नक्षलवाद्यांनी कमांडो मानस ला सोडले

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
9 Apr 2021 - 4:32 am
गाभा: 

नक्षलवाद्यांनी हल्ला करून साधारण २० जवानांना ठार मारले होते आणि एकाला बंदी बनविण्यात आले होते. आता त्या जवानांची सुटका केली आहे.

ह्या बातमीत लक्षवेधी गोष्टी खालील आहेत

- जवानाची सुटका करताना शेकडोच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. हि मंडळी सर्वसाधारण गावकरी वाटते. ह्यावरून नक्षलवाद्यांना किती पाठिंबा आणि जनसमर्थन आहे हे दिसून येते.
- त्याशिवाय तथाकथित समाजसेवक मंडळींनी ह्यांत पुढाकार घेतला आहे ह्यावरून हि मंडळी नक्षल नेत्यांना भेटत असावी असे वाटते.

नक्षलवाद ह्यावर थोडा जास्त खोलाने विचार करायला पाहिजे आणि माझ्या मते हिंसेने अनेक समस्या सुटलेल्या जाऊ शकतील पण त्याशिवाय जनतेने इतके समर्थन ह्या लोकांना का दिले आहे हे सुद्धा भारतीयांनी ओळखले पाहिजे.

दोन बाजू आहेत.

- बुद्धिभ्रम आणि भीती दाखवून सामान्य लोकांना नक्षलवाद्यांनी वेठीस धरले आहे.
- सरकार आणि व्यवस्था कुचकामी असल्याने त्यांच्या पेक्षा नक्षल मंडळी गावकर्यांना प्रिय आहेत.

सत्य कदाचित दोन्ही बाजूंचा मध्ये असावे असे वाटते.

Naxalsism

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 5:45 am | मुक्त विहारि

वाचत आहे