नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

आरसा

Primary tabs

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
3 Dec 2020 - 12:19 pm

झालं गेलं गंगेला मिळालं,
विचार करू नये फारसा.
बाकी सगळे ऐकतात हो,
पण ऐकत नाही तो फक्त आरसा.

आरशाची एक मोठी गंमत असते,
त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही.
प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते,
अधिक काळ पाहवत नाही.

आरशावर का चिडू मी,
तो थोडीच आठवणी साठवत होता.
पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी,
मला माझा भूतकाळ आठवत होता.

हल्ली आरशात मी बघतच नाही,
कारण मग नंतर मन रमतच नाही.
आता कल्पनेतच जगीन म्हणतो,
सत्याला सामोरं जाणं जमतच नाही.

आरशापासून पळत होतो,
माझ्या सावलीला हसताना पाहून हबकलो.
"स्वतःपासून कुठे पाळतोयस?"
ऐकून ती व मी जागीच थबकलो.

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2020 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा...!

-दिलीप बिरुटे