मजसी भेटवा....
कुणी असो सोवळा,
कुणी तो बावळा,
विठ्ठल सावळा,
सर्वांना प्रिय..
कृपेची साऊली,
उभी असे राऊळी,
ती विठू माऊली,
सर्वांना प्रिय..
क्षण जाई वाया,
निरवी "तो" माया,
ऐसा विठुराया,
सर्वांना प्रिय..
वाजवू मृदुंग,
गाउनी अभंग,
मनी पांडुरंग,
सर्वांना प्रिय..
मकरकुंडलांचा साज,
डोळाभर पाहू आज,
उभा केशीराज,
सर्वांना प्रिय..
धरूनिया हात,
करी जो सनाथ,
असा पंढरीनाथ,
सर्वांना प्रिय..
सोडवी आसक्ती,
देई जो विरक्ती,
तो रखुमापती,
सर्वांना प्रिय...
जिथे नामाचा गजर,
तिथे जातीने हजर,
सखा रखुमावर,
मजसी भेटवा...!!
जयगंधा..
२६-११-२०२०.
प्रतिक्रिया
26 Nov 2020 - 8:45 pm | प्राची अश्विनी
वाह!
30 Nov 2020 - 5:10 pm | Jayagandha Bhat...
धन्यवाद.
3 Dec 2020 - 9:48 am | गोंधळी
👍
10 Dec 2020 - 11:12 am | Jayagandha Bhat...
धन्यवाद..