भाज्यांचे निर्जंतुकीकरण आम्ही कसे करतो

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Jul 2020 - 1:05 pm
गाभा: 

अत्रुप्त आत्मांच्या भाजी घ्या भाजीवर भाज्यांच्या सॅनिटायझेशन बद्दल प्रश्न विचारला गेला, सध्या सार्वत्रिक असलेला मीठ अथवा खाण्याच्या सोड्याने भाजी धुवावी असा एक सल्ला आला आणि बिरुटे सरांनी त्याबद्दल सुयोग्य साशंकता व्यक्त केली.

माझ्या लहानपणी शाळेत भारीचा बहुधा इलेक्ट्रॉन का काय मायक्रोस्कोप आणि सुसज्ज प्रयोगशाळा होती त्यात गुरुजींनी मायक्रो ऑर्गॅनिझमचे दर्शन उत्साहाने घडवले होते. सोबत 'माशी' हा प्रकार किती भयंकर - म्हणजे माणसे ते कुत्र्यामांजरीच्या शीशू वर बसून पुन्हा अन्नपदार्थांवर बसून कशा पद्धतीने जिवाणू विषाणू पसरवतो हे समजावून सांगितले तेव्हापासून मला स्वतःला कमालीचा माशीफोबीआ आहे! आपल्या देशात लहान गावात सांडपाण्याच्या नाल्यांच्या काठी आणि मोठ्या शहरात गटारांच्या भोका भोकांच्या किंवा लोखंडी सळईच्या झाकण लावलेल्या परिसरात भाजीपाल्याची (आणि इतर अन्नपदार्श मिठाई इत्यादी) सर्रास विक्री आणि खरेदी चालू असते. आणि सहाजिक माश्यांचाही मोठा वावर व्यवस्थितपणे दुर्लक्ष करून व्यापार चालू असतो (अगदी शिक्षीत गावे आणि शिक्षीत माणसे यांचाही यात सहभाग असतो). तसे (भारतता सहसा पाळला न जाणारा) कायदा सांडपाण्याच्या जागे पासून १०० मीटरच्या आत अन्नपदार्थ घटकांच्या विक्रीस अनुमती देत नाही. (सहसा मिठाई दुकानदारांना या कायद्याची माहिती (पालन नको) असते)

पण माशिफोबीआमुळे मी भाजी खरेदीच्या वेळी कमालीचा संवेदनशील आणि सतर्क रहात आलो आहे. म्हणजे ज्या भाज्यांची साल काढली जाते ती तशी कुठेही घेतो पण साल काढली जात नाही त्या भाज्या सहसा सुपर स्टोअर मधून घेणे पसंत करतो किंवा अगदीच गरज पडली तर किमान उघडा ओला कचरा पेटी आसपास नाही गटार झाकण आसपास नाही आणि माश्या खूप नाहीत एवढे आग्रहाने पाळतोच. पण त्या शिवाय भाजीचा वरचा थर सरकवून खालची भाजी घेतो.

आता कोविड-१९ कोरोना वीषाणूंनी निर्जंतुकीकरणाचा प्रश्न अधिक गंभीर बनवला आहे. मीठ आणि खाण्याच्या सोड्यात भाज्या भिजवून घेण्यासाठी बरेचजण सांगतात पण त्याने फारतर काही जिवाणूंची वाढ रोखली जात असावी. बिरुटेसर म्हणतात तसे वीषाणूंना मीठ आणि खाण्याच्या सोड्याने आणि थंडपाण्याने फरक पडण्याचा संभव कमी असावा. कोविडसाथ पसरली तेव्हा पासून मी घेत असलेली अधिकची काळजी

१) भाजी खरेदीच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळतोच - मी घेताना मागून कुणी घुसखोरी केली तर मी ज्या वेगाने बाजूस होतो त्याचे कुणि व्हिडीयो काढला तर विनोदी दिसू शकतो पण मी ते पाळतो.

२) भाजी वाल्यांना मास्क घालण्याची सवय अगदी आग्रहाने लावली शिवाय नोटा घेतल्या नंतर हँड सॅनिटायझरने सॅनिटाईज करण्याचीही सवय लावली. कमावलेले पैसे एका आजारपणात जातील हे सांगितले की पाळतात बिचारे. वरुन माझ्याही हातावर आठवणीने हँड सेनिटायझरचे चार थेबही प्रेमाने टाकतात.

३) माझ्या मित्रांनी सुचवल्यापासून भाजी निवडण्याच्या बास्केटला धरण्यासाठी अर्धा बास्केट मध्ये एक आणि वजनाच्या मशिन मध्ये एक असे स्वतःचे अडीच पेपर नॅपकिन खर्ची घालतो.

४) साल काढून खातो अशा भाज्या फळे चक्क साबणाच्या पाण्याने धुतो आणि साल नसलेल्या भाज्या फळे कढत गरम पाण्यानेच धुतो. कारण मीठ आणि खाण्याच्या सोड्यात धुण्याने मनाचे समाधान होते वीषाणूंना केवळ साबण आणि गरम पाणीच मारू शकते.

तरी कांदा लसूण अश्या काही भाज्या सुटतातच तर त्यांची पिशवी वेगळी ठेवली आहे ते चिरण्याच्या आधी गरमपाण्याने धुतो.

एक प्रश्न असा असू शकतो की नंतर अन्न शिजवल्यावर गरम होतेच मग आधी गरमपाण्याने धुण्यात काय हशील ? मी सध्या अधिकतम पदार्थ गरम करून खातो पण तरीही वरून पसरलेली कांदा कोथिंबीर इत्यादी सुटतातच त्यांना इतर भाज्यां अथवा पदार्थांवरचा हात केव्हा लागेल हे एकतर सांगता येत नाही दुसरे रेफ्रीजरेटर ही जिवाणू वीषाणू पसरवली जाणारी आणि कमीतकमी वेळा निर्जंतुक केली जाणारी जागा आहे की ज्यातले काही पदार्थ तुम्ही नंतर गरम करता तर काही पदार्थ थंडच खाता पिता त्यात भाज्या निर्जंतूक न करता भरणे मला तरी श्रेयस्कर वाटत नाही.

शेवटी कुणि म्हणेल एवढी काळजी का घ्यायची ? मरणाला का घाबरावे या प्रश्नाला मला बाळासाहेब ठाकर्‍यांचे वाक्य आठवते मरायची हौस आली की सिमेवर जावे आणि शत्रुला मारून मग मरावे. जाणीवपूर्वक संसर्गजन्या आजाराबाबत निष्काळजीपणा करणे म्हणजे स्वतः सिगरेट फुंकताना आसपासच्या न फुंकणार्‍यांच्या फुप्फुसातसुद्धा सिगरेटचा धुर अप्रत्यक्ष पणे लोटण्यासारखे आहे. माझ्या वर्तनाने इतरांना आजार पोहोचावा इतर कुणालातरी दवाखान्याचा भुर्दंड पडावा किंवा इतर कुणाच्या आयुष्याचा दोर तुटावा असे माझ्या स्वतःच्या गलथानपणामुळे घडणे माझ्या स्वतःच्या मनाला पटत नाही.

* अनुषंगिका पलिकडची अथवा शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
* उत्तरदायीत्वास नकार लागू

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2020 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंब्याच्या दिवसात आम्ही आंबे साबण-पाण्यात बुडवून ठेवले होते. आणि नंतरही साबण-पाण्याने धून कोरडेठाक केले आणि दुपारी आणलेले आंबे दुस-या दिवशी खाल्ले.

भाजीपाला मीठ आणि खाण्याच्या सोड्याने काही होणार नाही. बरं सालां त्याला साबण-पाण्याने धूणे म्हणजे ते कठीण काम आहे. शेवग्याच्या शेंगा धुता येतील, टॉमेटो साबण-पाण्याने धुतले. पत्ता कोबी काही पाने काढून फेकून देता येतील, आम्ही कांदेही साबण-पाण्याने पुसून कोरडे करतो. आणि पंख्याखाली वाळत घालतो. मेथीची भाजी खुप आवडते पण आणने टाळले. आणि नंतर स्वच्छ हात सेनिटाइजर, स्वच्छ साबण-पाण्याने धूतो. वस्तुला चिकटून करोना होत असेल असे वाटत नाही. पण आता करतो तो वेडेपणा म्हणा, पण तो वेडेपपणा करतो.

मनाचं समाधान आणि शास्त्रीय काटेकोरपणा जितका समजून पाळता येईल तितका पाळावा. आपण म्हणता तसे मास्क वाले, ग्लोज वाले भाजीपाला विक्री करणारे निवडतो. भाजीपाला माझ्या तालुक्याच्या ठिकाणी शेतातला पाहुन्यांकडून घेतो. इतरवेळी वरील काळजी.

आणि फार विचारही करीत बसू नये. करोना कशाला चिकटून येईल, कोणा स्पर्श केलेल्या झालेल्या माणसाला करोना असेल आणि तो भाजीपाल्याला चिकटला तर नसेल ना, असा विचार घरात आले की सोडून द्यावे, धु-धा करून तो निघुन जातो. पण, एकदा मनाला करोना चिकटला की तो धूणे फार कठीण होऊन जाते.

बाकी ते उघडयावरील पदार्थ खाण्याबद्दल तसेच आहे मनात. उघड्यावरील पदार्थावर काय काय, कुठून कुठून काय काय येऊन बसत असेल. याक.

-दिलीप बिरुटे
(स्वच्छ आणि टापटीप)

आणि फार विचारही करीत बसू नये. करोना कशाला चिकटून येईल, कोणा स्पर्श केलेल्या झालेल्या माणसाला करोना असेल आणि तो भाजीपाल्याला चिकटला तर नसेल ना, असा विचार घरात आले की सोडून द्यावे, धु-धा करून तो निघुन जातो. पण, एकदा मनाला करोना चिकटला की तो धूणे फार कठीण होऊन जाते.......

अतिशय सुंदर विचार ..अतिशय धन्यवाद. काळजी तर नक्कीच घ्यायची आहे पण काळजीच्या ध्यासापायी मानसिक आरोग्य घालवून बसू नका. ते परत मिळवणे महा कर्म कठीण .

एक फार प्राचीन काळातले वाक्य आठवले.
"श्याम, हाता पायाला कोरोना लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला कोरोना होऊ नये म्हणून सुद्धा जप हो!!"

असो हलके घेणे.

बाकी लेख उत्तम आहे सर. आधीच काळजी घेणे सर्वोत्तम.

Rajesh188's picture

3 Jul 2020 - 4:08 pm | Rajesh188

भारतात स्वच्छता नसताना सुद्धा कोरणा चा. प्रसार अतिस्वछ देशान पेक्षा कमी आहे.
रोज विषाणू,जिवाणू चे हल्ले झाल्यामुळे लोकांची प्रतिकार शक्ती चांगली आहे.
बाकी कारोणा पुष्टभागवर किती वेळ सक्रिय राहतो ह्या विषयी ठोस अशी माहिती नाही.
भाजी मधून प्रसार झाल्याचे एक तरी ठोस उदाहरण आहे का.

माहितगार's picture

3 Jul 2020 - 5:54 pm | माहितगार

...भाजी मधून प्रसार झाल्याचे एक तरी ठोस उदाहरण आहे का....

असाच प्रश्न वीषाणूबाधीत जंगली प्राण्यांच्या सहवासात राहील्याने वीषाणूचा प्रसार झाल्याचे एक तरी ठोस पुरावा द्या असे चिनीही विचारू शकतात. आपण म्हणता तसा पुरावा उदाहरण देण्यासाठी कोविड-१९ ने बाधीत व्यक्तीला भाजीवर शिंकुन ती भाजी गरम न करता खाऊन मग अशा काही व्यक्तीची टेस्ट करून द्यावा लागेल आणि तसे करण्याची किंवा अगदी तसा सल्ला देण्याची अनुमती कायदा देत नाही. चुभूदेघे पण मला वाटते हे सामान्य ज्ञान आहे.

आता पर्यंत जी वैज्ञानिक दृष्टीकोणातून वाचलेली खात्रीशीर माहिती आणि लॉजीक आहे त्यानुसार जंतूनाशक आणि तीव्र उष्णते शिवाय इतर कोणत्याही पृष्ठभागावर वीषाणू (स्वतःचा गुणाकार करू शकत नाहीत) पण किमान बर्‍यापैकी काळ स्वतःचे अस्तीत्व टिकवून ठेवतात. आणि अशा वीषाणूबाधीत पृष्ठभागास स्पर्श होऊन (कोवीड) वीषाणू तोंड नाक डोळे या वाटे प्रवेश केल्यावर आजार होणार नाही याची खात्री वैज्ञानिकांनी दिल्या शिवाय वीषाची परिक्षा का घ्यावी. अधिकची काळजी घेणे सहज शक्य व श्रेयस्कर असता नसती जोखीम घेऊन शरीरावर आजाराची शक्यता का ओढवून घ्यावी?

रोज विषाणू,जिवाणू चे हल्ले झाल्यामुळे लोकांची प्रतिकार शक्ती चांगली आहे.

माझ्या आता पर्यंतच्या वीषाणू विषयींच्या माहितीनुसार सर्वसाधारण प्रतिकार शक्ती आणि विशीष्ट वीषाणूंशी प्रतिकाराच्या अनुभवातून आलेली प्रतिकार शक्ती या विभीन्न बाबी आहेत. विशीष्ट वीषाणूंशी प्रतिकार करून आलेली प्रतिकारशक्ती केवळ त्याच वीषाणूंचा मुकाबला करते. शरीराला पुर्वानुभव नसलेले नवे वीषाणू आल्यास शरीराला पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रतिकारशक्तीवरच अवलंबन करावे लागते.

आणि सर्वसाधारण प्रतिकारशक्तीची क्षमता उपलब्धता आणि टिकाऊपणा याला स्वतःच्या मर्यादाही असतात अन्यथा मानवी जगासमोर जिवाणू वीषाणूंचे प्रश्नच उपस्थित राहीले नसते.
(माणूस आणि मानवी जिवनमान अधिक अस्वच्छ आणि जंतुयुक्त राहीले तर चालले असते. पण केवळ स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणातून मानवी सर्वसाधारण आयुष्याची लांबी बरीच वाढली आणि लोकसंख्या वाढीस हातभार लावणारी ठरली नाही काय? या बाबत मात्र उदाहरणे देता येतील)

भारतात स्वच्छता नसताना सुद्धा कोरणा चा. प्रसार अतिस्वछ देशान पेक्षा कमी आहे.

१) विकसित देशांपेक्षा सर्वसाधारण आयुष्य मर्यादा भारतात कमी आहे. भारतात वयस्क व्यक्तींचे नेहमीपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले जाण्यासाठी ते आधी अधिक जगावयास हवेत , ते आधीच गचकून जात असतील तर वयस्कांचा मृत्यूदर आधीच अधिक असेल म्हणजे वाढीव मृत्यूदर दिसून येण्याचा स्कोपच मुळात कमी असेल.

२) कोविडमुळे सर्वसाधारण मृत्यूदरापेक्षा पन्नास टक्क्यांपर्यंत मृत्यूदर वाढला आहे (मी मागच्या वेळी इटली बाबत वाचन केले त्यानुसार). प्रत्येक मृत्यूची शहानिशा व व्यवस्थित मोजणी न होणार्‍या, कोविडच्या टेस्टींग सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेल्या भारतासारख्या देशात मृत्यूदर काहीच वाढलेला नाही असा ठाम दावा कोणत्या आधारावर करता येऊ शकतो ?

उत्तरदायीत्वास नकार लागू

चौकटराजा's picture

3 Jul 2020 - 5:00 pm | चौकटराजा

आणि फार विचारही करीत बसू नये. करोना कशाला चिकटून येईल, कोणा स्पर्श केलेल्या झालेल्या माणसाला करोना असेल आणि तो भाजीपाल्याला चिकटला तर नसेल ना, असा विचार घरात आले की सोडून द्यावे, धु-धा करून तो निघुन जातो. पण, एकदा मनाला करोना चिकटला की तो धूणे फार कठीण होऊन जाते.
करोनाने काय केले असेल तर माणसाला कमालीचे भय व तदनुषन्गिक संशय निर्माण करण्याचे काम केले आहे.
एक वाक्य पुरेसे आहे... माणसाला इन्फेक्शन झाल्याशिवाय त्यावर मात करायची अक्कल शरीरातील संरक्षक यन्त्रणेला येत नाहीत. एक तर जन्मभर बिसलेरीची बाटली घेऊन फिरा वा धोका पत्करून बारा गावचे पाणी प्या !

एकदा लस निर्माण झाली की निदान भीती तरी जाईल. पण तोपर्यंत बिस्लेरी हातात घेऊन फिरण्यापेक्षा पर्याय नाही.

मी तर यावर्षी एकही पालेभाजी बाहेरून विकत आणलेली नाहीये. बहुतेक भाज्या शेतातच पिकवून घरी आणल्या आहेत. तेव्हा फक्त काही भाज्यांसाठीच दुकानात जातो.
बाकी माहितगार यांच्यासोबत सहमत. वाद घालण्यापेक्षा चांगले उपाय पुढे आणायला काय हरकत आहे.
उदा: यूव्ही लाईट वापरून निर्जंतुकीकरण शक्य आहे त्यावर काही करता येईल काय?

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2020 - 7:15 pm | प्राची अश्विनी

मी uvलाईट वापरते. भाज्या, फळे, किराणा , मोबाईल दूध पिशव्या, चावी सगळ्यासाठी. UV mate म्हणून foldable आहे हे. दहा मिनिटे एक बाजू नंतर उलटून दुसरी बाजू दहा मिनिटे.

सुबोध खरे's picture

3 Jul 2020 - 7:18 pm | सुबोध खरे

भाज्या किंवा फळातून करोना च लागण होण्याची शक्यता नगण्य आहे. आपल्या करोना असलेल्या भाजीवाल्याने स्वतःच्या नाकाला हात लावून मग हात लावलेले फळ किंवा भाजी आपण हातात घेऊन त्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला/ कनकाला हात लावला तर होण्याची थोडीशी शक्यता आहे.
आता आपण आणि भाजीवाल्याने दोघांनी मुखवटा घातलेला असेल तर हि शक्यता दहा हजारात एक ( कदाचित दहा लाखात एक) पेक्षा कमी असेल.

करोनाचा विषाणू पोटात गेल्यास आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता नाही कारण पोटात असलेले हायड्रोक्लोरिक आम्ल त्या विषाणूनां निष्प्रभ करते.

मग भाजी आणि फळे का स्वच्छ करायची?

भाजी किंवा फळे याला शेणखत किंवा सोनखत घातलेले असते त्यात इतर जिवाणूंची संख्या प्रचंड असते. त्यामुळे आपल्याला गॅस्ट्रो कॉलरा सारखे आजार होण्याची शक्यता असते. पाऊस पडू लागल्यावर हि जमिनीवरची घाण शेतात उतरते किंवा भाजी बाजारात त्याचा संपर्क आपल्या भाजीपाल्याशी येतो.

यासाठी ज्या भाज्या आपण कच्च्याच खातो त्या स्वच्छ धुणे आवश्यक आहे. उदा सॅलड ची पाने, टोमॅटो, कोथिंबीर.

ज्या भाज्या किंवा फळे आपण सालासकट खातो ती उदा द्राक्षे, वांगी, टोमॅटो साबणाच्या पाण्याने धुवावीत. यासाठी आपण अंगाचा साबण किंवा कपड्याचा साबण वापरू शकता. ( कपड्याच्या साबणाच्या १०० % पावडर मध्ये सोडा सुद्धा असतोच)

याचे कारण त्यावर फवारलेली कीटकनाशके साबणाने धुतली जातील साध्या पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने अथवा पोटॅशियम परमँगनेटने धुतली जात नाहीत.

खाण्याच्या सोड्यामुळे किंवा मिठाच्या पाण्यामुळे जंतू मरतात हे अर्धसत्य आहे. कारण त्याच्यासाठी लागणारे मिठाचे किंवा सोड्याचे प्रमाण खूप जास्त असावे लागते. मिठाचे प्रमाण कमी झाले तर लोणच्याला बुरशी येते आणि समुद्राचे पाणी जंतूविरहित असायला हवे होते.

साबण पोटात गेल्यामुले आपल्याला अपाय होऊ शकतो अशा तर्हेचा पोकळ युक्तिवाद पुढे केला जातो. त्यात कोणताही पुरावा नाही कारण आपण जर आपले हात साबणाने पन्नास वेळेस धुतो तेंव्हा साबण पोटात जातोच.
शिवाय हीच भाज्या किंवा फळे आपण साबणाचा अंश राहणार नाही हि काळजी घेऊन धुणे आवश्यक आहे.

साबणाचा मानवी शरीरावर कोणताही अपाय होतो याला शास्त्राधार नाही. शल्यक्रिये पूर्वी किंवा बद्धकोष्ठ झाले असता साबणाच्या पाण्याचा एनिमा दिला जातो त्यातून शोषल्या जाणाऱ्या साबणाचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम आढळलेला नाही.

लहान मुलांना शौचास होणाऱ्या खड्यासाठी साबणाच्या पाण्याचा एनिमा शतकानुशतके दिला जातो त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम आढळलेला नाही.

त्यातून ज्यांना साबणाबद्दल शंका असेल त्यांनी आपले हात साबणाने स्वच्छ धुवून ती भाजी किंवा फळे भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून खावी.

माहितगार's picture

3 Jul 2020 - 8:48 pm | माहितगार

बाकी सगळ मान्यय पण भारतात भाज्यांना हात केवळ भाजी वाल्यांचा नव्हे तुमच्या आधी भाजी निवडण्यासाठी हात घातलेल्या सतराशेसाठ लोकांचे हात लागलेले असू शकतात. त्यात बारागावचे पाणी पिण्याच्या पोकळ गप्पा हाणणारे काळजी न घेणारे अस्वच्छ किती हात असू शकतील कुणास ठाऊक ?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2020 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा

सुबोध खरे - धन्यवाद.

चौकटराजा's picture

4 Jul 2020 - 9:06 am | चौकटराजा

आज देखील सामान्य माणसात विषाणू जीवाणू ची गल्लत होण्याचे काही कमी होत नाही ! सबब डॉ खरे ना धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2020 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. भाजीपाल्यांना मीठ-सोड्याने धुतल्याने काहीही उपयोग नाही, हे लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

जयंत कुलकर्णी's picture

4 Jul 2020 - 11:09 am | जयंत कुलकर्णी

मी पालेभाज्या आणल्या आणल्या पाण्यात बादलीत स्वच्छ धुतो. मग त्यात पाणी राहिले तर त्या भाज्या फ्रीजमधे सडतात म्हणून टर्कीश टोवेलमधे गुंडाळून चक्क वॉशींग मशीनच्या ड्रायरमधे टाकतो. पाच मिनिटे स्पिन केले की भाज्या अगदी कोरड्या ठणठणीत होतात. मग फ्रीजमधे ...

हे मी अनेक वेळा केलेले आहे.

तुषार काळभोर's picture

4 Jul 2020 - 12:54 pm | तुषार काळभोर

मी काही दिवसांपासून spread of covid through food असं सर्च करून पाहत होतो. सगळीकडे एकच माहिती होती की खाद्यपदार्थांतून कोरोनाचा प्रसार किंवा लागण होण्याची शक्यता नगण्य आहे. कोरोनाचा अंश असलेले सूक्ष्म थेंब (बाधित व्यक्तीने शिंकल्याने किंवा खोकल्याने उडालेले) जर स्पर्शातून आपल्या नाकात गेले, तर विषाणू संसर्ग होतो.
आता निर्धास्त झालो. म्हणजे निष्काळजी नाही, पण उगाचची काळजी जरा कमी होईल.

शिजवायच्या भाज्यांच्या बाबतीत फारशी काळजी करायची गरज नाहीच. पण कच्च्या खाल्ल्या जाणार्‍या गोष्टीत ज्या साबणाने खसाखसा धुता येतील, त्याच घेतोय सध्या. उदा. फळांमध्ये आंबे, संत्री, केळी इत्यादी. भाज्यांमध्ये टोमॅटो, काकडी इत्यादी. साबणाने धुता येणार नाहीत, अशा गोष्टी टाळतो (कोथिंबीर कच्ची वरून पसरणं, असा लाड सध्या बंद ठेवलाय. भाजी शिजताना त्यात टाकल्याने ती निर्जंतूक होत असावी). दुकानातलं वेष्टण असलेलं खाद्य उदा बिस्कीट आणि नूडल्स - पाकीटं खसाखसा साबणाने धुवून घेतो. बाकी धान्य, किराणा यात काळजी नसते - कारण १) चोवीस-अट्ठेचाळीस तासांनी कोरोना त्यातून जात असावा, २) ते पदार्थ शिजले जातात, त्यामुळे कोरोना नक्कीच मरत असेल.
इकडे गावाला इतकी काळजी घेत नव्हते, पण आता सुरू केलीय. प्रत्येकवेळी पाचेक मिनिटं 'वाया' घालवलेली परवडतील. बाकी बाहेर भाजी, किराणा दुकानदार यांना काही शिकवत नाही. बाहेर गेलो तर कुणाचा शरिरीक स्पर्श होणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतो. रोखीची फारशी काळजी करत नाही, कारण एकदा घरी आल्यावर आपण 'स्वच्छ' झालो की परत पैशांना स्पर्श करायची गरज लागत नाही. केलाच तर हाताला सॅनिटायजर आहेच. रोख अजून कधी निर्जंतुक केली नाही.

Rajesh188's picture

3 Jul 2020 - 7:40 pm | Rajesh188

हे सर्व मटेरियल असलेली sanitab म्हणून गोळ्या बाजारात आहेत.
450 रुपयाला 25 गोळ्या.
मल्टिपर्पज आहेत .
20 की 10 लिटर पाण्यात 1 गोळी टाकायची आणि त्या मध्ये भाज्या भिजत ठेवून नंतर वाहत्या पाण्यात धुवयच्या.
Corona virus gayab.
Parat ladhys,bathrom pan त्यांनी स्वच्छ करू शकतो.
Bleaching powder सारखा वास येतो.

माहितगार's picture

4 Jul 2020 - 10:14 am | माहितगार

यास मिपाकर जाणकारांचा वैद्यकीय दुजोरा मिळाल्यास बरे पडेल.

तुषार काळभोर's picture

4 Jul 2020 - 12:55 pm | तुषार काळभोर

म्हणजे स्वानुभव नसावा.
असो.

सुबोध खरे's picture

4 Jul 2020 - 12:52 pm | सुबोध खरे

SODIUM dichloroisocyanurate

हे संयुग शरीरावर कोणताही अपाय करत नाही( मूत्रपिंडातून जसेच्या तसे बाहेर टाकले जाते) असे आढळलेले आहे.

त्यामुळे ते सध्या तरी मानवी वापरासाठी सुरक्षित आहे.

अर्थात हा उपाय एक तर महाग आहे आणि त्यातून निघणाऱ्या क्लोरीनचा भाज्यांच्या/ फळांच्या रंग वास किंवा चवीवर काय परिणाम होतो हे बघावे लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2020 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा

+++111

शिवाय आता ह्यापुढील काळात मनोभयाचा फायदा घेऊन भरपूर लुटालूट होणार आहे.. हे ही लक्षात ठेवलेले बरे. आज गोळ्या, उद्या लिक्विड ..काहीही आणि का ही ही!

मनोभयाच्या फायद्याचे पोटॅशियल ग्राहक असेही आहेत .. ग्रहशान्ती करा... वास्तुशान्ती करायची राहिली असेल तर ती ही करा ..... नारायण नागबळी ... ताईत , अन्गारे,, धुपारे ,एक कोटी जपाचा सन्कल्प, गणपतीला नारळाचा हार.......... यादी भरपूर

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2020 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. बरोबर आहे एकदम. ही पण मनोभयाचा फायदा घेऊन केली जाणारी लुटालुट च आहे. तिच्या ग्राहकांनि त्याच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे.

ठराविक अगदी नगण्य लोक सोडली तर हात धुण्याची सवय होती का कोणाला.
आणि ते पण साबणाने.
फक्त नैसर्गिक विधी आटोपल्या वर साबणाने हात धूने हे सर्वमान्य होते.
बाकी थोडे पाण्यानी हात ओले करून रुमलानी पुसले की झाले काम.
भाज्या धुणे ही मात्र आपली जुनी सवय आहे (साबणाने नाही )
आणि शिजवून च खाणे हे तर आपली परंपरा आहे
सलाड चे नखरे हे तसे नवीनच.
आदिम काळात तंदुरी हा प्रकार होता आपल्या कडे पण नंतर मांस शिजवून खाल्ले आपण.
तंदुरी ची आदिम काळातील पद्धत भारतात परत कोणी सुरू केली त्याचा मी शोध घेतोय.
कच्चे मांस रोगास आमत्रण आणि बदनाम होतात भाज्या.

आनन्दा's picture

5 Jul 2020 - 10:32 am | आनन्दा

तंदुरी मांस कच्चे असते?
हे काहीतरी नवीनच ऐकले आज

तुषार काळभोर's picture

5 Jul 2020 - 1:18 pm | तुषार काळभोर

ते काहीही दावे आणि विधानं करतात.

Rajesh188's picture

5 Jul 2020 - 11:23 pm | Rajesh188

न शिजवलेले मांस हे आरोग्य ला हानिकारक च आहे.
भाजणे म्हणजे शिजवणे नव्हे .
दोन्ही क्रिया मध्ये फरक आहे.

तंदुरी ह्या प्रकारात पूर्ण मांस न भाजले जाण्याची शक्यता असते ह्या अर्थाने कच्चे मांस असा शब्द प्रयोग झाला तो चुकीचाच आहे.
शब्द प्रयोग चुकीचं आहे भाव नाही.

अभ्या..'s picture

5 Jul 2020 - 2:29 pm | अभ्या..

कुठलीच गोष्ट पूर्णपणे भाजली तर ती खाण्यायोग्य राहात नसते.
त्याला कोळसा हा शब्दप्रयोग आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2020 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

@त्याला कोळसा हा शब्दप्रयोग आहे. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

वामन देशमुख's picture

5 Jul 2020 - 7:18 pm | वामन देशमुख

टोमॅटो व्यतिरिक्त सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या स्वच्छ धुवून, एका मोठ्या कापडात त्याचे गाठोडे बांधून, वॉशिंग मशीन मध्ये फिरवून कोरडे करून घेतो मग वेगवेगळ्या पॉलीथीन मध्ये/ डब्यांमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवतो. आठवडाभर ताज्या राहतात, at least ताज्या आहेत अश्या वाटतात.

करोना उद्भवल्यापासून कच्च्या भाज्या / सलाद (कोथिंबीर, पुदिना, पालक, चुका, मूळ्याची पाने, काकडी, बीट, गाजर, तोंडली, टोमॅटो, मुळा, मुळ्याच्या शेंगा, गवारीच्या कोवळ्या शेंगा, मिरची इ.) कच्चं खाणं टाळतोय.

कोथिंबीर, पुदिना इ. भाजी शिजत असतानाच टाकतो, सर्व करताना वरून टाकत नाही.

कच्च्या भाज्या खाल्याने करोना होण्याची शक्यता नाही.

पण अस्वच्छ असतील तर मात्र गॅस्ट्रो कॉलरा होण्याची शक्यता आहे.

आणि कीटक नाशके फवारलेल्या असतील तर दूरगामी परिणाम होऊ शकतो.

तेंव्हा भाज्या खायच्या पूर्वी भरपूर वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवा.

माहितगार's picture

6 Jul 2020 - 11:28 am | माहितगार

एक पालकाची जुडी

* आधी शेतातून वेचली जाते मानवी हाताळणी १
* बहुतेक बास्केट (टोपल्या) उघड्या असतात :
* बास्केट टोपली भरलेली लगेच गाडीत चढवली असे होत नाही सहसा वाहनासाठी वाट पहावी लागते म्हणजे तो पर्यंत टोपली भरलेल्या जागे पासून एकत्रीत स्टॉक पर्यंत नेऊन ठेवणे यासाठी वेगळी व्यक्ती असल्यास -आणि नग मोजण्यासाठी सहसा असणार मानवी हाताळणी २
* बास्केट (टोपली) उचलून गाडीत भरणे मानवी हाताळणी ३
* टोपली मार्केट यार्डात उतरवणे मानवी हाताळणी ४
* टोपलीचा लिलाव करणार्‍या घाऊक विक्रेता दलालाने नग मोजण्यासाठी अथवा चेक करण्यासाठी हाताळल्यास मानवी हाताळणी ५
* किरकोळ विक्रेत्याने मोजणी करण्यासाठी केलेली हाताळणी आणि त्याच्या गाडीत टोपली चढवणे ६
* किरकोळ विक्रेत्याने विक्री ठिकाणी भाजी उतरवणे हाताळणी ७
* किरकोळ विक्रेता भाजी नीट लावून रचून ठेवतो हाताळणी ८
* एक जुडी २ खरेदीदारांनी हि हवी ती नको करत हाताळली ९
* घरी विकत घेणारा आणि भाजी बनवणारी व्यक्ती वेगळी असल्यास हाताळणी १०
म्हणजे ज्या अधिक एक्स्प्पोजर रिस्क पालक जुड्या असतील त्यांना १० पर्यंत एक्सपोज रिस्कमधून जावे लागू शकते. ज्या तेवढ्या एक्सपोजर रिस्क मध्ये नसतील त्यांनाही किमान ३ तरी एक्सपोज रिस्क मधून जावे लागू शकते.

१,१०,००० पालक जुड्या पैकी १०,००० जास्त एक्सपोज रिस्कला गेल्या १,००,००० कमी एक्स्पोज रिस्कला धरल्या तरी १०,०००* १० = १,००,००० एक्स्पोजर १,००,०००* ३ एक्स्पोजर = ३,००,००० एक्स्पोजर ४,००,००० देणार्‍यांपैकी १० % व्यक्ती कोणत्यान कोणत्या श्वसन आजाराने बाधीत + निष्काळजी असतील तर ४०,००० जुडा संसर्गजन्य रिस्कमध्ये जाऊ शकतात
कमीत कमी १०,००० मधल्या १००० आणि १,००,००० जुड्यातली संसर्गजन्य रिस्क कमी म्हणजे १०,००० जरी धरली तरी ११००० जुड्या संसर्गजन्या रिस्क मध्ये गेल्या त्यातील फक्त १००० जुड्या गरम पाण्याने सॅनिटाईज न करता कच्च्या सॅलड म्हणून खाल्ल्या तर त्यातून १०० जणांना संसर्ग झाला तर ते पुढच्या १० जणांना संपर्कजन्य संसर्ग पोहोचवतात म्हणजे म्हणजे एकुण जोखीम झाली १००० लोकांना. म्हणजे ४१,००० संसर्गजन्य लोकांमध्ये समजा १००० अधिक संसर्गजन्य लोकांची भरपडते. म्हणजे जवळपास २ ते २.५% लोकांना संसर्गाची रिस्क पडू शकते. २% खूप कमी आहे नाही पण हि एका दिवसाची जोखीम आहे ५० दिवसातली जोखीम १०० टक्के असू शकते. सगळ्यांनाच मृत्यूजन्य वीषाणू जन्य संसर्गाने पछाडले जाईल असे नव्हे त्यातील ९८ टक्के रिकव्हर होतील. पण बाकीच्यांना औषधपाण्याच्या खर्चाच्या गमावलेल्या वेळेच्या चक्रातून जावे लागेल.

महाराष्ट्रातील १० कोटी पैकी २% लोकांना या मार्गाने संसर्ग झाला तर २० लाखांना जोखीम होते आणि केवळ भाजी धुण्यासाठी पाणी गरम करण्याच्या किंवा निर्जंतुकीकरणाच्या जोखीमरहीत मार्गाचा अवलंब करण्याच्या आळसामुळे अशी जोखीम का घ्यावी ?

चौकटराजा's picture

6 Jul 2020 - 3:31 pm | चौकटराजा

मानवी जीवनच नव्हे तर इतर प्राणी जीवन हे जोखमी शिवाय अस्तित्व धरूच शकत नाही . खरे तर आपण जी लस वा औषधे शोधायचा प्रयत्न करीत आहोत ही विषाणूला धोकादायक आहेत की नाही ? अनेक प्रसंग मानव जातीला सहन करावे लागले आहेत , त्यात जैविक व भौतिक सन्कटे ही येणारच हे सनातन सत्य आहे ! मानव ही एक संकट आहे ही बाब स्वीकारली की झाले. अनेक दिव्यातून जात मानव उत्क्रान्त झाला आहे टिकला आहे ते वरदान इतर प्राण्यानाही निसर्ग देणारच ना...... ?

ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन फिरण्याचे आहे असे सीमेवर २० जीव गेले तर हळहळ होते.

'शहीद जमील' हा शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार प्राप्त भारतीय वीषाणूशास्त्र संशोधक आहे. बरेच लोक बीना लसिकरणाचीच हर्ड इम्युनिटी येऊ द्या म्हणताहेत -म्हणजे कोणतीही विशेष काळजी घेऊ नका, जे व्हायचय ते एकदाचे होऊन जाऊ द्या!- त्यांच्यासाठी त्याने आकडेवारी छान समजावली आहे.

भारताची लोकसंख्या १.३८ अब्ज, बीना लसीच्या नैसर्गिक हर्ड इम्युनिटीसाठी त्यातल्या ६० टक्के लोकांना कोविड-१९ आजार लौकर होऊन जाऊ द्यावा लागेल. म्हणजे ८३ कोटी इन्फेक्शन यातल्या १५ टक्के लोकांना इस्पितळात भरती होण्याची वेळ येईल म्हणजे १२.५ कोटी आयसोलेशन बेड्स (त्याने आकडेवारी देताना ३ लाख बेड्सची व्यवस्था होती. ५ % लोकांना ऑक्सीजन व व्हेंटीलिएटर सपोर्ट द्यावा लागेल त्यासाठी ४ कोटी २० लाख आयसीयू बेड लागतील. भारतात उपलब्धः १ लाख ऑक्सीजन बेड आणि केवळ ३४००० व्हेंटीलिएटर सपोर्ट सहीत बेड. या सुविधांच्या अभावी ०.५ टक्के लोक मेले तर ४० लाख लोक मरतील. (हि मुलाखत बातमी २३ मे ची आहे भारताची काही कपॅसिटी वाढली असे गृहीत धरून चालू पण तरीही तफावत किती रहाणार आहे. संदर्भ

एक ही जीव घेतला तर कायदा शिक्षा देतो, स्वतःची सदसद विवेक बुद्धी छळते ते वेगळे स्वतःच्या, रेल्वेच्या खाली काही जीव गेले शिक्षा नसली तरी इंजिन ड्रायव्हरला झोप येत नाही तळमळतात म्हणे. निष्काळजीपणाने स्वतःपुरती जोखीम असेल तर ठिक आहे पण ती जोखीम कळत न कळत बेपर्वाईने आपण समाजात हकनाक पसरवतो, ज्यांना अज्ञानाने कळतच नाही त्यांचे सोडून द्या पण ज्यांना कळते सवरते त्यांनी अधिक बारकाईने अधिक जबाबदारीने वागल्यास आकाश थोडेच कोसळते. वाचले तर चार जिव वाचतात. जसे २० जीव सिमेवर जातात तसा एखादा तरूण ब्रिगेडीअर करोना नेही जातो त्याचा जीव जाण्या मागे त्याच्या स्वतः कडून त्रुटी राहिली असेल तसेच तिथपर्यंत करोना पोहोचवण्याच्या साखळीतील प्रत्येकाकडून त्रुटी राहीले असे होत नाही का? असो.

माहितगार's picture

6 Jul 2020 - 5:15 pm | माहितगार

आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी टिव्ही न्यूज वरून ऐकत ऐकत टंकतोय

पहिल्या १ लाख केसेस नोंदवल्या जाण्यासाठी ५६ दिवस लागले नंतरच्या १ लाख केसेस १६, ११, ९, ७, ४ एवढ्या कमी दिवसात येऊन ७ लाख केसेस (२० हजारच्या घरात मृत्यू) वर जाताना सर्वाधिक संख्येच्या केसेस मध्ये रशियाला मागे टाकत भारताने ३ रा क्रमांक पटकवला आहे (या टेस्ट करून मोजलेल्या केसस असतील तर जिथे टेस्टींग झालेलेच नाही त्याचा आदमास घेतला तर अलरेडी भारताने पहिला क्रमांक मिळवलेला असणार आहे.)

माहितगार's picture

6 Jul 2020 - 5:30 pm | माहितगार

आता पर्यंत १ कोटी टेस्ट झाल्या आहेत पॉझिटीव्हीटी रेट १३ टक्के येतोय (म्हणजे अप्रत्यक्षपणे ६ लाख केसेसचा अंदाज नंतर आलेला आहे) आणि नोंदवलेल्या ७ लाख सपोर्टेड केसेस मध्ये मृत्यूदर ४.२५ टक्क्याचा आहे म्हणजे अनसपोर्टेड केसेस मध्ये मृत्यूदर अधिकच असेल.

मृत्यूंची झळ मुख्यत्वे गरीब वर्गाला बसते आहे आणि मध्यमवर्ग आर्थीक झळीवर जरासा सुटतो आहे. नुकत्याच झालेल्या वाद विवादात लस उपलब्धतेस अजून वर्षभराचा वेळ आहे तेव्हा अधिकची काळजी घेतल्याने श्रम पडल्याने दोन जीव वाचण्याची शक्यता असेल तर प्रत्येकाने अधिकची काळजी का घेऊ नये ?

चौकटराजा's picture

6 Jul 2020 - 6:35 pm | चौकटराजा

माझ्या वैयक्तिकी अंदाजानुसार ,भारतातील अप्रामाणिकपणा ,लोकशाही ,रुढीप्रियता ,बोलबच्चन गिरी ,लोकसंख्येची घनता ,प्रचंड आर्थिक विषमता ,नवीन चंगळ बाजीचा उदय ,आरोग्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष ,अज्ञान, अनेक प्रकारची उत्सव गिरी यांचा अभद्र संगम म्हणूनऑक्टोबर २०२० अखेर भारत करोना बळीचे अग्रभागी असेल की नाही सांगता येत नाही पण करोना ग्रस्ताचे बाबतीत नककी असेल.

आनन्दा's picture

7 Jul 2020 - 12:27 pm | आनन्दा

या बाबतीत २-३ प्रश्न आहेत

१. जर एका विशिष्ट गतीने आजार पसरू दिला, जसे की सध्या पसरत आहे, तर हवेतून सौम्य व्हायरल लोड मिळून सामूहिक प्रतिकारशक्ती लवकर तयार होइल का?
२. व्हायरस पसरत असताना त्याची पण म्युटेशन्स तयार होत असणार, त्यातली काही म्युटेशन्स सौम्य असतील का? आणि त्या सौम्य म्युतेशन्स ने सामूहिक संसर्ग झाला तर प्रतिकारशक्ती लवकर तयार होइल का?
३. हे १५ टक्के वगैरे आकडे खरेच विश्वासार्ह आहेत का? कारण आज खरे तर आपण जवळजवळ कोणतीही सुरक्शितता पाळत नसतात देखील भारतात करोनाच्या वाढीचा दर माझ्य अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे.. त्यामुळे मला असे वाटू लागले आहे की आपण जवळजवळ सामूहिक प्रतिकारशक्ती तयार केलीच आहे..

अवांतर -
करोना आणि त्या अनुषंगाने झालेली / केली गेलेली चीनची कोंडी पाहता कधीकधी मला करोना हा प्लांटेड / हाइपड आजार आहे असे वाटते. पण तो या धाग्याचा विषय नाही, म्हणून तुर्तास सोडून देतो.

कोणी डॉक याबद्दल काही सांगतील का?

आनन्दा's picture

7 Jul 2020 - 12:30 pm | आनन्दा

अजून एक..

एखाद्या करोनाबाधित माणसाशी मोकळ्या हवेत मास्क शिवाय व्यवहार केल्यामुळे मला हवेतून सौम्य संसर्ग होऊ शकतो का?

किंवा इमारतीच्या पार्किंगमध्ये एखाद्या करोनाबाधिताशी मास्कशिवाय गप्पा मारल्याने मला संसर्ग होईल का? आणि झाला तर तीव्रता किती असेल?

माहितगार's picture

7 Jul 2020 - 2:54 pm | माहितगार

(मी डॉक्टर नाही पण माझी आतापर्यंतची माहिती आणि लॉजीक जसे चालते) प्रश्न उलट्या क्रमाने घेतो.

किंवा इमारतीच्या पार्किंगमध्ये एखाद्या करोनाबाधिताशी मास्कशिवाय गप्पा मारल्याने मला संसर्ग होईल का? आणि झाला तर तीव्रता किती असेल?

कोविड-१९ आणि एकुणच श्वसनजन्य वीषाणू संसर्ग केवळ मोठ्या थेंबातून होतो की छोट्या थेंबातून अधिक लांबवर जातो या बद्दल संशोधकात अंशतः (तपशिलाचा) वाद चालू आहे अगदी कालच २३९ वैज्ञानिकांनी आग्रही शक्यता व्यक्त केली आहे की छोट्या थेंबातूनही वीषाणूंचा प्रसार जरासा अधिक दुरवर होत असणार. एअरबोर्न शब्दावर गूगलले तर बर्‍याच बातम्या आणि शोध मिळतील. हा संशोधकातील तपशिलाचा वाद बाजूला ठेवला तर किमान स्वरुपाचे वीषाणू विज्ञान, सामान्य विज्ञान आणि लॉजीक यांचा ताळमेळ घातला तर उत्तर सामान्य ज्ञानाच्या प्रश्नोत्तरात मोडावे. सविस्तर उत्तराकडे नंतर येऊ...

मला प्रश्नातील एक गृहीतक सुरवातीसच अधिक क्लिअर केलेले सयुक्तीक राहील असे वाटते

किंवा ..... एखाद्या करोनाबाधिताशी

कुणाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली तरी लगेच आनंद अवाजवी स्वरुपात साजरा न करण्याचा सल्ला जाणकार देताना दिसतात कारण टेस्ट करता सँपल पाठवल्या नंतर ही किंवा टेस्ट रिझल्ट निगेटीव्ह आल्या नंतरही लागण होण्याचा संभव असू शकतोच.

त्यामुळे शारिरीक अंतरपाळताना एखादी व्यक्ती कोरोना बाधीत आहे किंवा नाही याचा विचार करण्याची उसंतही उपलब्ध असतं नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी शारीरीक आंतर पाळणे भाग आहे / अभिप्रेत आहे. (घरातील व्यक्तींशी अगदीच अडचणीच्या क्षणीचा भाग सोडला तर अंतर पाळणे श्रेयस्कर असावे)

किंवा इमारतीच्या पार्किंगमध्ये एखाद्या करोनाबाधिताशी मास्कशिवाय गप्पा मारल्याने मला संसर्ग होईल का? आणि झाला तर तीव्रता किती असेल?

मूळ प्रश्नाकडे परत येऊ:
१) आपण मास्क बांधतो ते मुख्यत्वे दुसर्‍याला बाधा होऊ नये म्हणून - हे सर्वांनी दुसर्‍यांची काळजी घेतली तर आपली काळजी आपोआप घेतली जाते असे तत्व आहे. मास्कच्या स्वरुप आणि प्रत्यक्ष वापरावर संसर्गाची जोखीम अवलंबून असेल.

२) मास्क बांधला आहे किंवा नाही या पेक्षाही शारीरीक अंतर हा प्रमुख क्रायटेरीया आहे. - ज्या कणांचे आकार मिलीमिटीर पेक्षा कमी असेल किंवा धुळीच्या कणापेक्षा लहान असेल ते हवे सोबत बर्‍यापैकी अंतर हवेच्या दिशेने गाठतील हे सांगायला ज्योतीष आणि वैज्ञानिक दोन्हीही लागू नयेत किंवा कसे- प्रत्यक्ष संसर्ग होईल किंवा नाही हे अंतरा शिवाय समोरच्या व्यक्तीच्या उश्वास आणि बोलताना तुषार किती जोरात उडतात त्यांचा आकार (वजन) आणि हवा वाहती आहे किंवा नाही आणि हवेच्या दिशेवर इत्यादीवर अवलंबून असेल. ( माझ्या व्यक्तीगत अंदाजाने परस्पर उंचीचाही संबंध यावा कमी उंचीच्या व्यक्तीने अधिक उंचीच्या व्यक्तीपासून संसर्गाची शक्य्ता कमी असावी म्हणून अधिक अंतर पाळणे श्रेयसकर असावे)
३) अंतर जेवढे कमी आणि खेळत्या हवेचे प्रमाण जेवढे कमी आणि व्यक्तींची संख्या जेवढी अधिक तेवढी संसर्गाची शक्यता अधिक अंतर जेवढे अधिक व्यक्तींची संख्या जेवढी कमी आणि हवा जेवढी कोरडी आणि खेळती तेवढी संसर्गाची शक्यता कमी व्हावी. हे साधे गणित नाही का ? उदाहरणार्थ सहा फुटांचे अंतर त्यातल्या त्यात सुरक्षीत समजले जाते पण समजा हवेचा जोर तुषार सोडणार्‍याकडून तुषार झेलणार्‍याकडे अधिक असेल तर सहा फुटाचे अंतर असूनही वीषाणू पोहोचणार नाहीच याची गॅरंटी कशी देणार किंवा एखादा जॉगर धावपटू धावता धावता शिंकला किंवा शिंकत शिंकत धावला तर त्याची शिंक अधिक अंतर कव्हर करेल. किंवा एखादी व्यक्ती शिंकुन पुढे निघुन गेली आणि नेमके त्या मुमेंटला कुणि तिथे पोहोचले तरी अंतर अधिक असूनही बाधा होऊ शकतेच पण दोन व्यक्ती संवाद साधत आहेत त्यात सहाफुटांचे अंतर त्यातल्या त्यात कमी जोखीमेचे असणार.

४) कुणाचे तुषार उडाल्या उडाल्या अर्थात सिलींग फॅनच्या अथवा एसीच्या खेळत्या हवेस तेवढा अर्थ असणार नाही कारण ते आपापल्या दिशेने हवा फिरती ठेवू शकतात ज्यात संसर्गजन्य वीषाणू हवेतच गोल गोल फिरतील (खेळती नव्हे)

५) ज्याला बाधा होईल ती किती प्रमाणात होईल ते त्या त्या व्यक्तीच्या त्या त्या वेळच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असेल. ( मी अलिकडे कायप्पावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉ. धनंजय केळकरांचे व्याख्यान ऐकले) व्हायरल लोड वीषाणू संख्येचा नेमका किती परिणाम होतो हे अद्यापही संशोधनात असलेतरी होत असण्याची शक्यता गृहीत धरावी लागत असावी (चुभूदेघे).

६) प्रतिकार शक्ती व्यवस्थित असताना शरीर प्रतिकार करत असले तरी शिंका खोकलणे होऊ शकते त्यतनही वीषाणूंचा प्रसार होतोच म्हणजे स्वतःचे शरीर सुरक्षीत राहीले तरी स्वतःच्या उश्वासातील तुषार मार्गे वीषाणू दुसर्‍यांना पोहोचवले जात असतात.

एनी वे बिंदीस्त जागेत / घरात संवाद साधण्यापेक्षा मोकळ्या जागेत सुरक्षीत -६ फुटाचे- अंतर ठेवत मास्कबांधून संवाद साधणेच अधिक सुरक्षीत असावे.

कोणा चाचणी घेऊन पॉझीटीव्ह असलेल्या कोरोना बाधीताशी संवादा पलिकडे - संवादासाठी मास्क बांधून ६ फुटाचे अंतर - व्यवहार म्हणजे जसे की वस्तुंची देवाण घेवाण करण्याची वेळ आलीच तर मला वाटते एखाद्या निर्जंतुकीकरण केलेली प्लास्टीकची बास्केट किंवा बकेट इत्यादी वापरावे ज्यातून दोघांनीही वस्तु देण्यापुर्वी निर्जंतुकीकरण करावे. ६ फुटापेक्षा कमी अंतर ठेवण्याची वेळ आली तर अशी जोखीम सहसा निरोगी निर्व्यसनी तरुणांनी घ्यावी, माझ्या व्यक्तीगत मते एन - ९५ मास्क डोळ्याला चष्मा लाबंबाह्यांचे कपडे हातात आणि पायात मोजे बूट अशी किमान तयारी असावी.

एन - ९५ मास्क कमी वापरा म्हणतात पण आवश्यक तेथे टिका झाली तरी केला पाहीजे असे माझे व्यक्तीगत मत आहे.

(उत्तरदायीत्वास नकार लागू)

माहितगार's picture

7 Jul 2020 - 3:18 pm | माहितगार

करोना आणि त्या अनुषंगाने झालेली / केली गेलेली चीनची कोंडी पाहता कधीकधी मला करोना हा प्लांटेड / हाइपड आजार आहे असे वाटते. पण तो या धाग्याचा विषय नाही, म्हणून तुर्तास सोडून देतो.

भारतीय तत्वज्ञानातील दिसणारे जग मिथ्या आहे याच्यावरच्या विश्वासातून कुणि बोलत असेल तर भाग वेगळा.
जागतिक राजकारण त्यातुन होणार्‍या आरोपबाजी बाजूला ठेवल्या तरी, नेहमीच्या व्हेंटीलिएटर गरजेपेक्षा अधिक व्हेंटीलिएटर लागत असतील आणि नेहमीच्या मृत्यूदरा पेक्षा ४९% पर्यंत अधिक मृत्यू होताहेत हे सिद्ध होत असेल तर हाईप्ड कसे म्हणता येईल. संशयाचे मीठ असावे ते स्वतःचे जेवण खारट होईल एवढे नसावे. जसे साप साप म्हणून भुई थोपटू नये तसे साप खरोखर फिरत असेल तर अस्तीत्व नाकारु नये.

भारतात करोनाच्या वाढीचा दर माझ्य अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे.

कोण म्हणाले कमी आहे म्हणून-वर आकडेवारी दिली आहे-सहसा सरकारी आकडेवारी कमी करुन दाखवली जाते म्हणजे अधिक असू शकते-, सोप्या शब्दात रोज मरे त्याला कोण रडे असे झाले अशी स्थिती आल्यावर लोक रडायचे थांबले किंवा आपण रडण्याकडे लक्ष देणे थांबवले म्हणजे लोकांचे मरण थांबले असा अर्थ होत नसावा किंवा कसे? माझे मार्केटींगचे गुरु सांगत पाऊसाची सवय झाली की मुसळधार पावसाचे ही काही वाटत नाही मग माणूस छत्री विकणार्‍याला परत पाठवतो, याचा अर्थ पाऊसाची समस्या संपली असा होत नसावा किंवा कसे.

आजच्या सकाळ मध्ये ग्रामीण भागात व्हेंटीलिएटर कमी पडल्याने एका पॉझीटीव्ह स्त्रीचा मृत्यू अशी बातमी आहे. बातमीत न आलेल्या व्यक्ती किती असतील ते देव जाणे. तिथे जाऊन आपण मदत करु शकत नाही तर कमीत कमी परिस्थितीचे गांभीर्य कमी मोजून केवळ समाजमनाची दिशाभूल झाली असे नाही तर त्या समाजमनाने जबाबदार्‍या घेण्याचे नाकारावयास सुरू केले तर .. असो.

जर एका विशिष्ट गतीने आजार पसरू दिला, जसे की सध्या पसरत आहे, तर हवेतून सौम्य व्हायरल लोड मिळून सामूहिक प्रतिकारशक्ती लवकर तयार होइल का?

मी वरच्या प्रतिसादात विषयातील जाणकाराच्या संदर्भा सहीत माहिती दिली आहे - ज्यांचा संदर्भ दिला ते माझे कोण लागत नाही- तरी आपल्याला माहिती नाकारावी वाटते तर इतर संदर्भातून तपासून संदर्भा सहीत त्रुटी नजरेस आणाव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात समाजमनाची दिशाभूल करणारा संशय संदर्भाशिवाय पसरवला असे होऊ नये.

(उत्तरदायीत्वास नकार लागू)

मी कोणतेही निष्कर्ष काढता नाहीये, केवळ शंका काढतोय..

भारतात करोनाच्या वाढीचा दर माझ्य अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे >>
याबद्दल मला असे म्हणायचे आहे की सरकार जे आकडे दाखवत आहे ते फारच कमी आहेत.. एक तर करोना प्रचा द वेगाने पसरत, पण लोक बरे होत आहेत..
मी असे म्हणण्याचे कारण -
मी ज्या भागात राहतो तिथे सगळी पांढरपेशी वस्ती आहे, पण अजूनही भाजी घेणारा ती हाताळल्याशिवाय घेत नाही.
चहा टपऱ्या जोरात चालू आहेत
लोक सर्रास रस्त्यावर फिरत आहेत
किंबहुना शाळा आणि ऑफिस याशिवाय काहीही बंद नाहीये.
या परिस्थितीत करोना प्रचंड वेगाने पसरायला हवा होता असे माझे मत आहे.. पण आकडेवारी तसे दाखवत नाही. करोनाच्या दुपटीचा वेगही मंदावत आहे.

मी यातून असे निष्कर्ष काढतो की
1. एक तर करोना खूप वेगाने पसरतोय, पण बहुनांशी सौम्य लक्षणे असल्यामुळे नोंद होत नाहीये.
2. किंवा करोना पसरतच नाहीये..

जो आजार lokdown असताना प्रचंड वेगाने वाढत होता तो आजार lokdown उठल्यावर इतक्या कमी वेगाने वाढेल यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.

त्यातून तयार झालेली हे सगळे मते आहेत..

बहुतेक आजारी लोकांचे स्वरुप नॉन सिम्प्टोमॅटीक असल्याने ८५ टक्के घरच्या घरीच बरे होण्याची शक्यता असल्याने सर्व सुरळीतच भासत राहील उरलेल्या १५ टक्क्यातीलही २.५ ते ८ टक्के सोडता बरे होतील चिंता मृत्यूदर किमान अर्ध्याने वाढेलला असण्याची आहे.-को मॉर्बिडीटी असलेल्यांचा प्रत्यक्षातला मृत्यूदर अर्वाधिक वाढलेला असेल. जिथे टेस्टींग नाही तिथे मृत्यू को मॉर्बिडीटीवर ढकललले (नोंदवले जातात रडारवर येत नाहीत) एका डेंटीस्ट डॉक्ट विद्यार्थ्याची बातमी होती त्याची टेस्ट तिनदा निगेटीव्ह आली पण लक्षणांनुसार त्याने स्वत:च सांगितले कि कोविडच आहे . तो गेल्यावर पुन्हा टेस्ट केली ती पॉझीटीव्ह आलेली होती.

काम आऊटसोर्स करणार्‍या माझ्या एका परिचितांची मागच्या आठवड्यात एका फार्मा कंपनीला भेट झाली. सिईओने सहज म्हटले की खोचकतेच्या उद्देश्याने टोला लावला माहित नाही पण त्याने 'घरी बसून काम करा म्हणजे कोरोनाही होत नाही आणि अपघातही होत नाही' असे काहीसे बोलला असावा.

प्रत्येक अपघात माझ्या डोळ्यासमोर होत नाही म्हणजे भारतात (किंवा इतरत्र) अपघात होत नाहीत असे नाही. आताच्या लॉकडाऊन्समुळे ट्रॅफीक आणि अपघात संख्या कमी झाली असेल पण सर्वसाधारण काळात माझ्या डोळ्यासमोर अपघात होत नाहीत तरीही अपघातग्रस्तांना सेवा पुरवणारी आर्थोपेडीक क्लिनिक्स ओसंडून वाहत असतात. वीषाणू शरीरात पोहोचणे सुद्धा एक अपघात आहे, आपण गाडी जपून चालवली तरी अपघात होऊ शकतो, आणि गाडी जोरात (आणि बेदरकार) चालवली तरी अपघात होऊ शकतो. सर्वांनीच गाड्या जोरात (आणि बेदरकार) चालवल्या तर ट्रॅफीक वाढल्याचे आणि सुरळीत असल्याचे चित्र दिसत राहीले तरी इस्पितळांना पेशंट हँडल करण्यासाठी बेड कमी पडू शकतात.

अपघात होतात म्हणून गाडी चालवूच नये का ? नक्कीच चालवावी पण जरूरी त्या सर्व सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन करून चालवावी.

जो आजार lokdown असताना प्रचंड वेगाने वाढत होता तो आजार lokdown उठल्यावर इतक्या कमी वेगाने वाढेल यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.

वर दिलेली आधीकृत आकडेवारी आपण नीट वाचली असता आजार कमी वेगाने वाढत असल्याचे सुचवत नाही आहे. आता पर्यंत १ कोटीच्या आसपास टेस्ट झाल्या ७ लाख रडारवर आले ६ लाख आजार होऊन गेल्यानंतर कळाले म्हणजे अदमासे ४६ टक्के नंतर कळाले. ७ लाख जे रडारवर वेळे आधी आले ते सर्व गचकले नाही केवळ ४.२५ टक्केच दिवंगत झाले. ४.२५ टक्के रेट सर्व साधारणपणे ऑक्सिजन आणि व्हेंटीलिएटर सुविधा देऊन येतोय म्हणजे जिथे टेस्टींग ऑक्सिजन आणि व्हेंटीलिएटर सुविधा नाही तिथे मृत्यूदर बराच अधिक असू शकतो. (- भारताची १३० कोटी पैकी ३० कोटी लोकसंख्या जरी घनदाट वस्त्यातून रहाते असे गृहीत धरले तरी १३ लाखाच्या ३० पट तरी चारेक कोटी पर्यंत आजार सहज पसरलेला असू शकतो किंवा येत्या काळात सहज पसरेल प्रत्यक्षातला मृत्यूदर बराच अधिक असणार जो टेस्ट आणि संगणकीकृत नोंदींच्या अभावी रडारवर येत नाहीए. माहितीच्या आधिकारात किंवा संसदेच्या पटलावर प्रश्नांची उत्तरे मागवल्या नंतर सावकाशपणे आकडेवारी चे गांभीर्य पुढे येऊ लागेल )

लॉकडाऊन उठल्यानंतर सरकारलाही सगळी आकडेवारी रडारवर नको आहे. सेवा दात्या अधिक घनता असलेल्या ठिकाणी आजार अधिक पसरतोय. (भारतात मृत्यूंची नोंद होऊन डाटाबेसमध्ये विश्लेषणासाठी येण्यात एक पंचवार्षीक कालावधी संपलेला असतो अगदी पुण्यासारख्या ठिकाणी डेथपासेस अगदी कोरोना येण्यापुर्वी पर्यंत हाताने लिहीलेले नॉन कॉम्प्युटराईज्ड दिले जात मग नंतर पास घेऊन तुम्ही सर्टीफिकेट मागण्यासाठी गेला तरच संगणकीकरण होणार!) छोट्या शहर आणि गाववाड्यातील आकडेवारीची स्थिती दयनिय असणार . इटलीत सुद्धा सगळ्या मृतांचे टेस्टींग केले जाऊ शकले नाही पण संगणकीकरणामुळे वाढलेला मृत्यूदर लवकर कळला. भारतात गरिब वर्गाच्या जेष्ठ नागरीकातील मृत्यूदर पुर्वीपासूनच जास्त असणार त्यामुळे मृत्यूदरात झालेली वाढ भारतात चटकन नोंदवली जात नाहीए. मध्यम वर्गात आजार कमी पसरण्याचे कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये लोक एखाद दुसर्‍या फ्लोअरशी संवाद ठेऊन असतात. शिक्षण आर्थीक क्षमता या कारणांनी शारिरीक प्रतिकारशक्ती बरी असणे आणि फ्लोअर बाह्य संवाद कमी असल्याने चाळींच्या तुलनेत आजाराची साखळी न वाढण्याचा फायदा होतो. आपण म्हणता तसे त्यांचे घराच्या बाहेर नियम न पाळता मिसळणे वाढते आहे तसे आजार वाढतो आहे फक्त तो एखाद्या फ्लोअर पर्यंत मर्यादीत असल्यास महापालिकेला त्यांच्या कडे बघण्यास वेळ नाही. किंबहूना सरकारी इस्पितळांची जबाबदारी खासगी क्षेत्रात देण्याचा एक फायदा जसा ताण कमी करणे आहे तसा वाढती आकडेवारी न दिसून येण्यात सरकारचे राजकीय वाभाडे निघू नये म्हणून कोणतेही सरकार सर्व मध्यमवर्गाची आकडेवारी पुढे आली नाही तर सरकारलाही ठिकच असेल.

आकडेवारीवर असंख्य लोक लक्ष्य ठेऊन आहेत मोठ्या त्रुटी आल्या तर कुणि न कुणि लक्षात आणून देईल मी काल टंकलेली आक्डेवारी एन डी टि व्ही वरून घेतली आहे ते काही सरकारी बाजूचे चॅनल नाही अधिकृत आकडेवारी चुकत असेल तर त्यांनी आधीच आवाज केला असता. अर्थात जिथे टेस्टींग सुविधाच देशभरात नाहीत तिथे खेडोपाडी छोट्या शहहरात किती आले आणि किती गेले याची मोजदाद होणे संभव नाही.

असो.

सामूहिक रोग प्रतिकार शक्ती विषयी जरा सांशक च वाटते .
एक तर हे खूप धोकादायक आहे अपेक्षित प्रतिकार शक्ती निर्माण झाली नाही तर प्रचंड प्रमाणात जीवित हानी होवू शकते.
आणि ह्या शिवाय संबंधित देशाची पूर्ण प्रशासनिक यंत्रणा पूर्णतः कोलमडून जावू शक्रते.
आणि जगात कोणत्या ही देशाने कोणत्या ही साथीच्या रोगांवर सामूहिक रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी केल्याची नोंद आहे का?

की फक्त ही theory aahe प्रत्यक्षात असे काही घडत नाही.

रोगा पासून बचाव करण्याचा सर्वात खात्रीचा उपाय घराच्या बाहेर न पडणे
भाज्या रोज न मागवता 6 ते 7 दिवस पुरतील अशा मागवणे आणि सर्व माहीत असलेले उपाय करून फ्रीज मध्ये साठवून ठेवणे.
डाळी किंवा बाकीच्या गरजेच्या वस्तू साठवून ठेवणे त्या साठी रोज बाजारात जायची गरज नाही.
बाहेरील कोणत्याच व्यक्ती शी शक्यतो संपर्क टाळणे.
मास्क हा काही तुम्हाला 100 टक्के सुरक्षा देत नाही एक चूक तुम्हाला बाधित करू शकता.
किती ही काळजी घेतली तरी चूक होण्याचे प्रमाण काही percent तरी असतेच.
त्या साठी मला पना corona होवू शकतो ह्या विषयी मनाची तयारी असावी .
घाबरून जावू नये.

चौकटराजा's picture

7 Jul 2020 - 7:48 pm | चौकटराजा

त्या साठी मला पना corona होवू शकतो ह्या विषयी मनाची तयारी असावी .
घाबरून जावू नये.
ज्यावेळी करोना प्रादुर्भाव चालू झाला त्यावेळी मिपावर लोक चेस खेळायला लागले. कुणी रेसीपी टाकायला लागले. चेपू वर गाणी काय , ज्योक्स काय नुसता भारतीयाना उत आला होता. प्रशासनाने विमानतलावरच गलथानपणा केल्याचा उल्लेख व उहापोह फार कमी लोक करीत होते. लोकाना आजही जीवाणू व विषाणूतला फरक कळत नाही. मला तरी भारतातील हा उद्रेक अपेक्शित होता. ब्राझील देखील भारतासारखेच एक बेशिस्त राष्ट्र आहे. रशिया व अमेरिका इथे कदाचित हवेतील थन्डावा हा कारणीभूत झाला असावा हा माझा केवळ वैयक्तिक अन्दाज आहे !

Rajesh188's picture

8 Jul 2020 - 6:47 pm | Rajesh188

जेव्हा पासून सी 19 आला तेव्हा पासून असंख्य दावे केले गेले .
मास्क वापर करा ह्याचा जोरदार प्रचार केला गेला लोकांनी मास्क तोंडाला लावायला नुकतीच सुरवात केली होती तोपर्यंत मास्क कोणी वापरावा आणि मास्क निरोगी लोकांनी वापरणे कसे व्यर्थ आहे ह्याचे धडे द्यायला suravat झाली.
लोकांना मास्क वापरावा की नको असे प्रश्न पडले.
मग sanitizer ni विषाणू मरतो म्हणून पोट तिडकिने सांगायला suravat झाली की लगेच काही दिवसात santizer त्वचेला कसे घातक आहे ह्याचे बोद्धिक सुरू झाले.
परत लोक द्विधा मनस्थिती मध्ये.
मग corona fakt badhit लोकांच्या शिंकण्या मुळे,खोकण्या मुळे फस्त 6 मीटर परिसरात पसरतो हे सांगितले जावू लागले आणि काही दिवसात लगेच विषाणू हवेतून सुद्धा पसरत आहे हे दिव्य ज्ञान झाले.
परत लोकांना सुरक्षित अंतरतील फोल पना जाणवायला लागला परत द्विधा मनस्थिती .
घरात झोपताना पण मास्क वापरावा काय असे पण विचार यायला लागले.
लॉक डाऊन हा जागतिक मान्य एकमेव उपाय देशांनी सुरू केला की लगेच कामगार,अर्थव्यवस्था,स्थलांतरित ह्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत ह्याचे अमृत .मिळायला लागले.
करावे तर काय करावे.

चौकटराजा's picture

8 Jul 2020 - 7:27 pm | चौकटराजा

सर्वायवल ऑफ फिटेस्ट ... ज्याचे शरीर व मन परिसराला अनुकूल असे बदलते तो जगतो. हा एकच मंत्र लक्षात ठेवावा ! हे झाले विज्ञान . जिसका बुकिंग हो गयेला है वो जाणे वाला है ! हे झाले अध्यात्म