जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
24 Apr 2020 - 11:04 pm

सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती. पुढे मोजून तीन दिवसात ३१ डिसेंबरच्या त्या अविस्मरणीय रात्री कॅप्टन विजय कुमार या जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा ठरलेला होता.

"मी कायमची घर सोडून जाते आहे, विजू डिअर!" आभासी वास्तवात गुंगून गेलेल्या विजयला कुजबुजल्यासारख्या स्वरात एक परिचित आवाज ऐकू आला. "लग्नाचा अर्थ समजण्याएवढी तुझी मानसिक वाढ कधी चुकूनमाकून झालीच, तरच पुन्हा माझ्या ...". तो आवाज हळूहळू विरत गेला. सौ. अंजली विजय कुमार तावातावाने घराबाहेर पडली. पाठीमागे वळून न बघण्याची तसदी देखील न घेता तिने दरवाजाला चक्क लाथ घातली. दरवाजा धाडकन 'लॅचबंद' झाला.

[एका इंग्रजी शतशब्दकथेचा स्वैर भावानुवाद]

वाङ्मयभाषांतर

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

25 Apr 2020 - 2:48 pm | मराठी कथालेखक

पाठीमागे वळून न बघण्याची तसदी देखील न घेता तिने दरवाजाला चक्क लाथ घातली

बाहेर उघडणारा दरवाजा आहे का ? शक्यतो सगळे दरवाजे आत उघडतात...