राम मंदिर शीलान्यास

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in काथ्याकूट
5 Aug 2020 - 10:53 am
गाभा: 

राम जन्मभूमी शिलान्यास
एक हजार वर्षांनंतर आज अयोध्येत सबल हिंदू एकतेचे प्रदर्शन होत आहे. एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर सम्पूर्णपणे संसदीय मार्गाने, परकीय आक्रमकाने उद्धवस्त केलेल्या मंदिराचे पुनर्निर्माण आज सुरू होत आहे.
प्रत्येक हिंदू माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
'शांतीप्रिय धर्माचे लोक आक्रमकपणे संघटीत होत असताना निद्रिस्त हिंदूंनी जागे होण्याचा हा क्षण आहे. राम मंदिराच्या निर्माणाने कोरोना जाईल का असले प्रश्न विचारून तोंड वाकडे करणाऱ्यांना या देशाची नाळ कधीच समजली नाही. आज देशात जे चैतन्य दिसतंय ते जाणवू शकत नसणाऱ्या अकलेच्या अंधांनी डोळ्यांचा आणि डोक्याचाही इलाज करून घ्यायला हवा.
साडेतीनशे वर्षांपूर्वी मोगलांची आक्रमणे आणि ब्रिटिशांचा चंचूप्रवेश सुरु असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे जे औचित्य होते तेच आजच्या या शीलान्यासाचे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने 'या भूमीच्या, या धर्माच्या रक्षणासाठी एक सार्वभौम राजा अवतरला आहे' असा संदेश तत्कालीन भारतवर्षात पसरला. गलितगात्र हिंदू समाजात एक चेतना निर्माण झाली. हाच संदेश आजच्या निद्रिस्त हिंदूंनी घेणे गरजेचे आहे.
जातीयवाद, प्रांतवाद विसरून प्रत्येक भारतीयाने मी प्रथम एक भारतीय आहे हे स्वतःला आणि इतरांनाही सांगणे आवश्यक आहे.
आज दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपन्न होणारा हा सोहोळा सर्व कुटुंबियांसह दूरदर्शनवर बघावा, अनुभववा. या योगे घरातील पुढच्या पिढीला हिंदुत्वाचे संस्कार देण्याची संधी साधावी.
।।जय श्री राम।।

प्रतिक्रिया

माझा_डूआइडी's picture

9 Aug 2020 - 3:32 pm | माझा_डूआइडी

हाच धागा मागे का राहू द्यावा म्हनून हा प्रतिसाद!

अथांग आकाश's picture

9 Aug 2020 - 8:05 pm | अथांग आकाश

।।जय श्री राम।।

22 जान ला अयोध्येत मोठा सोहळा होतोय,
एक स्वप्न साकार होतेय,
सर्वांनी यात सहभागी होऊन हा क्षण साजरा करुयात

मुक्त विहारि's picture

2 Jan 2024 - 5:03 pm | मुक्त विहारि

जय श्रीराम...

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jan 2024 - 3:54 pm | llपुण्याचे पेशवेll

अयोध्या मुक्त झाली. आता काशी, मथुरा, नारायणेश्र्वर, पुण्येश्वर हळू हळू मुक्त होतील. हिंदू जागा होऊन हे सगळे परत मिळवेल अशी खात्री आहे.

वामन देशमुख's picture

3 Jan 2024 - 4:30 pm | वामन देशमुख

अयोध्या मुक्त झाली. आता काशी, मथुरा, नारायणेश्र्वर, पुण्येश्वर हळू हळू मुक्त होतील. हिंदू जागा होऊन हे सगळे परत मिळवेल अशी खात्री आहे.

+१०८

मिळवेल आणि टिकवेल अशी आशा आहे.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हाती सत्ता गेली की, परत एकदा, हिंदुंना फाट्यावर....

वेडा बेडूक's picture

2 Jan 2024 - 3:57 pm | वेडा बेडूक

22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
https://misalpav.com/node/51865