कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
4 Nov 2020 - 12:17 am

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक.

वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले. विशेष दिवशीच अशी मिठाई भृगू दरबारात स्वीकारली जाते, हे मला तेंव्हा कळले. कोऱ्या कागदावरचे वाचन चालू झाले. आणि आश्चर्य म्हणजे मला महर्षी म्हणाले, तू जमलेल्या भक्तांना गणेश देवता रूपाने आशीर्वाद दे. मला सर्वस्वी नवीन धक्कादायक अनुभव होता.

या रीडींगच्या वेळी मी जालंधर शहरात त्यांना भेटायला गेलो होतो. पंजाबी पद्धतीने अघळपघळ स्वागत झाले. त्यांनी वाचनाचे शूटिंग करायला आनंदाने परवानगी दिली. कॅमेरा, एंगल, लाइटिंग वगैरे जुळवणी करताना पंडितजी कौतुकाने पहात होते. मीच त्यांना जरा लांब ठेवलेले कोरे कागद ते गादीवर बसल्यावर हातात दिले. तासाभरापेक्षा जास्त चाललेल्या वाचनात ते वेळोवेळी भावविवश होऊन, आनंदी होऊन डोळे पुसत असे वाचत होते की जणू लिहिलेले वाचताना जसे पान उलटायला लागते तसे ते उलटत असत. फोन आला तर ते घेत त्यात ते पंजाबीत बोलत असत.
सर्वात शेवटी भृगुऋषींनी आदेश केल्याप्रमाणे तिथे ठेवलेल्या दीपावर ते कोरे कागदाला जाळून टाकले गेले!

(आधीच्या एका धाग्यावर श्री रमेश नाईक यांनी भृगुसंहितेच्या वाचनाचे प्रात्यक्षिक आहे का? असेल तर वाटायला आवडेल म्हणून म्हटले होते. त्या संदर्भात हा धागा सादर करत आहे.)

मांडणीसद्भावनाप्रतिक्रियासमीक्षाअनुभव

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

4 Nov 2020 - 11:44 am | प्रसाद गोडबोले

भृगु संहिता तेही हिंदी मध्ये ? भृगु ऋषी हिंदीत लिहायचे कि पंजाबीत ? भृगु ऋषींचा कालखंड किमान रामायण महाभारत पुर्व असावा म्हणजे भृगुंचे लेखन ई.स. ३शतकाच्या आसपास झाले असयला हवे आणि अध्यत्मिक दृष्टीने पाहिल्यास तर किमान बुध्दपुर्व ५०० ते १००० वर्षे आधी १ तेव्हा हिंदी अस्तित्वात होती का ? =))))

उत्तरेतील लोकांना च्यु बनवणे फारच सोप्पे आहे राव . पण "ओक" आडनावाच्या माणासाने ह्यावर विश्वास ठेवावा हे जास्त विनोदी आहे =))))

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 10:42 pm | उपयोजक

नाडी खेचूनच काढलीत पार! :)))

आंबट चिंच's picture

4 Nov 2020 - 12:40 pm | आंबट चिंच

मा. ऑ. आणि जरा तो कागदाचा शोध कधी लागला ते पण सांगा.

मुळात आता ते सगळे कागदावर कुठुन आले भले कोरे असे म्हणता मग त्यांना काय दिव्य दृष्टीने सगळे दिसले की काय?

हे संजया….

तुमचे आणि पूर्वजाची नावे हे बरोबर सांगत आहेत. हे मला नवीन आहे. मी जे पहिले होते ते देवनागरी लिपीत होते. यात थोडा फेस रीडिंग चा भाग असू शकेल. पुण्यात काही वर्षा पूर्वी फुर्गुसन रोड वर एक हस्त सामुद्रिक होते. पटवर्धन असे काही तरी नाव होते. ते हात बघून भविष्य सांगत आणि तुमच्या आई वडिलांचे ,पत्नी चे नाव सांगत ..त्या नावातील तीन चार अक्षरे सांगून शेवटी नाव सांगत. उदा. तुमच्या वडिलांचे नाव दोन अक्षरी आहे ..त्यात ष आणि व आहे जसे म्हणजे विष्णू , असे सांगत. त्यांना कर्ण पिशाच्य अवगत अशी अफवा होती. हा तसाच काही प्रकार असावा.

शशिकांत ओक's picture

5 Nov 2020 - 2:53 pm | शशिकांत ओक

खयाल अपना अपना...

प्रसाद गोडबोले's picture

6 Nov 2020 - 12:57 am | प्रसाद गोडबोले

मजा म्हणुन परत पाहिला व्हिडीओ. १ मिनिट ५३ सेकंदाला भृगु महर्षींनी चक्क लस्सी चा उल्लेख केलेला पाहुन डोळे पाणावले =))))

ओय चक दे फट्टे ... ओ बल्ले बल्ले .....वांहुं वाहुं ....

संजय क्षीरसागर's picture

6 Nov 2020 - 7:44 am | संजय क्षीरसागर

रावणाचं पुष्पक विमान तुम्हीच उडवत होतात, असा उल्लेखही सापडेल !

लगे रहो !