धनवापसी : एक आयडिया

साहना's picture
साहना in काथ्याकूट
6 Feb 2021 - 5:55 am
गाभा: 

दिल्ली मधील मोक्याच्या जागी खालील समाधी स्थळें आहेत.

राज घाट : ५ एकर (गांधी)
शांतीवन : ५२ एकर (नेहरू)
विजय घाट : ४० एकर (शास्त्री)
शक्तिस्थळ : ४५ एकर ( इंदिरा)
समता स्थळ : १२ एकर
किसान घाट : १९
वीर भूमी: १५
एकता स्थळ : २२

एकूण जागा : २१० एकर.

दिल्लीतील सर्वांत प्राईम प्रॉपर्टी म्हणजे सर्कल A चा दर आहे ७ लाख रुपये प्रति चौरस मीटर पण आपण इथे २ लक्ष रुपये किंमत जर धरली (माझे गणित रेट च्या बाबतीत चुकलेले असू शकते, मिपा वरील लेंड शार्क नि मत व्यक्त करावे) तरी होतात १७ हजार कोटी रुपये. (गांधीजींच्या समाधीवर टॉवर बांधला तर काही व्यक्ती मोठा प्रीमियम देतील पण तो भाग वेगळा)

हाती मरा तो सव्वा लाख का म्हटले जाते पण झेल सिंग सारखे काहीही कर्तृत्व नसलेले नेते दिल्लीत मेल्यानंतर सुद्धा गरीब भारतीय जनतेची जागा बळकावून बसले आहेत.

१७ हजार कोटी रुपयांत बरेच काही केले जाऊ शकते. हा जनतेचा पैसा आहे आणि तो विनाकारण कुणाच्या थडग्यावर गुंतून पडावा हे दुर्दैव आहे.

हि सर्व थडगी त्या त्या नेत्याच्या जन्मस्थानी किंवा भारतातील सर्वांत अविकसित अश्या गावांत न्यावीत आणि दर वर्षी फुले वगैरे नाचण्याचे नाटक कर्णयसाठी मंडळी जेंव्हा तिथे जातील तेंव्हा एका निमित्ताने त्या भागांत रस्ते वगैरे बांधले जातील. देशांतील सर्वांत अविकसित गांवांची नावे पाहिजेत तर गांधी परिवाराने कुठून निवडणूक लढवली आहे ते पाहावे. बेल्लारी, अमेठी, रायबरेली, वायनाड इत्यादी.

अर्थांत हि स्टेप १ आहे. हे झाल्यानंतर राष्ट्रपती भवन सुद्धा रिसॉर्ट मध्ये हलविण्यात येऊन राष्ट्रपतींनी उगाच राजवाड्यांत न राहता सामान्य सरकारी घरांत जावे. साधी राहणी उच्च विचारसरणी हि बापूंची शिकवण अमलांत आणायची हीच वेळ आहे.

त्यानंतर समस्त IAS आणि त्यांच्या पिळवळीला सुद्धा त्यांच्या बंगल्यांतून बाहेर काढून मोठ्या हाय राईज टॉवर मध्ये जागा दिली पाहिजे आणि त्याचे भाडे त्यांच्या पगारातून कट केले पाहिजे. ह्या सर्व बदलातून किमान २-४ लक्ष कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. एकदा दिल्लीत हे साध्य केले कि प्रत्येक राज्यांत सुद्धा हाच मॉडेल राबवावा आणि सुरुवात थडगी आणि राजभवन ह्यावरून करावीत.

चर्चा होऊ द्या.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 6:07 am | मुक्त विहारि

अशा अनेक जागा, मौक्याच्या ठिकाणी आहेत ....

आमच्या डोंबोलीत, ऐन मोक्याच्या ठिकाणी, जुने, मोडकळीस आलेले सरकारी सुतिकागृह आहे...

एक नव्या पैशांचा देखील खर्च न करता, तिथे 10-12 मजली, अतिशय उत्तम, सरकारी इस्पितळ बांधता येईल....

तळमजला, धंदा करण्यासाठी...

7 मजली, हाॅस्पीटल आणि उरलेले सगळे मजले, रहिवासी लोकांना...

या स्मारकांच्या निमीत्ताने शहरात बगीचे, मोकळ्या जागा शिल्लक राहील्यात. तीथेही लोकवस्ती झाली तर गर्दी, प्रदुषण, एअर क्वालिटी, पाणी, सांडपाणी ईत्यादी समस्या येतील.

न्युयॉर्कच्या ८४३ एकर सेंट्रलपार्कची आठवण झाली. ती जागा तर कैक ट्रीलियन डॉलर्सची आहे. त्यातला १ इंच सुद्धा 'डेव्हलपमेंटला दीला नाही अजुन.

अशा मोकळ्या जागा पावसाचे पाणी शोषुन घेतात, तेथील झाडे ऑक्सीजन निर्माण करतात, म्हणुन त्यांना शहरांची फुफ्फुसे म्हणतात असे ऐकले आहे.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 8:48 am | मुक्त विहारि

आणि

घराणेशाहीची स्मृती जपणारी स्थळे वेगळी ...

मानसिक गुलामगिरी निर्माण करायला अशी स्मारके उत्तम असतात ...

हे काय पटत नाही.

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

काँक्रीटचे जंगलच कशाला करायचे ?
मैदाने तयार करा, उद्याने तयार करा, जलाशय बांधा, सोलर पार्क तयार करा, मोजकी ऐसपैस कार्यालये तयार करा !

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 7:53 am | मुक्त विहारि

50% बांधकाम आणि 50% पर्यावरण

धागाकर्ती ने त्या जागा विकुन धनवापसी सुचवली आहे. ७ लाख रुपये चौ मी देउन मैदाने अथवा जलाशय कोण करणार? एवढे पैसे देणारा एक एक ईंच जमिनीवर बांधकाम करुन आपले पैसे वसुल करणार.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 12:17 pm | मुक्त विहारि

बांधा, वापरा आणि हस्तांतर करा ....

भंकस बाबा's picture

6 Feb 2021 - 9:06 am | भंकस बाबा

सहमत आहे.

चौकटराजा's picture

6 Feb 2021 - 9:47 am | चौकटराजा

घटनेत बदल करून ज्याला दोन पेक्षा अधिक मुले असतील त्याला मनरेगा, झोपडपट्टी निर्मूलन ,रेशनवरचे धान्य ,सरकारी दवाखान्यातील स्वस्त औषधे या सारख्या सवलती मिळणार नाहीत. असा कायदा का करीत नाही !?( कारण जितकी गरीब मुले जास्त तितकी फिरविता येणारी मते जास्त ).

घटनेत बदल करून २८ मजली इमारत फक्त पाच सहा व्यक्तीचे कुटुम्बास बान्धायला परवानगी नाही , दोन ते तीन घरे असतील तर त्यापलिकडे परवानगी नाही असा कायदा का करीत नाही ?( कारण अशाने बिल्डर पोसता येतात व त्यान्चे कडून मुबलक पैसा निवडणुकीसाठी मिळतो !) एकूणात लोकशाहीचा विजय असो ,पी एम ला अक्कल नाही हे म्हणण्याच्या स्वातन्त्र्याची किंमत तर द्यावयास हवी ना ? ती अशी द्यायची मग !

अफाट लोकसंख्या, ही राष्ट्राला घातकच असते ....

Rat Psychology ....

पण, कुणी आपल्या कुटुंबासाठी किती घरे विकत घ्यावीत, ह्याला बंधन नसावे...

माझ्या मते मुलांवर सुद्धा बंधन अजिबात नसावे. जास्त लोंकसंख्या हि मोठी समस्या नाही किंवा लोकांनी जास्त घरे घ्यावीत ह्यातही काहीच समस्या नाही. अंबानीला २५ मुले असली तरी चांगलेच आहे किंवा सचिन ला १० मुले असली तरी कुणाला फरक पडत नाही. उलट फायदाच आहे.

त्याच वेळी गरीब मुलांना सुद्धा भविष्य नाही असे नाही. अनेक कतृत्ववान मुले गरिबीत जन्म घेऊन सुद्धा पालकांची तिसरी किंवा चौथी संतान होती. वाढणारी लोकसंख्या हि समस्या वाटली तरी प्रगती साठी जगाच्या पाठीवर जितके मनुष्य जास्त तितका प्रगतीचा वेग सुद्धा वाढत असतो.

प्रत्येक बंधनाचे सेकेंड ऑर्डर इफेक्ट्स असतात जे आमच्या विचारशक्तीचा पलीकडील असतात. बिल्डर लोकांविषयी सामान्य माणसांना खूपच तिटकारा आहे पण एकूण बांधकाम क्षेत्र अवाढ्यव आहे म्हणूनच त्यांत लोक गुंतवणूक करतात, बँक लोन देते इत्यादी. काहीही जबरदस्ती करून मागणी कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे धरणाचा तुटवडा होऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम होण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय गृहबांधणीत जाणारा पैसा मग दुसऱ्या क्षेत्रांत जाईल, खोटेपणा करून तिसऱ्याच्या नवे फ्लॅट घेण्याची पद्धत निर्माण होईल किंवा स्वतः एक कंपनी स्थापन करून त्याच्या द्वारे ४ फ्लॅट लोक घेतील आणि बरेच काही साईड इफेक्ट्स आहेत. एक व्हेरिएबल बदलले तर शेकडो इतर व्हेरिएबल्स बदलतात आणि आपल्याला पाहिजे तसे शेवटी होत नाही.

Rajesh188's picture

6 Feb 2021 - 1:47 pm | Rajesh188

लोकसंख्या वाढली की पृथ्वी वरील नैसर्गिक साधन संपत्ती वर परिणाम होतो.ती जास्त वापरली जाते आणि नैसर्गिक संतुलन बिघडते.
पाणी,हवा,आणि शेवटी अन्न सुद्धा दूषित होते.
पैसे श्रीमंती हे मानव निर्मित आहेत त्याला सजीव सृष्टी च्या पालन पोषण करण्यात काडी ची किंमत नाही.
अंबानी ची चार पोर पाणी पिणार नाहीत काय,अन्न खाणार नाहीत काय,श्वास घेणार नाहीत काय.
की फक्त पैसे च खाणार.
पृथ्वी जास्त दिवस राहण्याच्या लायकीची राहणार नाही कारण माणसा कडून नैसर्गिक साधन संपत्ती चि लूट अमर्याद होत आहे.
आणि नैसर्गिक साधन संपत्ती माणूस बनवू शकत नाही.
1mm आकाराचा मस्तीचा कण सुद्धा माणूस बनवू शकतं नाही.

आपल्या चिकटपणाची दाद द्यावीशी वाटते. कितीही अपमान झाला, लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेचे वाभाडे काढून त्याची लक्तरे मिपावर टाकली तरी निलाजरे पणाने पुन्हा आपण आपला मूर्खपणा घेऊन साई मंदिराच्या बाहेरील भिकाऱ्या प्रमाणे पुन्हा उभे राहता. कुठून येते बरी हि चिकाटी ?

> लोकसंख्या वाढली की पृथ्वी वरील नैसर्गिक साधन संपत्ती वर परिणाम होतो.ती जास्त वापरली जाते आणि नैसर्गिक संतुलन बिघडते.

* नैसर्गिक संतुलन असे काहीही नसते आणि पृथ्वीवर कधीही संतुलन नव्हते. पृथ्वीवरील ९९% सजीव मानव निर्माण होण्याच्या आधीच नामशेष झाले होते.

* नैसर्गिक संपत्ती असाही काही प्रकार नसतो. मानव आहे म्हणून संपत्ती हि संकल्पना आहे. मानवी तंत्रज्ञानाने जगांतील सर्व प्रकारची संपत्ती वाढत आहे. अगदी फॉरेस्ट सुद्धा भारत आणि चीन मध्ये वाढत आहे.

> पाणी,हवा,आणि शेवटी अन्न सुद्धा दूषित होते.

अजिबात नाही. फक्त काँग्रेस सारखे समाजवादी आणि साम्यवादी लोक सत्तेत असतात तेंव्हाच हे होते. थेम्स नदी असो वा हडसन ५० वर्षे मागे होती त्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. श्रीमंत देशांत निसर्गाची काळजी जास्त चांगल्या प्रमाणात घेतली जाते.

> अंबानी ची चार पोर पाणी पिणार नाहीत काय,अन्न खाणार नाहीत काय,श्वास घेणार नाहीत काय.

हो पण स्वतःच्या पैश्यांची घेऊन खातील आणि पितील. सध्या आंदोलन करणाऱ्या दलालांच्या पोरांच्या प्रमाणे फुकटे असणार नाहीत.

> पृथ्वी जास्त दिवस राहण्याच्या लायकीची राहणार नाही कारण माणसा कडून नैसर्गिक साधन संपत्ती चि लूट अमर्याद होत आहे.

हि गोष्ट मागील २०० वर्षांपासून डावी मंडळी करत आहेत. पृथ्वी नष्ट होणार आहे आणि तसे नको असेल तर सत्ता आणि संपत्ती आमच्या हाती द्यावी अशी शेवटी मागणी केली जाते. ग्रेटा काय किंवा अल गोर काय, हि नालायक मंडळी हेच सर्प अंजन सर्वाना विकत आहेत.

> 1mm आकाराचा मस्तीचा कण सुद्धा माणूस बनवू शकतं नाही.

हे १००% असत्य आहे, आपल्या डोक्यांत मृत्तिका खूप प्रमाणात निर्माण होत आहे असे आपली प्रतिक्रिया पाहून वाटते.

तुमचा कंपू तयार आहे इथे पाच सहा लोकांचा त्यांना इतरांचे प्रतिसाद बकवास वाटत असतात.
तुम्ही वर दिलेला प्रतिसाद बिनडोक पणाच कळस आहे पण तुमच्या कंपू तील लोकांना तसे जाणवणार नाही.
पर्यावरण चळवळ डावे पक्ष चालवतात हे तुमचे मत बौद्धिक दिवाळखोरी चे प्रतीक आहे.
निसर्ग संकटात नाही हे डावे किंवा paryaranvadi उगाचच तशी भीती दाखवत आहेत .
काय म्हणावं तुमच्या विचार शक्ती ल.
आणि शेवटी येथील एक पण वस्तू न घेता 1mm मातीचा कण बनवण्याची पद्धत जरा सर्व च लोकांना सांगा.
तुमच्या अफाट बुध्दी matteche दर्शन होवू ध्या.
अंबानी विकत घेतील पाणी आणि हवा पैसे देवून.
मान्यता काढली की जी कृत्रिम मान्यता आहे फक्त मानण्यावर आहे.
तर मान्यता काढली तर पैस्या ची किंमत 0 आहे .
झाडाच्या एका पानाची पण किंमत नाही त्या कागदाच्या 2000 रुपयाच्या नोटी ला.

> झाडाच्या एका पानाची पण किंमत नाही त्या कागदाच्या 2000 रुपयाच्या नोटी ला.

ठीक आहे. मी पाने देते तुम्ही २००० रुपयांची नोट द्या.

सॅगी's picture

6 Feb 2021 - 9:36 pm | सॅगी

झाडाच्या एका पानाची पण किंमत नाही त्या कागदाच्या 2000 रुपयाच्या नोटी ला

रस्त्यावर उधळा की!!! ज्यांना किंमत समजत असेल ते घेऊन जातील...

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 4:48 pm | मुक्त विहारि

नैसर्गिक साधन संपत्ती वर परिणाम होतो.

ह्याला सहमती आहे ....

एक उदाहरण देतो .... 100 माणसांना पुरेल इतकीच जमीन अन्न पुरवठा करत आहे ...

आता, त्याच जमिनीवर, 300-350 माणसे अवलंबून राहायला लागली तर, अन्नपुरवठा, योग्य प्रमाणात मिळणार नाही...

जर इच्छा असेल तर, Rat Psychology बद्दल जरूर वाचा ... मला जर लिंक मिळाली तर पाठवतो ....

@ राजेश,

मी कंपूबाज नाही, तुमचे विचार पटत असतील तर, विचारांना पाठिंबा नक्कीच देईन .... तारतम्यता हा मनुष्याचा स्थाईभाव असावा ...

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 4:59 pm | मुक्त विहारि

येथील कंपू बहद्धर त्याची वाहवा करतात त्या मुळे सुमार बुद्धिमत्ता असून सुध्धा ती व्यक्ती स्वतःला खूप हुशार समजू लागते.
तसाच प्रकार घडत आहे.

हो सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन मला वारंवार घडत आहे !

विंजिनेर's picture

10 Feb 2021 - 2:01 am | विंजिनेर

मिपावर थांबण्याचा आग्रह नाही. या आता..

chapala

येथील कंपू बहद्धर त्याची वाहवा करतात त्या मुळे सुमार बुद्धिमत्ता असून सुध्धा ती व्यक्ती स्वतःला खूप हुशार समजू लागते.
तसाच प्रकार घडत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Feb 2021 - 5:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राजघाट्,वीरभुमी विकणार का? छान.
प्रत्येक राज्यात एक आलिशान राजभवन असते. निव्रुत्त करून वा होउन सत्ताधारी पक्षाची री ओढण्यासाठी हे पद असते. राज्यपालास एखादा २ बी एच के मध्ये बसवुन २५/३० राजभवने विकली तर बक्कळ पैसा मिळेल.

राष्ट्रपती भवन नंतर त्यांचाच नंबर. या सर्वांचे Airbnb करायचे.

"राहा राजभवन रिसॉर्ट मध्ये ३ दिवस आणि ४ रात्री फक्त ९९९ मध्ये".

"राधाकृष्णन टी रूम मध्ये फ्री ब्रेकफास्ट आणि, अब्दुल कलाम गॅलरीत अमर्यादित स्वीट डिश बफे, फक्त ९९९९ रुपयांत"

"लग्न करावे तर मुघल गार्डन मध्ये ... "

टॅग लाईन्स सुद्धा रेडी आहेत.

चौकटराजा's picture

6 Feb 2021 - 6:12 pm | चौकटराजा

मूळ लेखात उदाहरण भारतातील दिले आहे म्हणून माझा प्रतिसाद तसा आहे ! म्हणजेच तो तसा सापेक्ष आहे ! बंधन अनैसर्गिक असेल ते फक्त तात्विक नैतिक भाषेत ! निसर्ग हा खरे तर बंधनावरच आधारलेला आहे उदा . माणसाला ऑक्सीजन घेऊन जगण्याचे बंधन ! समुद्राला खालून रेटा मिळाला की सुनामीत रूपांतरीत होण्याचे बंधन . तेंव्हा मुक्त पणाचा फुकट आव आणायचा कशाला ?

अर्थशास्त्रात एक नियम आहे तो असा की कोणतीच गुंतवणूक ही सर्वदा आदर्श नाही तशी संपत्तीही नाही अशी मी त्याला पुस्ती जोडेन ! जेंव्हा रेल्वे रूळ टाकण्याचे काम माणसे करीत होती त्यावेळी चीन मधील लोकसंख्या कॅनडात काम करीत होती त्यावेळी ती चीनची संपदाच होती आज ती लायबिलीटी आहे ! युरोपात जर चक्कर मारली तर ही गावेच्या गावे मृत झाली आहेत काय ? असा प्रश्न पडावा इतकी लोकसंख्या आजही कमी आहे ! स्वीस मध्ये बंगला हा नियम असून फ्लॅट हा अपवाद आहे ! त्याचे कारण तिथे मुबलक जमीन आहे असा नाही तर लोकसंख्याच कमी आहे !

भारत व चीन असे दोनच जगात देश आहेत ज्यांना लोकसंख्या एका समस्येने गेली शेकडो वर्षे ग्रासलेले आहे पण विज्ञानात प्रगती ज्यावेळेपासून होऊ लागली व नवनवीन आकर्षणे ( त्यातील एक २८ मजली ) उत्पन्न होऊ लागली तशी समाजातील सर्वच जणांची हाव वाढू लागली आहे . सुखी जीवनमान वेगळे व हाव वेगळी ! सुखी जीवनात पुरेसे घर ,पुरेसे अन्न ,समाजोपयोगी व उपजिविकेस युक्त असे शिक्षण ,खेळण्यास क्रीडांगणे , बागा ,स्वच्छ परिसर व मुख्यतः आरोग्य या गोष्टी येतात कारण या सर्वांचा प्राधान्याने निसर्गाशी ,माणसाच्या जगण्याशी संबंध येतो . लोकसंख्या जास्त झाली मग रोजगार समस्याच वाढली मग डान्स बार ,दारू ढोसायचे बार ,फटाक्यांची आतषबाजी,, सहस्त्र भोजने यांचे समर्थ करायचे ही भांडवल शाहीची टिपिकल मांडणी असते ! त्यासाठी मग राजघाट विकायचे पर्याय सुचतात !

काळे मांजर's picture

6 Feb 2021 - 8:23 pm | काळे मांजर

सहमत

ग्रामीण दोन पिढ्यानी 20 एकर वर 4 मुले मग आणखी 4 प्रत्येकी करून 2 पिढ्यात 20 वारस करून शेताचे अप्पे पात्र करून ठेवले आहे
मोदी आणि योगी हेही त्यांच्या घरचे अप्पे पात्रातले अप्पेच आहेत,
त्यामाने नेहरू गांधी कुटुंबच एकच लग्न व 2 च मुले तत्व पाळते

डॅनी ओशन's picture

6 Feb 2021 - 8:31 pm | डॅनी ओशन

वेलकम ब्याक

Perfectly balanced, as all things should be.
=))

काळे मांजर's picture

6 Feb 2021 - 8:39 pm | काळे मांजर

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 10:56 pm | मुक्त विहारि

मारूती ते बोफोर्स

आता तर, आंतरराष्ट्रीय ....

इटली ते बॅन्काॅक ....

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा

चौरा साहेब,
शेवटचा परिच्छेद पटला आणि आवडला.

> ! सुखी जीवनात पुरेसे घर ,पुरेसे अन्न ,समाजोपयोगी व उपजिविकेस युक्त असे शिक्षण ,खेळण्यास क्रीडांगणे , बागा ,स्वच्छ परिसर व मुख्यतः आरोग्य या गोष्टी येतात कारण या सर्वांचा प्राधान्याने निसर्गाशी ,माणसाच्या जगण्याशी संबंध येतो . लोकसंख्या जास्त झाली मग रोजगार समस्याच वाढली मग डान्स बार ,दारू ढोसायचे बार ,फटाक्यांची आतषबाजी,, सहस्त्र भोजने यांचे समर्थ करायचे ही भांडवल शाहीची टिपिकल मांडणी असते ! त्यासाठी मग राजघाट विकायचे पर्याय सुचतात !

जगांतील कुठला समाज असा आहे जिथे हाव नाही ? किंवा भारतांतच असा कुठला काळ होता जेंव्हा हाव नव्हती ? सहस्त्रभोजने नव्हती, महिना भर चालणारी लागणे नव्हती, माङया नव्हत्या, तमाशे नव्हते ?

मुळात हाव आहे म्हणून जी काही थोडीफार सुबत्ता किंवा प्रगती झालीय ती शक्य झाली. सुबत्ता आल्यामुळे हाव निर्माण होते हे गृहीतक चूकच नव्हे तर घातकही वाटतं.

पुरेसे, योग्य प्रमाणात, आदर्श तितके उत्पन्न मिळाले..(इक बंगला बने न्यारा).. ना कम ना ज्यादा... की तिथेच वाढीची किंवा "हावे"ची सोयीस्कर इतिश्री असे काही व्हावे ही अपेक्षा भाबडी वाटते.

साहना's picture

8 Feb 2021 - 12:41 pm | साहना

सहमत !

आपली जी स्थिती आहे त्यांत आपण संतुष्ट नसतो आणि म्हणूनच काही न काही करून आपली सध्याची स्थती सुधारावी म्हणून आपण प्रयत्न करतो. ह्याला काही लोक हाव म्हणत असले तरी संपूर्ण मानवी सभ्यतेचा पाया आहे.

त्याशिवाय सुबत्ता आली कि इतर गोष्टीं सुद्धा लोक वेळ घालायला लागतात उदाहरणार्थ पुस्तके विकत घेऊन वाचणे, कविता लिहिणे, योगा करणे, पशुसंवर्धन, इत्यादी. आज किल्ल्यांच्या प्रति मराठी माणूस खूपच जागरूक आहे कारण मराठी माणसाकडे ते करायला वेळ आहे आणि आर्थिक सुबत्ता हे त्याचे एक कारण आहे.

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 1:14 pm | चौकटराजा

सुबत्ता नव्हती त्यावेळी लायबरीतून पुस्तके घेऊन समाज वाचत होताच की ! १९६० साली पोपट पाळणारे होतेच की ! योगा ला तर सुबत्तेची गरज काय ? वाचनाची आवड ,संगीताची आवड,, व्यायामाची आवड , पोहण्याची आवड , गप्पा मारण्याची आवड ,संशोधनाची आवड ,विचारमंथनाची आवड याचा सुबत्तेशी काही संबंध नाही ! उदबत्ती नव्हती त्यावेळीही माणसाला मरव्याचा सुगंध माहीत होता ! आणि बाकर वडी माहित नव्हती त्यावेळी हुरडाही !!!

सुबत्ता वाढली की हाव वाढते याचे कारण ही पुरी होण्याची शक्यता वाढते . माझ्या ऑफिसात एक मुलगी होती ती थंडीच्या दिवसात तीस दिवसात तीस वेगवेगळे स्वेटर्स घालून येई ! याला मी हाव म्हणतो ! स्वेटर घालणे ही गरज आहे नैसर्गिक ! पण ... बाकी सारे म्हणजे हावच !

एक उदाहरण आणखी देतो .. माझा एक लहानपणापासून काहिही कमी ना पडलेला भाचा आहे ! त्याला मी भूक कमी करणाऱ्या " गॅस्ट्रिक बँड " ऑपरेशन चे महत्व समाजावून देत होतो ,तर तो मला म्हणाला म्हणजे अशी ऑपरेशन करून भूक कमी करणे हे अनैसर्गिक नाही का,? मी त्याला म्हणालो १२०० कॅलरीची गरज शरीराला असताना दररोज ३००० कॅलरी ची खादाडी करून लठ्ठ होत रोगांना निमंत्रण देणे हे नैर्सर्गिक आहे का ते अगोदर सांग !

ह्या मुद्यांचे खंडन करणे फारच म्हणजे फारच सोपे आहे.

> सुबत्ता नव्हती त्यावेळी लायबरीतून पुस्तके घेऊन समाज वाचत होताच की !

१९४७ साली ज्या काळी भारत पूर्णपणे दळिद्री होता त्याकाळी फक्त १२% लोक साक्षर होते. कोण लायब्ररीत जाऊन पुस्तके घेत होता ? आज काल मोबाईल मुळे कुठलेही पुस्तक घरबसल्या वाचणे शक्य झालेच आहे पण सुमारे ८०% जनता वाचण्यास सक्षम झाली आहे. से सर्व अर्थी सुबत्तेने शक्य झाले आहे.

> १९६० साली पोपट पाळणारे होतेच की

भारतांतील वन्यजीवांची संख्या १८५० ते १९५० दरम्यान झपाट्याने कमी झाली. कायदे करून सुद्धा फरक पडला नाही. पण २००६ पासून २०२० पर्यंत बहुतेक वन्यजीवांचे संवर्धन होऊन त्यांची संख्या वाढली आहे. हे फक्त सुबत्तेने शक्य झाले आहे. मागील ५० वर्षांत सर्वप्रथम भारतातील फॉरेस्ट कव्हर वाढले आहे. हे सर्व सुबत्तेने शक्य झाले आहे.

> वाचनाची आवड ,संगीताची आवड,, व्यायामाची आवड , पोहण्याची आवड , गप्पा मारण्याची आवड ,संशोधनाची आवड ,विचारमंथनाची आवड याचा सुबत्तेशी काही संबंध नाही

पूर्णतः चुकीचा निष्कर्ष आहे. मोकळा वेळ असतो तेंव्हांच काव्य शास्त्र विनोद शक्य असतो. अर्थांत तुम्ही आम्ही कदाचित चांगल्या घरांतून असाल पण भारतातील बहुतेक जनता ५० वर्षे मागे निरक्षर होती. इथे कसली आवड जोपासण्याची सवड होतीच कुणाला ? भारतातील महिलांना विशेषतः कुठे वेळ होता ? वॉशिंग मशीन ह्या साध्या यंत्राने जगभर महिलांना वर्षाला कित्येक तास मोकळा वेळ निर्माण करून दिला आहे. हा व्हिडीओ पहा : https://www.ted.com/talks/hans_rosling_the_magic_washing_machine/transcr...

क्रीडा क्षेत्राचे उदाहरण घेतले तर मागील २० वर्षां भारतांत क्रीडाक्षेत्र बऱ्यापैकी वाढले आहे आणि भारत विविध स्पर्धांत नेत्रदीपक प्रगती करत आहे. ५० वर्षे मागे कुठे होती भारताची सायना नेहवाल ? पुरुषांचे सोडून द्या पण निव्व्ल स्त्री लेखिका असलेली पुस्तके, स्त्री निर्देशक असलेले चित्रपट, स्त्रियांनी निर्माण केलेली पेटंट्स, एकूण योगा स्टुडिओ (दर डोई), एकूण शास्त्रीय संगीताचे आणि नृत्याचे क्लासेस, ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

> उदबत्ती नव्हती त्यावेळीही माणसाला मरव्याचा सुगंध माहीत होता

तुम्हाला ठाऊक असेल हो. १९४७ साली भारतातील किती लोकांनी साबण लावून अंघोळ केली असेल (वर्षाला एकदा) असे तुम्हाला वाटते ? १९७० साली आपले केस थोडे रखरखीत होतात म्हणून कुठल्या तरी गृहिणीला वाईट वाटले असेल, पण चांगले तेल घेण्याची तिची क्षमता नसेल किंवा शाम्पू तिने पहिला सुद्धा नसेल. त्यामुळे बिचारी मन मारून झोपी गेली असेल.

> आणि बाकर वडी माहित नव्हती त्यावेळी हुरडाही

१९४७ साली किती लोक रात्रीचे जेवण परवडत नाही म्हणून उपाशी पोटी झोपी गेले असतील आणि तेच प्रमाण २०२० मध्ये किती असेल ?

> माझ्या ऑफिसात एक मुलगी होती ती थंडीच्या दिवसात तीस दिवसात तीस वेगवेगळे स्वेटर्स घालून येई ! याला मी हाव म्हणतो ! स्वेटर घालणे ही गरज आहे नैसर्गिक ! पण ... बाकी सारे म्हणजे हावच !

तुम्हीच दुसऱ्याला काय म्हणता ह्याला काहीही महत्व नाही. एका माणसाची हाव ती दुसऱ्याची गरज असते. आपल्याला सगळे कळत नाही आणि दुसऱ्याचे भले कश्यात आहे हे आपल्याला ठाऊक नाही अशी किमान विनम्रता आपल्या अंगी असावी. कारण ह्या गोष्टींत त्या व्यक्तीला आनंद मिळतो ते ती व्यक्ती आपल्या पैश्यांची घेतील तुम्ही त्याला हाव म्हणता म्हणून ती हाव होत नाही.

काही लोक २ किलोमीटर गाडी चालवून जिम मध्ये जातात आणि मग ४ किलोमीटर ट्रेडमिलवर धावून पुन्हा २ किलोमीटर गाडी चालवून घरी येतात. दर दिवशी ४ किलोमीटर पाणी घेऊन चालणाऱ्या महिलेला ती हाव वाटेल तर कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणाऱ्या माणसाची ती गरज आहे.

मी लहान असताना आमच्या एका नातलगाकडे अशी नळ व्यवस्था होती जिथे काही नळांतून नेहमी गरम पाणी यायचे. मला ती हाव वाटत होती. आज असल्या नळांशिवाय माझे चालत नाही.

त्यामुळे प्रेजुडीस कमी करा असाच सल्ला देईन.

कारण सर्वच गृहिते फक्त गृहीते आहेत . आज वाचनाची आवड कमी झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे ग्रंथ व्हवहार मात्र वाढला आहे हे माझेच नव्हे तर या क्षेत्रातील प्रकाशकांचे मत आहे. लायब्ररीतील एक पुस्तक १०० लोक वाचत होते . मोबाईल वर किती लोक पुस्तके वाचत असतील ...?

१९४७ साली भारत देश तुम्ही म्हणता इतका दरिद्री नक्कीच नव्हता . मी १९५३ साली जन्माला आलो व एकूण गरिबीतच वाढलो तरी तुमचे संदाज साफ चूक आहेत . खेड्यात व शहरात अन्न कमी अशी स्थिती नव्हती. निवड नव्हती हे खरे ! आज सुबत्येच्या काळात भारतात कुपोषण नाही असा तुमचा शोध आहे का ?

एका माणसाची हाव दुसर्याची गरज ... ? मग चोर देखील निष्पाप म्हणावयास हवे कारण चोरी ही त्याची गरज म्हणावयास हवी ! यालाच समाजविचारहीन विचारसरणी म्हणतात ! एका माणसाची हाव ही दुसर्याची गरज .. याचेच पुढेच प्रतिपादन दुसर्यास संधी .. सबब कोणताही धंदा अगदी शस्त्र तस्करीचा काढा त्यातून रोजगार निर्माण होतोच हे अमेरिकन तत्वज्ञान परफेक्ट तुमचात रुजलेय ! वा !

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 4:57 pm | मुक्त विहारि

पुर्वी, चुका,चाकवत अशा पालेभाज्या सहज मिळत असत...

आजकाल, ह्या पालेभाज्या मागवाव्या लागतात...

गावठी गवार, गावठी भेंडी, हे तर नामशेष झाले आहेत ..

तांदूळाची व्हरायटी कमी झाली...

खपली गहू तर खपूनच गेला ...

कसदार ज्वारी आणि बाजरी, निघून गेली....

रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्यामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, कीटकांच्या काही जाती नामशेष पण झाल्या असतील ...

जास्त लोकसंख्या ही हळूहळू विनाशाकडेच नेणार ....

आपण फक्त, ह्या ना त्या रूपात, रसायनेच खात असतो...

खूपच वैचारिक गफलत होत आहे. हे प्रकरण माझ्या हाताच्या बाहेर आहे तरी सुद्धा पब्लिक साठी स्पष्टीकरण देते.

> लायब्ररीतील एक पुस्तक १०० लोक वाचत होते . मोबाईल वर किती लोक पुस्तके वाचत असतील

१२% साक्षरता आणि ८०% साक्षरता ह्यांत कुठल्या ग्रुप मध्ये जास्त पुस्तके (दर डोई) वाचली जात असतील असे तुम्हाला वाटते. आंतर्जालाने फक्त पुस्तकेच वाचली पाहिजेत असे नाही मिपा सारख्या संकेत स्थळावरील वरील लेख सुद्धा गृहीत धरावेत.

> १९४७ साली भारत देश तुम्ही म्हणता इतका दरिद्री नक्कीच नव्हता . मी १९५३ साली जन्माला आलो व एकूण गरिबीतच वाढलो तरी तुमचे संदाज साफ चूक आहेत . खेड्यात व शहरात अन्न कमी अशी स्थिती नव्हती.

तुम्हाला पाहिजे तो पॅरामीटर घ्या .भारत १९४७ साली आज आहे त्यापेक्षा प्रचंड गरीब होता. स्वच्छ पिण्याचे पाणी हा एकाच साधा सोपा पिरॅमिटर घेतला तरी आज दरडोई जास्त लोकांना चांगले पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. (आपला स्वतःचा अनुभव काय आहे हा फक्त anecdotal अनुभव आहे).

> आज सुबत्येच्या काळात भारतात कुपोषण नाही असा तुमचा शोध आहे का ?

प्रचंड प्रमाणात कुपोषण आहे पण दरडोई प्रमाण खूपच कमी झाले आहे. इतके कमी झाले आहे कि भारतीय लोकांची सरासरी उंची मागील १०० वर्षां सुमारे ५ सेंटीमीटर (महिलांसाठी) आणि ३ सेंटीमीटर (पुरुषांसाठी) वाढली आहे. त्याशिवाय कुपोषणाने होणारे बाल मृत्यू इत्यादींची संख्या कमी झाली आहे.

> मग चोर देखील निष्पाप म्हणावयास हवे कारण चोरी ही त्याची गरज म्हणावयास हवी

उगाच काहीही बरळू नका. चोरी अनैतिक आहे ह्यांत गरज आणि हाव ह्यांचा काहीही संबंध नाही. तुम्ही कोणाचा हिऱ्याचा हार चोराला किंवा ४ दिवस उपाशी राहिल्याने भूक असह्य होऊन हॉटेल मधील एक ब्रेड चोराला ह्यांत हाव किंवा गरज असल्या तरी दोन्ही बाबतीत ते कृत्य अनैतिक आहे कारण दुसऱ्याची खाजगी मालमत्ता तुम्ही हिंसेने किंवा खोटारडे पणा करून आपली केलीत.

माझ्या प्रत्युत्तरात मी लोकांनी आपला आनंद स्वतःच्या पैश्यांची कमवावा असे स्पष्ट लिहिले आहे पण वाचून लक्षांत घेण्याची क्षमता नाही तर मी काय करणार ?

> सबब कोणताही धंदा अगदी शस्त्र तस्करीचा काढा त्यातून रोजगार निर्माण होतोच हे अमेरिकन तत्वज्ञान परफेक्ट तुमचात रुजलेय ! वा !

ह्याला एकच उत्तर. "खिसलेली हे क्या ? " - लांबू आटा

डॅनी ओशन's picture

6 Feb 2021 - 8:20 pm | डॅनी ओशन

यकशेअटठयांशी प्रभूंची ट्रॅजेडी ! यकशेअटठयांशी खरोखरीच युगपुरुष. कोणत्याही कळपात ह्ये राजबिंडे यक्तिमत्व उठून दिसते. त्यामुळे, हेटर्स असणार, त्यात हाश्चर्य हो कसले ? ऐसी अक्षरे मध्ये पुरोगामी सुद्धा यांच्या न’व न’व्या खोड्या काढत असतात. तर, कमळवाल्यांची कर्मभूमी मिपावर सुद्धा यांचा न 'साहण्या'इतका हप्मान होत असतो.
थोर व्यक्ती चुकीच्या वेळेत जन्मला कि काय होते ह्याचे अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे यकशेअटठयांशी प्रभू.

सॅगी's picture

6 Feb 2021 - 9:38 pm | सॅगी

२००० रुपये आणि झाडाची पाने यातला फरक न समजणार्‍याबरोबर अजुन काय होणार?

Rajesh188's picture

7 Feb 2021 - 10:30 am | Rajesh188

कलियुगात सत्य कोणाला पचत नाही असत्य आणि खोटी स्तुती लोकांना आवडते .
काळा चा परिणाम आहे तुम्ही आम्ही काही करू शकत नाही.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 12:01 pm | मुक्त विहारि

कॉंग्रेसच्या काळात तर हे प्रमाण खूपच वाढले होते ....

सॅगी's picture

7 Feb 2021 - 12:07 pm | सॅगी

खोटे हे खोटेच असते, आणि रेटून बोलल्याने ते खरे होत नाही.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 12:16 pm | मुक्त विहारि

नेहरूंना सगळे समजते, असेच बिंबवल्या गेले होते...

जनता भुलली होती...

चीनचे मिचमिचे डोळे आणि भारतीय जनतेचे डोळे, एकदमच उघडले...

आणि काय दुसरे.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 12:26 pm | मुक्त विहारि

जसे वाचन, तसेच विचार ...

Rajesh188's picture

7 Feb 2021 - 12:55 pm | Rajesh188

कमल संदेश
जास्त वाचनात आले की विचार पण तसेच होतात.
त्या साठी चोफेर वाचन पाहिजे म्हणजे संतुलित विचारधारा निर्माण होवून दृष्टी सुधारते.

लोका सांगे, ब्रह्मज्ञान.... स्वतः कोरडे पाषाण .....

तुम्ही नुसताच, कमल संदेश वाचलात, आचरणात पण आणा ...

बाय द वे,

बटाट्या पासून सोने काढण्याचे मशीन आले तर, खरेदी करणार का?

हे काय मॅटर आहे हो ? कसले मशीन ?

आपल्या संतुलित आणि चौफेर ज्ञानासाठी आपण काय वाचता हे आम्हाला सांगितले तर आमच्या सारख्या अज्ञ लोकांना मार्गदर्शन मिळेल. कारण आपली विचारक्षमता आणि तर्कक्षमता हि अमानवीय आहे असेच वाटत आले आहे. शक्तिमान प्रमाणे कुंडलिनी वगैरे जागृत केली आहे का ?

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 2:11 pm | मुक्त विहारि

सहमत आहे ...

ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद!
अर्थातच तो तुम्ही दिलाय म्हणुन विनोदी वाटला! अशीच आम्हा पामरांची करमणुक करत रहा प्रभु!!

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 12:14 pm | मुक्त विहारि

करोना समोरून हल्ला करतो, असे अगाध ज्ञान ग्रहण करणारे कार्यकर्ते, अजून मौलिक ज्ञान देतील...

आधी, तुम्ही लेखांची जबाबदारी घ्या, मी प्रतिसादांची खबरदारी घेतो, असे चालले होते ....

आता गाडी,

माझे प्रतिसाद, तुमची करमणूक .... अशा प्रगतीपथावर आली आहे ...

चिगो's picture

9 Feb 2021 - 1:22 pm | चिगो

हे आजकाल होत नाही का? फक्त नेहरुंच्या जागी दुसरे योग्य नाव टाकले की झाले.

कसं आहे ना, कि 'अवतारा'ला भुलणे, ही आपल्या समाजाची आवड आहे. त्यामुळे नवे नवे अवतार आणि नवे नवे भुलणारे तयार होतच असतात.

बाकी चालू द्या.

भंकस बाबा's picture

7 Feb 2021 - 1:48 pm | भंकस बाबा

बहुतेक आयडी कोमात जातात असा माझा मिपावरचा अनुभव आहे.
पण गेंड्याची कातडी काय असते हे मी हल्ली जोरदार अनुभवतो आहे

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 2:09 pm | मुक्त विहारि

पेशन्स हवा

समोरचा निर्लज्ज आणि अती शहाणा असला की की आपल्याला सुद्धा निर्लज्ज होणे गरजेचे पडते.
तरी सुद्धा
शक्यतो भाषा सभ्य च वापरायची असा माझा प्रयत्न असतो.

इथे अती निर्लज्ज पण आयडी आहेत गेंड्या ला पण लाजवतील असे.
मी त्यांच्या पुढे काहीच नाही.

आम्ही त्यांना, अवतारी बाबा समजतो

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 8:04 am | आनन्दा

काही निर्लज्ज आयडिंकडे गेंड्याची आणि सरड्याची कातडी मिक्स होऊन अली आहे, त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे मुख्यमंत्री साहेब?

भंकस बाबा's picture

8 Feb 2021 - 8:32 am | भंकस बाबा

ज्या चर्चा चालतात त्या अभ्यासू वृत्तीने चालतात. जर एखादा म्हणत असेल की शेतकऱ्याचं आंदोलन हे निव्वळ भंपक जाहिरातबाजी आहे तर त्यासाठी तो माणूस प्रसारमाध्यमातले पुरावे , आंतरजालावरील लिंक , इतिहासातील नोंदी अशा गोष्टी सादर करते. पण गेंड्याच्या कातडीचे लोक आपल्याला सोयीस्कर असे पुरावे जसे पप्पूचे दावे, एनडिटीव्हीच्या बातम्या, रबिशकुमारच्या धांदात खोट्या वावड्या असे प्रस्तुत करतात. या बाबतीत अनेकदा तोंडघशी पडली आहेत हे धुरंदर! तरीही भाजपाद्वेष, मोदींफोबिया, चाटुगिरी या गोष्टीचे पालन करण्यासाठी आपला हेका सोडत नाहीत. मुद्देसूदपणे यांचे दावे खोडले तर गायब होतात व थोड्या कालानंतर दुसऱ्या धाग्यावर जाऊन गरळ ओकत बसतात.
आतापर्यंतचा अनुभव हो!

अभ्यासोनी प्रकटावे, हे अवतारी बाबांना, समजत नाही

योगेश कोलेश्वर's picture

8 Feb 2021 - 12:03 pm | योगेश कोलेश्वर

सहमत आहे...

योगेश कोलेश्वर's picture

8 Feb 2021 - 12:08 pm | योगेश कोलेश्वर

सहमत आहे... सहना जी च्या मताशी

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 1:32 pm | टवाळ कार्टा

बाब्बो १७ हज्जार कोटी....उधळपट्टी आहे ही....पण एका बाजूने १७ हजार कोटींची उधळपट्टी केली तर दुसर्या बाजूला ३ हजार कोटींची उधळपट्टी करायचा हक्क मिळतो का?

कपिलमुनी's picture

8 Feb 2021 - 5:26 pm | कपिलमुनी

@धागा लेखक --
हे तुमचे जे अतिशय उदात्त विचार आहेत, ते खूप चांगले आहेत.

यावर तुम्ही काही कृती करणार आहात का ?
जसे की पी आय एल ?
गेला बाजार ऑनलाइन पेटीशन ?

साहना's picture

8 Feb 2021 - 7:30 pm | साहना
शा वि कु's picture

8 Feb 2021 - 7:40 pm | शा वि कु

अनेक लोकांना घरं नसतात, तर अश्या जागा वाया घालवणे म्हणजे न परवडणारी चैनच.

हा आक्षेप केवळ ह्या जागा जनतेच्या पैशातून आल्या आहेत म्हणून आहे का ? उदा. गोल्फ कोर्सेस वर तुमचं काय मत ? जाणून घ्यायला आवडेल.

> हा आक्षेप केवळ ह्या जागा जनतेच्या पैशातून आल्या आहेत म्हणून आहे का ?

हो.

सरकारी अधिपत्या खाली असलेली जमीन हि सर्व जनतेची आहे. ती आपल्या बापाची जहागीर आहे ह्या पद्धतीने राजकारणी आणि बाबू मंडळी वापरत आहेत. ह्याला आक्षेप आहे.

खाजगी संस्थांनी आपल्या पैश्यांनी जमीन घेऊन गोल्फ कोर्स बांधले काय किंवा म्हशींचा तबेला बांधला काय, तिथे मला काहीही आक्षेप नाही. ज्याच्याकडून जागा घेतली त्याला मोबदला मिळाला कि झाले.

फक्त एक अपवाद आहे. विविध देवस्थानाच्या जमिनी सरकारने निर्लज्ज पणे चोरून आपल्या केल्या आहेत. ह्या जमिनीदेवस्थानांना परत मिळाल्या पाहिजेत आणि सर्व जनतेचा त्यावर हक्क नाही. त्याशिवाय ज्या कालावधींत सरकारने ह्या जमिनी आपल्या केल्या होत्या त्या कालावधीचे योग्य ते भाडे आणि त्यावर व्याजसुद्धा सरकारने देवस्थानांना परत दिले पाहिजे.

शा वि कु's picture

8 Feb 2021 - 9:14 pm | शा वि कु

सर्व जनतेचा हक्क- कशाने प्रस्थापित होतो ? राजघाट आणि उदा, पंढरपूरचे देऊळ, यात एकावर जनतेचा हक्क तर एकावर "देवस्थान" या बॉडीचा हक्क कसाकाय ? पुढे, हि देवस्थान बॉडी कोण नियंत्रित करते ? उदा, सरकार निवडणुकीने निवडले जाते, कंपनीचे बोर्ड कम्पोसिशन मालक ठरवतात. तर देवस्थानात स्टेकहोल्डर्स कडून काय नियंत्रण होते ?

उदा, देवस्थानाच्या पुढे जाऊन गड किल्ले ताजमहल वैगेरे पण खाजगी मालमत्ता का ? असायला हवे, त्या लॉजीकने.

देवस्थाने बांधताना नागरिकांच्या पैश्यातूनच बांधली नसतात काय ?

साहना's picture

8 Feb 2021 - 11:05 pm | साहना

चांगला प्रश्न आहे पण वेळेअभावी सध्या सोडून द्यावा लागत आहे. साईदीपक ह्यांची व्याख्याने ऐकावीत आपल्या बहुतेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली आहेत.

ती आपल्या बापाची जहागीर आहे ह्या पद्धतीने राजकारणी आणि बाबू मंडळी वापरत आहेत. ह्याला आक्षेप आहे.

सहमत आहे

ह्या सर्व सर्व जनते साठी खुल्या असतील तर कोणाला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
मुंबई मध्ये ओवल मैदान किंवा क्रॉस मैदान,हँगिंग गार्डन,गिरगाव चौपाटी ,प्रिय दर्शनी पार्क,संजय गांधी नॅशनल पार्क ह्या सरकारी जागा आहेत पण त्या सामान्य लोकांसाठी खुल्या आहेत ते उत्तम च आहे.
नाही तर सामान्य लोकांना एवढ्या मोठ्या जागा खरेदी करणे शक्य नाही.
सार्वजनिक जागा ह्या सार्वजनिक च असाव्यात खासगी लोकांना त्या विकायची गरज नाही.
Rashtrpati भवन किंवा संसद,पंतप्रधानांचे निवास स्थान हे दिव्य भव्य च असावे विविध देशाचे प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा त्याची छाप पडते.
मला आठवतं एसटी ही गावं खेड्यात जायची अगदी 2 प्रवासी असेल तरी .
ज्या गावात काहीच सोय नाही त्या लोकांना एसटी खूप उपयोगी पडायची.
खासगी वाहतूकदार अशा तोट्याच्या रूट वर सेवा देणार नाही.
रेल्वे 700 रुपयात 1800 km च pravas घडवून आणते तीच खासगी झाली तर किमान भाडे 2000 रुपयाच्या वर असेल .
सर्वच सरकारी उपक्रम वाईट,असे नाही म्हणता येणार.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:04 pm | मुक्त विहारि

गोष्ट फक्त, सरकारी मोकळ्या जागांची चालली आहे...

बाय द वे,

एस.टी.चा मुद्दा बरोबर आहे... त्या मुद्द्यासाठी, वेळ असेल तर, वेगळा धागा काढलात तर उत्तम ...

साहना's picture

9 Feb 2021 - 2:17 am | साहना

> खासगी वाहतूकदार अशा तोट्याच्या रूट वर सेवा देणार नाही.

देऊ सुद्धा नये ! विनाकारण पैश्यांचा अपव्यय.

टीप : खूप रूटवर खाजगी बसेस ची सेवा नव्हती कारण सरकारने त्यावर बंदी घातली होती. गोव्यांत सर्वत्र अगदी खोलवर जंगलांत सुद्धा खाजगी सेवा आहे. कर्नाटकांत बहुतेक ठिकाणी आहे.

Rajesh188's picture

9 Feb 2021 - 1:47 pm | Rajesh188

सामाजिक जाणीव असणे हे खरोखर एवढे वाईट आहे का? समाजातील दुर्बल लोकांना बेसिक सेवा पुरवणे ही समाजाची आणि सरकार ची जबाबदारी नाही का?
मग ह्या समाजातील दुर्बल घटकांना सुविधा पुरुवू शकत नसेल तर कशाला हवी आहे सुबत्ता आणि कशाला हवं आहे सरकार आणि कायदे kanun.
सर्व सर्व सरकारी यंत्रणा नष्ट करा आणि ज्यांना जसे जगायचे आहे तसे जगू ध्या.
फुकट पोलिस, आर्मी,पाणी योजना,रस्ते प्रशासन ह्या वर कशाला समाजाचा पैसा खर्च करायचा.

काळे मांजर's picture

9 Feb 2021 - 1:51 pm | काळे मांजर

जे लोक आज समाजवादाच्या नावाने बोंबलत आहेत , त्यांच्या आजा बाबांना नेहरूंने फुकट बीसीजी , इबीसी सवलत , विद्यार्थी बस पास वगैरे दिले नसते तर हेही वडनगरला चहा विकत बसले असते

काळे मांजर's picture

9 Feb 2021 - 1:55 pm | काळे मांजर

आणि ज्या लोकांना गरिबाला फुकट बस देऊ नये असे वाटते त्यांना कोविड डोस अन दुबईतुन यायला वनदे भारत मिशन सवलतीत हवे असते

ते पुरवण्यासाठी सरकार जवळ जवळ फुकट गरिबांच्या जमिनी घेवून धरण बांधत आणि अगदी नगण्य पैसे घेवून ह्या लोकांना 24 तास पाणी पुरविले जाते.पण असे स्वस्तात आम्हाला पाणी नको असे एक पण म्हणत नाही.
ती सरकार ची जबाबदारी च आहे असे तूनतूने वाजवत बसतात.

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 1:27 am | उपयोजक

१) योजनेअंतर्गत फुकट्यांना पक्की घरे मिळतात ते कसे थांबवावे? त्यामुळेही काही प्रमाणात धनवापसी होईल.
२) या देशात भ्रष्ट राजकारण्यांची संख्या भरपूर आहे.त्यांची संपत्ती सरकारजमा केल्यास कित्येक अब्ज रुपयांची धनवापसी होईल.
३) आरक्षणाची तरतूद ही टॅक्सपेयरच्या जनतेचा पैसा तसेच विविध शासकीय योजनांमधला पैसा वळवून केली जाते.जी मुले आरक्षण घेऊन केटी किंवा वायडी होतात किंवा शेकडा ६५% टक्केपेक्षा कमी गुणांनी पास होतात त्यांना छदामही परत देऊ नये.ओपनवाल्यांसारखीच यांची पूर्ण फि घेतली जावी.फक्त मन लावून अभ्यास करणे हेसुद्धा शक्य नसेल तर शासनाने यांची फी का म्हणून माफ करावी? ही असली केट्या/वायडी किंवा अत्यल्प मार्कांनी पास झालेली मुले फुकट शिकवून देशाला फायदा तो काय? कशाकरता यांचा खर्च देशाने उचलावा?

काळे मांजर's picture

9 Feb 2021 - 1:32 pm | काळे मांजर

पासिंग ची अट 50 ची आहे , ती सर्वांना कॉमन आहे

ज्यांना अति मार्क मिळतात ते बाहेर जाऊन पैसे मिळवत बसतात , बसुदेत बापडे

पण इथे नोकरी करणारे सामान्य लोक सामान्य लोकांच्यासाठी पूल बांधतात व इथली कामे करतात

टॉपर आहे म्हणून तो माझ्यासाठी काम करेल असे काही नाही

तुम्ही काही देणार नसाल आणि उलट पूर्ण फी भरुन घेणार असाल , दुर्गम भागातल्या कॉलेजात खस्ता खात शिकायला लावणार असाल तर तो तुमचा फायदा का बघेल? तुम्ही त्याचा काय फायदा करुन देता?

त्याने त्याचा माल कुठेही विकावा,

माझा मुद्दा इतकाच आहे की कमी मार्क पडलेले , उशिरा पास झालेले ह्यांच्याबद्दल आकस नको

तेही आम्हाला उपयोगी आहेत

त्याने त्याचा माल कुठेही विकावा,

माझा मुद्दा इतकाच आहे की कमी मार्क पडलेले , उशिरा पास झालेले ह्यांच्याबद्दल आकस नको

तेही आम्हाला उपयोगी आहेत

काळे मांजर's picture

9 Feb 2021 - 5:35 pm | काळे मांजर

मला भाजी विकणारा , माझ्यासाठी रिक्षा बस लोकल ट्रेन मेट्रो चालवणारा , सिनेमा दाखवणारा, पॉपकॉर्न विकणारा, किराणा दुकान व फार्मसी चालवणारा, आधार कार्ड काढून देणारा , चहा विकणारा , सिक्युरिटी , ब्यांकेचा कशीयर

ह्यात कोण युनिव्हर्सिटी टॉपर आहे ? ह्यात नापास होऊन मग नंतर पास होऊन डिग्री असलेलेही असतील

मला हे लोक महत्वाचे की पहिल्या अटेम्प्टला पास होऊन गोल्ड मेडल मिळवलेले आणि अमेरिकेत जाऊन बसलेले ?

राजहंस , चक्रवाक पक्षी असतील राजबिंडे , पण म्हणून आमची इको सिस्टीम कावळे , चिमण्या अन कबुतर घेऊनच पूर्ण होणार ना ?

राजहंस मरेनात तिकडे

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 5:39 pm | मुक्त विहारि

तोकडे समर्थन ....

उपयोजक's picture

15 Feb 2021 - 8:41 am | उपयोजक

या अशा शाळा/कॉलेजात छपरी मार्क्स घेऊन पास होणाेर्‍यांना फि माफी बंद करुन पूर्ण फी वसूल करावी हा मुद्दा आहे.चांगले मार्क्स मिळवायचे नसतील तर सरकारने या आळशी लोकांचा खर्च का करायचा? पैसे काय झाडाला लागतात काय?

मुक्त विहारि's picture

15 Feb 2021 - 10:13 am | मुक्त विहारि

मते लागतात

99% मार्क घेवून 5 लाख कमावणारा गुणवत्ता धारक आहे की 5 वी पास होवून करोडो रुपयाचा व्यवसाय उभा करणारा गुणवत्ता धारक आहे.

काळे मांजर's picture

15 Feb 2021 - 5:19 pm | काळे मांजर

50 % घेऊन पास होतात

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 1:34 am | उपयोजक

या देशातल्या अनुदानित शिक्षकांना अक्षरश: लठ्ठ म्हणावेत असे पगार आहेत.यातले बहुतांश शिक्षक हे त्या पगाराच्या तुलनेत आऊटपुट देत नाहीत.काहीजणांना तर यांच्याच विषयातलं पुरेसं ज्ञान नसतं.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विज्ञानातलं एकही नोबेल मिळालेलं नाही. ही आपल्या हिणकस शिक्षणव्यवस्थेची फळे.मग का या शिक्षकांना लठ्ठ पगार द्यावेत?

शिक्षण खात्यांत अक्षरशः पैश्यांची नासाडी होत आहे. गोव्यांत दरविद्यार्थ्यामागे सरकार दार वर्षी ४०,००० रुपये खर्च करते. खाजगी शाळा २०,००० रुपयांत जास्त चांगला रिसाल्ट आणून दाखवतात.

जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे?

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 1:36 am | उपयोजक

आणि चांगले आऊटपुट न देणार्‍या शिक्षकांची यादी बनवून त्यांचे पगार एक चतुर्थांश करावेत.कितीतरी धनवापसी होईल.

चौकस२१२'s picture

9 Feb 2021 - 7:37 am | चौकस२१२

साहाना जी आपल्या भावना आणि त्यामागची तडफड ( विचारांची) कळली .. १००% मान्य असे नाही म्हणणार पण मूळ मुद्दा जर " हा असगळा अतिरेक होतोय" हे म्हणणे असले तर अगदी मान्य
परंतु आपण दुसऱ्या टोकाला ( विचाराने ) जात नाही ना असे हि वाटते आपला एकूण लेख वाचून .. उदाहरण... द्यायचे तर श्रीमान केजरिवला यांनी सुरवातीला काहीतरी मी सरकारी गाडी / मोठे घर वापरणार नाही असा पवित्रा घेतलं होता असे आठवते ...तसे आहे .. त्यांना लोक सांगत होती कि अरे बाबा ती गाडी आणि ते घर हे त्या पदासाठी आहे ... त्या मागे सुरक्षा, आणि इतर हि करणे असतात..
अर्थात ज्ञानींझैलसिंगजींचे यांचे स्मारक २० एकर मध्ये आहे हे ऐकून "चम्मत ग" वाटली ...

ज्या समाजाला व्यकितपूजा एवढी मान्य आहे त्या देशाने २०१ एकर चा असा वापर करणे यात आश्रय कसले म्हणा !

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 8:18 am | मुक्त विहारि

व्यक्तिपुजेच्याच आहेत ...

साहना's picture

9 Feb 2021 - 12:42 pm | साहना

:)

धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे आणि फिरून फिरून बहुतेक लोक त्याच त्याच मुद्द्यावर येत आहेत त्यामुळे ह्या चर्चेतून मी निवृत्ती घेते. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2021 - 5:32 pm | मुक्त विहारि

अभिनंदन