आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:29 am

आज काय घडले...

पौष व. ११

न्या. रानडे यांचे निधन

शके १८२२ च्या पौष व. ११ रोजी हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचे निधन झाले.

राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, आर्थिक इत्यादि अनेक क्षेत्रांत माधवरावांनी मार्गदर्शन केले. हिंदी अर्थशास्त्राचे ते तर जनकच होते. आयुष्यातील शेवटच्या दिवसांतहि यांचे लक्ष सार्वजनिक कार्यात गुंतून.राहिले होते. लाहोरच्या सामाजिक परिषदेस जातां आले नाही म्हणून यांना मनस्वी वाईट वाटले. रोज रात्री साडे दहा वाजतां काळजात वेदना सुरू होत असल्या वेळी मृत्यूशीच झुंज सुरू होई. पौष व. ९ रोजी पायावर सूज दिसत होती आणि पौष व.११ ला सकाळी माधवरावांना थोडी हुशारी वाटली. रमाबाई सह थोडे फिरून आल्यावर त्यांचे मित्र कीतिचंद्र मुकर्जी मरण पावल्याची बातमी तारेने यांना समजली. 'काम करता करतां मरण्यांत सुख असते' अशा अर्थाचे सुभाषित माधवरावांच्या तोंडातून बाहेर आले. रात्री जेवण झाल्यावर वाचीत असतांना नेहमींची कळ आली. शेजारचे डॉक्टर धांवत आले. रमाबाई माधवरावांना सावरू लागल्या, पण उपयोग झाला नाही. एक रक्ताची वांति झाली आणि माधवरावांचा आत्मा त्यांचे शरीर सोडून गेला!

दुसऱ्या दिवशी सर्व देश दुःस्वसागरांत बुडून गेला. लो. टिळकांनी माधवरावांची योग्यता सांगितली. “महाराष्ट्र देश म्हणजे त्या वेळी थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या त-हेने ऊब दिली असतां तो पुन्हां सजीव होईल व हातपाय हालवू लागेल, याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतीनी त्यास पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरितां जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावांनीच केली असे म्हटले पाहिजे." ना. गोखले यांनी उद्गार काढले, "Mr. Ranade was one of those men who appear, from time to time, to serve as a light to guide the footsteps of our weak and erring humanity.”
१६ जानेवारी १९०१ranade

इतिहास