मिपा आणि निबंधलेखन

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
21 Mar 2021 - 10:33 am
गाभा: 

आम्ही शाळेत असताना आम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये निबंधलेखन म्हणून एक प्रकार होता..

खरे तर तो होता creativity बघण्यासाठी, पण सगळ्यांसाठी ते कसलं जमायला? मग आमच्या सरांनी एक युक्ती सांगितली आम्हाला.

सर काय म्हणायचे, एक निबंध व्यवस्थित पाठ करा.. समजा घराला लागलेली आग.
मग घराला लागलेली आग, म्हणजे काय, तर एका घराला आग लागली, मग कश्या ज्वाला आल्या, मग कोणीतरी फायरब्रिगेडला बोलावले, मग त्यांनी कसे पाणी मारले, ज्वाळा कश्या आकाशपर्यंत जात होत्या, ब्रिगेडने कशी काशी केली आगीची वगैरे.. आणि मग किती नुकसान झाले आम्ही कसे वाचलो इत्यादी इत्यादी.

तर हा निबंध पाठ झाला की पुढे काय?
पुढचा मार्ग सोपा आहे, समजा एक रम्य संध्याकाळ म्हणून विषय आला, तर मग सुरू करायचं, एके संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो होतो, तिथे अचानक एका घराला आग लागली... मग आपला निबंध पुढे सुरू. एक रम्यभीषण संध्याकाळ
समजा मी पाहिलेला निसर्ग म्हणून विषय आला, तर एके दिवशी आम्ही शेजारच्या डोंगरावर फिरायला गेलो होतो, तिथे एक घराला अचानक आग लागली.. मग पुन्हा आपला निबंध सुरू. डोंगरावरच्या भीतीदायक निसर्ग..
समजा दवाखान्यावर आला विषय, तर दवाखान्याला आग लावायची.
माझी शाळा म्हणून आला विषय, तर शाळेला आग लावायची..
हे एकदा जमले की कोणताही विषय लिहिणे सोपे, मराठी असो नाहीतर इंग्रजी..

रत्नागिरीमधले कोणी असतील तर ते सर पण तुम्हाला आठवतील.

पण हे सगळे मला आत्ता का बरे आठवले असेल?

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

21 Mar 2021 - 10:48 am | आग्या१९९०

माझ्या आयडीवरून सुचले असेल.

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 10:56 am | मुक्त विहारि

इथे पण काही लोकांचे असेच आहे ....

आधी बाण मारायचा आणि मग वर्तुळे काढायची...

गणेशा's picture

21 Mar 2021 - 11:25 am | गणेशा

भारी सांगितले..
आठवण :
आम्ही निबंध म्हणजे मी अमुक तमुक असतो तर असा विषय आला कि आपले समाजकल्याण फलाना चालू ठेवायचो.
उदा. मी नदी असतो तर..

---
मुळ विषय..

मिपाचे आजकाल असेच दिसते आहे.. ओढून ताणून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीं, कोणी शिवसेनेला शिव्या घालतेय, कोणी मोदी ला, कोणी पवार कोणी काँग्रेस ला, कोणी प्रत्येक गोष्टीत घराणेशाही कोणी प्रत्येक गोष्टीत मोदी..
कुठला हि विषय आला कि हेच चालू...
रोजच्या घडामोडी कमी आणि त्यामागे आपणच आता कोणाचे तरी हस्तक असल्या प्रमाणे बोलतोय.. हेच चालू आहे..
बाकी काय?

ह्या कामाचे पैसे मिळत असते तर "श्रीमंतीचे मार्ग" असले धागे काढायची गरजच नव्हती ...

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 11:35 am | मुक्त विहारि

सहमत आहे

जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते....

डॅनी ओशन's picture

21 Mar 2021 - 12:30 pm | डॅनी ओशन

तुम्ही कस्काय सहमत ???

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 12:48 pm | मुक्त विहारि

सगळ्यांचेच पाय मातीचे असतात....

फक्त, माती वेगवेगळी असते...

कुणी मातीवर कितीही रंगरंगोटी केली तरी, 8-9 महिन्यांत रंग उडतोच...

गणेशा's picture

21 Mar 2021 - 12:33 pm | गणेशा

आणि

जिनके घर शीशे के होते हैं, वो अपणे ही घर मे नंगे भी नहि घुमा सकते

कृपया आता येथे ही निबंध .. गेला बाजारा म्हणी.. सुविचार.. डायलॉग सुरु करु नये ही विनंती :-)

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 12:46 pm | मुक्त विहारि

हे सांगणारे आपण कोण?

गणेशा's picture

21 Mar 2021 - 12:48 pm | गणेशा

सुरुवात कोणी केली?

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 12:49 pm | मुक्त विहारि

असे कधीच म्हटलेले नाही ...

आग्या१९९०'s picture

21 Mar 2021 - 12:46 pm | आग्या१९९०

जिनके घर शिशे के होते है, वो बत्ती बुझाकर कपडे बदलते है

गणेशा's picture

21 Mar 2021 - 12:50 pm | गणेशा

हाहाहा.. खुप हसलो

शा वि कु's picture

21 Mar 2021 - 12:57 pm | शा वि कु

गोलमाल मध्ये-
वो बेसमेंट मी जाके कपडे बदलते है

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 1:07 pm | मुक्त विहारि

अशा पण व्यक्ती, सगळ्या ठिकाणी मिळतील...

बापूसाहेब's picture

21 Mar 2021 - 11:41 am | बापूसाहेब

असे कोणतेही गुरुजी आम्हाला शाळेत नव्हते पण मराठी संकेतस्थळावर आणि जालावर असे अनेक गुरु भेटले जे डिट्टो असेच वागतात. त्यांच्या डोक्यात जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकच विचार असतो. तो विचार सोडला तर त्यांना इतर काहीही येत नसते. मग अशी लोकं, प्रसंग कोणताही असो तोच विचार मांडत असतात, फक्त वेगवेगळ्या भाषेत. आयुष्यात त्या विचाराव्यतिरिक्त इतर अनेक विचार देखील अस्तित्वात असतात पण त्याकडे ते ढुंकून सुद्धा बघत नाहीत.!!!

कधीकधी असे वागणे त्यांच्या अंगलट येत, पण अश्या वेळी ही लोकं शांत बसतात आणि मग दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन तोच तोच विचार मांडत बसतात.. आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना फरक पडत नाही कि प्रसंग कोणता आहे..!!!!!

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 11:53 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

आधी बाण मारायचा आणि मग वर्तुळे काढायची....

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2021 - 12:36 pm | चौथा कोनाडा

भारी आयड्या आगलाव्या निबंधाची
(ही आयड्या बहुतेक दमांच्या एका कथाकथनाच्यावेळी त्यांच्याच तोंडून ऐकलेली)

आता येऊं द्या एका मागोमाग एक निबंध
आग १
आग २
आग ३
...
...
सो ऑन !

साहना's picture

21 Mar 2021 - 12:49 pm | साहना

इंग्रजी भाषेतून my friend हा निबंध पाठ करून एक विद्यार्थी शाळेंत गेला. निबंध आला my father. ह्याने फ्रेंड रिप्लेस करून फादर लिहून टाकले. मला अनेक बाप आहेत पण काही बाप हे खास बाप आहेत. ह्यांना मी घरी बोलावतो, त्यांच्या बरोबर खेळतो. माझ्या आईला सुद्धा माझे सर्व बाप बरेच प्रिय आहेत. ती नेहमीच चांगल्या बापाच्या सहवासांत राहायला सांगते. आणि नंतर तात्पर्य सुद्धा लिहीले "फादर इन नीड इस द फादर इन्डीड".

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 12:50 pm | मुक्त विहारि

भारी किस्सा आहे ...