चौकस२१२

पहिली गोष्ट मी फक्त gharacyaa गुंतवणुकी बद्दल बोलत नाहीये वरील मी ७% /9% उदाहरणात फंड मधील किंवा समभागात गुंतवणुकीबद्दल किंवा इतर कोणत्याही धंदयांतून मिळालेल्या परतावा आणि एखाद्याचा आजचा आयकर याबद्दल बोलत होतो ...किंवा माझा काही "गुंतवणुकीला " विरोध नाहीये... तुम्ही गैरसमजूत करून घेताय

मी फक्त गुंतवणुकी चा विहार करताना आयकर हा मूड हि कदाचित विचारात घयावा एवढेच म्हणत होतो अर्थात आयकर किंवा गृहकर्ज प्रत्येकाला असेलच असे नाही उद्या एखादा मोनॅको किंवा सौदी सारखया टॅक्स फ्री देशात राहून भारतात निवेश करणार असेल तर तुम्ही दिलेली माहिती उपयोगी आहेच कि
असो
आपण जी माहिती देत आहेत ती चांगलीच आहे पण कृपया माझ्या मुद्य्यांल उगाच "निगेटिव्ह " वैगरे समजू नका

चौकस२१२'s picture

10 Apr 2021 - 6:37 pm | चौकस२१२

आयकर हा मुद्दा