भारतदर्शन : सांस्कृतिक गीतगंगा : भाग २ : नागालँड - विशेष!!

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
6 Apr 2020 - 9:54 pm

भाग १

लेख प्रत्यक्ष भटकंतीचा नसला तरी, एक प्रादेशिक वैविध्याचा अनुभव देणारा असल्याने या विभागात लिहितो आहे. यात आपण भारताची सफर करणार आहोत पण दृकश्राव्य संगीताच्या च्या माध्यमातून... भारतात अनेक बोली-भाषांमधील स्थानिक सांस्कृतिक झलक दाखविणाऱ्या गीतांची निवड करून रोज थोडी येथे देण्याचा हा उपक्रम असेल. अट इतकीच कि सगळी गाणी पूर्ण पाहायची-ऐकायची, काही आवडतील काही नाही आवडणार, काही गुणगुणावीशी सुद्धा वाटतील तर काही भाषा किंवा सुरावट अपरिचित असल्याने निरस वाटू शकतील, पण कशीही असली तरी आपल्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव करून देणारी आहेत आणि म्हणून या पुढील काही दिवस चालणाऱ्या 'वॉच पार्टी' साठी आग्रहाचे आमंत्रण!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाषांच्या विविधतेत सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक नागालँड, आणि एक विशेष संगीत परंपरा जपणारे. कदाचित या राज्याचे या मालिकेत सर्वाधिक व्हिडीओ असतील, त्यातले पहिले ५ नक्की पहा. आणि फुलस्क्रीन पहा!

१७. नागालँड - भाषा हिंदी व चाखेसांग

काय पाहाल : नागालँडचा पावसाळ्यातील चिंब निसर्ग (व्हिडीओ ला ४ मिनिटांची प्रस्तावना आहे पण थेट गाण्यांपाशी तो सुरु होईल अशाच प्रकारे दिला आहे, तुम्ही सुरुवातीपासून पाहू शकता). माझा अत्यंत आवडता बँड, तेत्सेओ सिस्टर्स
काय ऐकाल : नागा संगीताची तोंडओळख, त्यांची वाद्ये व फिल्मी संगीत यांचा सुंदर मिलाफ.

नागालँड - भाषा माओ

काय पाहाल : विविध नागा जातींचे पारंपरिक पोशाख, सुखद निसर्ग
काय ऐकाल : आधुनिक गीत

नागालँड - भाषा झेलिआंगरॉन्ग (झेमे, लिआंगमाई व रॉन्गमेई जमाती)

काय पाहाल : झेमे, लिआंगमाई व रॉन्गमेई जमातींची वाद्ये वस्त्रे व दक्षिण नागालँड चा निसर्ग
काय ऐकाल : पारंपरिक संगीत

नागालँड - भाषा अंगामी

काय पाहाल : नयनरम्य ड्रोन दृश्ये
काय ऐकाल : माझा दुसरा आवडता बँड, 'कलर्ड कीज', वॉरियर कॉल्स चा गाण्यात उपयोग, पारंपरिक व आधुनिक मिश्र संगीत

नागालँड - भाषा झेलिआंगरॉन्ग

काय ऐकाल : पाश्चात्य गीत, सुंदर रचना

नागालँड - भाषा सुमी

काय पाहाल : सुमी जातीचे जीवन
काय ऐकाल : वॉरिअर कॉल्स व पारंपरिक गीत

नागालँड - भाषा चोकरी

काय पाहाल : पुन्हा एकदा तेत्सेओ सिस्टर्स
काय ऐकाल : पारंपरिक नागा गीत.

नागालँड - भाषा सांगताम

काय पाहाल : सांगताम जमातीचे जीवन
काय ऐकाल : पाश्चात्य गीत, इंग्रजी मिक्स

नागालँड - भाषा काचारी

काय पाहाल : काचारी वेष, असामीच्या जवळचे
काय ऐकाल : भाषा आसामी बंगालीच्या अधिक जवळ, संगीत पद्धतीसुद्धा जरा अधिक परिचित

नागालँड - भाषा फोम

काय पाहाल : फोम स्त्रियांचे वेष
काय ऐकाल : पाश्चात्य चालीचे गीत

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


१५. आसाम - भाषा बरं (बोडो)

काय पाहाल : आसाम हा सर्वात समृद्ध वस्त्र संस्कृतीचा प्रदेश, त्यातही बोडो जमातीची वस्त्रे अत्यंत देखणी.
काय ऐकाल : पारंपरिक संगीत वाद्ये, मृदूंगाचा ठेका, दोतारा सारंगी.

आसाम - भाषा अहोमिया (आसामी)

काय पाहाल : माजुली या ब्रह्मपुत्रेतील बेटावरील खेड्यातील साधे जीवन. शेती व वस्त्रोद्योग. आसामी कला.
काय ऐकाल : आसामी परंपरेचे भावुक संदर्भ.

आसाम - भाषा कार्बी

काय पाहाल : कार्बी क्षात्र परंपरा, वेशभूषा, बांबू नृत्य.
काय ऐकाल : पारंपरिक गीत.

आसाम - भाषा मिसिंग

काय पाहाल : ब्रह्मपुत्रेचे विशाल पात्र, पारंपरिक वेष .
काय ऐकाल : पारंपरिक गीत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१६. मणिपूर - मैतेई बिष्णुप्रिया

काय पाहाल : विणकर जीवनशैली, मणिपुरी मार्शल आर्ट
काय ऐकाल : पारंपरिक गीत

काय पाहाल : मणिपूरचा राज्यप्राणी 'सांगाय' हरणाच्या हालचाली मणिपुरी शास्त्रीय नृत्यातून साकारताना नर्तकी, सांगाय हरणे, निसर्ग.

मणिपूर - भाषा थाडॉ

काय पाहाल : दक्षिण मणिपूरमधील आधुनिकता, या भागात एकंदर जीवनमान किती उंचावलेले आहे हे दिसते
काय ऐकाल : आधुनिक गीत.

मणिपूर - भाषा टांगखुल

काय पाहाल : वेशभूषा, उत्तर सीमावर्ती मणिपूरचा निसर्ग
काय ऐकाल : पाश्चात्य शैलीतले गीत. अगदी मुंबई दिल्लीतले भले भले सुद्धा पाश्चात्य संगीताच्या बाबतीत या राज्यांतील कलाकारांसमोर झक मारतात

मणिपूर - भाषा सोप्वोमा (माओ जमात)

काय पाहाल : उत्तर मणिपूर चा निसर्ग, माओ जमातीची वेशभूषा
काय ऐकाल : पारंपरिक गीत

मणिपूर - भाषा पॉला

काय पाहाल : आधुनिकता, या भागात एकंदर जीवनमान किती उंचावलेले आहे हे दिसते
काय ऐकाल : आधुनिक गीत.

मणिपूर - भाषा रोंगमेई

काय पाहाल : रोंगमेई जमातीचे जीवन, पश्चिम मणिपूरचा नेत्रसुखद निसर्ग
काय ऐकाल : पारंपरिक गीत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2020 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन येऊ दया. छान लेखन आहे.

-दिलीप बिरुटे

दो-तारा सारंगीचे स्वर झकास.

हा उपक्रम फार आवडला आहे.

मदनबाण's picture

8 Apr 2020 - 4:32 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising

किल्लेदार's picture

8 Apr 2020 - 5:31 pm | किल्लेदार

ईशान्य भारत काहीच पाहिला नाही. इथेच बसल्याबसल्या बघून घेतो.

ramjya's picture

19 Apr 2020 - 12:38 pm | ramjya

मी तिन्सुकिया ला आलो होतो....दिमापुर स्टेशन पाहिले आहे...ईशान्य भारत सुन्दर आहे