गणपतीची लोकगीतं

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
22 Aug 2020 - 1:30 pm

यावे नाचत गोरीबाळा
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा
सर्वे ठायी मी वंदितो तुला |
यावे नाचत गौरीबाळा ट
चौदा विधयेचा तूं माता पिता
सर्वे ठायी हाय तुजी सत्ता |
चार वेदा ध्यावे वेळोवेळा ृ
यावे नाचत गोरीबाळा |
साही शास्त्रे अठरा पुराण
तुझ्यापासून झाले निर्माण |
भक्त देव येती मंडपाला
यावे नाचत गोरीबाळा |
मुळारंभी सत्व धरी पाया |
संगे घेत सरस्वती माया. |
किती विनवी तुला भक्तमेळा ः
यावे नाचत गोरीबाळा |

अल्याड नमन पल्याड नमन गणेशा तू देवा
आमी खेळ मांडियेला करू तुजी सेवा
आमी खेळ मांडियेला येसीच्या ग दारी
येसीच्या ग दारी |
येसीच्या दारी ग पारवा घुमतो
पारवा धुमतो
पारव्या पाखराचं गुंज गुंज डोळं
गुंज गंज डोळं
गुंज गुंज डोळं ग सबेमंदी खेळं
संबेमंदी खेळं
सबेच्या नारींनी ग पंच आरती केल्या
पंच आरती केल्या
आरती घालू सोनं का परती घालू सोनं
परती घालू सोनं |
आमच्या गणेबाचं कंठीयाचं लेणं
कंठीयाचं लेणं
आरती घालू सोनं का परती घाठू सोनं
परती घालू सोनं
आमच्या गणोबाचं पेंजणाचं टेणं
पैजणाचं लेणं |
आरती घालू सोनं का परती घाढू सोनं
परती घालू सोनं
आमच्या गणोबाचं अंगठीचं ठेणं
अंगठीचं लेणं
आल्याड नमन पल्याड नमन गणेशा तू देवा
आमी खेळ मांडियेला करू तुजी सेवा

संग्रहिका : सरोजिनी बाबर

इतिहासवाङ्मयकविता

प्रतिक्रिया

एकदम छान! बाप्पा मोरया!!