कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Jul 2020 - 4:57 pm
गाभा: 

जुलै महिन्यापासून कोविड-१९ला कव्हर देणार्‍या अजून हेल्थ इंश्युरन्स पॉलीसी येणार अशी बातमी वाचल्याचे आठवते . एका खासगी हॉस्पीटलने कोविड टेस्टचा रिझल्ट सांगण्याआधी इंश्युरन्स आहे का असा प्रश्न विचारल्यासा अनुभव लेख मिपावर आलेला आहे तेव्हा कोविड-१९ला कव्हर देणार्‍या इनश्युरन्स पॉलीसीं बद्दल जाणकारांनी माहिती द्यावी या निमित्ताने माहिती आअणि अनुभवांची चर्चा व्हावी म्हणून हा धागा

* कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ?
* ऑनलाईन दुवे
* तुम्ही स्वतः हेल्थ इन्शुय्रन्स एजंट असल्यास प्रतिसादात तसे लिहुन ठेवावे
* इन्श्युरन्स ऑनलाईन न घेता एजंट मार्फत घेण्याचे काही फायदे असतात का?
* अमुक तमुक गोष्टीसोबत हेल्थ इनश्युरन्स फ्री अशा काही स्कीमही आहेत का ? असतील तर त्यांचा कितपत उपयोग होतो?

* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

21 Jul 2020 - 11:35 pm | संजय क्षीरसागर

भस्त्रिका !

मला तर माझ्या स्टार हेल्थच्या जुन्या मेडिक्लेम मध्येच कोविड साठी सोय करून दिली गेली आहे. एकही पैसा नविन प्रीमियम भरायची गरज पडली नाही.

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2020 - 6:40 pm | टवाळ कार्टा

हे तुम्ही सांगितल्यावर केले की सगळ्यांनाच हा फायदा मिळाला आहे?

मला सांगायची गरजच पडली नाही. सर्वच इन्शुरन्सधारकांना मेल मार्फत माहिती दिली गेली.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2020 - 11:48 pm | टवाळ कार्टा

स्टार हेल्थकडून मला असा काही ईमेल नाही आलाय अजून

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 7:53 pm | श्वेता२४

हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे यात सर्व व्हायरल आजार कव्हर आहेत. भविष्यातील सुद्धा

mrcoolguynice's picture

25 Jul 2020 - 8:05 am | mrcoolguynice

युनायटेड चा कोरोना कवच

आपण दिलेली लींक मार्च महिन्यातील दिसते. मला वाटते जुलै नंतर अद्ययावत पॉलीसी पर्याय उपलब्ध होतील असे वाचून होतो म्हणूनच धागा काढला.

सुबोध खरे's picture

26 Jul 2020 - 2:32 pm | सुबोध खरे

ती लिंक देण्याचे कारण हे आहे कि सरकारने चालू असलेल्या पॉलिसी मध्येच लोकांना कॉव्हिडचे उपचार उपलब्ध करून द्यावे असा आदेश दिला आहे. तेंव्हा ज्यांची आरोग्यविमा पॉलिसी आहे त्यांनी ती चालू ठेवावी

मराठी_माणूस's picture

27 Jul 2020 - 11:41 am | मराठी_माणूस

एका विमा कं. ने खास कोव्हिड साठी एक विमा काढला आहे असे एक जण सांगत होता.

जर एखाद्या कडे असलेला आरोग्यविमा कोव्हिड कव्हर करत असेल तर हा खास कोव्हिड चा आरोग्यविमा घेणे उचीत होईल का ?

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 7:43 pm | सुबोध खरे

कोव्हीड साठी जर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागले तर हा खर्च ५-६ लाखापर्यंत जाऊ शकतो.

एवढा जर आपला आरोग्य विमा असेल तर गरज नाही असे मला वाटते.