भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय- १२. ताजमहालावरील कोरीव लेखनकाम

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
30 Jun 2020 - 11:38 pm
गाभा: 

भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

१२. ताजमहालावर जे कोरीव लेखनकाम करून केले आहे त्याची भाषा व लिपी कोणती ते? लिहिलेले वाचता येते का?
कोरून लिहिलेल्या पट्टीवर कारागिरांनी आपली नावे त्यात लिहिली आहेत?

एबा कोच यांनी अरबी व फारसी भाषेत अत्युच्च दर्जाच्या लेखन शैलीच्या कारागिरांची नावे त्यांनी नोंदलेली आहेत असे आवर्जून लिहिले आहे. हे लेखन नेमके कुठे पहायला मिळेल? ते कोण यावर त्या म्हणतात...

1

खोट्या कबरीच्या खोलीत दक्षिणे कडील कमानीवरील पट्टीत ते सापडेल. त्यात शेंदरी चौकोनात १०४५ हिजरी असे आहे. तर खालील पिवळ्या चौकोनात अनामत खान अशी सही केली आहे. ‘नक्ष’ लेखन शैलीत आहे तर सही ‘सुलूस’ नावाच्या लिपीत सादर केली होती) (French word - cartouches - उच्चार कारतूश - सही किंवा नावासाठी दिलेली जागा) हे लेखन वाचू शकणाऱ्यांनी यावर अभ्यास करून आपले मत सांगावे की सही अरेबिकमधे आहे कि फारसीत? तारीख पुर्ण आहे की फक्त साल? कारण एबांच्या पुस्तकात संदिग्धता आहे.
*जिलूखाना इमारतीवरील इवानातील (आत गेलेला भागाच्या कमानी वरील) पिश्ताक (शीर्ष पट्टीचा भाग) उभ्या दांड्या व त्यातल्या मजकुराला आडवी लांबसर आखीव काट म्हणजे ते अरेबिक मधील कुराणातील आयते लिहिलेले आहेत. *ताजमहलाकडे जाताना ज्या दरवाज्यातून जावे लागते तो दरवाजा.

1

या शीलालेखातून असा काय संदेश मानवतेला दिला गेला आहे यावर एबा कोच पान २२६वर लिहितात… (Sura is 89, al-Fajr, 'Daybreak',) ताजमहालच्या शिलालेख कार्यक्रमाची थीम मृत्यूनंतरच्या जीवनावर आधारित (आहे). कुराणातील सुरा (प्रकरणे), किंवा त्यातील आयते (परिच्छेद,) (अंतिम) दिवसाच्या एकनिवाडा, दिव्य दया आणि स्वर्ग लोकांनी विश्वासू लोकांना (दिले गेलेले ) वचन आहे. याच आधारावर ताजमहाल होता असा युक्तिवाद केला जात आहे. ओ इब्न अल अरेबी यांनी गूढ चित्रात सांगितल्याप्रमाणे, देवाच्या सिंहासनाची प्रतिकात्मक प्रतिकृती बनवा. या कल्पनेच्या विरोधात बोलणार्या अनेक मुद्द्यांपैकी एक म्हणजे (सुरा २, श्लोक २५५) चे प्रसिद्ध सिंहासनाचे श्लोक. ते देवाच्या गौरवाचे गुणगान करणारे (आहेत) या शिलालेखात अनुपस्थित आहे. जेव्हा ताजमहालचे सर्व घटक एकत्र पाहता त्यामध्ये काही शंका नाही की - परमात्म्याकडे मुमताजसाठी घर तयार केल्याबद्दल देवाच्या स्वतःच्या शब्दासह, समाधीची संपूर्ण प्रतीकात्मकता त्यातून प्रकट व्हावी. (गूगलवरून सरभेसळ भाषांतराचे समजेल अशा भाषेत स्वैर रुपांतर)

यानिमित्ताने माझ्यापाशी असलेल्या कुराणाच्या मराठी प्रतीतून ताजमहालाच्या विविध भागात कोरलेल्या आयतींचा अनुवाद वाचला तो सादर करत आहे. त्या अर्थाचा संदर्भ कसा लावावा ते वाचकांनी ठरवावे.

1

1

लेडी न्यूजंट यांच्या सांगण्यावरून १८१२ साली दिल्ली वा आग्र्यातील कोणी एक मारिया नावाच्या कलाकाराकडून, हे कुराणातील सुलूस लिपीतून अरेबिक लेखन करवून घेतले गेले. त्यात सुरा ४० श्लोक ७ व ८ , सुरा ४१ श्लोक ३० व मधे (गूगलचे भाषांतर मासला म्हणून देत आहे. ‘जे स्वर्गात वचन देतात आणि जे त्यांच्या वाडवडिलांच्या पूर्वजांसमवेत योग्य मार्गाचा अवलंब करतात त्यांना सार्वकालिक बागांचा दावा करतात, पती / पत्नी आणि संतती '.
शेजारच्या फोटोत वर च्या चौकटीत शीर्षक मानले तर खाली ११ श्लोक आहेत असे वाटते.

1

हाच भाग मौदूदींच्या मराठी कुअरान प्रतीत असा आहे.
सुरा ४० मधील ७-९ - १२ श्लोक

1

सुरा ४१ मधील १९ ते ३० श्लोक -

1

वरील लेखाचा उद्देश असा आहे की ताज महालातील हस्तकलेच्या उन्नत लेखनशैलीची तारीफ करायला हवी. त्याच बरोबर त्या संस्कृतीच्या लेखी कुअराणामधील विचारधन काय असते यावर प्रकाश टाकला जावा. ताजमहाल पहाताना या बाबींकड लक्ष द्यायला शक्य नसते. फोटोतून पहायला मिळाले व विचारले की काय या पट्टीतील लेखनात लिहिले असते तर लोक "काय की" म्हणतात किंवा तोंडाचा चंबू करून "पुर्रर्ऱ" करून दोन्ही हातानी माहित नाही असे म्हणताना दिसतात. तसे होऊ नये ...

….

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

4 Jul 2020 - 11:00 am | दुर्गविहारी

विचार करायला लावणारे लिखाण आहे.

शशिकांत ओक's picture

5 Jul 2020 - 3:14 pm | शशिकांत ओक

प्रत्येक गड आणि किल्ल्यावरील शीलालेख, प्राचीन भाषेतील लिखाण यावर गड प्रेमींनी काही शोधकार्य करून तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घ्यावा, यातून भाषा, लिपी, लेखन पद्धती यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो.

शशिकांत ओक's picture

10 Jul 2020 - 7:39 pm | शशिकांत ओक

तुर्कस्थान मधील सुप्रिम कोर्टात निर्णय घेतला गेला की १९३४ साला पासून चर्च (म्युझियम) म्हणून मान्यता पावलेली इमारत ही 'मशीद' आहे असे मानले जावे... तुर्की पंतप्रधान एर्दोगान तसे पुकारणार आहेत.
हे नेमके 'ताजमहाल ला' मंदिर म्हणून मानले जावे या भारतीयांच्या अपेक्षेप्रमाणे आहे.
इस्तंबूल या शहरात ही वास्तू १६०० वर्षापासून उभी होती. साधारण ६शे वर्षांपूर्वी ती मुस्लिमांनी हस्तगत केली. मशीद म्हणून वापरली. शहराचे नाव कॉन्टँटिनोपल अशा बायझंटाईन (ख्रिश्चन) काळातील नावाला बदलून इस्तंबूल केले.
युरोपियन देशांच्या दबावाखाली १९३४ पासून हा ख्रिती चर्च वास्तू समुह मशिदी ऐवजी म्युझियम म्हणून सर्व धर्माच्या लोकांना पहायला अभ्यासायला उघडला गेला.
'ताजमहाल या बाबतीत ही कबर इमारत या आधी मंदिर समूह म्हणून बांधली मंदिर होती' असे मानले जावे असा निर्णय सुप्रिम कोर्टात दिला जावा अशी केस करून निर्णय मिळवला जावा.

रमेश आठवले's picture

11 Jul 2020 - 8:02 pm | रमेश आठवले

भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमणियम स्वामी यांच्याशी समर्क करा. ते अशा केसेस सर्वोच्च न्यायालयात लढवतात आणि बहुधा जिंकतात. रामसेतु आणि अयोध्या केसेस मध्ये त्यांनी भाग घेतला होता. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिराच्या जवळ ज्ञानवापी हे संस्कृत नाव असलेली मशीद आहे. ती केस त्यांनी सध्या हातात घेतली आहे.

शशिकांत ओक's picture

11 Jul 2020 - 10:06 pm | शशिकांत ओक

ताज महल केसवर ते काम करतील असे वाटते.