सरतील कधी शोष शोषितांचे!

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
3 Dec 2020 - 3:53 pm

एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात..

भाग - १ उपोद्घात
कोणास ठाऊक, कदाचित विधात्यानेच घडविले असेल. डार्विनने शब्दांत मांडले येवढेच. प्राणीजातिलाच कशाला बदनाम करायचे? निसर्ग सुद्धा टिकू न शकणारे मोडून तोडून नवी निर्मिती घडवित असतो. जमिन प्रबळ आहे तोवर घट्टपणे मांड टाकून खदखदत्या अंगाराच्या छाताडावर बसून राहते. पण ती जरा कमी पडली की ज्वालामुखी तिच्या चिथड्या करून अग्नीलोळांचे राज्य तिथे स्थापन करतो. मैलोंमैल वाहणाऱ्या नदीला सागर पूर्णपणे गिळून स्वाहा करतो. सागराच्या थंडपाण्यात वन्ही आपले साम्राज्य स्थापून पाण्याला उकळी आणतो. ही पूर्ण दुनिया एक प्रचंड शक्तियज्ञ आहे. हा यज्ञ फक्त दुर्बळ अजाबळीच स्वीकारतो. यज्ञात व्याघ्रबळी दिल्याचे ऐकले आहे का कोणी?
बळी तो कान पिळी
बुळीच जातात बळी
मोठे मासे छोटे मासे
खाद्यशृंखलांचे फासे
सामर्थ्यवानच खासे
दुर्बळ टाकती उसासे
दुनियेत दोनच जाती
शोषित, व शोषणकर्ती

क्रमशः

समाजप्रतिभा

प्रतिक्रिया

शा वि कु's picture

3 Dec 2020 - 10:55 pm | शा वि कु

वाचतोय.

चांदणे संदीप's picture

4 Dec 2020 - 11:37 am | चांदणे संदीप

पुभाप्र!

सं- दी - प

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2020 - 2:50 pm | चौथा कोनाडा

रो च क !

पुभाप्र!