आज काय घडले.... माघ शु. ४ श्रीगणपतीचा जन्मदिवस :

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
15 Feb 2021 - 4:50 pm

आज काय घडले....

माघ शु. ४

श्रीगणपतीचा जन्मदिवस :

माघ शु. ४ हा दिवस श्रीगणपतीचा जन्मदिन म्हणून मानला जातो.

गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. पद्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण ... आदि ग्रंथांतून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत. पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्याची मूर्ति बनवून ती सजीव केल्यावर गणपति निर्माण झाला; अदितीच्या पोटी हा महोत्कटरूपाने जन्मास आला; पार्वती स्नान करीत असतां द्वाररक्षकाचे काम करणा-या गणपतीने शंकरालाहि मज्जाव केला, त्यामुळे युद्ध झाले आणि शंकरांनी याचे मस्तक तोडले, परंतु पार्वतीच्यासाठी शंकरांनी परत इंद्राच्या हत्तीचे मस्तक बसविलें ; शनीच्या दृष्टिपाताने गणपतीचे मस्तक जळाले, पण देवांनी तेथे हत्तीचे मस्तक बसविलें. इत्यादि अनेक कथा पुराणग्रंथांतून वर्णन केल्या आहेत. कित्येक ठिकाणी गणेशाच्या बालचरित्राचेंहि वर्णन आढळते. 'गणानां त्वा गणपति' हे ऋग्वेदांतील सूत्र गणपतीचे मानतात. महाभारतासारख्या अवाढव्य ग्रंथनिर्मितीच्या वेळी गणेश हाच 'लेखकु' झाल्याचा उल्लेख आहे. सुमुख, एकदन्त, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश इत्यादी बारा नांवे याची प्रसिद्ध.आहेत. गणपतीला गृत्समद, राजा वरेण्य व मुद्गल यांसारखे थोर भक्त मिळाले आहेत. सुखकर्ता दुःखहर्ता -' म्हणून गणपती हे भारतीयांचे आराध्यदैवत बनले आहे. शैव-वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक गणपतीची उपासना करतात. तामिल देशांत तंचिकाई अलवर म्हणजे बुद्धिवान् गजानन आहे. तंजावर येथेही प्रसिद्ध असे गणपतीचे देवालय आहे. त्रिचनापल्लीला उच्छि पिल्लेयर हे अत्यंत भव्य असे गणेश-मंदिर आहे. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य पंथ मान्यतेस पावला आहे. गणपतीचे अनेक अवतार मानले गेले आहेत. कृतयुगांत विनायक, त्रेतायुगांत मयूरेश्वर, द्वापरयुगांत गजानन, ... असे त्याचे वर्णन आढळते..पेशव्यांचे आराध्य दैवत गणपति हेच होते. महाराष्ट्रांतील मोरगांव, थेऊर, लेण्याद्रि, सिद्धटेक आदि अष्टविनायकांची स्थाने प्रसिद्ध आहेतganesh janm

इतिहास